shambhagwat
Guest Members
Ultimate Contributor
Offline
Gender: 
Posts: 308
|
 |
« Reply #15 on: September 18, 2007, 01:17:47 PM » |
|
सर्वांना नमस्कार,
१) जे आपल्याला येते त्यावर जास्त भर द्यावयाचा व जे अवघड वाटते ते option ला टाकायचे अशी साधारणत: माणसाची प्रवृत्ती असते. असे होऊ नये यासाठी आपल्याला जे येत नाही त्यावर आपण जास्त भर द्यायला हवा. कित्येक वेळेस शब्दच कळत नाहीत तर कित्येक वेळेस शब्द कळतात पण अर्थच कळत नाही. काहीवेळेला अर्थ कळलेला नसतो तर फक्त कळल्यासारखा वाटतो. शेवटी अशी स्थिती येते की, शब्द कळलेले असतात. अर्थही कळलेला असतो. मार्गही दिसत असतो पण त्याची प्रचिती आलेली नसते. हीच साधकावस्था असते असे मला वाटते. (फक्त साधावयाचे राहिलेले असते.) ही साधकावस्था येईपर्यंत तरी ह्या पध्दतीने अभ्यास करावयास लागतो असे मला वाटते. थोडक्यात या पुस्तकातून आपल्याला काय कळले यापेक्षा मला अजूनही काय कळलेले नाही यावर आपण जास्त भर देऊया. म्हणजे ग्रंथ वाचायला घ्यावयाचा व आपल्याला काय कळलेले नाही त्याचीच टिपणे काढावयाची. "बहिर्मनातील युक्ती" यावरील चर्चा सुरू करताना माझा हाच प्रयत्न होता व माझी अशी समजूत आहे की, माझ्यासकट बऱ्याच जणांच्या बुध्दीला बराच पौष्टिक खुराक मिळाला होता. असो. मी हा विचार मांडला असल्याने त्याप्रमाणे सुरवात करण्याची जबाबदारी माझ्यावरच येते असे मानून मी या ग्रंथातील एक वाक्य सुचवतो.
"चैतन्य स्वरूपात विचाराला विचार रुपाने स्फुरण्यासाठी जो अवकाश, तो अवकाश म्हणजेच विचारात सूक्ष्म रुपाने वास करून असणारे आकाश तत्व होय." पान क्र. ६३ व ६४ (याबाबत मला जे समजलेय किंवा समजल्यासारखे वाटतेय ते लिहिण्याचा प्रयत्न करून पोस्ट करेन. तो पर्यंत तुम्हीही प्रयत्न करा.
२) प्रश्नोत्तरांच्या साहाय्याने अभ्यास चांगला होतो पण जास्तीत जास्त मार्क मिळविण्याची हल्लीची परिक्षा पध्दतीचा फारसा उपयोग होईल असे वाटत नाही. त्यासाठी आपण लहानपणी एकमेकांना कोडी घालायचो ती पध्दत अनुसरता येईल. मात्र कोडे घालणाऱ्याने कोडे घालावयाच्या आधी आपले उत्तर तयार केलेले असले पाहिजे. ह्या पध्दतीने अभ्यासात रंजकता तर येईलच पण आपण आपोआपच जास्त बारकाईने वाचायला लागू. इथेही मी हा विचार मांडलेला असल्याने मलाच प्रथम एक कोडे सुचवावयाला लागेल.
मात्र "झाकली मूठ सव्वा लाखाची" या न्यायाने उत्तरे देण्याचे टाळू नका. आपण चुकीचे उत्तर दिले तर आपले हसे होईल असे वाटून बिचकू नका. आपण सगळेच एकमेकांच्या मदतीने शिकत आहोत हे लक्षात ठेवा. जर एखाद्याने तुम्हाला जे वाटते तेच लिहिले असेल तर त्याला दुजोरा द्यायला विसरू नका. त्यामुळे अगोदरच्याला आणखी धीर येईल. जेवढा सहभाग जास्त तेवढ्या प्रमाणात या फोरममधे जिवंतपणा येईल हे लक्षात ठेवा म्हणजे आपण आपले विचार किंवा मत मांडणे किती आवश्यक आहे कळेल. बोलण्यापेक्षाही आपले मत लेखी स्वरूपात मांडताना आपण आपोआपच जास्त प्रभावीपणे विचार करायला लागतो हे विसरू नका. असो. कोड्यात पाडणारा प्रश्न असा आहे की,
विश्वप्रार्थनेमधे चांगली बुध्दी व आरोग्य हे शब्द कशाचा नामनिर्देश करतात? "तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार' या ग्रंथाच्या आधारे स्पष्ट करा.
मी माझे उत्तर दहा दिवसांनी पोस्ट करेन.
सर्वांना नमस्कार. सर्वांना शुभेच्छा.
|
|
|
|
|
dr.nutanpol
Senior Namdharaks
Ultimate Contributor
Offline
Gender: 
Posts: 429
|
 |
« Reply #16 on: September 19, 2007, 02:30:01 AM » |
|
Namaskaar,
It is indeed good idea to start e-abhyas varg by puzzle and solution method. This way everbody's chintan process would be activated. I also agree with Shri. Subhash Kelkar on his view that by question-answer method, we should try to understand meaning of each sentence written by Shri. Satguru. I think we would continue abhyas varg by both the methods. Adhikasya adhikam phalam.
May everybody progress materially and psycho-spiritually!
|
Sarve Sukhinha santu! Sarve bhadrani pashyantu! May Divinity Within All get bloomed! May God Bless all!
|
|
|
shambhagwat
Guest Members
Ultimate Contributor
Offline
Gender: 
Posts: 308
|
 |
« Reply #17 on: September 19, 2007, 12:30:28 PM » |
|
सर्वांना नमस्कार,
प्रश्नोत्तरांचा अजिबातच उपयोग नाही असे मला काही सुचवावयाचे नव्हते. पण माझ्या पोस्टचा तसा अर्थ निघतोय हे नक्की. ही चूक लक्षात आणून दिल्याबद्दल नूतनताईंना मनापासून धन्यवाद. त्यासाठी चुकीची दुरुस्ती करत आहे.
जीवनविद्येच्या कुटुंबात जे नव्याने दाखल झालेले आहेत. किंवा ज्यांचा बेसीक कोर्स झालेला नाही अथवा नुकताच झाला आहे त्यांच्यासाठी प्रश्नोत्तर पध्दती ही अत्युकृष्टच आहे या बाबत मला काहीएक शंका नाही.
