|
Varsha
|
 |
« on: April 03, 2007, 02:25:23 AM » |
|
Sorry Dr.Nutan,magchya prashnache uttar kahi karanamule nahi deu shakle.Tumhi tyache uttar khup chan lihile aahe.Sarva sukshma badal chan sangitle aahet.Thanks. "तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार" हा सिध्दांत ऐकल्यावर आणि हा ग्रंथ वाचल्यावर या सिध्दांताविषयी आपल्या मनात कोणकोणते विचार येतात?
Tuch aahes Tuzya jeevanacha shilpkar ha granth vachlyavar kalale ki aapan Vichar,Ucchar aani Aachar ya staravar kam karto. Bahirman aani Antarman kase kam kartat te kalale.Aapli pratyek kruti Janeevechya tape recording machine madhe record hot aste mhanun kruti kartatna savadh asle pahije.. satkarma aani dushakarma tun punya aani pap nirman hotat aani aaplyapudhe sukh aani dukh rupane prakat hotat.Mahnjech aapan keleli karme aaple nashib ghadvat astat.Mhanun tuch aahes tuzya jeevanacha shilpkar! Purvi mala vatayche ki aapan fakta Aachar ya staravarach kam karto..mag manus sajjan asla tar tyachyasamor fakta sukhach yayla pahije..pan jeevanvidhyet aalyavar kalale ki vichar karne he suddha kam aahe..nehmi swatahabaddal aani dusryanbaddalhi shubh vicharach kele pahijet..karan te suddha Janeevechya tape var record hotat.Mhanun pratyek kam kartana savadh asle pahije. Aani +ve vichar karychi bahirmanala savay lavnyasathi Sadguruni Vishwaprarthana sangitli.Ti satat mhatli ki -ve vichar jatat.Shubh vichar bahirmanamadhe satat gholale ki kalantarane te antarmanat murtat aani sukh rupane jeevanat prakat hotat. Sadguruni aaplyala fakta manache science sangitle nahi tar te vaprun sukhi kase vyayche te suddha sangitle(vishwaprarthana).Swtaha te aaplya aayushyat vaprun aaplya samor udaharan thevle. Asech Sadguru sarvana milot aani saglejan sukhi hovot.
|
|
|
|
|
Geeta Datar
Junior Contributor

Offline
Gender: 
Posts: 75
|
 |
« Reply #1 on: April 05, 2007, 09:30:27 AM » |
|
Namaskar Everyone
My answer to Question on 'Tuch Aahes Tuzya Jeevanacha Shilpakar'
This book is nothing but a special key to the gold mine within us. Sadguru has shown us how to extract everything we need to live life gloriously, joyously and abundantly. This gold mine is infinite intelligence and boundless love within everyone of us.
Our Sadguru teaches us the ' YUKTI YOGA ' in this book. The yukti or the trick is with the help of conscious mind how to elevate our subconscious mind and eventually transform it into divine mind. This last stage is called Unman.
When all of us follow every step our Sadguru tells us with 100% guarentee we will find the treasure house within us and everyone will experience UNMANICHYA SUKHAT PANDURANGA BHETI DET.
WITH SADGURU'S AKHAND MARGADARSHAN LET EVRYONE LIVE LIFE GLORIOUSLY JOYOUSLY AND ABUNDANTLY.
LOTS OF LOVE AND AANAND TO EVERYONE
Geeta Datar
|
Vitthal Vitthal
|
|
|
dr.nutanpol
Senior Namdharaks
Ultimate Contributor
Offline
Gender: 
Posts: 429
|
 |
« Reply #2 on: April 20, 2007, 11:28:14 AM » |
|
अखिल मानव जातीला शांतीसुखाचा राजमार्ग दाखवणाऱ्या विश्वसंत श्री. सदगुरू पै माऊली आणि त्यांना सावली सारख्या साथ देणाऱ्या सौ. माई यांना कोटी कोटी नमस्कार.
आपण सर्व प्रेमळ भावंडांना अनेक अनेक सप्रेम नमस्कार.
तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार, म्हणजेच आपल्यापैकी प्रत्येकाच्या दृष्टीकोनातून विचार केला तर मीच आहे माझ्या जीवनाचा शिल्पकार असे आहे.
