dr.nutanpol
Senior Namdharaks
Ultimate Contributor
Offline
Gender: 
Posts: 429
|
 |
« on: July 12, 2007, 02:20:25 AM » |
|
आपले अनेक नामधारक बंधु-भगिनी परदेशात वास्तव्यास आहेत व त्यांच्याजवळ हा ग्रंथ नाही हे समजल्यावर ह्या सुंदर ग्रंथातील प्रकरणे वेबसाईट वर लिहून त्यांना कळवावीत अशी प्रेरणा निर्माण झाल्याने ती येथे देत आहे.
शरीर साक्षात परमेश्वर
--विकृत दृष्टीकोन--
"शरीर साक्षात परमेश्वर" हा जीवनविद्येचा सिध्दांत वाचून वाचकांच्या भुवया निश्चित उंचावतील याची आम्हाला पूर्ण खात्री आहे. ह्याचे मुख्य कारण असे की, शरीराबद्दल आपण आतापर्यंत जे वाचत आलो, ऐकत आलो व सांगत आलो, त्यापेक्षा हा सिध्दांत आगळा आणि वेगळा आहे. शरीर हे नाशवंत आहे, असार आहे, मिथ्या आहे, टाकावू आहे, वगैरे अशा शब्दात शरीराची निंदा-नालस्ती करण्यात येते. याचा दृश्य परिणाम असा झाला की मानवी शरीराकडे पहाण्याची दृष्टी विकृत झाली. शरीराला ताप दिल्याशिवाय किंवा त्रास दिल्याशिवाय देव प्रसन्न होत नाही असा आणखीन एक गैरसमज निर्माण झाला. तीर्थयात्रा करणे, व्रतवैकल्ये करणे, उपासतापास करणे, देहदंडण करणे, अनवाणी प्रदक्षिणा घालणे किंवा देवाच्या दर्शनाला जाणे वगैरे, शरीराला ताप देण्याचे प्रकार , "तप किंवा तपश्चर्या" या नावाखाली प्रचलित झाल्या. जीवनविद्येला हा सर्व प्रकार मान्य नाही. वर म्ह्टल्याप्रमाणे मानवी शरीराकडे पहाण्याचा दृष्टीकोन विकृत झाल्यामुळे त्याचा जीवनाकडे पहाण्याचा दृष्टीकोन विकृत झाला. शरीराची काळजी न घेणे, शरीराकडे दुर्लक्ष करणे, संसाराकडे व मुलाबाळांकडे लक्ष न देणे व संसारातील सर्व गोष्टी दैवाधीन अशा भावनेने प्रयत्नवादाला सोडचिठ्ठी देणे वगैरे गोष्टी केल्या म्हणजे आपण देवाचे मोठे भक्त झालो, असा भ्रम त्याच्या ठिकाणी निर्माण झाला. त्याचप्रमाणे जन्म-मरणातून सुटका म्हणजे मोक्ष व हा मोक्ष प्राप्त करून घेण्यासाठी एकांतात जाणे, वैराग्याची कास धरणे, आधिभौतिक प्रगतीकडे दुर्लक्ष करणे, साधू, बैरागी किंवा संन्यासी होणे वगैरे गोष्टी करण्यात , देव, धर्म, उपासना व जीवनाची सार्थकता आहे अशी लोकांची धारणा होऊन बसली. देहाकडे, संसाराकडे व जीवनाकडे पहाण्याचा दृष्टीकोन असा विकृत झाल्यामुळे आधिभौतिक प्रगतीकडे, सामाजिक जीवनाकडे व राष्ट्रहिताकडे लोकांचे संपूर्ण दुर्लक्ष झाले. परकीय आक्रमणाला आपण यशस्वी तोंड देऊ शकलो नाही व गुलामगिरीच्या बंधनात शेकडो वर्षे जखडून पडलो, त्याची अनेक कारणे आहेत, त्यापैकी एक मुख्य कारण म्हणजे शरीराकडे व जीवनाकडे पहाण्याचा वरील विकृत दृष्टीकोन हाच होय. (पान १७ व १८)
--परमेश्वर म्हणजे काय--
"शरीर साक्षात परमेश्वर" हा विषय पहाण्यापूर्वी "परमेश्वर" म्हणजे नेमके काय ते पाहिले पाहिजे. सर्वसाधारणपणे लोक समजतात तसा परमेश्वर मुळातच नाही. "परमेश्वर" या विषयासंबंधी लोकमानसात प्रचंड गोंधळ दिसून येतो त्याचे प्रमुख कारण म्हणजे परमेश्वराचे झालेले चित्रीकरण, मूर्तीकरण व व्यक्तीकरण होय. परमेश्वर म्हटल्यानंतर निरनिराळ्या निरनिराळ्या निरनिराळ्या लोकांच्या दृष्टीपुढे निरनिराळ्या प्रकारचा परमेश्वर येईल. परंतु जीवनविद्येच्या दृष्टीकोनातून सर्व धर्मातील सर्व लोकांसाठी परमेश्वर एकच असून तो निर्गुण, निराकार, अव्यक्त, सर्वशक्तिमान, अदृश्य, सर्वव्यापी व अनंतस्वरूप आहे. परमेश्वर निर्गुण आहे याचा अर्थ, सर्व गुण जेथून उदयाला येतात त्याला निर्गुण असे म्हणतात. परमेश्वर निराकार आहे याचा अर्थ, सर्व गुण जेथून प्रगट होतात त्याला निराकार असे म्हणतात. परमेश्वर अव्यक्त आहे म्हणजे सर्व व्यक्त रूपे ज्या मूळ स्वरूपातून व्यक्त होतात त्याला अव्यक्त असे म्हणतात. परमेश्वर सर्वव्यापी आहे याचा अर्थ, सर्वांना व्यापून जे उरते त्याला सर्वव्यापी असे म्हणतात. परमेश्वर सर्वशक्तिमान आहे याचा अर्थ, सर्वांचे जे अधिष्ठान व आधार आहे त्याला सर्वशक्तिमान असे म्हणतात. परमेश्वर अदृश्य आहे याचा अर्थ, सर्व दृश्यरूप जेथून उदयाला येते त्याला अदृश्य असे म्हणतात. परमेश्वर अनंतस्वरूप आहे याचा अर्थ असा की, त्याला आदि नाही आणि अंत नाही, त्याला पार नाही आणि सीमा नाही. असा हा परमेश्वर सच्चिदानंदस्वरूप आहे. परमेश्वराचे आनंद हे स्वरूप आहे, जाणीव हे त्याचे रूप आहे व शक्ति हा त्याचा गाभा आहे. (१९ व २०) ---सर्वत्र ईश्वर---
वर म्हटल्याप्रमाणे?परमेश्वर" हा शब्द उच्चारल्याबरोबर निरनिराळ्या निरनिराळ्या निरनिराळे लोक परमेश्वरासंबंधी निरनिराळ्या कल्पना करतात. प्रत्यक्षात मात्र लोक समजतात त्यापेक्षा परमेश्वराचे स्वरूप आगळे आणि वेगळे असे आहे. हा परमेश्वर म्हणजे प्रत्यक्षात सच्चिदानंद स्वरूप असून चैतन्याचा विराट सागर आहे. म्हणूनच हे चैतन्य विश्वात सर्वत्र वास करून आहे. ज्ञानेश्वरीत ज्ञानेश्वर महाराज सांगतात,
सर्व उपाधिमाजी गुप्त , चैतन्य असे सर्वगत, ते तत्वज्ञ स्विकारिती. भगवत गीतेत याच चैतन्याला "ईश्वर" असे म्हटले आहे.