मात्र जे जीवनविद्येच्या प्रांगणात बरीच वर्षे आहेत. सत्गुरूंचा अनेक वर्षांचा सहवास लाभला आहे. त्यांची अनेक प्रवचने ऐकायला मिळायचे भाग्य ज्यांना लाभले आहे. सत्गुरूंची प्रकाशित झालेली सर्व पुस्तके किंवा कॅसेट इत्यादिंचा अभ्यास झाला आहे तसेच जे पुस्तक दिंडी वगैरे सारख्या सत्गुरू कार्यात सहभागी होत असतात अशांच्यासाठी मी माझी सूचना केली होती. मला वाटते अशा सिनिअर भक्तांकडून "तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार" या ग्रंथात लपलेल्या खजिन्याचा शोध घेतला जावा व त्यातील अप्रकाशित रत्ने त्यांनी इतरांसाठी खुली करून द्यावीत. अशा शोधक वृत्तीमुळेच अशा भक्तांमधून सत्गुरूंना अभिप्रेत असलेले विचारवंत तयार होतील जे भविष्यात मानवजातीपुढे उभ्या राहाणाऱ्या समस्यांचे निराकारण करू शकणारे उपायही शोधू शकतील. शुभ चिंतन, शुभेच्छा, शुभ बोलणे व शुभ कर्मे यांच्या आधारे आपल्या जेष्ठ भक्तांमधून असे विचारवंत तयार व्हावेत या हेतूनेच सत्गुरूंनी हा ग्रंथ लिहिला आहे असे मी तरी मानतो.
संदर्भ : "आज परिस्थिती अशी आहे की अविचारी व अडाणी लोकांची संख्या असंख्य आहे तर विचारवंत लोक केवळ मूठभर आहेत. विचारवंतांचा दुष्काळ व अविचारी लोकांचा सुळसुळाट हेच या जगाचे खरे दुर्दैव होय. हे प्रमाण जेव्हां उलटे होईल तेव्हांच या जगाचे नंदनवन होईल. प्रस्तुत ग्रंथ "तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार" हा या दिशेने केलेला प्रयत्न आहे." तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार पान क्र.२१५-२१६
टीप : मी जीवनविद्येत नवा आहे. वय वर्षे १.५ फक्त. मला अजूनही सत्गुरूंचा सहवास अथवा दर्शन अथवा त्यांच्या प्रवचनाचा योग आलेला नाही. मात्र ते त्यांच्या ग्रंथांद्वारे मला मार्गदर्शन करत आहेत याबाबत मला शंका नाही. अशी सर्व परिस्थिती असूनही मी जेष्ठांना काही सूचना करतोय म्हणजे लहान तोंडी मोठा घास घेतोय हे लक्षात आल्याने सर्व जेष्ठ भक्तांची क्षमा मागतो.
सर्वांना नमस्कार. सर्वांना शुभेच्छा.
|
|
|
|
|
rakeshmahashabde
Junior Contributor

Offline
Gender: 
Posts: 32
rakesh mahashabde
|
 |
« Reply #18 on: September 23, 2007, 11:34:49 PM » |
|
नमस्कार चांगली बुद्धि आणि आरोग्य ---- १--चांगली बुद्धि-- हिन्दी च्या प्रार्थनेत सन्मति शब्द घेतला आहे .मला तरी अस समझल कि ईश्वर सर्वाना अशी बुद्धि दे कि मनात नेहमी सदविचार राहे. २ -- आरोग्य -- शरीर निरोगी राहों कोंणत्या ही प्रकार ची व्याधि नसों सर्वांना शुभेच्छा.
|
|
|
|
|
DEVENDRA
New Contributor
Offline
Gender: 
Posts: 24
|
 |
« Reply #19 on: September 24, 2007, 01:24:19 AM » |
|
Dear All, Vitthal! Vitthal!!saprem Namaskar, विश्वप्रार्थनेमधे चांगली बुध्दी व आरोग्य हे शब्द कशाचा नामनिर्देश करतात? "तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार' या ग्रंथाच्या आधारे स्पष्ट करा.
Changali Buddhi:- Buddhiche vaibhav pratyekapashi ahe,pan bahutekankade nandate ti 'Durbuddhi'. Etar pranyanpeksha Manus shreshtha,karan tyachyapashi ahe buddhi.Durbuddhi mhanje manasa manasas dur karnari,dari nirman karanari. Changli Buddhi Mhanje "Shahanpan". Shahanpan Hach Narayan ani Narayan Tethe Sukh, Shanti, Samadhan, Anand. Aarogya:- Health is weaith.Health is Heaven. Health is Harmony.Health is Harvest of Happiness.& SHARIR SAKSHAT PARMESHWARMhanjech Var Sangitalyapramane Changali Buddhi Ani Arogya he Sakshat Narayan mhanje Parmeshwarcha ahet.
|
Thanks May God bless all akhanda shubhchintan & vishwaprarthana Devendra (Ghatkopar) 9220828744
|
|
|
dr.nutanpol
Senior Namdharaks
Ultimate Contributor
Offline
Gender: 
Posts: 429
|
 |
« Reply #20 on: September 24, 2007, 01:06:05 PM » |
|
नमस्कार,
बुध्दी म्हणजे निश्चयात्मक वृत्ती.
ती मनापेक्षा जास्त स्थिर असते आणि निर्णयात्मक असते. वृत्ती कशी निर्माण होते हे समजावून घेण्यासाठी आपण आपल्या मुळ स्वरूपातून ती कशी निर्माण होते ते पाहू. आपले मुळ स्वरूप-सत् + चित् + आनंद हे आहे. ही ३ पदे वेगवेगळी नाहीत. त्यांचे गुण मात्र वेगवेगळे आहेत. जसे साखर तिच्या आकार, गोडीपासून वेगवेगळी नाही. आनंद म्हणजे एका बाजूने सुख तर दुसऱ्या बाजूने तृप्तता आहे. यातील सत् म्हणजे एका बाजूने सत्य, नित्य, अस्तित्व, अखंड, असे आहे. तर दुसऱ्या बाजूने सत्ता, सामर्थ्य, शक्ती असे आहे. चित् = जाणीव+ नेणीव, म्हणजे (CONSCIOUSNESS AND UNCONSCIOUSNESS), (बाह्य मन +अंतर्मन+ अमन) असे जीवाच्या बाबतीत तर दिव्य मन (Divine Consciousness) हे शिवाच्या बाबतीत आहे. पण नुसते जाणीव असे म्हटल्यास त्यात नेणीव अंतर्भूत आहे असे समजावे. चैतन्याच्या विराट सागरातील जाणीवेत स्फुरण निर्माण होते. जसे सागरातुन लाट निर्माण होते तसे. पण सागरातील स्फुरणाला वारा कारणीभूत असतो. जाणीवेच्या स्फुरणाला कोणीही जबाबदार नसते. स्फुरणे हा जाणीवेच्या ठायी असणारा गुणधर्म आहे. जाणीवेचे मुळ स्फुरण म्हणजे असिपद आहे. केवळ अस्तित्व. ती असणे-स्व-शिव या पदावरून भाव या पदावर आरूढ होते. म्हणजेच जाणीव होणे किंवा प्रकट होणे या पदावर उपाधिच्या सहाय्याने आरूढ होते तेव्हा ती शिव या पदावरून घसरते आणि जीव या पदावर आरूढ होते. कारण उपाधि धारण केल्याबरोबर जाणीव स्वतःला विसरते व देह म्हणजे मी (खोटा सुक्ष्म अहंकार) असे समजू लागते. जाणीवेच्या उपाधिच्या सहाय्याने झालेल्या प्रकट साकार स्फुरणाला वृत्ती असे म्हणतात. वृत्ती जेव्हा निश्चय करते तेव्हा तिला बुध्दी असे म्हणतात.