यातील तू म्हणजे प्रत्येकाच्या ह्दयातील "मी" आहे. हा मी म्हणजे आहे तरी कोण? स्वरूपाच्या अंगाने पाहिले तर हा "मी" चैतन्य तत्व आहे. (सत् + चित् + आनंद) , तसेच त्याच्या ठायी असणारी जाणीव "मन" रूपाने प्रकट झाली व जाणीवच स्थूल बनून देह रूपाने प्रकट झाली आहे. म्हणजे "मी" चा अर्थ, चैतन्य, मन व देह असा तिन्ही मिळून आहे. चैतन्य तत्वाच्या ठायी असणाऱ्या जाणीवेत (चित् तत्वात) स्फूरण झाले. आणि मग जाणीवेने स्वतःचे भान घेतले (शुध्द अहंकाराचा उदय-असिपद) आणि स्वतःच्या अस्तित्वाचे भान दिले. (ओंकार) ही जाणीव आपल्या स्वरूपाला विसरली. (यालाच भवरोग-भ्रम असेही म्हणतात.) हे मायेच्या प्रभावामुळे झाले.(माया म्हणजे-reason unknown) आणि मग जाणीवेच्या ठिकाणी संभ्रम निर्माण झाला.की मी कोण? मग जाणीवेला दिसला तिने धारण केलेला आकार आणि मग जाणीवेने कल्पना केली की ती म्हणजे आकार आहे. (देहभावाचा उदय) जाणीव जेंव्हा संकल्प-विकल्प करू लागते तेंव्हा तिला मन असे म्हणतात. ती जेंव्हा चिंतन करू लागते तेव्हा तिला चित्त असे म्हणतात व ती निश्चय करू लागते तेंव्हा तिला बुध्दी असे म्हणतात. चैतन्याच्या ठिकाणी असणारी जाणीवच (चित् तत्व) "मन" , चित्त व बुध्दीच्या रूपाने प्रकट होते. तत्वतः शुध्द "मी" ने देह धारण केल्यावर तिला अनेक गोष्टी चिकटल्या. आणि त्या गोष्टी बरोबर जाणीवेने तादात्म्य स्विकारले. म्हणजे त्या गोष्टी म्हणजे "मी" आहे असे जाणीव स्वतःला समजू लागली. उदा. बारशाला ठेवलेले नाव, देहाचे लिंग, घेतलेले शिक्षण, करीत असलेला व्यवसाय, जात, धर्म-संप्रदाय वगैरे.आणि या सर्वांच्या अभिमानामुळे ती स्वतःला ईतरांपेक्षा वेगळी समजू लागली तसेच अशा प्रकारच्या संस्कारातून तसाच अंतर्मनाचा साचा तयार झाला त्यामुळे माणसामाणसांत भेद-वैर निर्माण झाले. मूळ स्वरूपाकार असणारी जाणीव प्रकट झाली "मन" रूपाने. जाणीवेच्या ठिकाणी स्वभावतः ओढ असते की, स्वतःच्या ठिकाणी असणारा आनंद चाखावा ती आनंदाचा अनुभव घेण्यासाठी तळमळू लागते. असे करताना ती इंद्रियाद्वारे एका पदार्थाचा अनुभव घेऊ लागते मग त्याचा कंटाळा आला की दुसरा पदार्थ असे भुंगा जसे एका फुलावरून दुसऱ्या फुलावर उडतो तसे एका विषयाचा वीट आला की दुसरा विषय असे जन्मोजन्मी जाणीवेचे भ्रमण चालू झाले आहे पण तिला तृप्ततेचा अनुभव येत नाही. कारण जाणीवेचे भ्रमणच तिच्या दुःखाचे कारण आहे. ती जर स्वरूपाचा विचार करीत आपल्या मुळ स्वरूपाला चिकटून राहील तर तिला बसल्या ठिकाणी स्वरूप साक्षात्कार होईल व ज्या आनंदाला सुखाला आपण शोधतोय तो आनंद हेच आपले स्वरूप आहे म्हणजेच आपण आहोत याचे ज्ञान होईल. जाणीवेला मुळ स्वरूपाचे ज्ञान करून देण्याचे सामर्थ्य फक्त खऱ्या सदगुरूंमध्ये असते. आणि त्यांना शरण गेल्यावर ते जेंव्हा दिव्य बोध आणि दिव्य साधना देतात त्यामूळेच जाणीवेचा स्वरूपाच्या दिशेने प्रवास सुरू होतो. मीच आहे माझ्या जीवनाचा शिल्पकार म्हणजे माझ्या जीवनातील यच्चयावत सुखदुःखाला मीच जबाबदार आहे. स्वरूपाच्या विसरात मी देह पातळीवर कर्म करतो (इंद्रियाद्वारे) आणि मनाच्या पातळीवर जे कर्म करतो( विचार करतो, कल्पना करतो) त्यातून मी