dr.nutanpol
Senior Namdharaks
Ultimate Contributor
Offline
Gender: 
Posts: 429
|
 |
« on: June 23, 2007, 03:12:26 AM » |
|
शरीर साक्षात परमेश्वर-
सर्वांना नमस्कार, आपण मराठीतही या ग्रंथांवर अभ्यास चर्चा करू या. कृपया सर्वांनी यात भाग घ्यावा अशी नम्र विनंती आहे. श्री. सुभाष केळकर यांनी सुचवल्याप्रमाणे आपण प्रत्येक मुद्यावर प्रश्न काढून त्यावर उत्तरे लिहू व नंतर त्यावर चर्चा करू या.
शरीराविषयी विकृत दृष्टिकोन-
१) जीवनविद्येचा शरीराकडे पहाण्याचा दृष्टिकोन कोणता?
उ. श्री. सुभाष केळकर यांनी सांगितल्याप्रमाणे शरीर साक्षात परमेश्वर असे प्रतिपादित करताना श्री. सदगुरूंना असे सांगावयाचे आहे की, शरीर म्हणजे विराट चैतन्य शक्तीने (सूक्ष्म चैतन्य तत्वाने) धारण केलेले स्थूल रूप आहे.
२) शरीराकडे पहाण्याचा पारंपारिक दृष्टिकोन कोणता?
उ. शरीर हे असार आहे, नाशिवंत आहे, ते अंतिम सत्य नाही, मिथ्या आहे, टाकावू आहे. शरीर हा परमार्थाच्या आड येणारा धोंडा आहे, तो आत्म्याचा पिंजरा आहे.. वगैरे शब्दात शरीराची निंदा नालस्ती करण्यात येते.
३) या विकृत दृष्टिकोनामुळे कोणते गैरसमज निर्माण झाले?
उ. अ) शरीरातील आत्म्याला-देवाला प्रसन्न करून घ्यायचे असेल तर, मनावर-इंद्रियांवर ताबा मिळवायचा असेल तर शरीराला ताप दिला पाहिजे. देह दंडन केले पाहिजे. तसेच तप व तपश्चर्या या साधनेच्या अंतर्गत अनेक देह दंडन साधना, व्रत वैकल्ये व कर्मकांडे निर्माण झाली.
ब परमार्थ प्रयत्नपूर्वक करायचा व प्रपंच देवावर सोडायचा. बायका-मुलांच्या व स्वतःच्या उदरनिर्वाहाची तसेच शरीराची काळजी घेण्याची गरज नाही. कारण ते मिथ्या आहे. देवाची भक्ती करायची असेल तर कामधंदा न करता भिक्षा मागून उदरनिर्वाह केला तरी चालेल.
देह व त्याशी संबंधित कोणत्याही गोष्टीचा विचार करण्याची गरज नाही असा समज निर्माण झाल्यामुळे बायको-मुलांविषयी अनास्था, कामधंद्याविषयी उदासीनता, दारिद्र्यातही समाधान, आधिभौतिक प्रगती विषयी कोणतेच कर्तव्य नाही असा दृष्टिकोन निर्माण झाला. परमार्थाचा विचार करणे म्हणजे प्रपंच देवावर किंवा दैवावर सोडण्यास तयार होणे, बायको मुलांचा त्याग करण्यास तयार होणे व तसे करणे ही मोठी गोष्ट वाटू लागली. संन्यासाविषयी सर्वसामान्यात मोठे आकर्षण निर्माण झाले.
४) या गैरसमजांचा समाजावर काय परिणाम झाला?
उ. अनेक लोक बैरागी झाले. संन्यासी होणे अलौकिक समजले जाऊ लागले.
कर्मकांडांचा अतिरेक झाला. लोकांच्या अज्ञानाचा पुरोहित वर्गाने फायदा घेतला. लोक प्रयत्नवादी बनायच्या ऐवजी प्रारब्धवादी-दैववादी झाले. वैज्ञानिक प्रगतीकडे दुर्लक्ष झाले. देश मागासलेला राहिला. पारतंत्र्य भोगावे लागले.