बुध्दी चांगली दे याचा अर्थ -
म्हणून असा होऊ शकतो की बुध्दीला आपण कोण आहोत याचे स्मरण व्हावे, तसे प्रयत्न करावेत, आपण विश्वव्यापक आहोत ही जाणीव आपल्या ठायी निर्माण व्हावी अशी बुध्दी दे. असे स्मरण होणे आवश्यक आहे कारण ही तृप्ततेची अवस्था आहे. ही अवस्था प्राप्त व्हावी अखंड आनंदाची अवस्था प्राप्त व्हावी म्हणून जाणीव तळमळत आहे त्यासाठी तिची सारी धडपड सुरू आहे पण हा आनंद म्हणजेच आपण आहोत हे तिला ठाऊक नाही जे स्वतःजवळ आहे किंबहुना जे म्हणजे ती स्वतः आहे ते साऱ्या जगभर जाणीव शोधत आहे. हे कळण्यासाठी कितीतरी जन्म गेले आहेत. म्हणून संत तुकाराम महाराज म्हणतात, किती वेळा जन्मा यावे किती व्हावे फजित. मनुष्याच्या ठिकाणी असणाऱ्या जाणीवेलाच आपण आनंदमय आहोत, विश्वव्यापक आहोत याची अनुभूति येऊ शकते हे सामर्थ्य अन्य कोणत्याही जीवाच्या ठायी असणाऱ्या बुध्दीत नाही. आणि मनुष्य जन्म अतिशय दुर्लभ असा आहे. हे सारे खऱ्या अर्थाने समजण्यासाठी आणि उमजण्यासाठी त्यासाठी आवश्यक ती साधना मिळण्यासाठी, मार्गदर्शन होण्यासाठी आणि मार्गावर प्रवास करताना वारंवार जागे करण्यासाठीश्री. सदगुरू आवश्यक आहेत तेंव्हा त्यांचे महत्त्व सर्वांना समजो आणि श्री. सदगुरूंना शरण जाण्याची सर्वांना बुध्दी दे. सदगुरू बोध आत्मसात करावा, आवश्यक ती साधना करावी, सत्संग करावा, उत्कृष्ठ ग्रंथांचे वाचन व्हावे, सदगुरू कार्य-सेवा करावी, सतत शुभ चिंतन करावे, शुभ बोलावे, शुभ कर्मे-सत्कर्मे करावीत अशी बुध्दी दे. निग्रहाने दुष्कर्मे टाळावीत, वाईट लोकांच्या संगतीपासून आणि व्यसनांपासून अलिप्त रहावे अशी बुध्दी दे. देहाची उत्तम काळजी घ्यावी, , सर्व प्रांपचिक कर्तव्ये करीत वाट्याला आलेले सर्व काम आवडीने गोडीने करावे अशी बुध्दी दे. सर्वांच्या आनंदात आनंद मानण्याची आणि सर्वांच्या दुःखात सहभागी होऊन त्यांना आवश्यक ती आणि शक्य ती सर्व मदत करण्याची सहवेदना, संवेदना दे. श्री. सदगुरूंविषयी, आत्मदेवाविषयी, माता-पिता, शिक्षक, राष्ट्र, समाजातील सर्व घटकांविषयी आणि विश्वाविषयी कृतज्ञता कायम असावी अशी बुध्दी दे. थोडक्यात चांगली बुध्दी दे म्हणजेच सत् बुध्दी दे , सत् कडे घेऊन जाणारी बुध्दी सर्वांना दे. सर्वांच्या मनाचा विकास होत त्यांच्या मनाचा उर्ध्वगतीने प्रवास व्हावा अशी प्रेरणा त्यांच्या ठायी निर्माण होऊ दे आणि त्यासाठी आवश्यक ते सर्व प्रयत्न-साधना-सतत शुभ चिंतन करण्याची आणि निसर्ग नियमांशी सुसंगत जीवन जगण्याची सर्वांना बुध्दी दे.
चांगले आरोग्य लाभो म्हणजे- आरोग्य म्हणजे मन व देह या दोन्हींची सुअवस्था. मन सुवस्थेत रहाण्याचे एकच ठिकाण आहे आणि ते म्हणजे निजस्वरूपाच्या चरणी. आणि मन तेथेच चिकटले आहे-मुरले आहे अशी अवस्था सर्वांना लाभो म्हणजे मनाचे आरोग्य लाभो. कारण त्यात सर्वसुख आहे. देहाचे व मनाचे आरोग्य लाभण्यासाठी चांगली बुध्दी आवश्यक आहे आणि तिचा विचार आणि स्वरूपाच्या ठायी मन रहाण्यासाठी कोणत्या गोष्टी लाभणे आवश्यक आहे याचा विचार आपण आधी केला आहे. तेव्हा ते सर्व सर्वांना लाभो. देहाचे आरोग्य-देह आधि आणि व्याधि दोन्ही पासून मुक्त राहो. आधि म्हणजे मनाचे विकार ज्यांचा परिणाम देहावर होतो. व्याधी होण्याचे कारण नैमित्तिक असू शकते. आजारी व्यक्तीशी संबंध आला, आहारात पोषक द्र्व्यांची कमतरता निर्माण झाल्यामुळे व्याधि निर्माण होऊ शकतात. असे होऊ शकते अशी अनेक कारणे असली तरी आधि आणि व्याधि दोन्ही होण्याचे कारण पुर्वी केलेली देह किंवा/आणि मन यांच्या पातळीवर केलेली अशुभ कर्मे असे असू शकते. जर मनाचा प्रवास उर्ध्व गतीने श्री सदगुरूंच्या मार्गदर्शनाखाली सुरू राहील तर मनाचे विकार होणार नाहीत. आणि हातून अशुभ कर्मेही होणार नाहीत. मनाचा प्रवास उर्ध्व गतीने होण्यासाठी सदबुध्दी आवश्यक आहे आणि तिचा विचार आपण आधी केला आहे. याच बरोबर देहाचे आरोग्य संभाळण्यासाठी युक्त आहार, विहार, निद्रा, व्यायाम, योगासने, उत्तम संगती, उत्कृष्ठ संस्कार व योग्य शिकवण या सर्वांची नितांत गरज आहे म्हणून देहाचे आरोग्य उत्तम रहावे म्हणून सर्व आवश्यक ती सर्व काळजी घेवोत आणि आवश्यक ते सर्व सर्वांच्या जीवनी उपलब्ध होवो म्हणजे त्यांचे आरोग्य व्यवस्थित राहील अशी प्रभू जवळ प्रार्थना आहे.
|
Sarve Sukhinha santu! Sarve bhadrani pashyantu! May Divinity Within All get bloomed! May God Bless all!
|
|
|
shambhagwat
Guest Members
Ultimate Contributor
Offline
Gender: 
Posts: 308
|
 |
« Reply #21 on: September 28, 2007, 08:39:13 PM » |
|
सर्वांना नमस्कार.