माझी "नियती" उद्याचे जीवन तयार करीत असतो. म्हणून मला जर सुख हवे असेल तर मला कर्म करताना (देह व मन या पातळीवर) सावध असायला हवे." मी" पण जेव्हा निर्माण झाले तेंव्हापासून जाणीवेला निसर्ग नियम लागू झाले. आणि शुभ कर्मांच्या बदल्यात सुख आणि दुष्कर्मांच्या बदल्यात दुःख असे सुख-दुःख मिश्रित जीवन सुरू झाले आहे. आपण पाहिले की, जीवनाची निर्मिती निर्गुण चैतन्य तत्वाच्या स्फुरणातून सुरू झाली आणि स्वतःच्या ठायी वास करणाऱ्या आनंदाचा आस्वाद घेण्यासाठी जाणीवेचा प्रवास सुरू आहे. आपल्या जीवनाचे शिल्प आपणच घडवले पाहिजे हे लक्षात आल्यावर पुढचा महत्वाचा मुद्दा असा की जीवनाचे शिल्प घडवायचे कसे? वास्तविक जीवाचे मुळ स्वरूप हे चैतन्य आहे. आणि चैतन्य तत्व आनंदघन आहे. पण केवळ स्वरूपाचा विसर झाल्यामुळे जीव सुखासाठी-आनंदासाठी तळमळतो आहे. मी" पण जेव्हा निर्माण झाले तेंव्हापासून जाणीवेला निसर्ग नियम लागू झाले. स्वरूपाच्या विसरात मी देह पातळीवर कर्म करतो (इंद्रियाद्वारे) आणि मनाच्या पातळीवर जे कर्म करतो( विचार करतो, कल्पना करतो) त्यातून मी माझी "नियती" उद्याचे जीवन तयार करीत असतो. म्हणून मला जर सुख हवे असेल तर मला कर्म करताना (देह व मन या पातळीवर) सावध असायला हवे." . आणि शुभ कर्मांच्या बदल्यात सुख आणि दुष्कर्मांच्या बदल्यात दुःख असे सुख-दुःख मिश्रित जीवन सुरू झाले आहे. त्यामुळे मीच माझ्या सर्व जीवनातील सुख-दुःखाला जबाबदार असून माझे जीवन निसर्गनियमाधीन असल्यामुळे मी ते सावधपणे जगले पाहिजे ,तसेच मी जे सुख दुःख इतरांना कळत किंवा नकळत देईन तेच माझ्या वाट्याला येणार आहे. म्हणून मी सदैव असा प्रयत्न केला पाहिजे की ज्यामुळे इतरांना जास्तीत जास्त सुख मिळेल. तसेच हेही लक्षात ठेवले पाहिजे की, जीवन प्रारब्धाच्या, पूर्वकर्मांच्या, नशिबाच्या अधीन नसून प्रत्येक क्षणी आपल्याला स्वातंत्र्य आहे की तो क्षण आपण दुष्कर्म करण्यात घालवावा, सत्संगात घालवावा, कर्तव्य-कर्मे करीत परमेश्वराचे कृतज्ञतेने स्मरण करण्यात घालवावा, की वेळ वाया घालवावा. थेंबे थेंबे तळे साचे या म्हणीनुसार थोडे थोडे करीत आपले आयुष्य पुढे पुढे सरकत आहे. "मी"चे त्याच्या जन्मापासून अनेकाबरोबर संबंध आले आहेत. त्यामुळे अनेकांचे ऋण आहेत. या सर्वांविषयी कर्तव्ये पार पाडणे ही जबाबदारी आणि बांधीलकी आहे. आई-वडील, शिक्षक, आत्मतत्व, सदगुरू, राष्ट्र व समाजातील सर्व घटक, विश्वातील घटक या सर्वांच्या उपकारामुळेच आपण जीवनाचा आनंद अनुभवत आहोत. या सर्वांविषयी आपले कर्तव्य पार पाडणे हे नैतिक कर्तव्य आहे. आपण जीवनाचे शिल्प सुंदर बनवायचे असेल तर शहाणपण मिळवले पाहिजे. कारण शहाणपणाला पर्याय नाही, शहाणपण हे शुध्द श्रवण, सदगुरू ग्रंथांचे वाचन, शुभ-चिंतन, शुभ ईच्छा करणे, कृतज्ञता पूर्वक ईशस्मरण व सदगुरू स्मरण , शुभ कर्मे-सदगुरू सेवा यातून निर्माण होते. आपण श्री. सदगुरूंना शरण जाऊन त्यांनी सांगितल्याप्रमाणे शहाणपण मिळवीत सत्संगात, प्रार्थनेत, आपले नित्यकर्म कर्तव्य बुध्दीने आवडीने गोडीने करण्यात खरे शहाणपण असून तसे वागणे म्हणजेच जीवनशिल्पाला सुंदर आकार देण्याचा प्रयत्न करणे आहे.