ईश्वरः सर्व भूतानाम् ह्द्देशेर्जुन तिष्ठति, भ्रामयन सर्व भूतानि यंत्ररूढानि मायया
थोडक्यात सर्व भूतमात्रात ईश्वर वास करतो म्हणजे चैतन्य वास करते. वर म्हटल्याप्रमाणे आनंद स्वरूप असल्यामुळे व जाणीव हे त्याचे रूप असल्यामुळे, हे चैतन्य सतत स्फुरद्रुप असते. याचाच भावार्थ असा की, हे चैतन्य व्यक्त होण्यासाठी, सगुण होण्यासाठी, साकार होण्यासाठी नित्य स्फुरत असते. म्हणूनच हे चैतन्य विश्वरूपाने व्यक्त होते, प्रगट होते, सगुण साकार होते. इतकेच नव्हे तर प्रगट झालेल्या या विश्वात तेच चैतन्य बीजरूपाने वास करून रहाते. हा सर्व प्रकार कसा घडतो हे उदाहरण देऊन स्पष्ट करता येईल. आंब्याची एक कोय जमिनीत पेरल्यानंतर काही दिवसांनी तीच कोय जमिनीखाली नाहीशी होते व अंकुर रूपाने जमिनीच्यावर उगवते, व्यक्त होते. पुढे याच अंकुराचे रूपांतर बुंध्यामध्ये होते. अशा प्रकारे पेरलेल्या कोयीचे मोठ्या वृक्षात परिवर्तन होते व ते विविध स्वरूपात म्हणजेच अंकुर, बुंधा, फांद्या, पाने, मोहोर व आंबे या सर्व प्रकाराने बहरून येते. याच आंब्याच्या झाडावर तीन हजार आंबे आले तर प्रत्येक आंब्यात कोय असलेली दिसून येईल. म्हणजे जी फक्त एक कोय जमिनीत पुरलेली होती ती विविध रूपात म्हणजेच अंकुर, बुंधा, फांद्या, पाने, मोहोर, आंबे या सर्व रूपाने ती विस्तारित झाली व पुन्हा प्रत्येक आंब्यात कोय रूपाने वास करून राहिली. असाच प्रकार चैतन्य स्वरूपात घडत असतो. म्हणूनच ज्ञानेश्वर महाराज सांगतात,
अनंतरूपे अनंतवेषे देखिले म्या त्यासी, बापरखुमादेवीवरू खूण बाणली ऐसी
थोडक्यात सच्चिदानंदस्वरूप चैतन्य विश्वरूपाने विविध रूपात प्रगट होते व सर्व भूतमात्रात बीजरूपाने वास करून रहाते. म्हणूनच भगवंताने गीतेत सांगितले आहे.
"बीजं मां सर्व भूतानां विध्दी पार्थ सनातनम् "
ज्ञानेश्वरीत ज्ञानेश्वर महाराज तेच सांगतात,
तैसा मज एकाचा विस्तार ते हे जग
"विश्वात सर्वत्र परमेश्वर वास करतो" हा प्रज्ञावंत ज्ञानी भक्तांचा सिध्दांत निसर्ग रक्षण व पर्यावरण संरक्षण या विषयाच्या संदर्भात किती महत्वाचा ठरतो, हे वाचकांच्या ध्यानात येईल. आता येथे महत्वाची गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे ती ही की जे चैतन्य विश्वरूपाने प्रगट झाले त्याच विश्वाचा आपले मानवी शरीर हा एक अविभाज्य भाग आहे. इतकेच नव्हे तर ते चैतन्य बीजरूपाने मानवी शरीरात वास करून रहाते. हेच निराळ्या शब्दात सांगायचे झाले तर अव्यक्त, अदृश्य,अरूप, निर्गुण, निराकार असे हे चैतन्य "मानवी शरीर " या रूपात व्यक्त, दृश्य,सगुण, साकार या स्वरूपात प्रगट झाले. ज्याप्रमाणे पाणी लहर रूपाने प्रगट होते व ती लहर अंर्तबाह्य पाणीस्वरूप असते, त्याप्रमाणे चैतन्य मानवी शरीर रूपाने साकार झालेले असून ते अंर्तबाह्य चैतन्यरूप आहे. असे हे शरीर साक्षात परमेश्वर आहे हा जीवनविद्येचा मौल्यवान सिध्दांत अधिक स्पष्ट करणे इष्ट वाटते. (पान २० ते २३) --नैसर्गिक पध्दतशीर व्यवस्था--
सच्चिदानंदस्वरूप परमेश्वर जेव्हा विश्वरूपाने प्रगट होतो तेव्हा तो विश्वात सर्वत्र " नैसर्गिक पध्दतशीर व्यवस्था " या रूपात सगुण साकार झालेला दिसून येतो. म्हणूनच जीवनविद्येने विश्वरूपाने व्यक्त झालेल्या परमेश्वराची खालील प्रमाणे व्याख्या केलेली आहे.
" निसर्गनियमांसहित स्वयंचलित स्वयंनियत्रित नैसर्गिक पध्दतशीर व्यवस्था म्हणजे परमेश्वर "
" नैसर्गिक पध्दतशीर व्यवस्था " या स्वरूपात परमेश्वर विश्वात कसा प्रगट झालेला आहे हे खालील निवडक उदाहरणावरून स्पष्ट करता येईल.
१) अवकाशात सूर्य स्थिर असतो व त्याच्या भोवती पृथ्वीसकट इतर ग्रह फिरत असतात. पृथ्वी स्वतःभोवती फिरत फिरत सूर्याभोवती फिरत असते. पृथ्वीचे स्वतःभोवतीचे फेरे व सूर्याभोवतीचे फेरे ठराविक विशिष्ट पध्दतीने व ठराविक वेळापत्रकाप्रमाणे होत असतात. हा सर्व भव्य व दिव्य प्रकार पुरातन काळापासून आजतागायत, व्यवस्थित पध्दतीने चालत राहिलेला आहे. पृथ्वीच्या या फिरण्यामुळेच आपल्याला दिवस व रात्र अनुभवाला येतात व त्याचप्रमाणे उन्हाळा, हिवाळा, पावसाळा वगैरे ऋतू नियमाने येत असतात. हा सर्व प्रकार व्यवस्थित चालत असतो, तरीसुध्दा येथे ही व्यवस्था प्रत्यक्षपणे कोणीही करीत असताना दिसत नाही. त्याचप्रमाणे या नैसर्गिक पध्दतशीर व्यवस्थेच्या अंतर्गत स्वयंचलित स्वयंनियत्रित अशी अलौकिक व अद्भूत व्यवस्था असून ही सर्व व्यवस्था निसर्गनियमाने मंडित आहे, अशी आहे ही नैसर्गिक पध्दतशीर व्यवस्था.
२) पृथ्वीसकट सर्व ग्रह सूर्याभोवती अवकाशात फिरत असतात, परंतु सूर्यासकट हे सर्व ग्रह अवकाशात कोसळत नाहीत, याचे कारण गुरूत्वाकर्षणाच्या भव्य व दिव्य अशा अद्भूत शक्तिच्या प्रभावामुळे ते सर्व एकमेकांना धरून व सांभाळून आहेत, अशी आहे ही नैसर्गिक पध्दतशीर व्यवस्था.