१) विश्वप्रार्थनेमधे चांगली बुध्दी व आरोग्य हे शब्द कशाचा नामनिर्देश करतात? २) विश्वप्रार्थनेत "सुखात, आनंदात व ऐश्वर्यात" हे शब्द कशाचा नामनिर्देश करतात?
टीप : १) काही ठिकाणी वाक्याच्या सुरवातीला कंसात आकडा लिहिला आहे. हा आकडा संदर्भासाठी दिलेला असून, ज्या पानावर ते वाक्य आले असेल त्या पानाचा क्रमांक दर्शवितो. २) संदर्भ समाप्तीची खूण म्हणून मोकळा कंस वापरला आहे. ३) विश्वप्रार्थना शास्त्रीय आहे किंवा नाही हे ठरविण्यासाठी या लिखाणाचा कोणालातरी उपयोग होऊ शकेल असे वाटल्याने हा सर्व खटाटोप मी करत आहे. ४) जरा वेगळ्यापध्दतीने मी माझे मुद्दे मांडत असलो तरी मी "तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार" या ग्रंथाचाच आधार संपूर्णपणे घेतलेला आहे व इतर ग्रंथांचा संदर्भ देण्याचा मोह टाळला आहे. ५) माझ्याकडून अज्ञानामुळे अर्थाचा अनर्थ झाला असल्यास अथवा मी उगीचच बादरायणी संबंध जोडतोय असे वाटल्यास तुम्ही कोणीतरी ते लक्षात आणून द्या. ६) शेवटचे व महत्वाचे म्हणजे विश्वप्रार्थना समजावून घेतल्याने आपली संकल्पना स्पष्ट होऊन आपण विश्वप्रार्थनेप्रती दृठ भाव धरू हाच माझा खरा हेतू आहे. मात्र आपली प्रत्यक्ष प्रगती ही निव्वळ विश्वप्रार्थना अखंड म्हटल्यानेच होणार आहे ह्याचे भान ठेवले तर शब्दजंजाळात किती अडकायचे हे आपोआपच कळू शकेल.
(२७)आज अखिल मानवजात विनाशाच्या उंबरठ्यावर उभी आहे.() यावर काही इलाज करावयास पाहिजे असेल तर सर्वप्रथम आपल्याला अचूक कारण शोधावयास लागेल. कारण (४६)रोगावर वरवर मलमपट्टी करून भागत नाही, तर त्यासाठी रोगाचे अचूक निदान करून त्याचे मूळच निपटून काढणे आवश्यक असते.() सद्गुरूंनी ह्यासाठी प्रथम अचूक कारण शोधून काढले. ते कारण म्हणजे (२७)आपल्या व पर्यायाने समाजाच्या जीवनाला इष्ट किंवा अनिष्ट आकार देण्याचे कार्य आपणच म्हणजे आपलेच बहिर्मन व अंतर्मन परस्परांच्या संगनमताने कळत किंवा नकळत करीत असतात() ह्या विषयीचे समाजातील अज्ञान होय. समाजात पसरलेले हे अज्ञान दूर करणे हे सद्गुरूंचे एकमेव धेय्य आहे व त्यानुसार ते कार्य करीत आहेत.
या धेय्यप्राप्तीसाठी सर्वांना सहज उच्चार करता येईल, ज्याचा अर्थ कोणालाही सहज समजेल, वय, शिक्षण, जात, धर्म, आर्थिक परिस्थिती वगैरेचा कोणताही अडथळा नसेल तसेच त्यात सांप्रदायिकता नसेल व कोणाच्याही भावना ज्याने दुखविल्या जाणार नाहीत अशा साधनाची किंवा उपासना पध्दतीची आवश्यकता निर्माण झाली व त्या धडपडीतून विश्वप्रार्थनेचा उगम झाला आहे.
(५१)आपण मनाने जाणीवपूर्वक जे करतो ते सर्व करणारे बहिर्मन असते() हे लक्षात घेतले तर चांगला विचार हा जाणीवपूर्वक करायचा असतो म्हणजेच बहिर्मनाने करावयाचा असतो हे लक्षात येईल. विचार चांगला असो किंवा वाईट असो, (६३) विचारात जे विलक्षण सामर्थ्य आहे याचे प्रमुख कारण म्हणजे विचार किंवा वृत्ती म्हणजे प्रत्यक्षात चैतन्याची स्फुर्तीच होय.() जर आपली बुध्दी चांगली असेल तरच आपल्याकडून चांगला विचार केला जाईल हेही नक्की. आणखी खोलात जाऊन विचार करावयाचा झाल्यास (२२७) ही वृत्ती जेव्हा संकल्प-विकल्पात्मक असते तेव्हां तिला मन असे म्हणतात. ही वृत्ती जेव्हां निश्चयात्मक असते तेव्हां तिला बुध्दी म्हणतात.() हे लक्षात घेतले तर बुध्दी म्हणजे निश्चयात्मक वृत्ती किंवा निश्चयात्मक बहिर्मन किंवा निश्चयात्मक विचार होय. यासाठीच आपण परमेश्वराकडे चांगली बुध्दी मागत असतो. म्हणजेच आपण त्या परमेश्वराकडे विलक्षण सकारात्मक विचार सातत्याने व निश्चयपूर्वक (कुठल्याही प्रकारच्या शंकेचा अभाव) धारण केलेले बहिर्मन मागत असतो. अशारितीने सामान्यजनांना अत्युतम बहिर्मनाची प्राप्ती ह्या विश्वप्रार्थनेच्या द्वारे प्राप्त होते. मग त्यांना बहिर्मनाचे महत्व कळो अथवा न कळो. (६७) बहिर्मन व अंतर्मन हे दोन टाळ आहेत.() येथे सद्गुरूंना पहिला टाळ म्हणजे चांगल्या विचाराने सदैव भरलेले बहिर्मन अभिप्रेत असून आपण त्याचाच निर्देश "चांगली बुध्दी" ह्या शब्दाने करत असतो असे म्हणता येते.