प्र. आपण आपल्या जीवनाचे शिल्प घडवित असताना कोणकोणत्या गोष्टींकडे लक्ष देणे गरजेचे आहे?
शहाणपणाने वागण्याची बुध्दी आपल्या सर्वांना सतत होवो ही श्री. सदगुरू चरणी तळमळीची प्रार्थना...............
|
Sarve Sukhinha santu! Sarve bhadrani pashyantu! May Divinity Within All get bloomed! May God Bless all!
|
|
|
|
Varsha
|
 |
« Reply #3 on: May 01, 2007, 02:37:34 AM » |
|
Namaskar Everyone, प्र. आपण आपल्या जीवनाचे शिल्प घडवित असताना कोणकोणत्या गोष्टींकडे लक्ष देणे गरजेचे आहे? Thank you Dr Nutan,he prashnavali chalu kelyamule abhyas hoto aahe aani aaple aacharan JV la dharun aahe ki nahi te kalte aahe. Aaple jeevan ghadvit astatana mahatvacha factor mhanje ' shahanpan'.Shahanpan milavinyacha ek marg mhanje Sadguruna sharan jaun tyanchyakadun dnyan sampadan karne.Karan Sadgunkadun je dnyan milte te dnyan prapanchachya angane shahanpan bahal karte v parmarthachya aangane sadhakala aatmadnyan dete. Antarangatun shashvat sukh milnyasathi Sadgurunkadun aatmadnyan milne aavashyak aahe. Prapanchachya aangane nisarg niyamana anusarun jeevan jagnyat Shahanpan aahe. He nisarg niyam aanant aahet tyatil mahatvache mhanje: 1.Kriya tashi pratikriya. 2.Jase aaple vichar tyapramane jeevanala aakar. 3.Jethe parinam aahe tethe karan he aslech pahije.Vichar,Ucchar,Aachar ya pratyek staravar kelelya krutina nisarga niyam lagu hoin tyapramane aapli niyati ghadat aste. Aaplya vicharanvar satat laksha thevun shubh vichar karne,satkarma karne yatun punya nirman houn manus sukhi hoto.Kharchi padleli punyai prarthanene bharun kadhta yete mhanun pratyek rikama kshana prarthanene bharun kadhaychi savay lavaychi. Sangaticha aaplya jeevanavar motha prabhav asto..mhanun aapan nehmi satsangatit rahayla pahije.Santanchya sangatit aalela vait manus suddha tarun jato. Sant aaplyala changlya vicharanchi sangat detat aani tyatunach sundar jeevan ghadte. Krutadnyata he punya aahe mhanun kunihi kelelya chotyatlya chotya madati baddal suddha krutadnya rahile pahije.Becz Greatful heart is close to God. Hati ghetlele pratyek kam aavdine aani premane kranyat shahanpan aahe.Karan kuthlehi kam tyat ras gheun kele aani te tadis nele ki te kam kartana swanand chakhata yeto. Varil uttarat mazyakadun kahi points lihayche rahile astil tyabaddal kshamaswa. Sarvana Jagatgurun kadun Dnyan prapt houn sarvajan sukhi hou det aani saglyanchi jeevanshilpe Uttam ghadu det.
