Jeevanvidya Discussion Forums
May 20, 2012, 12:05:08 AM *
Welcome, Guest. Please login or register.

Login with username, password and session length
News: Note: New user registration is Enable till 15 Aug 2011
 
  Back to Website   Home   Help Search Login Register  
Pages: [1]   Go Down
  Print  
Author Topic: Granth dindi haa maza pran ase sadguru ka mhanatat  (Read 1553 times)
prashant
New Contributor
*
Offline Offline

Posts: 5


« on: May 12, 2007, 05:45:12 PM »

Vittal Vittal,
   please tell me that why sadguru always tell us that,'Granth dindi haa maza pran aahe .'
   how granthdindi is also one type of sadhana?
 
   thanking everybody ,
  god bless every body

   Regards,
       Prashant
Report to moderator   Logged
dr.nutanpol
Senior Namdharaks
Ultimate Contributor
*
Offline Offline

Gender: Female
Posts: 429



« Reply #1 on: May 25, 2007, 01:59:52 PM »

अखिल मानवजातीला शांती सुखाचा राजमार्ग दाखवणाऱ्या श्री. सदगुरू पै माऊली व त्यांना पति हाच देव या भावनेने साथ देणाऱ्या सौ. माई यांच्या चरणी कोटी कोटी प्रणाम.

सर्वांना सप्रेम अभिवादन.

please tell me that why sadguru always tell us that,'Granth dindi haa maza pran aahe .'
   how granthdindi is also one type of sadhana?


या प्रश्नावर चिंतन करण्याचा श्री. सदगुरू कृपेने प्रयत्न करू या.

   श्री सदगुरूंच्या ग्रंथांचे महत्व अपरंपार आहे व हे आपल्यापैकी सर्वांनाच मान्य आहे.  हे ग्रंथ आपले खरे मित्र आहेत. ते आपल्याला जीवन  यशस्वीपणे कसे  जगायचे? यश-समृध्दी कशी मिळवायची? आधिभौतिक व आत्मिक उन्नती कशी करायची? शांती- सुख-समाधान  कसे मिळवायचे? याचे मार्गदर्शन करतात. शिवाय ते सोबत करण्यासाठी सोयीस्कर आहेत. सर्वात मह्त्वाचे म्हणजे ते आपल्याला श्री. सदगुरूंचे ज्ञान जसेच्या तसे देतात. त्यामुळे त्याच्या शुध्दतेविषयी आपल्याला खात्री असते.

श्री. सदगुरूंचे ग्रंथ हे आपले खरे मार्गदर्शक आहेत. कारण ते तो मार्ग दाखवतात ज्या मार्गाने गेल्यावर आपल्या अमित, अवीट आत्मसुख मिळेल. असे सुख जे कोणत्याही बाह्य गोष्टींवर अवलंबून नाही. त्याला बाह्य उपकरणांची, पैशाची गरज नाही व जे सुख आपल्याच जवळ आहे पण ते एरवी आपल्याला मिळू शकत नाही ते कसे मिळवायचे तो मार्ग दाखवतात. तसेच जीवन जगण्याची कला आपल्याला समजावून सांगतात. शहाणपण का व कसे मिळवायचे ते सांगतात.

 Knowledge is God  असे म्हटले जाते. श्री. सदगुरूंचा देह ज्ञानरूपाने ग्रंथांत वास करून आहे. त्यामुळे श्री. सदगुरू ग्रंथ दिंडी हा माझा प्राण आहे असे म्हणतात.

   ग्रंथ दिंडी अत्यंत श्रेष्ठ अशी साधना आहे. दिंडीत असताना केवळ श्री. सदगुरूंच्या तत्वज्ञानाचे, सेवा कार्याचे भान  असायला पाहिजे आणि असते. त्यामुळे आपल्या नकळत आपले श्री. गुरूंशी सतत अनुसंधान होते.

   दिंडी करत असताना काही जण आपला आदर करतात, मानाने वागवतात. तर काही जण आपला तिरस्कार करतात, तुच्छतेने वागवतात. काही लोक हाडझीडही करतात. यामुळे दोन्हीकडे समान दृष्टीने पहाण्याची सवय अंगी बाणवावी लागते यातून आपली सहन शक्ती, संयम हे गुण वाढतात. जेवणाची-रहाण्याची सोय सगळीकडे उत्तमरीतीने होते असे नाही त्यामुळे विषम परिस्थितीतही संयमाने कसे राहून आनंदाने कार्य कसे करावे हे शिकायला मिळते. कार्य करत असताना आपले सहकाऱ्यांबरोबर कार्य करण्याच्या पध्दतीवरून मतभेद होऊ शकतात अशावेळेस तडजोडीने वागून आपल्या म्हणण्यापेक्षा कार्याला प्राधान्य द्यावे लागते. त्यामुळे सामंजस्य व शहाणपण हे गुण वाढीस लागतात.   
     