(५५)नेणीवपूर्वक जी कार्ये मनाकडून केली जातात त्या मनाला अंतर्मन असे म्हणतात. आपल्या पोटात जे अन्न जाते, त्या अन्नाचे पचन करणे, मांस करणे, नखे करणे वगैरे अनेक गोष्टी या देहाच्या कारखान्यात तयार करण्याची कामे हे अंतर्मन करीत असते. त्याच प्रमाणे जागेपणी आपोआप श्वासोच्छ्वास चालणे, गाढ निद्रेत श्वसनक्रिया चालवत ठेवणे, हृदयाचे ठोके पाडण्याचे काम करणे, फुप्फुसाचे भाते वरखाली हालवत ठेवणे वगैरे अनेक क्रिया या शरिराचे ठिकाणी नकळत घडत असतात, त्या सर्व क्रिया करणारे मन म्हणजे अंतर्मन हे होय.() यावरून हे स्पष्टच होते की, रक्ताभिसरण संस्था, श्वासोच्छ्वास संस्था व पचनक्रिया संस्था या तीन महत्वाच्या गोष्टींद्वारे एकाद्याचे आरोग्य तपासले जाते व या तीनही गोष्टी अंतर्मनाच्या अखत्यारीत येतात हे लक्षात घेतले तर विश्वप्रार्थनेत आरोग्य हा शब्द अंतर्मनासाठी वापरलेला आहे हे कळते. थोडक्यात "आरोग्य" शब्द चांगल्या अंतर्मनाचा निर्देश करतो असे म्हणता येईल. याखेरीज अंतर्मनाचे आणखीन एक वैशिष्ट्य आहे त्याचा उल्लेख शेवटी केला आहे.
(५१)पांच कर्मेद्रिये व पांच ज्ञानेंद्रिये यांच्या द्वारे मन जगाशी संबंध जोडते व जगासंबंधीचे ज्ञान ते गोळा करीत असते() या वाक्यात "मन" हा शब्द बहिर्मन या अर्थाने वापरलेला आहे. ह्या कर्मेंद्रियात अथवा ज्ञानेंद्रियात जर जन्मत:च वैगुण्य असले तरीही अशा माणसाचे बहिर्मन चांगल्या बुध्दीने युक्त असेल म्हणजेच त्याच्या बहिर्मनात सदैव चांगले व सकारात्मक विचार राहातील; तसेच त्याची अंतर्मनाद्वारे चालणारी कार्ये कार्यक्षम असतील तर असा माणूस त्या जोरावर आपली प्रगती प्राप्त करून घेऊ शकतो. अशा वेळेस त्याचे वैगुण्य त्याच्या कार्याच्या किंवा प्रगतीच्या आड येऊ शकत नाही. (उदा. हेलन केलर)
अशा रितीने आपल्या बहिर्मनाची प्रत्येक क्रिया चांगली होऊन त्याला प्रतिक्रिया म्हणून आपले अंतर्मन सुरेख साद देते व त्यातून इष्ट नियती निर्माण होते. ह्या इष्ट नियतीचा परिणाम म्हणून आपल्याला सुख, आनंद व ऐश्वर्य प्राप्त होत असते. म्हणजेच सुख, आनंद व ऐश्वर्य हे तिनही शब्द "इष्ट नियती" किंवा "इष्ट नियतीचे परिणाम" या अर्थाने वापरलेले आहेत हे लक्षात येते. हे नीट कळावे म्हणून सद्गुरू उदाहरण देतात, (५८) एखादी बाई वस्त्र विणत असते त्यावेळेस थोडे निरीक्षण करावे. ती बाई हातात दोन सुया घेऊन सुताचे उभे व आडवे टाके फिरवित कार्य करत असते आणि हे करता करता आपोआप वस्त्र तयार होते.() हे वस्त्र म्हणजेच नियती होय. चांगले विचार व चांगले आरोग्य म्हणजे इष्ट नियती होय. अशा प्रकारची अनेक उदाहरणे सद्गुरूंनी दिलेली असून त्या सर्व उदाहरणांचा बोध नव्याने घेता येऊ शकेल.
माणसाला सुख, आनंद व ऐश्वर्य मिळाले की त्याच्या अंगी मद निर्माण होण्याची शक्यता असते. असे होऊ नये व हे सर्व प्राप्त झाल्यावरही आपले पाय जमिनीवरच राहावेत यासाठी भलं कर, कल्याण कर व रक्षण कर असे म्हणून आपण जे मिळवले आहे ते टिकविण्याचा प्रयत्न करत असतो. याबाबतची माझी मते अगोदरच मांडलेली असल्याने त्याचा पुनरुक्ती करत नाही.
|
|
|
|
|
shambhagwat
Guest Members
Ultimate Contributor
Offline
Gender: 
Posts: 308
|
 |
« Reply #22 on: September 28, 2007, 08:40:50 PM » |
|
इथपर्यंत माणसाचा प्रवास झाला की तो तृप्त होतो. त्याच्याकडे सगळे असते पण त्यात तो गुंतून पडला नाही पाहिजे यासाठी अखंड परमेश्वराचे स्मरण असण्यासाठी त्याचे नाम मुखात अखंड असणे आवश्यक आहे यासाठी "तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे" असे आपण म्हणत असतो. ही सर्वोच्च अवस्था आहे. ही स्थिती स्पष्ट करण्यासाठी सद्गुरू सांगतात, (६१) स्वत: निर्माण केलेल्या जाळ्यात जे रेशमी किड्यासारखे स्वत:च अडकतात ते बध्द तर याच्या उलट जे या जाळ्यात कोळ्यासारखे सुखाने विहार व व्यवहार करतात ते सिध्द किंवा मुक्त जाणावेत.() रेशमी किडा जो कोश तयार करतो तो कोश जर तुम्ही पाहिला असेल तर लक्षात येईल की तो कोष किती सुंदर दिसतो. रेशमापासून बनविलेली मुलायम, चमकदार टिकाऊ वस्त्रप्रावरणे डोळ्यासमोर आणा. विशेषकरून आपल्या भगिनिवर्गाला आवडणाऱ्या रेशमी साड्या, शालू व पैठणी डोळ्यासमोर आणा. म्हणजे लक्षात येईल की ही वस्त्रे इतकी सुंदर असतात आणि म्हणूनच त्यात त्या गुंतुंन पडू शकतात. अगदी तसेच या विश्वप्रार्थनेच्या द्वारे आपल्याला आयुष्यात कोणालाही हेवा वाटू शकेल इतक्या सुंदर गोष्टी प्राप्त होतात की त्या गोष्टींच्या मोहात पडणे किंवा त्यात गुंतून पडणे हे अगदी स्वाभाविकच म्हटले पाहिजे. यावेळेस भगवंताचे नाम मदतीला येते. त्या नामाच्या उच्चाराने त्या भगवंताचे नित्य स्मरण राहाते. जे आपल्याकडे आहे ते सर्व भगवंताचे आहे, त्यानेच ते दिले आहे हे भान जागृत राहायला लागते व हा शेवटच्या अडथळाही आपण ओलांडतो. या स्थितीपर्यंत पोहोचलेल्या माणसाला आता काही मिळवावयाचे राहिलेले नसते तर ज्यांना ते मिळालेले नाही त्यांना ते मिळावे यासाठी त्यांना मार्गदर्शन करावयाचे असते. "उरलो आता उपकारापुरता" या स्थितीत माणूस पोहोचलेला असतो. परमेश्वराचे भान अखंड राहिल्याने "जो जे भेटे भूत तो ते भगवंत" अशी मनाची धारणा झालेली असते व या प्रवासाच्या शेवटच्या टप्यात या धारणेचे रुपांतर प्रत्यक्ष अनुभूतीत होऊन तो कृतार्थ होतो.