३) समुद्राचे खारट पाणी सूर्याच्या प्रभावामुळे वर खेचले जाऊन त्याचे रूपांतर ढगात होते व त्याच ढगाकडून पृथ्वीवर गोड पाण्याचा वर्षाव होतो,अशी आहे ही नैसर्गिक पध्दतशीर व्यवस्था.
४) पर्जन्यवृष्टीमुळे डोंगर-पर्वत, कपारीतून नद्यांचे प्रवाह वाहू लागतात व ते सर्व प्रवाह पुन्हा समुद्राला जावून मिळतात, अशी आहे ही अशी आहे ही नैसर्गिक पध्दतशीर व्यवस्था.
५) पर्वत, डोंगर, टेकड्या, विहिरी, तलाव, नद्या, वृक्ष-वनस्पती, सरोवरे,जलचर, प्राणी, पशु-पक्षी वगैरे सर्व भूतमात्र व सर्व प्राणिमात्र हे सर्व एकमेकांशी संबंधीत असून, त्यांचे अस्तित्वसुध्दा एकमेकांवर अवलंबून असते. यालाच पर्यावरण व्यवस्था म्हणतात. अशी आहे ही नैसर्गिक पध्दतशीर व्यवस्था.
६) पृथ्वीवर विविध प्रकारचे लहानमोठे वृक्ष आहेत. हे वृक्ष म्हणजे प्रत्यक्षात शंकराचे अवतारच होत. ज्याप्रमाणे शंकराने विष स्विकारून जगाला अमृत उपलब्ध करून दिले, त्याचप्रमाणे हे वृक्ष कार्बन डाय ऑक्साईड स्वतःसाठी स्विकारतात व जगाला ऑक्सिजन उपलब्ध करून देतात. अशी आहे ही नैसर्गिक पध्दतशीर व्यवस्था. 7) मातेच्या गर्भपिशवीत मूल जन्माला येते. नऊ महिने गर्भाशयात त्याची जोपासना होते, मुल जन्मल्यानंतर मातेच्या स्तनात दूध निर्माण होते, अशा रितीने लहान मुलांची सर्व प्रकारे जीवनव्यवस्था होते. अशी आहे ही नैसर्गिक पध्दतशीर व्यवस्था. ८) पशु, पक्षी, जलचर वगैरे सर्व प्राणीमात्र व सर्व भूतमात्र आणि विश्वातील सर्व माणसे पृथ्वीवर वास करतात. परंतु पृथ्वीमातेने सर्व प्राणीमात्रांना जर धरून ठेवले नसते तर सर्व प्राणीमात्र व सर्व माणसे अवकाशात फेकली गेली असती. परंतु परमेश्वरी नैसर्गिक पध्दतशीर व्यवस्था. इतकी सुरेख आहे की, गुरूत्वाकर्षणाच्या अलौकिक शक्तीच्या प्रभावाने सर्व भूतमात्रांना पृथ्वी मातेने घट्ट धरून ठेवले आहे. ज्याप्रमाणे लहान मुले दिवसभर खेळतात व रात्र झाली की, आईच्या कुशीत जाऊन विसावतात व झोपतात, त्याचप्रमाणे सर्व प्राणीमात्र व सर्व माणसे दिवसभर पोट कार्यरत असतात व रात्र झाली की पृथ्वीमातेच्या कुशीत जाऊन विसावतात व झोपतात. अशी आहे ही नैसर्गिक पध्दतशीर व्यवस्था. ९)जीवनविद्येच्या दृष्टीकोनातून पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश ही पंचमहाभूते म्हणजे प्रत्यक्षात पंचमहाभूते म्हणजे प्रत्यक्षात पंचमहादेव होत. भव्य व दिव्य परमेश्वरी नैसर्गिक पध्दतशीर व्यवस्था, या पंचमहादेवाच्या रूपाने प्रगट झालेली आहे. पृथ्वी स्थूल आहे तर जल तत्व पृथ्वीपेक्षा सूक्ष्म आहे व व्यापक आहे. जल तत्त्वापेक्षा प्रकाश तत्त्व अधिक सूक्ष्म आहे व व्यापक आहे. त्याचप्रमाणे आकाश तत्त्व आधीच्या सर्व तत्त्वांपेक्षा अधिक सूक्ष्म असून व्यापक आहे. या संदर्भात दुसरा महत्त्वाचा मुद्दा असा की, ही पंचमहातत्त्वे एकापेक्षा एक सूक्ष्म, उपयुक्त, व्यापक व उपलब्ध असलेली दिसून येतात. पृथ्वी हे तत्त्व स्थूल असून उपयुक्त आहे. सर्व वैश्विक जीवनाला पृथ्वी हा मोठा आधार आहे. थोडक्यात पृथ्वीशिवाय जीवन अशक्य आहे. परंतु जल तत्व हे पृथ्वीपेक्षा अधिक सूक्ष्म व उपयुक्त असून ते पृथ्वी तत्त्वा पेक्षा ते अधिक प्रमाणात उपलब्ध आहे.
|
Sarve Sukhinha santu! Sarve bhadrani pashyantu! May Divinity Within All get bloomed! May God Bless all!
|
|
|
|
Varsha
|
 |
« Reply #1 on: July 17, 2007, 04:21:55 AM » |
|
Dear Nutan Tai, Thanks a lot for this Granth!Thank you so much for taking so many efforts for us.
May God Bless You.
|
|
|
|
|
dr.nutanpol
Senior Namdharaks
Ultimate Contributor
Offline
Gender: 
Posts: 429
|
 |
« Reply #2 on: July 31, 2007, 01:07:35 AM » |
|
त्याचप्रमाणे वायुतत्त्व आधीच्या तीन तत्त्वापेक्षा अधिक उपयुक्त असून ते सर्वत्र उपलब्ध आहे. वायु तत्त्वाशिवाय वैश्विक जीवन अक्षरशः अशक्य आहे. जेथे आपले नाक जाईल तेथे हवा उपलब्ध असते. हवेचा काळाबाजार करता आला असता तर मानवजातीवर महासंकट आले असते. परंतु नैसर्गिक पध्दतशीर व्यवस्था इतकी सुंदर आहे की, हवा सर्वांना सर्वत्र उपलब्ध आहे व कोणालाही हवेची मक्तेदारी किंवा काळाबाजार करता येत नाही, हे सर्वांचे सुदैव होय. शेवटचे महा तत्त्व म्हणजे आकाश हे तत्त्व अत्यंत सूक्ष्म व उपयुक्त असून या तत्त्वाशिवाय वैश्विक जीवन अशक्य आहे. असे हे आकाश तत्त्व सर्वांना सर्वत्र उपलब्ध असून या आकाशाच्या पोटात सर्व भूतमात्रांना आधार व आसरा मिळालेला आहे. अनंत कोटी ब्रम्हांडे या आकाशाच्या पोटात वास करून आहेत. अशी आहे ही पंच महाभूतांची सुंदर नैसर्गिक पध्दतशीर व्यवस्था. आता आपण "शरीर साक्षात परमेश्वर" या मुख्य विषयाकडे वळू. (पान -२९)
शरीर साक्षात परमेश्वर विश्वात सर्वत्र विविध रूपाने परमेश्वर प्रगट झाला आहे. त्याच प्रमाणे तो "मानवी शरीर" या स्वरूपात सुध्दा सगुण-साकार झालेला आहे. निसर्ग नियमांनी मानवी शरीर बध्द आहे. त्याचप्रमाणे हेच मानवी शरीर स्वयंचलित, स्वयंनियंत्रित असून ते नैसर्गिक पध्दतशीर व्यवस्था अशा स्वरूपात व्यक्त आहे.