|
|
|
|
|
suhas
New Contributor
Offline
Gender: 
Posts: 20
|
 |
« Reply #4 on: May 02, 2007, 11:56:09 PM » |
|
Tumha sarvana dhanyavad karan tumhi changla sanvad ghadvun anlyabaddal ani lokana pustak vachnyachi avad nirman karnya baddal. pan mala mazha abhyas tumchya level cha naslya mulay ase vatat asel kadachit ki evdhe mothale prashna ani tyanche arth kinva tyachya var uttrache agralekh vachayla ani samjayla kathin ani kantala yeto. uttare short ani sweet asavit. mala ek gosht mahit aahe ki apan jast mothe palhal lavle tar samorchyala kantala yeil ani to lakshach denar nahi. ithe forum madhe chalnari charcha, sanvad faqt namdharkancha nasun aplyala navin mansan paryant hyachya dware pohchayche aahe tyanchya mana madhe avad,prem hya jeevan vidyye baddal ani swata baddal nirman karayche aahe. tyala jeevan vidyeche vichar kiti shreshtha aahet he patvun dyayche aahet. apan evdhi moth mothi discussion ani shabd jar apan vaparle tar samorchya navin vyakti la bouncer jail. tari thodasa prayatna tya drushtine karava. mi nehmi vichar ekach karto mazya samor yenarya navin vyakti baddal ki mala hyache bhale jhalele pahayche aahe ani hyala mazya jeevan vidyechi godi lagli ki ha sukhi honar aahe ani tya sathi tyala apan saglya shortcut margdarshan kele pahije. mi sagle prashna ani tyani uttare vachto anand vato ani kautuk hi evdha vel tumha sarvana milto kasa evdhi pustke vachayla. mala lokana bhetayla tyanche vichar janun gyayla avadtat ani mag mi haluch sadgurunche ek don amrut tushar tyanchyavar sodto tyana samjel ashya bhashet. ani ase kelya mulay aapoaap tyana vatayla lagte he kahi tari vegle aahe. mi tyana force mulich karat nahi kinva ikde ya mhanun hi sangat nahi kamit kami tin char velela bhetlya kinva bolalya shivay ani ekda tyani apan hun tayari dakhavli ki mag to aapoaap jeevan vidye kade yetoch yeto. tumchya normal discussion peksha thoda vegla vishay zhala hyachi mala janiv aahe tya baddal shamaswa. hye ithe mi mazha anubhav share karu ka?
take care god bless you luv suhas
|
TAKE CARE GOD BLESS YOU LOVE SUHAS
|
|
|
dr.nutanpol
Senior Namdharaks
Ultimate Contributor
Offline
Gender: 
Posts: 429
|
 |
« Reply #5 on: May 06, 2007, 08:53:58 PM » |
|
अखिल मानवजातीला शांतीसुखाचा राजमार्ग दाखवणाऱ्या श्री पै माऊलींना व सौ. माईंना अनंत कोटी नमस्कार.
सर्वांना सप्रेम अभिवादन.
प्रिय गुरूबंधू सुहास,
तूमचे जे मत आहे की आपण आपल्याला जेवढे शक्य आहे त्या परीने जीवनविद्येचा प्रचार जास्तीत जास्त केला पाहिजे आणि तोही सोप्या भाषेत हळूहळू समजावून केला पाहिजे हे योग्यच मत आहे आणि त्याबाबत दुमत असण्याचे कारण नाही.
"अभ्यास-चर्चा"या टॉपिक मध्ये आपण ग्रंथांवर अभ्यास चर्चा करतो त्यासाठी ग्रंथ वाचणे, त्यावर चिंतन करणे, श्री. सदगुरूंचे तत्वज्ञान खोलात जाऊन समजावून घेणे आणि मग आपले विचार व्यक्त करणे असे सारे अपेक्षित आहे. आपण जीवनविद्येचा अधिक अभ्यास करण्यासाठी असे करतो. हे सारे नवीन नामधारकाला समजेल असे नाही पण प्रयत्न केल्यास कालानंतराने हळूहळू जमू शकेल.
आपण असे करू की जीवन-विद्येच्या तत्वज्ञानावर आधारित एक प्रश्नावली सुरू करू. यात सोपे प्रश्न असतील. त्यातुन सदगुरूंच्या तत्वज्ञानाची सर्वांना ओळख होईल. हे प्रश्न श्री. सदगुरूंच्या ग्रंथांवर आणि प्रवचनांवर आधारित असतील. कोणालाही यांत भाग घेता येईल. आपणास ही कल्पना आवडल्यास हे सदर चालवण्याची ईच्छा असल्यास आपण ते सुरू करावे, मीही त्यात भाग घेत जाईन.
तुमच्या जीवनविद्येतील तत्वज्ञान सर्वांना विशेषतः नवीन व्यक्तींना समजावून सांगण्याच्या आस्थेबद्दल जेवढे कौतुक करावे तेवढे थोडे आहे.
विश्वप्रार्थनेची गोडी सर्वांना लागो ही सदगुरूचरणी प्रार्थना........
विठ्ठल विठठ्ल...........
|
Sarve Sukhinha santu! Sarve bhadrani pashyantu! May Divinity Within All get bloomed! May God Bless all!
|
|
|
Deepak_jvm
Global Moderator
Senior Contributor
Offline
Posts: 125
|
 |
« Reply #6 on: May 19, 2007, 11:44:09 PM » |
|
Dear All, This is a very good topic. As this discussion is on books, it would be better if we could start a separate topic for each book. Thus any newcomer can contribute to a discussion on that particular book at any time. Discussion on any Marathi language book can be in two languages - Marathi and English. I am sure, most of you can post your thoughts in both languages. Thus non-Marathi people will get an opportunity to understand jeevanvidya.