आपणाला चांगली बुध्दी व चांगले आरोग्य प्राप्त झाले आहे. त्या आधारे इष्ट नियती निर्माण होऊन आपण सुखात, आनंदात व ऐश्वर्यात लोळत आहोत. इतकेच नव्हे तर असे असूनही आपल्याला कोणत्याही प्रकारचा ताठा अथवा गर्व झालेला नसून आपण नम्र आहोत. हे सगळे वैभव परमेश्वराने आपल्याला दिलेले आहे हे भान आपल्याला असल्यामुळे परमेश्वराप्रती पूर्णपणे कृतज्ञ आहोत. इतकेच नव्हे अखंड नामस्मरणाच्या आधारे मीच परमेश्वर असून मी सगळीकडे भरून राहिलोलो आहे अशी स्थिती प्राप्त होऊन प्रती-सद्गुरू बनलेलो आहोत हे स्वप्न कोणाला नाकारावेसे वाटेल? अशा पध्दतीने आपला जीवनप्रवास व्हावा असेच सर्वांना वाटत असेल. आपल्या सद्गुरूना आपला प्रवास असाच व्हावा असे वाटतेय.
असे म्हटले जाते की माणसाने आपले धेय्य सतत आपल्या डोळ्यासमोर ठेवावे म्हणजे त्याने अनुसरलेल्या मार्गावरून तो कधिही ढळत नाही. आपण विश्वप्रार्थना म्हणत असतो म्हणजे जणू काही हा आदर्शवत वाटणारा जीवनप्रवास आपल्याला प्राप्त व्हावा हे धेय्य सतत आपल्या डोळ्यासमोर राहावे असा प्रयत्न करत असतो. एखादे घर बांधण्यासाठी आर्किटेक्ट त्याचा आराखडा तयार करतो व त्या आराखड्याप्रमाणे नंतर घर बांधले जाते. विश्वप्रार्थना म्हणजे जणूकाही आपल्या आदर्शवत जीवनाचा आराखडा आहे. हा आराखडा सतत आपल्या डोळ्यासमोर राहावा व त्याप्रमाणेच आपले जीवन घडावे याच हेतूने सद्गुरू आपल्याला अखंड विश्वप्रार्थना म्हणावयास सांगतात. साधारणत: माणूस जेव्हा जागा असतो तेव्हा त्याला आपल्या धेय्याचे भान असते. इथे मात्र आपले धेय्य कळत नकळत सतत समोर राहाते कारण अखंड विश्वप्रार्थनेमुळे आपले आदर्शवत धेय्य जागेपणातून झोपेत, स्वप्नात, सुषुप्तीत व तेथून आणखी आत अज्ञाताच्या प्रांतात उतरते व हे धेय्य गाठण्याची प्रक्रिया शेवटी नेणीवेतून म्हणजेच अंतर्मनाच्या अफाट ताकदीतून साकार होऊ लागते. अंतर्मनाचे आणखी एक कार्य समजावून घेतले तर हे कसे घडते ते समजून घेता येईल. या अगोदर अंतर्मनाच्या ज्या कार्यांचा उल्लेख केला होता (५५) त्याचप्रमाणे कांही क्रिया आपल्याकडून कळत घडतात व नंतर त्या मनातच मुरतात. या क्रिया मनात मुरतात याचा अर्थच असा की, या क्रिया बहिर्मनात मुरतात व अंतर्मनात जाऊन उरतात.() म्हणजेच रिकाम्या वेळात आपण जाणीवपूर्वक विश्वप्रार्थना म्हणतो ती बहिर्मनात मुरते व शेवटी ती अंतर्मनात जाऊन उरते. थोडक्यात आपण वर कल्पिलेले आदर्शवत जीवनाचे धेय्य बहिर्मनात मुरून अंतर्मनात जाऊन उरते. त्याबरोबर आपले अंतर्मन ते धेय्य साकार व्हावे यासाठी आपली संपूर्ण ताकद वापरून प्रयत्न करू लागते व आपल्या जीवनात अशा काही घटना घडतात की खरोखरच वर कल्पिल्याप्रमाणे आदर्श जीवन जगू लागतो.
हे सगळे कसे होते ते स्पष्ट व्हावे किंवा कळायला सोपे जावे यासाठीच अमेरिकेचे अध्यक्ष वॉशिंग्टन यांचे उदाहरण सद्गुरूंनी दिलेले आहे. (८०)शाळेमध्ये टण् टण् टण् असा विद्यार्थ्यांना घंटानाद देण्याची पध्दत होती. या घंटानादाशी वॉशिंग्टनने विलक्षण पध्दतीने स्वत:शी संबंध जोडला. तो खालील वाक्य म्हणत असे- टण् टण् टण् अमेरिकेचा प्रेसिडेंट वॉशिंग्टन वरील वाक्य म्हणत असताना तो त्यात गुंग होऊन जायचा. ते वाक्य वॉशिंग्टन अशा रंगात रंगून व गुंग होऊन गुणगुणत रहायचा की ते म्हणत असताना त्याची विलक्षण तंद्री लागायची व एक प्रकारे तो कांही वेळ Trance मध्ये जायचा. याचा एकंदर परिणाम असा झाला की, त्या वाक्यातील "अमेरिकेचा प्रेसिडेंट वॉशिंग्टन" या कल्पनेने वॉशिंग्टन जणू झपाटलाच गेला. ती कल्पना बहिर्मनातून त्याच्या अंतर्मनात खोलपर्यंत जाऊन भिडली. परिणामी अंतर्मनाच्या सर्व शक्ती त्या कल्पनेला साकार स्वरूप देण्यासाठी जागृत होऊन कार्यरत झाल्या. पुढे वॉशिंग्टनच्या जीवनात अशा कांही घटना घडत गेल्या की, एकेकाळचा साधा शाळेतला शिपाई शेवटी खरोखरच अमेरिकेच प्रेसिडेन्ट झाला.