    दिंडीत नेतृत्व करणे, आपले म्हणणे दुसऱ्याला समजावून सांगता येणे, सभाधीटपणा, गाण्याची कला, वादन कौशल्य, अशा विविध गुणांचा विकास होतो. व्यक्तीमत्व विकास व्हावा म्हणूनअनेक तरूण -तरूणी बरेच पैसे खर्च करतात अनेक कोर्सेस व शिबीरे जॉईन करतात पण पदरात फारसे काही पडत नाही. तरूणांना विनंती आहे की त्यांनी जीवन विद्येचा बेसिक कोर्स करावा आणि ग्रंथ दिंडीत भाग घ्यावा यामुळे त्यांच्या व्यक्तीमत्वाचा अत्यंत सुंदर असा विकास होईल.

    एकोप्याने कसे रहायचे, दुसऱ्याला संभाळून घेत गोड बोलून त्याच्या मदतीने कार्य करायचे हे समजते. दुसऱ्याच्या विकासात आपला विकास, दुसऱ्याच्या सुखात आपले सुख कसे ? याचा प्रत्यक्ष अनुभव दिंडी करताना येतो. श्री. सदगुरूंच्या उपदेशामुळे लोकांचे कसे भले झाले व होत आहे याचे अनेक किस्से आपल्याला दिंडी करताना ऐकायला मिळतात. लोकांचे भले करण्याच्या, ज्ञानी करून अंधश्रध्देतून त्यांना मुक्त करण्याच्या, व्यसनमुक्त करण्याच्या, सुखी करण्याच्या श्री.सदगुरूंनी हाती घेतलेल्या ऐतिहासिक  कार्याचे आपणही साक्षीदार आहोत, एक घटक आहोत याचे अपूर्व समाधान दिंडीत मिळते.  यामुळे आपल्याला सर्वांना सुखी करण्याच्या जीवनविद्या मिशनच्या मिशनमध्ये सहभागी झाल्याचे पूण्य मिळते.

  ग्रंथ दिंडीत तनाने, मनाने व धनाने सहभागी होता येते. या सहभागाने अनेकांचे कल्याण झाले व होत आहे. सर्वांचे लाडके प्रबोधनकार श्री. अशोक खवळे यांनी अनेक ग्रंथ दिंडीत भाग घेतला आहे व घेत असतात. त्यांचे ग्रंथदिंडीवरील विचार व अनुभव ऐकण्यासारखे आहेत.  संधी मिळाल्यास सर्वांनी त्याचा फायदा घ्यावा. तसेच चारकोप कांदिवली येथील नेत्रदीपक कार्यक्रमाच्या शिल्पकार सौ. शीतलताई गोरे यांनी देखील अनेक ग्रंथदिंड्या आयोजित केल्या व करत असतात. जीवनविद्या मिशनच्या सर्व शाखा या श्री. सदगुरू प्रणित आणि त्यांना अत्यंत आवडणाऱ्या उपक्रमात भाग घेत असतात. मी या दिंडीचा अनुभव अनेक वेळा घेतला आहे व आजन्म यात सहभागी होता यावे अशी श्री.सदगुरूचरणी प्रार्थना आहे. दिंडीने मला अपरिमित लाभ झाला आहे.

  डॉ. विजय बापू गवंडी यांनी आपल्याला ग्रंथदिंडीचा कसा फायदा झाला, व्यक्तिमत्व विकास कसा झाला व ती अगणित पुणयाईची खाण कशी? याचे सुरेख वर्णन "आदर्श विद्यार्थी आदर्श पालक" य़ा ग्रंथात पान ३४ पासून पुढे केलेले आहे. ते या ग्रंथातूनच वाचण्यासारखे आहे. ते आज अमेरिकेत पी. एच् डी नंतरचे शिक्षण घेत आहेत.

     थोडक्यात एक तरी ज्ञानेश्वरीची ओळी अनुभवावी हे जसे तसे एक तरी ग्रंथदिंडी करावी असे आहे आणि याचा प्रत्यक्षच अनुभव घेतला पाहिजे.

ग्रंथदिंडी करून आत्मकल्याण करून घेण्याची बुध्दी सर्वांना होवो ही श्री. सदगुरू चरणी प्रार्थना..........
Report to moderator   Logged

Sarve Sukhinha santu! Sarve bhadrani pashyantu!
May Divinity Within All get bloomed!
May God Bless all!
Pages: [1]   Go Up
  Print  
 
Jump to:  

Powered by MySQL Powered by PHP Powered by SMF 1.1.14 | SMF © 2006-2011, Simple Machines LLC Valid XHTML 1.0! Valid CSS!