तुकाराम महाराज सांगतात-
"अवघे ब्रम्हरूप रिता नाही ठाव , प्रतिमा तो देव कैसा नोहे"
त्याच धर्तीवर जीवनविद्या सांगते-
"अवघे ब्रम्हरूप रिता नाही ठाव , शरीर तो देव कैसा नोहे"
या संदर्भात ज्ञानेश्वर महाराज सांगतात,
"विश्व परते सारावे मग माते घ्यावे, ऐसा मी नोहे आघवे सकटची मी"
याचा अर्थ असा की, समोर दिसणाऱ्या विश्वाला बाजूला सारायचे आणि कुठेतरी जंगलात किंवा गुहेत किंवा खोलीमध्ये कोंडून घेऊन डोळे मिटून देवाला पाहण्याचा प्रयत्न करायचा, हा प्रकार संतांना मान्य नाही. कारण डोळ्यांना न दिसणारा परमेश्वर डोळ्यांना दिसावा म्हणून आपले निर्गुण स्वरूप टाकून विश्वरूपाने सगुण साकार झाला. ज्याला विश्वात परमेश्वर पाहता येत नाही त्याला सगुण निराकार परमेश्वर स्वरूप कधीच आकळता येणार नाही. या संदर्भात ज्ञानेश्वर महाराज ठणकावून सांगतात,
हे समस्तही श्री वासुदेवो, ऐसा प्रतिती रसाचा ओतला भावो, तो भक्तामाजि रावो आणि ज्ञानिया तोचि
याचा अर्थ असा की, जो विश्वामध्ये परमेश्वराला पहातो म्हणजेच विश्वरूपाने प्रत्यक्ष परमेश्वरच प्रगट झालेला आहे असे पहातो तो सर्व भक्तांमध्ये श्रेष्ठ असून तोच खरा ज्ञानी होय. जी गोष्ट विश्वाची तीच गोष्ट शरीराची. शरीराला बाजूला सारायचे आणि आत्मतत्त्वाला पाहण्यासाठी एकांतात स्वतःला कोंडून घ्यायचे, हे जीवनविद्येला मान्य नाही. कारण निर्गुण निराकार परमेश्वरच शरीररूपाने सगुण साकार झालेला आहे आणि म्हणून शरीररूपाने परमेश्वरच प्रगट आहे, मूर्तीमंत आहे हे ज्याला आकळता येत नाही, त्याला परमेश्वराचा अमृतानुभव कधीच प्राप्त होणार नाही. म्हणूनच ज्ञानेश्वर महाराज सांगतात,
जे जे भेटे भूत ते ते जाणीजे भगवंत हा भक्तियोग निश्चित जाण माझा
जीवनविद्येच्या दृष्टिकोनातून मानवी जीवनात "मानवी शरीर" हाच सर्वात महत्त्वाचा घटक आहे. मानवी शरीर ही संकल्पना वजा केली तर काहीही उरत नाही, इतकेच नव्हे तर काहीही उरत नाही हे सांगण्यास सुध्दा काहीही उरत नाही. दुसऱ्या शब्दात सांगायचे म्हणजे मानवी शरीर नाही तर देव-धर्म, बायको-मुले, घर-दार, उद्योग-व्यवसाय, यज्ञ-याग, भजन-पूजन, प्रपंच-परमार्थ वगैरे काहीही असू शकत नाही. थोडक्यात मानवी शरीर आहे म्हणून सर्व काही आहे व ते नसेल तर काहीच नाही, अशी वस्तुस्थिती आहे. जीवनात मानवी शरीराचे एवढे प्रचंड महत्त्व असून सुध्दा लोकांना मानवी शरीराची किंमत कळत नाही, हीच खरी मानव जातीची शोकांतिका होय. जीवनविद्या सांगते की, "शरीर साक्षात आकार परमेश्वराचा" म्हणजे "शरीर हा साक्षात्कार आहे परमेश्वराचा." प्रत्यक्ष परमेश्वर म्हणजेच "नैसर्गिक पध्दतशीर व्यवस्था" मानवी शरीर या रूपात प्रकट झालेली आहे. ही व्यवस्था मानवी शरीराच्या ठायी अलौकिक व अद्भुत अशा स्वरूपात अंतर्बाह्य नांदत आहे. योजना, रचना, कौशल्य, प्रमाण, सहजता व अचूकता या सर्व गोष्टींचा सुरेख मिलाफ होऊन मानवी शरीराची निर्मिती झालेली दिसून येते. अनेक उदाहरणे देऊन हा विषय़ स्पष्ट करता येईल. परंतु पुस्तकाचा आकार प्रमाणाबाहेर जाऊ नये म्हणून थोडक्यात काही उदाहरणे हा विषय स्पष्ट करतो. मानवी शरीरात डोळ्यांचे महत्त्व अपार आहे. कोहिनूर हिऱ्यापेक्षा सुध्दा ह्या डोळ्यांची किंमत लाखोपटीने अधिक आहे. कोंदणात हिरा बसवावा त्याप्रमाणे हाडांच्या कोंदणात डोळे रूपी हिरे बसविलेले आहेत. डोळ्यावर आघात होऊ नये म्हणून संवेदनाशील पापण्यांचा व पापण्यांच्या केसांची योजना झालेली आहे. डोळे सदैव स्वच्छ व सुस्थितीत रहावे म्हणून डोळ्यांच्या वरच्या भागातून पाण्याचा स्त्राव सूक्ष्म स्वरूपात सतत होत असतो. डोळ्यांच्या सुरक्षिततेसाठी केलेल्या योजनेप्रमाणे डोळ्यांची सर्व अंतर्बाह्य रचना अत्यंत कौशल्याने सहजपणे, अचूकपणे योग्य प्रमाणात योजनापूर्वक केलेली किंवा झालेली दिसून येते. त्याच प्रमाणे मुखातील दात, दाढा, हिरड्या, जीभ व पडजीभ या सर्व अवयवांच्या बाबतीत योजना, रचना, प्रमाण, सहजता, अचूकता व कौशल्य दिसून येते. डोळे व दात याप्रमाणेच इतर सर्व अवयवांच्या बाबतीत हाच प्रकार दिसून येतो. याच्याही पलीकडे शरीरातील अंतर्गत व्यवस्था सूक्ष्म व गुंतागुंताची आहे. उदाहरणार्थ यकृत, उदर, जठर, प्लीहा, पित्ताशय, ह्दय, मूत्रमार्ग, फुफ्फुसे वगैरे. सर्वात मह्त्त्वाचा घटक म्हणजे रक्त होय. अंत्यंत आश्चर्यकारक व अद्भुत पध्दतीने शरीरात रक्त सहजपणे निर्माण होते. जे रक्त निर्माण होते ते प्रमाणात असते. अंत्यंत योजनाबध्द पध्दतीने आणि कौशल्याने या रक्ताचा पुरवठा सर्व शरीराला अचुकपणे होत असतो. या सर्वांच्याही पलीकडे मन, चित्त, बुध्दी ही इंद्रिये असून या अंतरेद्रियांचे पूर्ण स्वरूप माणसाला आकळता आलेले नाही. ह्या सर्वांच्याही पलीकडे अत्यंत सूक्ष्म अशा सर्व शक्ती म्हणजे कल्पना, भावना, धारणा, वासना, संकल्प, विकल्प वगैरे शरीराच्या आधारे नांदत असतात. सर्वात विस्मयकारक व विलक्षण अशा दोन शक्ती शरीराच्या आधारे नांदत असतात व त्या म्हणजे स्मृती व विस्मृती होय. माणसाच्या जीवनात आयुष्यभर अनेक लहान मोठ्या घटना घडत असतात व त्या सर्व अत्यंत योजनाबध्द पध्दतीने, कौशल्याने, सहजपणे व अचूकपणे सूक्ष्म जाणीवेच्या टेपवर गुप्त पध्दतीने रेकॉर्ड केल्या जातात. हा सर्व प्रकार गुप्तपणे घडून राहिलेला आहे, याचा पत्ताच माणसाला नसतो. परंतु आपण प्रयत्न केला तर त्या घटना पुन्हा आठवता येतात. सिनेमामध्ये पूर्वकाळात घडलेल्या घटना फ्लॅशबॅक पध्दतीने पुन्हा दाखवण्यात येतात. अगदी त्याचप्रमाणे स्मृतीचे बटन जेव्हा आपण दाबतो तेव्हा पूर्व काळात घडून गेलेल्या घटना आपल्याला भराभर आठवता येतात व त्या सर्व मनःचक्षूपुढे दिसू लागतात.