अगदी याच उदाहरणाप्रमाणे आपल्याला विश्वप्रार्थना म्हणायची आहे. विश्वप्रार्थनेशी तादात्म्य पावावयाचे आहे. विश्वप्रार्थना करताना रंगून जायचे आहे. विश्वप्रार्थना म्हणताना आपले देहभान हरपून जायला पाहिजे. आणि हे सर्व होण्यासाठी ती अखंडपणे म्हटली की आपले काम होणार आहे. त्यासाठी रिकाम्या वेळी ती अट्टाहासाने म्हणायला सुरवात केली की आपोआप पुढच्या पायरीवर आपण जाणार आहोत. म्हटले तर खूप सोपे आहे. फक्त आपण निश्चय करायचा तेवढेच बाकी आहे. बाकी सर्व विश्वनियम पाहून घेणार आहेत. ते नियम आहेत (१५१) १.क्रिया तशी प्रतिक्रिया. २. तुमच्या विचाराप्रमाणे तुमच्या जीवनाला आकार प्राप्त होत असतो. ३. कारणाशिवाय परिणाम नाही. वरील तीनही वैज्ञानिक सिध्दांतांचा साकल्याने विचार केला तर असे आढळून येईल की, माणसाचे जीवन वरील तीन सिध्दांतानुसार चाललेले आहे.()
मात्र हे आवर्जून लक्षात ठेवायला लागते की, (५९)आपल्या मनात जे विचार व विकार येतात त्यांना खोल अंतर्मनात पोहचविण्याचे काम कल्पना व भावना करतात.() यासाठीच आपल्या या प्रयत्नांच्या जोडीला सद्गुरूंवरील तसेच विश्वप्रार्थनेवरील प्रेम, विश्वास व श्रध्दा तसेच सबूरी (काही काळ वाट पाहाण्याची तयारी) याची जोड दिली तर आपण ईच्छीत स्थळी खूपच वेगाने अत्यंत कमी अडथळे येऊन सुरक्षीतपणे पोहोचतो.
सर्वांना नमस्कार. सर्वांना शुभेच्छा.
टीप : हे सर्व विश्वप्रार्थनेच्या संदर्भात असल्याने Meaning of VishwaPrarthana या टॉपीकमधेही जसेच्या तसे पोस्ट केले आहे.
|
|
|
|
|
shambhagwat
Guest Members
Ultimate Contributor
Offline
Gender: 
Posts: 308
|
 |
« Reply #23 on: September 28, 2007, 08:42:36 PM » |
|
jpg attachment continued
|
|
|
|
|
shambhagwat
Guest Members
Ultimate Contributor
Offline
Gender: 
Posts: 308
|
 |
« Reply #24 on: September 28, 2007, 08:44:16 PM » |
|
jpg attachment continued
|
|
|
|
|
shambhagwat
Guest Members
Ultimate Contributor
Offline
Gender: 
Posts: 308
|
 |
« Reply #25 on: September 29, 2007, 02:24:47 PM » |
|
सर्वांना नमस्कार,
विसावे शतक सुरू होण्यापूर्वी स्वामी विवेकानंद अमेरिका व इग्लंडच्या दौऱ्यावर गेल्याचे सर्वांना माहित असेलच. त्यावेळेस त्या सर्वांनी स्वामी विवेकानंदांना डोक्यावर घेतले होते. त्याच्या विचारांचा मोठा पगडा त्यावेळच्या पाश्चात्य तत्ववेत्यांवर पडलेला होता. स्वामी काहीतरी नवीन सांगत आहेत, नवा विचार मांडत आहेत असेच त्यावेळेस सर्वांना वाटले. प्रत्यक्षात सर्व धर्मग्रंथांचा अभ्यास करून मगच ते अमेरिकेला गेले होते व हिंदू धर्माचे तत्वज्ञान कसे श्रेष्ठ आहे हे सिध्द केले होते. असो.
"तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार" हा सिध्दांत शास्त्रीय आहे असे स्वामी विवेकानंदांनाही मान्य होते. यासाठी त्यांची दोन वचने खाली देत आहे.
"Stand up, be bold, be strong. Take the whole responsibility on your own shoulders and know that you are the creator of your own destiny. - Swami Vivekanand"
"All power is within you; you can do anything and everything. Believe in that. Do not belive that you are week. Stand up and express the divinity within you - Swami Vivekanand"
सर्वांना नमस्कार. सर्वांना शुभेच्छा.
|
|
|
|
|
|
Varsha
|
 |
« Reply #26 on: September 30, 2007, 11:33:00 AM » |
|
Sarvana Namaskar, Abhyas Charcha vachtana baryach prashnanchi uttare milatahet.. Shree Sham Bhagwatani lilhilela khalil paragraph khupach upukta aahe (५१)पांच कर्मेद्रिये व पांच ज्ञानेंद्रिये यांच्या द्वारे मन जगाशी संबंध जोडते व जगासंबंधीचे ज्ञान ते गोळा करीत असते() या वाक्यात "मन" हा शब्द बहिर्मन या अर्थाने वापरलेला आहे. ह्या कर्मेंद्रियात अथवा ज्ञानेंद्रियात जर जन्मत:च वैगुण्य असले तरीही अशा माणसाचे बहिर्मन चांगल्या बुध्दीने युक्त असेल म्हणजेच त्याच्या बहिर्मनात सदैव चांगले व सकारात्मक विचार राहातील; तसेच त्याची अंतर्मनाद्वारे चालणारी कार्ये कार्यक्षम असतील तर असा माणूस त्या जोरावर आपली प्रगती प्राप्त करून घेऊ शकतो. अशा वेळेस त्याचे वैगुण्य त्याच्या कार्याच्या किंवा प्रगतीच्या आड येऊ शकत नाही. (उदा. हेलन केलर) Gargi, ha para tuzyasathi lihilay asa mala watla.(ti asha mulana treat karte aani asha mulansathi ajun kay karta yeil yacha ti vichar karat aste.)Tuzya vicharana pushti denarech vichar Shree Sham Bhagwatani mandlet. Thanks to all for these posts.
|
|
|
|
|
shambhagwat
Guest Members
Ultimate Contributor
Offline
Gender: 
Posts: 308
|
 |
« Reply #27 on: October 01, 2007, 12:17:40 PM » |
|
Gargi, ha para tuzyasathi lihilay asa mala watla.(ti asha mulana treat karte aani asha mulansathi ajun kay karta yeil yacha ti vichar karat aste.)Tuzya vicharana pushti denarech vichar Shree Sham Bhagwatani mandlet.