God bless you, Deepak
|
|
|
|
|
dr.nutanpol
Senior Namdharaks
Ultimate Contributor
Offline
Gender: 
Posts: 429
|
 |
« Reply #7 on: May 20, 2007, 01:15:49 PM » |
|
May Sadguru bless all of us with akhand Vishvaprarthana in Sadguru-smaran and May all of us be Satshishyas whose goal of life is same as that of him!
Sarvana saprem abhivadan.
Dear Deepak,
Your suggestions are excellent! I feel that we should have discussions on various topics at various levels to fulfill the needs of various sadhaks and if you could arrange this on website it would be a grand idea!
May God bless all of us!
vitthal Vitthal!
dr.nutan
|
Sarve Sukhinha santu! Sarve bhadrani pashyantu! May Divinity Within All get bloomed! May God Bless all!
|
|
|
dr.nutanpol
Senior Namdharaks
Ultimate Contributor
Offline
Gender: 
Posts: 429
|
 |
« Reply #8 on: May 25, 2007, 11:19:43 AM » |
|
अखिल मानवजातीला शांती सुखाचा राजमार्ग दाखवणाऱ्या श्री. सदगुरू पै माऊली व त्यांना पति हाच देव या भावनेने साथ देणाऱ्या सौ. माई यांच्या चरणी कोटी कोटी प्रणाम.
सर्वांना सप्रेम अभिवादन.
आपण आपल्या जीवनाचे शिल्प घडवित असताना कोणकोणत्या गोष्टींकडे लक्ष देणे गरजेचे आहे?
या प्रश्नावर चिंतन करण्याचा श्री. सदगुरू कृपेने प्रयत्न करू या.
एखाद्या शिल्पकाराला दगडी शिल्प घडवत असताना ज्या गोष्टींकडे लक्ष देण्याची गरज आहे त्याच गोष्टींकडे मानवी जीवनशिल्प घडवत असताना देखील लक्ष देणे गरजेचे आहे. (सुगंध जीवन विद्येचा)
१) शिल्पकार-मानवी जीवनाचा शिल्पकार नियती किंवा प्रारब्ध नसून माणूस स्वतः आहे. त्याला परमेश्वराने बुध्दीचे वरदान दिलेले आहे व तिचा उत्कृष्ट वापर करून त्याने सुरेख असे जीवन शिल्प घडवायचे आहे.
१) कच्चा माल- जीवन तत्व-चैतन्य शक्ती हा कच्चा माल आहे. हे जीवन तत्व हा मानवी शिल्पाचा अत्यंत महत्वाचा घटक आहे. या तत्वाचा आपण आदर करून त्याचा सुयोग्य वापर करून आपल्याला सुंदर जीवन शिल्प घडवायचे आहे हे आपल्याला ज्ञात असले पाहिजे. या विषयी अज्ञान असेल तर आपण या कच्च्या मालाकडे दुर्लक्ष करतो किंवा कसे तरी ओबड धोबड जीवन शिल्प घडवतो.