जीवनात घडलेल्या सर्व घटना आपण बहिर्मनाच्या द्वारे अंतर्मनात साठवतो व प्रसंगानुरूप त्या पुनः आपल्याला अंतर्मनातून बहिर्मनात विशिष्ट प्रक्रियेने आणता येतात. मानवी जीवनातील सर्व घटना या अशा प्रकारे नेमक्या कोठे रेकॉर्ड होतात, नेमक्या कुठल्या पध्दतीने त्या रेकॉर्ड केल्या जातात व पुन्हा आपल्याला पाहिजे तेव्हा कशा आठवता येतात व विसरता येतात हा सर्व प्रकार अत्यंत अद्भूत, विलक्षण व विस्मयकारक आहे. परंतु एक गोष्ट मात्र खरी, ती ही की, निसर्गनियमांसहित स्वयंचलित स्वयंनियत्रित नैसर्गिक पध्दतशीर व्यवस्थेकडून हा सर्व प्रकार घडत असतो. आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा असा की, विश्वातील सर्व माणसे मानवजात या नात्याने दिसायला सारखीच असतात म्हणजे जगातील प्रत्येक माणसाला नाक, कान, डोळे, हात, पाय, मन, चित्त, बुध्दी वगैरे सर्व अंतर्बाह्य अवयव सारखेच असतात. परंतु जगातील प्रत्येक माणूस दुसऱ्या माणसापेक्षा अनेक प्रकारे वेगळा असतो. प्रत्येक माणसाचे रूप वेगळे, आवाज वेगळा, चालणे वेगळे, हस्ताक्षर वेगळे, बोटांचे ठसे वेगळे, स्वभाव वेगळा, आवड वेगळी, विचार वेगळे, रंग वेगळा असा सर्व प्रकार असतो. हा प्रकार म्हणजे नैसर्गिक पध्दतशीर व्यवस्थेची भव्य, दिव्य व अद्भुत अशी योजना असते. अशी जर योजना नसती व जगातील सर्व माणसे दिसायला व असायला सारखीच असती तर मानवी जीवनात प्रचंड गोंधळ निर्माण झाला असता किंबहुना मानवी जीवनात प्रलयच निर्माण झाला असता. एक उदाहरण देऊन हे उदाहरण स्पष्ट करता येईल. जन्माला आलेली जुळी माणसे, दोन पुरूष किंवा स्त्रिया दिसायला इतकी हुबेहुब व सारखी असतात की, त्यांच्या घरातील माणसे सुध्दा फसतात, मग इतरांची गोष्टच बोलायला नको परंतु नैसर्गिक, पध्दतशीर व्यवस्था इतकी अचुक आहे की, क्वचित जुळ्या माणसांचा अपवाद सोडला तर, वर म्हटल्याप्रमाणे जगातील माणसे, मानवजात म्हणून जरी एकाच प्रकारे दिसत असली तरी प्रत्यक्षात मात्र रंगारूपाने विविध प्रकारची असतात. सर्वात विस्मयकारक व आश्चर्यकारक गोष्ट अशी की अब्जावधी माणसे पूर्वी होऊन गेली, आज अब्जावधी माणसे जगात आहेत या पुढेही अब्जावधी माणसे जन्माला येतील. तरीही ही सर्व माणसे रंगारूपाने वेगवेगळी असतात व असतील. अशी आहे ही विलक्षण नैसर्गिक पध्दतशीर व्यवस्था.
|
Sarve Sukhinha santu! Sarve bhadrani pashyantu! May Divinity Within All get bloomed! May God Bless all!
|
|
|
dr.nutanpol
Senior Namdharaks
Ultimate Contributor
Offline
Gender: 
Posts: 429
|
 |
« Reply #3 on: July 31, 2007, 01:16:17 AM » |
|
शरीर परमेश्वराची जीवंत मूर्ति- मानवी शरीर हे अत्यंत अलौकिक, विस्मयकारक व विलक्षण असून सुध्दा मानव जातीला या शरीराचे महत्त्व योग्य प्रकारे उमजलेले दिसत नाही. जीवनविद्येच्या दृष्टीकोनातून शरीर हा सर्वात महत्त्वाचा घटक आहे. विश्वापासून ते विश्वंभरापर्यंत स्थूल मानाने एक साखळी आहे ती खालील प्रमाणे सांगता येईल.
