February 10, 2012, 01:15:55 AM
Welcome,
Guest
. Please
login
or
register
.
1 Hour
1 Day
1 Week
1 Month
Forever
Login with username, password and session length
News
: Note: New user registration is Enable till 15 Aug 2011
Back to Website
Home
Help
Search
Login
Register
Jeevanvidya Discussion Forums
>
General Category
>
Experiences
>
Experience of Shri. Sadguru Krupa-Shri. Sadguru Kary--
Pages: [
1
]
Go Down
« previous
next »
Print
Author
Topic: Experience of Shri. Sadguru Krupa-Shri. Sadguru Kary-- (Read 1669 times)
dr.nutanpol
Senior Namdharaks
Ultimate Contributor
Offline
Gender:
Posts: 429
Experience of Shri. Sadguru Krupa-Shri. Sadguru Kary--
«
on:
March 02, 2007, 05:26:07 PM »
विश्वसंत श्री. सदगुरू पै माऊलींना कोटी कोटी नमस्कार तसेच सौ. माऊलींना कोटी कोटी नमस्कार.
श्री. सदगुरू कृपेने कार्य करीत असताना श्री. सदगुरू कृपेचा जो अनुभव आला त्याविषयी अनुभव कथन करीत आहे.
माझ्या गुडघ्याला सुमारे १२ वर्षांपुर्वी स्कुटर मुळे अपघात होऊन ईजा झाली. या अपघातामुळे गुडघ्याचा सांध्याला जबरदस्त मार लागला. कारण स्कुटर गुडघ्यावर आदळली गेली. परिणामी मला २-३ महिने आधाराशिवाय उभेही रहाता येत नव्हते.आणि त्यानंतर श्री. सदगुरू कृपेने हळू हळू कुबडीच्या मदतीने चालता येऊ लागले.
इंदापुर येथे ग्रंथदिंडी जाहीर झाली आणि त्याच दरम्यान बहिणीकडे हडपसरला वास्तुशांति निमित्त प्रबोधक श्री. राजाभाऊ पाटील यांचे प्रवचन ठरवले होते. दिवाळीत हा कार्यक्रम आणि त्यानंतर ग्रंथदिंडी असा कार्यक्रम होता. मला वाशी शाखेतुन कोणीही ग्रंथदिंडीसाठी नेणार नाही याची खात्री होती कारण एक तर पाय अधू व दुसरे म्हणजे वजनही जास्त..(हे वजन नंतर बरेच कमी झाले) मला चालताना पाहुन लोकांना टेन्शन यायचे. एका खांद्याला कुबडी व दुसरा हात कोणाच्या तरी खांद्यावर, अशाप्रकारे मी चालत असे. मला एवढा आधार घ्यावा लागे म्हणून मी जास्त घराबाहेर पडत नसे. फक्त प्रवचनांना व श्री. सदगुरूंच्या कार्यक्रमांना नियमितपणे बाहेर पडत असे. आता घरात बसून उपयोगाचे नाही. नुसते घरात बसून प्रार्थना म्हणून उपयोगाचे नाही तर बाहेर पडून आपण कार्यात भाग घेतला पाहिजे. हे विचार माझ्या मनात वारंवार येत. त्या दरम्यान वाशीला श्री. सदगुरूंचा कार्यक्रम झाला व त्यात ते म्हणाले की मला फक्त माझ्यावर प्रेम करणारे लोक नको आहेत तर कार्य करणारे लोक हवे आहेत ते ऐकून तर माझी खात्रीच पटली की, मला कोणत्याही परिस्थितीत कार्यात सहभागी झाले पाहिजे. मी आधी श्री. सदगुरूंना मनातल्या मनात खुप प्रार्थना आणि विनंती केली काही करून मला ग्रंथदिंडीला जायचे आहे आणि ही ईच्छा तुम्ही पुर्ण करा आणि बहिणीला सांगितले तु श्री, संतोष तोत्रे यांना माझ्या पायाची कल्पना दे म्हणजे ते मला तेथे कोणते तरी बैठे काम देतील.
मी इंदापुरला माझ्या दोन मुली, बहिण, तिचा मुलगा, भावजय व तिचा लहान मुलगा असे गेलो.मला तेथे बैठे काम मिळाले नाही. मी एका ग्रुप बरोबर टाटा सुमो मधुन जात असे. तेथे गाडीतुन माईकवर कार्यक्रमाची माहिती सांगणे व प्रार्थना म्हणणे, अमृत तुषार व जीवनविद्येचे तत्वज्ञान थोडक्यात सांगणे, ग्रंथदिंडीला आलेल्या नामधारकांची लहान मुले संभाळणे , पत्रके वाटणे, गाडीतुन ग्रंथदिंडी करणे असे काम करीत असे. यातच माझी दुसऱ्याच दिवशी कुबडी तुटली. माझी खोली दुसऱ्या मजल्यावर होती. मला दोन व्यक्तींच्या मदतीने चालावे लागे. मी हॉलच्या बाहेरच जेवत असे. असे ६-७ दिवस सदगुरू कृपेने दररोज ग्रंथदिंडीला जात असे.