२) उपकरणे-मानवी देह जो अनेक ईंद्रिये मिळून बनला आहे. तसेच त्यात पंचमहादेवांचा व अनेक शक्तींचा वास आहे. हे ध्यानात घेऊन आपण देहाकडे परमेश्वराची जीवंत मूर्ती या भावनेने पाहून मिळालेल्या सर्व ईंद्रियाचा अत्यंत योग्य प्रकारे वापर केला पाहिजे व जीवनशिल्प घडवले पाहिजे. (शरीर साक्षात परमेश्वर)
योग्य आहार-विहार, नियमित व्यायाम-चालणे, व्यसनांपासून अलिप्तता, संगतीबद्दल सावधानता यांकडे लक्ष असले पाहिजे बहिर्मन व अंतर्मन यांचे गुणधर्म लक्षात घेऊन त्यांचा सुसंवाद जीवनात घडवला पाहिजे. त्यांचे कार्य करण्याचे शास्त्र लक्षात घेऊन जीवन जगले पाहिजे. (अमृत मंथन)
३) कष्ट-प्रयत्नांची कास-अभ्यास, सर्वांविषयी आणि सर्व बाबतीत कर्तव्य बुध्दी, कौशल्य आणि कल्पकता हे जीवनशिल्प घडवत असताना अंगी असणे आवश्यक आहे. हे सर्व उत्तम रीत्या करण्याची सवय उपजत असू शकते किंवा ती प्रयत्न साध्य आहे हे लक्षात ठेऊन अंगी बाळगण्याचा आटोकाट प्रयत्न केला पाहिजे. सर्वांविषयी करूणा, कौतुक व कृतज्ञता हे गुणही मानवी जीवनाचे शिल्प घडवत असताना अंगी असणे आवश्यक आहे. (पहा ग्रंथ-तुमचा उत्कर्ष तुमच्या हातात)
४) शिल्पकलेचे ज्ञान-जीवन जगणे ही कला आहे व या कलेचे अनेक पैलू लक्षात घेऊन ज्ञान संपादन करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. सतत शुभ चिंतन, सावधपणा, शहाणपणाने वागणे, निसर्ग नियम लक्षात ठेऊन वागणे, अट्टाहासाने सत्कर्मे करणे, निग्रहाने दुष्कर्मे टाळणे, खर्ची पडलेली पुण्याई भरून काढणे, सत्संगात रहाणे, उत्कृष्ठ ग्रंथांचे वारंवार वाचन करणे, सदगुरू कार्यात भाग घेणे, विश्वप्रार्थना व श्री सदगुरूंनी दिलेल्या साधना करणे, आपल्या वाट्याला आलेले काम प्रेमाने, आवडीने गोडीने करणे, नेहमी तडजोडीस तयार असणे, सर्वांशी समता, सामंजस्य, एकता, सहिष्णुता, शांती व समाधान यावर आधारित वागणूक ठेवणे, योग्य मार्गाने पुरेशी संपत्ती कमावणे, बचत करणे-काटकसर करणे, मुलांकडे-पत्नीकडे लक्ष देणे, संतती मर्यादित असेल याची काळजी घेणे हे या कलेचे काही पैलू आहेत. ( शिल्पकार व सुखी जीवनाचे पंचशील,शांती सुखाचा राजमार्ग)
५) जीवन जगण्याच्या कलेचे ज्ञान ते शिकवणाऱ्या सदगुरूंना शरण गेल्याशिवाय मिळणार नाही हे ध्यानात घेऊन त्यांना शरण गेले पाहिजे. व त्यासाठी आवश्यक ते सर्व केले पाहिजे. या साठी नवविधा भक्तीचा उपयोग होईल. (नामाचा नंदादीप)
६) शिल्पकारावर कुटुंबाचे, समाजाचे, राष्ट्राचे, विश्वाचे व सदगुरूंचे ऋण आहेत हे लक्षात घेऊन त्याने या सर्वांविषयी बांधीलकी समजली पाहिजे आणि योग्य ते सर्व कर्तव्य केले पाहिजे.
आपल्या जीवनाचे शिल्प घडवीत असताना वरील बाबींकडे लक्ष देणे गरजेचे आहे. येथे विस्तार भयापोटी फक्त मुद्यांचा विचार केला आहे. तरी जिज्ञासूंनी श्री. सदगुरूंचे ग्रंथ वाचत चिंतन करावे अशी नम्र प्रार्थना.
वर्षाने चांगले उत्तर दिले आहे व महत्वाच्या मुद्यांना स्पर्श केलेला आहे. कृपया सर्वांनी या चर्चेत भाग घ्यावा अशी नम्र विनंती आहे.
प्र.क २) जीवन संगीतातील स्वर सप्तकापैकी पहिला स्वर जग या विषयी जीवनविद्येने नावीण्यपूर्ण असे काय सांगितले आहे?
श्री सदगुरूंनी आरंभिलेल्या ज्ञानयज्ञाने अधिकाधिक लोकांचे जीवन सुखी होवो व या जगन्नाथाच्या रथास हातभार लावावा अशी बुध्दी सर्वांना होवो ही श्री. सदगुरू चरणी तळमळीची प्रार्थना............
|
Sarve Sukhinha santu! Sarve bhadrani pashyantu! May Divinity Within All get bloomed! May God Bless all!
|
|
|
|
Varsha
|
 |
« Reply #9 on: May 31, 2007, 01:44:07 AM » |
|
Sarvana Namaskar, प्र.क २) जीवन संगीतातील स्वर सप्तकापैकी पहिला स्वर जग या विषयी जीवनविद्येने नावीण्यपूर्ण असे काय सांगितले आहे?