विश्व--राष्ट्र--समाज--कुटुंब-- इंद्रिये शरीर बहिर्मन--अंतर्मन--जीव--ईश्वर--परमेश्वर
वरील साखळी जर आपण पाहिली तर आपल्याला असे दिसून येईल की शरीराचे स्थान केंद्रस्थानी आहे. हे शरीर अलिकडच्या बाजूने व्यक्ताशी जोडले गेलेले आहे, म्हणून शरीराची योग्य पध्दतीने उपासना व जोपासना केली तर व्यक्त व अव्यक्त प्रांतातील सर्व घटकांची उपासना व जोपासना केल्याचे श्रेय प्राप्त होईल. याच्या उलट शरीराची प्रतारणा व अवहेलना केल्याचा दोष पदरात पडेल. खरे सांगायचे म्हणजे मानवी शरीराचे यथार्थ वर्णन व कौतुक विशद करण्यास शब्द अपुरे पडतात. मानवी शरीर म्हणजे परमेश्वराची चालती बोलती जीवंत मूर्ति होय. वास्तविक परमेश्वराच्या या जीवंत मूर्तीची पूजा करणे हेच अभिप्रेत आहे. आपल्या साधुसंतांनी व ऋषीमुनींनी आपल्याला पाषाणाची मूर्तीपूजा शिकविली, त्यात त्याचा मूळ हेतू लोकांनी "मानवी शरीर" या परमेश्वराच्या जीवंत मूर्तीकडे वळावे असाच होता. तुम्ही कुठल्याही मूर्तीकडे प्रथम पहा व नंतर तुम्ही स्वतःकडे पहा. मग तुम्हाला असे लक्षात येईल की ती पाषाणाची मूर्ती हुबेहुब थोड्याफार फरकाने मानवी शरीरासारखीच आहे. थोडक्यात माणसाने माणसाची मूर्ती तयार केली आणि ती, "देवाची मूर्ती" असे जाहीर केले. आता ही मूर्तीपूजा लोकांच्या इतकी अंगवळणी पडली आहे कीते माणसाने निर्माण केलेल्या पाषाणाच्या अचेतन मूर्तीकडे प्रत्यक्ष देव म्हणून पाहू लागले व परमेश्वराने निर्माण केलेल्या मानवी शरीररूपी जीवंत परमेश्वराच्या मूर्तिकडे संपूर्ण दूर्लक्ष करून राहिले. त्याचप्रमाणे तथाकथित परमार्थाच्या किंवा अध्यात्माच्या आहारी जाऊन बहुतेक माणसे कर्मकांडात स्वतःला गुंतवून घेतात व सर्व आयुष्य वाया घालवतात. म्हणूनच तुकाराम महाराज सांगतात-
१) येथे अवघे वाया गेले दिसती सायास तुका म्हणे नाश झाल्या वेचाचा
२) नको सोडू अन्न नको सेवी वन चिंती नारायण सर्व भोगी
३) नको गुंफू भोगी नको पडू त्यागी लावूनी सरे अंगी देवाचिया
४) तीर्थ व्रत नेम भावेविण सिध्दी वायाची उपाधी करिसी जना
त्याचप्रमाणे अज्ञान व अंधश्रध्दा यांच्या आहारी जाऊन बहुतेक लोक शरीराकडे शत्रू म्हणून पहातात, उद्योग-धंद्याकडे दुर्लक्ष करतात, संसार सोडतात, जगाकडे तुच्छतेने पाहतात व तथाकथित वैराग्य धारण करतात. अशा लोकांना "धड ना परमार्थ, धड ना संसार, तुका दोहीकडे चोर" अशी अवस्था प्राप्त होते. जीवनविद्येला हा प्रकार मान्य नाही. जीवनविद्या सांगते पाषाणाच्या मूर्तीची पूजा व इतर कर्मकांड करण्यापेक्षा मानवी शरीररूपी जीवंत परमेश्वराच्या मूर्तीची पूजा करणे व कर्मचांग करणे अनंतपटीने श्रेष्ठ होय. आता या शरीररूपी परमेश्वराची पूजा करायची म्हणजे नेमके काय करायचे ते आपण थोडक्यात पहाण्याचा प्रयत्न करू. शरीराची स्वच्छता राखणे व त्याची योग्य ती काळजी घेणे, शरीराला उत्तम सवयी लावणे व त्याचे उत्कृष्ठ पध्दतीने संगोपन करणे, त्याला उत्तम शिक्षण, शिकवण व संस्कार देणे, व्यायाम व योगासने यांच्याद्वारे शरीराला सुस्थितीत व कार्यक्षम ठेवणे, त्याला उत्तम खायला व उत्तम प्यायला देणे म्हणजेच शरीररूपी परमेश्वराच्या जीवंत मूर्तीची पूजा करणे होय. प्रत्यक्षात मात्र बहुतेक लोक शरीररूपी परमेश्वराची पूजा करण्याऐवजी त्याची विटंबना करीत असतात. स्नान न करणे, त्याला ओंगळ स्थितीत ठेवणे, त्याला घाणेरड्या अनिष्ट सवयी लावणे, दारू, गुटखा, गांजा, गर्द, तंबाखू, विडी, सिगारेट, वगैरे घाणेरड्या अनिष्ट गोष्टींच्या व्यसनांचा नैवेद्य अर्पण करणे, शिक्षण न देणे, अंधश्रध्देची शिकवण देणे, अनिष्ट संस्कार करणे, अशा प्रकारे बहुतेक लोक या शरीररूपी परमेश्वराची विटंबना व अपमान करीत असतात. "जशी क्रिया तशी प्रतिक्रिया" या निसर्गनियमाप्रमाणे या शरीररूपी परमेश्वराच्या जीवंत मूर्तीला अनिष्ट गोष्टींच्या विषाचा नैवेद्य अर्पण केल्यामुळे निसर्गदेवतेचा भयंकर कोप होतो व या लोकांना शारिरीक व मानसिक रोग होऊन व अनेक आपत्ती-विपत्तींना तोंड द्यावे लागून त्यांचे जीवन व संसार उध्वस्त होतो. याच्याउलट वर म्हटल्याप्रमाणे प्रयत्नपूर्वक शरीराचे उत्तम संवर्धन व संगोपन केल्याने व त्याला उत्तम, उत्कृष्ठ व चांगल्या अशा गोष्टींच्या अमृताचा नैवेद्य अर्पण केल्याने निसर्गदेवतेची अशा लोकांवर कृपा होते आणि त्यांना शारिरीक व मानसिक सुस्थिती व आरोग्य प्राप्त होऊन त्यांचे जीवन सुखी, यशस्वी व समृध्द होते. थोडक्यात शरीररूपी परमेश्वराला उत्कृष्ठ अमृताचा नैवेद्य अर्पण करून सुखी व्हायचे की त्याला अनिष्ट गोष्टींचा नैवेद्य अर्पण करून दुःखी व्हायचे हे सर्वस्वी प्रत्येकाच्या हातात असते. म्हणूनच जीवनविद्या सांगते,-
'तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार'
शरीर एक दिव्य कॉम्प्युटर
शरीर ही परमेश्वराची जीवंत मूर्ति आहे त्याचप्रमाणे तो दिव्य संगणक (Divine Computer) आहे. आपण जो संगणक पाहतो, तो माणसाने निर्माण केलेला आहे. परंतु मानवी शरीररूपी दिव्य संगणक हा परमेश्वराने निर्माण केलेला आहे. जन्मल्यापासून मरेपर्यंत माणूस सतत कर्म करीत असतो, विचार-उच्चार-आचार या स्वरूपात माणूस सतत कर्म करीत असतो व या कर्मांच्याद्वारे प्रत्येक माणूस शरीररूपी दिव्य संगणकाला फिडींग करीत असतो. सामान्य संगणकाला जे अचुक किंवा चुकीचे फिडींग करतो त्याप्रमाणे त्या संगणकाकडून आपल्याला रिझल्टस् मिळत असतात. त्याचप्रमाणे विचार-उच्चार-आचार यांच्याद्वारा आपण शरीररूपी संगणकाला जे चांगल्या किंवा वाईट कर्मांचे (Actions) फिडींग करू त्याप्रमाणे आपल्याला सुखाचे किंवा दुःखाचे रिझल्टस् मिळत असतात.
या संदर्भात ग्रीक फिलॉसफर एपिक्टेट्स यांचे खालील वचन चिंतनीय आहे.
"You ought to be more concerned about wrong thoughts from your mind than about removing tumors and abscesses from the body."