या ग्रंथदिंडीचा मला अत्यंत फायदा झाला. माझे मन नुसते आनंदात नहात होते. माझा आत्मविश्वास खुप वाढला. आणि त्यानंतर अनेक ठिकाणी मी स्थानिक ,नवी मुंबईत इतर ठिकाणी व बाहेर गावी श्री. सदगुरू कृपेने ग्रंथदिंडीला जाऊ लागले. श्री. सदगुरू कृपेने बालसंस्कार केन्द्र ही सुरू झाले. हळू हळू पायात बरीच सुधारणा झाली आणि श्री. सदगुरू कृपेने आता कोणताही आधार न घेता चालता येते.
हा अनुभव जेव्हा advance course च्या गप्पा-टप्पा कार्यक्रमात सांगितला तेंव्हा प्रबोधक श्री. जगदीश बोंद्रे म्हणाले की सदगुरू महिमा अगाध आहे. सदगुरू सेवेला पर्याय नाही. तुम्हाला तुमची प्रगती लवकर व्हावी असे वाटत असेल तर जमेल तेवढे जास्तीत जास्त सदगुरू कार्यात भाग घ्या.
आत्मिक प्रगतीसाठी साधनेबरोबरच सदगुरू कृपा आवश्यक आहे. सदगुरू कृपा सदगुरू-सेवेतुन अधिक प्रमाणात आणि लवकर होते कारण जेंव्हा आपण इतरांच्या प्रगतीसाठी प्रयत्नशील असतो तेंव्हा त्यांच्याबरोबर आपलीही प्रगती अधिक वेगाने होते.
अनुग्रह देतानाच श्री. सदगुरू असे म्हणतात की तुम्हाला जमेल तसे तुम्ही श्री.सदगुरू कार्यात भाग घ्या. यासाठीच जीवनविद्येने नवनवीन उपक्रम सुरू केले आहेत. श्री. सदगुरू म्हणतात ग्रंथदिंडी हा माझा प्राण आहे. तो तुम्ही जपा. ही ग्रंथदिंडी केल्याने हजारो लोकांना फायदा झाला आहे.
माझ्यावर श्री. सदगुरूंनी अत्यंत कृपाळू दृष्टी ठेवून अनंत उपकार केले आहेत. मला माझ्या मुलींबरोबर रस्त्याने मोकळ्या हाताने जेंव्हा चालता आले तेंव्हा झालेला आनंद शब्दांनी व्यक्त करू शकत नाही.
म्हणून म्हणावेसे वाटते हे सदगुरू राया तुझ्या कृपेची बरसात सर्वांच्या जीवनात अशीच बरसू दे आणि सर्वांना अखंड जीवनविद्येची-प्रार्थनेची-सदगुरू सेवेची साथ लाभू दे.
थोडक्यात सदगुरू-सेवेचा महिमा अगाध, अवर्णनीय आहे. याचा सर्वांनी लाभ करून घ्यावा व आपली प्रगती साधावी ही अत्यंत तळमळीची प्रार्थना.......
Report to moderator
Logged
Sarve Sukhinha santu! Sarve bhadrani pashyantu!
May Divinity Within All get bloomed!
May God Bless all!
gargi
Junior Contributor
Offline
Gender:
Posts: 85
Re: Experience of Shri. Sadguru Krupa-Shri. Sadguru Kary--
«
Reply #1 on:
March 07, 2007, 04:47:11 AM »
Dear all,
I would like to share what may seem like a coincidence but I think its a result of trying to think of only positive thoughts, vishwaprarthana and sadguru's teachings. I was at work and chanting the vishwaprarthana during my lunch break. After lunch, I had a meeting and I reached the meeting room a little early. I saw a couple of scenic pictures on the wall and decided to read what was written on them. It said choose your thoughts because thoughts are converted to words and actions,actions to habits , habits to character and character to destiny.
The other picture described the importance of having a positive attitude which acts as a catalyst to set forward positive events and circumstances. Little incidences like this strenghthen my belief in sadguru's teachings. May everyone think only positive thoughts, speak only positive words and and do only positive actions.
May God Bless All
Namdahark
Report to moderator
Logged
Pages: [
1
]
Go Up
Print
« previous
next »
Jump to:
Please select a destination:
-----------------------------
General Category
-----------------------------
=> General Discussion
=> Events & Programmes
=> Jeevanvidya Philosophy
=> Experiences
=> eAbhyasVarg - Online Classroom
=> About Jeevanvidya Website
Loading...