देशाला जगात प्रतिष्ठा राहिली नाही. लोकांनीही आपल्या संस्कृतीविषयी आत्मविश्वास गमावला. पाश्चात्यांचे अंधानुकरण होऊ लागले.
४) जीवनविद्येचा या गैरसमजांकडे पहाण्याचा दृष्टिकोन कोणता?
उ. अ) देव प्रसन्न कर्मकांड करून होत नाही कारण तो कोणावरही कृपा करत नाही किंवा कोपही करत नाही. वीज जशी neutral -तटस्थ शक्ती आहे, तिच्यापासून होणारा फायदा-तोटा आपण तिच्याशी ज्ञानावर आधारित संबंध जोडतो की अज्ञानाच्या आधारावर जोडतो त्यावर अवलंबून आहे. तसेच निसर्ग नियमांचे ज्ञान लक्षात घेऊन जर आपण परमेश्वरी शक्ती ज्या ज्या रूपात व्यक्त झाली आहे त्या सर्व रूपांशी म्हणजेच सर्व प्राणिमात्रे व चराचर विश्वाशी संबंध कशाप्रकारे जोडतो, कसे वागतो-विचार करतो त्यावर आपल्या जीवनातलेसुख-दुःख अवलंबून आहे. ब) देह ही परमेश्वराची जीवंत मूर्ती असल्याने देहाकडे दुर्लक्ष करणे जीवनविद्येला बिलकुल मान्य नाही. देहाला उत्तम आहार दिला पाहिजे आणि योगासने-व्यायाम-प्राणायाम, चालणे या सारख्या गोष्टी नियमितपणे करून देहाची उत्तम काळजी घेतली पाहिजे.
देह किंवा बायकोमुलांचा प्रपंच देवावर किंवा दैवावर सोडणे जीवनविद्येला मंजूर नाही. जीवनविद्या असे सांगते की, प्रपंच असा युक्तीने केला पाहिजे की सुखी प्रपंचातून परमार्थ आपोआप सिध्द झाला पाहिजे. प्रंपंच परमार्थाच्या आड येत नाही तर अज्ञान आड येते. जीवन जगणे ही कला आहे व जो ही कला श्री. सदगुरूंना शरण जाऊन शिकून घेतो तो खरा शहाणा व खरा कलावंत होय व त्याचे जीवन निश्चितपणे सुखाचे होते.
आधिभौतिक प्रगती-वैद्यानिक प्रगती व आत्मिक प्रगती दोन्हींची समाजाला गरज आहे. वैद्यानिक प्रगती मुळे माणसाचे आयुष्यमर्यादा वाढली, रहाणीमान सुधारले पण त्याला जर नैतिक मुल्यांची-जीवन मुल्यांची जोड नसेल, ज्ञान व शहाणपण नसेल तर माणूस स्वतःच स्वतःच्या हाताने मानवजातीचा नाश करून घेईल म्हणून दोन्हीकडे लक्ष दिले पाहिजे.
आपल्या वाट्याला आलेले काम आपण अतिशय आवडीने, प्रेमाने सर्व शक्ती पणाला लावून केले पाहिजे. त्यामुळे एका बाजूला आपल्याला पुण्याची प्राप्ती होते व दुसऱ्या बाजूने लोकांना मदत होते, कुटुंबाची समाजाची, राष्ट्राची प्रगती होते व त्यामुळे विश्वातील सर्वांनाच त्याचा प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरीत्या फायदा होतो.
संन्यासी होणे म्हणजे पलायनवाद होय. जीवनाच्या रणांगणावर आपण पाय रोवून उभे राहिले पाहिजे व ज्ञान-शहाणपण-विवेक यांच्या आधारावर श्री. सदगुरू बोधात राहून आनंद वाटता वाटता आनंद लूटत जगायचे असे धोरण मनाशी बाळगून जीवनाचा आनंद अनुभवला पाहिजे.
|