दुसरा मुद्दा असा की आपण ज्याप्रमाणे स्वतःच्या शरीररूपी संगणकाला फिडींग करतो त्याचबरोबर ( Simultaneously) आपण इतर लोकांच्या शरीररूपी संगणकाला फिडींग करीत असतो. अशा पध्दतीने लोक स्वतःच्या व इतरांच्या शरीररूपी संगणकांना फिडींग करीत करीत स्वतःचे व इतरांचे जीवन घडवीत किंवा बिघडवीत असतात. म्हणून माणसाला व तो ज्या समाजात राहतो त्या समाजाला जर सुख, शांती, समाधान, आनंद, यश व समृध्दी हे सर्व पाहिजे असेल तर प्रत्येक मानवी शरीर हा दिव्य संगणक आहे हे नित्य लक्षात ठेवून लोकांनी परस्परांना उत्कृष्ठ विचार-उच्चार-आचार यांच्याद्वारा उत्तम फिडींग केले पाहिजे. परंतु प्रत्यक्ष परिस्थिती मात्र अगदी याच्या उलट आहे. अनिष्ट विचार-उच्चार-आचार यांच्याद्वारे लोक स्वतःला व इतरांना दुःखाच्या खाईत लोटत असतात. थोडक्यात उत्कृष्ठ कर्मांचे (Actions) फिडींग करून सुखी व्हायचे की अनिष्ट कर्मांचे फिडींग करून दुःखी व्हायचे हे माणसाच्या हातात आहे.
या संदर्भात डॉ. मर्फी यांचे खालील वचन चिंतनीय आहे.
"Any thought or action which is not harmonious with whether through ignorance or design results in discord or limitation of all kinds."
म्हणूनच जीवनविद्या सांगते,-
'तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार'
|
Sarve Sukhinha santu! Sarve bhadrani pashyantu! May Divinity Within All get bloomed! May God Bless all!
|
|
|
dr.nutanpol
Senior Namdharaks
Ultimate Contributor
Offline
Gender: 
Posts: 429
|
 |
« Reply #4 on: July 31, 2007, 01:22:15 AM » |
|
शरीर एक दिव्य टेपरेकॉर्डर-
दिव्य मानवी शरीर ही जशी परमेश्वराची जीवंत मूर्ति आहे त्याचप्रमाणे तो परमेश्वराने निर्माण केलेला दिव्य संगणक (Divine Computer) आहे. त्याचप्रमाणे मानवी शरीर हा ईश्वरनिर्मित दिव्य टेपरेकॉर्डर आहे.आपण जे टेपरेकॉर्डिंग मशीन पाहतो ते मानव निर्मित असून त्यावर फक्त ध्वनी टेप केला जातो. त्याचप्रमाणे मानवनिर्मित व्हिडिओ रेकॉर्डिंग मशीनवर फक्त ध्वनी व दृश्य टेप करण्याची व्यवस्था असते. परंतु ईश्वरनिर्मित मानवी शरीराच्या टेपरेकॉर्डिंग मशीनवर व व्हिडिओ रेकॉर्डिंग मशीनवर मानवाच्या A to Z सर्व हालचाली रेकॉर्ड केल्या जातात. सर्व विचार, विकार, कल्पना, भावना, धारणा, संकल्प, विकल्प वगैरे सर्व सूक्ष्म स्पंदने मानवी शरीररूपी रेकॉर्डवर रेकॉर्ड केल्या जातात. त्याचप्रमाणे माणसाच्या मनात निर्माण होणाऱ्या सर्वप्रकारच्या ईच्छा, आकांक्षा, महत्त्वाकांक्षा, आशा, निराशा वगैरे सर्व प्रकारची सूक्ष्म स्पंदने मानवी शरीररूपी रेकॉर्डवर रेकॉर्ड केल्या जातात. इतकेच नव्हे तर माणसाकडून होणारे सर्व उच्चार व आचार मानवी शरीररूपी रेकॉर्डवर रेकॉर्ड केल्या जातात. अत्यंत विलक्षण व विस्मयकारक गोष्ट अशी की वरील सर्व प्रकारच्या घटना मानवी शरीरात अत्यंत गुप्तपणे, कौशल्याने, सहजपणे व अचूकपणे व अखंडितपणे रेकॉर्ड करण्याचे कार्य निसर्गदेवतेकडून नित्य चालत असते. या संदर्भात आणखीन विलक्षण व विस्मयकारक प्रकार असा की, मानवनिर्मित टेपरेकॉर्डिंग मशीनवर किंवा व्हिडिओ रेकॉर्डिंग मशीनवर जे रेकॉर्ड केले जाते ते सर्व पुसून टाकता येते. परंतु ईश्वरनिर्मित मानवी शरीराच्या मशीनवर जे सर्व काही रेकॉर्ड केले जाते ते सर्व पुसून टाकता येत नाही. त्याचप्रमाणे मानवनिर्मित ऑडिओ टेपरेकॉर्डिंग मशीनवर किंवा व्हिडिओ रेकॉर्डिंग मशीनवर ध्वनी रेकॉर्ड व दृश्य दोन्ही रेकॉर्ड करण्यासाठी माणसांना प्रचंड खटाटोप करावा लागतो, वेळ काढावा लागतो, कष्ट घ्यावे लागतात, खर्च करावा लागतो व ते सर्व करण्यासाठी विविध प्रकारची उपकरणे गोळा करावी लागतात. याच्या उलट ईश्वरनिर्मित मानवी शरीराच्या मशीनवर माणसाच्या सर्व हालचाली व त्याची सर्व कर्मे रेकॉर्ड करण्यासाठी वर वर्णन केलेला खटाटोप केला जात नाही. आणखीन आश्चर्याची गोष्ट अशी की, दिव्य मानवी शरीररूपी टेपरेकॉर्डवर जे सर्व टेप केले जाते त्याचा एक रेकॉर्ड बनतो व तोच माणसाचे भवितव्य ठरविण्यास कारणीभुत ठरत असतो. माणसाच्या A to Z सर्व हालचाली किंवा त्याची सर्व प्रकारची सर्व कर्मे मानवी शरीराच्या मशीनवर रेकॉर्ड करण्याचे विलक्षण कार्य प्रत्यक्षात कोण करते, केव्हा करते, कसे करते, व शरीराच्या अंतर्गत नेमक्या कुठल्या भागात केले जाते हे आतापर्यंत कुणालाही ज्ञात झालेले नाही. हा सर्व प्रकार म्हणजे निसर्ग देवतेचा एक विलक्षण चमत्कार आहे. निसर्गदेवतेची वरील सर्व विलक्षण व्यवस्था लक्षात घेऊन आपण सत्कर्मे करून आपले भवितव्य उज्वल करायचे की अनिष्ट कर्मे करून आपले भवितव्य भीषण-भयानक करायचे हे आपणच ठरवायचे असते अन्य कोणीही नाही. म्हणूनच जीवनविद्या सांगते,- 'तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार'
शरीर -पंचमुखी महादेव
मानवी शरीर म्हणजे प्रत्यक्षात पंचमुखी महादेव आहे. पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश ही सर्व पंचमहाभूते नसून पंचमहादेव आहेत, याचेच यथार्थ वर्णन वर केलेलेच आहे. वास्तविक पंचमहादेवांचा सुंदर व सुरेख मेळ होतो तेव्हाच अनंत कोटी ब्रम्हांडाचा खेळ सुरू होतो. हे सर्व पंचमहादेव मानवी शरीराच्या ठिकाणी वास करून राहिलेले आहेत. जेव्हा प्रलय होतो तेव्हा पृथ्वी पाण्यात विरघळते, पाणी तेजात अदृश्य होते, तेज वायुत अंतर्धान पावते व वायु आकाशात गुप्त होतो. याच्या उलट उदय होतो तेव्हा आकाशातून वायू निर्माण होतो, वायुतून तेज निर्माण होते, तेजातून पाणी निर्माण होते व पाण्यातून पृथ्वी निर्माण होते. असा हा पंचमहादेवाचा क्रम आणि पराक्रम आहे. त्याचप्रमाणे मानवी शरीराचा लय आणि उदय म्हणजे प्रत्यक्षात पंचमहादेवाचा क्रम आणि पराक्रम आहे. म्हणूनच मानवी शरीर म्हणजे प्रत्यक्षात पंचमुखी महादेव आहे, हे लक्षात घेऊन त्याचा मानसन्मान केला पाहिजे व त्याची योग्यप्रकारे वर वर्णन केल्याप्रमाणे उपासना व आराधना केली पाहिजे.