Jeevan sangitatil pahila swar JAG yavishayi sangatana Sadguru Jagavishyi tumcha drushtikon kasa aahe yakade aaple laksha vedhtat. JAG ASAR,MITTHYA VA NASHIVANT NASUN TE SATYA ,NITYA VA NITYA NUTAN AAHE..asa siddhant te mandtat. Varil Siddhanta nusar pratyekane jagakade pahaycha aapla drushtikon jar positive thevla tar tyache tyachyavar eshta parinam hotil...yache spashikaran detana Sadguru mhantat,Jag ha ek Parigh aahe aani apan tyache kendra aahot..aapan je karto tyache jagavar aani jagache aaplyavar satat parinam hot astaat.. Aani he jag nisarg niyaman var chalalele aste..Jag ha jar ek aarsa aahe ase mhatle aani aapan aarshasamor ubhe rahun jar haat jodle tar te aarshatale pratibimb hi aaplyasamor haat jodte..yaulat aapan haat ugarla tar te pratibimb hi aaplyavar haat ugarte..he aapan 'Kriya tashi pratikriya ' ya nisarg niyamapramane pahile. Asech sarva nisarg niyam aapan jagashi jase vagto,vichar karto tyanusar karyanvit hotat aani aaplya jeevanavar prabhav taktat. Mhanun Jagakade pahanyacha aapla drushkon positive asne atyant aavashyak aahe. Vitthal Vitthal!!
|
|
|
|
|
shambhagwat
Guest Members
Ultimate Contributor
Offline
Gender: 
Posts: 308
|
 |
« Reply #10 on: September 14, 2007, 12:16:28 PM » |
|
सर्वांना नमस्कार,
तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार या ग्रंथामुळे माझी विचार करण्याची पध्दतच आमूलाग्र बदलून गेली आहे. गेली १७ वर्षे मी जप करीत आलो आहे. पण ह्या ग्रंथाचे वाचन केल्यावर माझ्याकडून होणारे अशुभ चिंतनाचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर कमी झाले व त्याचा परिणाम माझा जपाचा दर्जा आणखीन सुधारल्याचा अनुभव मी सद्या घेत आहे. काय केले असता आपली अभ्यास चर्चा आणखीन चांगली होऊ शकेल तसेच त्यासाठी अभ्यासाची आत्ताची पध्दत थोडी बदलली तर काय होईल याचाच सद्या विचार करीत आहे. त्यासाठी हा ग्रंथ परत एकदा सावकाश वाचतो आहे. अजून दोन तीन दिवसांनी मी माझे मत मांडायचा प्रयत्न करेन. तेव्हा जरा वेगळ्या पध्दतीने अभ्यास करता येईल का? त्याबाबतची मते मांडेन. असो.
सर्वांना नमस्कार, सर्वांना शुभेच्छा.
|
|
|
|
|
mk
Guest Members
Ultimate Contributor
Offline
Gender: 
Posts: 545
साधनेने प्राप्त सिद्धी ही साध्य नाही साधन
|
 |
« Reply #11 on: September 15, 2007, 11:45:03 AM » |
|
Namonamah
Without a sadguru (according to JV) this could happen (see attached image).
Regards Milind Khadilkar
|
या लिखांणात व्यक्त झालेल्या मतांशी लेखक सहमत असेलच असे नाही.
This content does not necessarily represent the views of the author.
|
|
|
Vaibhav Nimbalkar
Senior Contributor
 
Offline
Gender: 
Posts: 115
Viththal Viththal...
|
 |
« Reply #12 on: September 16, 2007, 08:38:57 PM » |
|
hehehehe.... (according to all )
|
Viththal Viththal.... May GOD bless all... 
|
|
|
Deepak_jvm
Global Moderator
Senior Contributor
Offline
Posts: 125
|
 |
« Reply #13 on: September 16, 2007, 09:09:32 PM » |
|
Dear Mr Bhagwat, I am very happy after reading your post. Wish you all the best for your progress.
May God bless all, Deepak
|
|
|
|
|
dr.nutanpol
Senior Namdharaks
Ultimate Contributor
Offline
Gender: 
Posts: 429
|
 |
« Reply #14 on: September 17, 2007, 12:12:28 AM » |
|
Namaskaar Shri. Sham Bhagwatji,
It is always feels nice to know your point of view. Waiting for your post on "Tuch aahes tuzya jeevanacha shilpakaar." Since this is the first book of Shri. Satguru read by me it holds special place in my life also!
Sarve sukhnh santu Sarve santu niramayh
Vitthal Vitthal.........
|
Sarve Sukhinha santu! Sarve bhadrani pashyantu! May Divinity Within All get bloomed! May God Bless all!
|
|
|
|