सर्वांना नमस्कार, एखाद्या सकारात्मक विचाराला सर्वतोपरी वाहून घेतले व तो विचारही दुसऱ्यांचे भले करण्यासंदर्भात असेल; तसेच त्यातून स्वत:ला काहीतरी प्राप्त व्हावे अशी कोणत्याही प्रकारची अपेक्षा नसेल तर त्याचे अंतर्मन त्याला कसे भरभरून प्रतिसाद देते याचे वर्तमानकाळातले एक उत्कृष्ट उदाहरण माझ्या वाचनात आले. नाबार्ड ही भारतातील शेती व ग्रामीण क्षेत्रात कार्य करणारी अग्रगण्य बँक. नाबार्डच्या आमंत्रणावरून नोबेल पारितोषिक विजेते डॉ. मुहमद युनुस यांनी नाबार्डला भेट दिली होती. त्यावेळेस त्यांनी केलेले भाषण म्हणजे जणू त्यांनी त्यांच्या जीवनाचा आढावाच घेतला होता. परंतू ते संपूर्ण भाषण इंग्रजीमधे होते. महाराष्ट्रातील गाव व तालुका पातळीवरील स्वयंसेवी संस्था व कार्यकर्त्यांपर्यंत ते भाषण पोहोचणे भाषेच्या अडसरामुळे शक्य नाही असे माझ्या लक्षात आल्याने त्या संपूर्ण भाषणाचे मी मराठीत भाषांतर केले. ते बऱ्याच जणांना आवडले. आपल्या फोरममधील लोकांना ते नक्कीच आवडेल म्हणून ते मी जनरल डिस्कशन या सदरामधे आज किंवा उद्या पोस्ट करत आहे. या अनुवादाचे कोणत्याही प्रकारचे हक्क मी राखून ठेवलेले नाहीत. जर कोणाला ह्या भाषणाचे हिन्दीत अथवा इतर प्रादेशिक भाषेत भाषांतर करायचे असेल तर त्याला माझी काहीच हरकत नाही. तसेच त्यासाठी कोणाला मूळ इंग्रजी भाषेतील भाषण पाहिजे असेल त्यांनी तसे कळवावे म्हणजे मी ते मूळ इंग्रजी भाषणही फोरममधे पोस्ट करेन. मूळ इंग्रजी भाषण नाबार्डने त्यांच्या न्यूजलेटरमधे जनहितार्थ प्रसिध्द केलेले असल्याने त्यांच्याकडूनही हरकत घेतली जाणार नाही. मात्र संदर्भ म्हणून नाबार्डच्या न्यूजलेटरचा उल्लेख जरूर करावा. मी हा खटाटोप करत आहे कारण मला तरी डॉ. मुहमद युनुस यांच्यात संतांचे गुण असल्याचे जाणवले. गरीबातल्या गरीब माणसाच्या घरातील असहाय्य व अशिक्षित खेडवळ स्त्रीच्या सर्वांगिण उन्नतीसाठी गेली ३३ वर्षे ते झटत आहेत. ईतकेच नव्हे तर त्यात त्यांनी लक्षणीय यश मिळवले आहे. त्यांच्या ह्या कार्यासाठीच त्यांना नोबेल पारितोषिक मिळाले आहे व सर्व जग त्यांनी सुचविलेल्या विचारांप्रमाणे दारिद्र्य निर्मूलनाची पध्दत अवलंबू लागले आहे. परमेश्वर अशा माणसाला योग्य मार्ग कसा दाखवत जातो याचे हे एक उत्तम उदाहरण आहे असे मला वाटते. त्यांच्या जीवनाचे सार थोडक्यात सांगावयाचे झाल्यास मी तरी खालील संतवचनाचा उल्लेख करेन. जे का रंजले गांजले । त्यासी म्हणे जो आपुले । साधू तोचि ओळखावा । देव तेथेचि जाणावा ॥ सर्वांना नमस्कार. सर्वांना शुभेच्छा.
|
|
|
|
|
dr.nutanpol
Senior Namdharaks
Ultimate Contributor
Offline
Gender: 
Posts: 429
|
 |
« Reply #28 on: October 04, 2007, 02:22:15 AM » |
|
नमस्कार,
श्री. शाम भागवत यांनी जे म्हंटले आहे की, विश्वप्रार्थना अंतर्मनात जाणे हेच विश्वप्रार्थना या साधनेचे ध्येय आहे हे अगदी खरे आहे. श्री. सदगुरू असे म्हणतात की सर्वांचे भले व्हावे असे मनापासून वाटू लागले की बरीच प्रगती झाली असे समजावे.
अखंड विश्वप्रार्थना अगदी संकटसमयी सुध्दा होऊ लागली तर बरीच प्रगती झाली असे समजता येईल. पण सर्वसाधारणपणे ती काही काळ मनासारखी, परत मन अस्वस्थ झाल्यावर क्षीण, परत चांगली असा प्रवास सुरू असतो. अट्टाहासाने प्रयत्न करणे, श्री. सदगुरू मानसपूजा करणे, सदगुरू कार्यात भाग घेणे, श्री सदगुरू ग्रंथांचे वाचन करणे, सत्संगाला उपस्थित रहाणे हाच त्यावर उपाय आहे.
नामस्मरण, प्रार्थना यामुळे आत्मज्ञानापर्यंत मजल मारता येईल ही गोष्ट खरी असली तरी त्यासाठी खूप वेळ लागेल.आपण सर्वांनी श्री. सदगुरूंकडून दिव्य बोध आणि दिव्य साधना ही घेतलीच पाहिजे कारण त्यामुळे आपल्याला आपली ध्येय प्राप्ती -आत्मज्ञान लवकर होईल.
श्री. सदगुरू असे सांगतात की दिव्यभाव-विचार अंतर्मनात जाण्यासाठी आपल्याला पासपोर्ट आणि व्हिसा यांची आवश्यकता असते. पासपोर्ट श्री. सदगुरू दिव्य बोध आणि दिव्य साधनेच्या द्वारे देतात तर आपले शुध्द अंतर्मन आपल्याला व्हिसा देते. या सर्वाचे ज्ञान असणे अत्यंत आवश्यक आहे. अन्यथा श्री. सदगुरू शरणागती नसेल आणि त्यांचे मार्गदर्शन नसेल तर कित्येक साधक अमनापर्यंत जाऊन परत येतात व त्यांना असे वाटते की आपल्याला आत्मसाक्षात्कार झाला आहे. याबद्दल श्री. सदगुरूंनी अनेक वेळा सावध केले आहे.
श्री. सदगुरूंना सर्व साधक मनापासून शरण जावोत ही श्री चरणी प्रार्थना..........
|
Sarve Sukhinha santu! Sarve bhadrani pashyantu! May Divinity Within All get bloomed! May God Bless all!
|
|
|
mk
Guest Members
Ultimate Contributor
Offline
Gender: 
Posts: 543
साधनेने प्राप्त सिद्धी ही साध्य नाही साधन
|
 |
« Reply #29 on: November 17, 2007, 11:46:09 PM » |
|
Namonamah.
JV books talk of "पांच कर्मेद्रिये व पांच ज्ञानेंद्रिये"....
I was under the impression that the two hands and the two feet are four karmendriyas and two eyes, two ears, nose and the tongue are six jnanendriyas.
Kindly correct me.
Thanks and regards Milind Khadilkar
|
या लिखांणात व्यक्त झालेल्या मतांशी लेखक सहमत असेलच असे नाही.
This content does not necessarily represent the views of the author.
|
|
|
|