Dear Mr. Sham
? ? ? ? ?But I know one thing from this you are studying Jeevan Vidya very well and I should study it more hard like you.
Dear Sachin Dhopat,
नमस्कार,
I have already replied your post. It served the purpose of acknowledgement only. But I noted your name in my notebook to send you detail reply latter.
Now I have no alternative to take the help of my mother tounge.
जीवनविद्येचा अभ्यास करत राहून धेय्याप्रत पोहोचणे हा खूप लांबचा पल्ला असावा. (किती जन्म माहित नाही) पण त्याला पर्यायही नाही. एकट्याने प्रवास करण्याऎवजी तुझ्यासारखा सोबती मिळाला तर बरे म्हणून हे सर्व लिहितोय.
मी अभ्यास कसा करतोय व तसाच का करतोय इतकेच मला सांगावयाचे आहे. तेच बरोबर आहे असे मला म्हणावयाचे नाही.
मी सद्या Notes काढतोय. पण मार्क मीळवण्याची पद्धत मला वापरायची नाहिय्ये.
मला जे महत्वाचे वाटतेय, तेवढेच मी लिहून काढतोय. नंतर तेच वाचत राहाणार आहे.? तसेच धेय्य गाठण्यासाठी प्रत्येकालाच बहीर्मनातील युक्त्या वापरावयास लागणार आहेत.? त्या प्रत्येकासाठी वेगवेगळ्या असणार आहेत. त्या ज्याचे त्यानेच शॊधून काढावयाच्या आहेत. आपण ज्या युक्त्या वापरणार आहोत त्या युक्त्यांबाबत शंका असेल तर सदगुरूंचे मार्गदर्शन घ्यावयाचे आहे.
आता हे सर्व मला कसे सुचते आहे ते सांगतो.
तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार या पुस्तकांत पान क्र. ६२ वर दिलेल्या साखळीचा पहिला भाग सदगुरुंनी असा दिला आहे.
परिस्थिती -->? संगत? -->? संस्कार? -->? वासना? -- विचार
यातील पहिले चार घटक प्रत्येकाचे वेगवेगळे असल्याने पाचव्या घटकाचे स्वरूपही प्रत्येकाचे वेगवेगळे असणार.? त्यामुळे Notes काढताना प्रत्येकाला महत्वाचे वाटणारे मुद्दे वेगवेगळे असणार.? आपण कशावर जास्त जोर द्यावयाचा याबाबतच्या प्रत्येकाच्या priorities / order of prefrences वेगवेगळ्या असणार आहेत.
माझे वडिल मला सांगत असत की "Writting makes a man perfect" म्हणून मी माझे सर्व मुद्दे लिहून काढणार आहे.
तसेच जर तू हुषार असशील (नव्हे तू आहेसच) तर हुषार माणसाला नेहमी नविन काहितरी वाचायला आवडते.? तेच तेच वाचायचा कंटाळा येतो.? जर मला तेच तेच वाचायचा कंटाळा आला तर त्यासाठी मी एक युक्ती वापरणार आहे.
"मी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन जीवनविद्येचे" या पुस्तकातील प्रश्न क्र. ३ चे ऊत्तरात अगदी शेवटी दिलेले वाक्य "There is no vision without revision" हे वाक्य कंटाळा जाई पर्यंत म्हणणार आहे.? आज ना उद्या हे वाक्य माझ्या अंतर्मनांत खोल शिरुन माझ्यात बदल केल्याशिवाय राहणार नाही याची मला खात्री आहे.
मला असे सारखे वाटतेय की आपल्या अंतर्मनात खोलवर रुतुन बसलेले राग व क्रोध
विशेषकरुन द्वेष व मत्सर समुळ निपटून काढून सर्वाभूती प्रेमभाव निर्माण होण्याची युक्ती म्हणजे आपण रोज म्हणतो ती प्रार्थना होय. हीच बहीर्मनातील युक्ती असेल काय ?
Regards,
ShamBhagwat