ज्ञानेश्वर महाराज सांगतात,
"सर्व उपाधीमाजी गुप्त चैतन्य असे सर्वगत ते तत्वज्ञ संत स्विकारिती"
परंतु जीवनविद्या एक पाऊल पुढे टाकून सांगते,
"सर्व उपाधीमाजी व्यक्त पंचमहाभूत असे सर्वगत ते जीवनविद्या निश्चित स्विकारिती"
या शरीररूपी पंचमुखी महादेवाचा मान-सन्मान करून त्याची कृपा संपादन करायची की त्याचा अवमान करून कोप प्राप्त करून घ्यायचा हे सर्वस्वी तुझ्या हातात आहे. म्हणून जीवनविद्या सांगते,-
'तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार'
|
Sarve Sukhinha santu! Sarve bhadrani pashyantu! May Divinity Within All get bloomed! May God Bless all!
|
|
|
dr.nutanpol
Senior Namdharaks
Ultimate Contributor
Offline
Gender: 
Posts: 429
|
 |
« Reply #5 on: July 31, 2007, 01:30:56 AM » |
|
शरीर एक तीर्थक्षेत्र
जीवनविद्येने विश्वरूपाने प्रगट झालेल्या परमेश्वराची खालील प्रमाणे व्याख्या केलेली आहे. " निसर्गनियमांसहित स्वयंचलित स्वयंनियत्रित नैसर्गिक पध्दतशीर व्यवस्था म्हणजे परमेश्वर " निर्गुण, निराकार अव्यक्त सर्वव्यापक चैतन्यशक्ती विश्वरूपाने ’अनंत रूपे अनंत वेशे’ अशा प्रकाराने सर्वत्र सगुण, साकार व व्यक्त होते. या संदर्भात तुकाराम महाराज सांगतात,
"नर नारी बाळे अवघा नारायण ऐसे माझे मन करी देवा" भगवान श्रीकृष्ण गीतेत असे सांगतात,
अहं सर्वस्य प्रभवः मत्तः सर्वं प्रवर्तते इति मत्वा भजन्ते माम् बुधाभाव समन्वितः
म्हणूनच वर म्हटल्याप्रमाणे मानवी शरीररूपाने प्रत्यक्ष परमेश्वरच प्रगट झालेला आहे. परमेश्वराची केलेली वरील व्याख्या मानवी शरीराला सुध्दा तंतोतंत लागू पडते. मानवी शरीर हे निसर्गनियमांनी बध्द आहे, ते स्वयंचलित आहे, ते स्वयंनियंत्रित आहे व ते नैसर्गिक असून त्या ठिकाणी पध्दतशीर व्यवस्था असलेली दिसून येते. तुकाराम महाराज सांगतात,
देह ही पंढरी आत्मा हा विठ्ठल नांदतो केवळ पांडुरंग
नामदेव महाराज सांगतात,
काया ही पंढरी आत्मा पांडुरंग करीत असे संग अहर्निशी
शरीराकडे आणखीन एका दृष्टीकोनातून पहाता येईल. आळंदीला अलंकापुरी असे दुसरे नाव आहे आणि या आळंदीत ज्ञानदेवांचे वास्तव्य असून तेथे इंद्रायणी नदीचे वास्तव्य आहे. मानवी शरीर ही सुध्दा आळंदी म्हणजे अलंकापुरी आहे. पंच कर्मेंद्रिये, पंच ज्ञानेंद्रिये, चार अंतरेंद्रिये, पंच प्राण वगैरे अलंकारांनी हे मानवी शरीर सुंदर पध्दतीने अलंकृत झालेले आहे. इतर सोन्यामोत्याचे अलंकार कितीही मौल्यवान असले तरी त्या सर्वांची किंमत करता येते. परंतु मानवी शरीराच्या ठायी जे अलंकार आहेत ते अत्यंत मौल्यवान तर आहेतच पण त्यांची किंमत पैशात करता येत नाही. हजारो रूपये खर्च करून सुध्दा गमावलेला अवयव पुन्हा प्राप्त होत नाही. कृत्रिम पध्दतीने बसविलेल्या अवयवाला नैसर्गिक पध्दतीने मिळालेल्या अवयवाची किंचितही सर येत नाही. अशा या अलौकिक मानवी शरीराच्या अलंकापुरीत स्वानंद स्वरूप ज्ञानदेव वास करीत असून, शरीररूपी आळंदीत जाणीव रूपी इंद्रायणी नित्य वहात असते. थोडक्यात मानवी शरीर हे विलक्षण तीर्थक्षेत्र आहे याची जाणीव बहुसंख्य लोकांना नसते ही अत्यंत खेदाची गोष्ट आहे. पुण्य मिळवण्यासाठी बहुसंख्य लोक कामधंदा सोडून किंवा रजा काढून तीर्थक्षेत्राला जातात, खूप कष्ट घेतात, खूप पैसा खर्च करतात, पैसा नसेल तर कर्ज सुध्दा काढतात आणि विविध कारणांमुळे मलीन व अशुध्द झालेल्या नदीच्या पाण्यात स्नान करतात. या संदर्भात तुकाराम महाराज सांगतात-
देही असोनिया देव वृथा फिरतो निर्दैव देव असे अंतर्यामी व्यर्थ हिंडे तीर्थग्रामी नाभी मृगाचे कस्तुरी व्यर्थ हिंडे तीर्थ वनांतरी तुका सांगे मूढ जना देही देव का पहाना
जीवनविद्येच्या दृष्टीकोनातून सुध्दा वरील सर्व यातायात करण्याची काहीच आवश्यकता नाही. जीवनविद्या सांगते, मानवी शरीर हेच क्षेत्र आहे, ह्दयस्थ स्वानंद हाच गोविंद-गोपाळ-विठ्ठल आहे. व जाणीव हीच आहे अखंड वाहणारी नदी. तुकाराम महाराज सांगतात-
तीर्थी धोंडा पाणी देव रोकडा सज्जनी
परंतु जीवनविद्या एक पाऊल पुढे टाकून सांगते,
तीर्थी धोंडा पाणी देव रोकडा स्वशरीरी
थोडक्यात तीर्थक्षेत्राला जाण्याची यातायात करीत बसण्यापेक्षा स्वतःचा उद्योग व्यवसाय आवडीने व प्रामाणिकपणे करीत व नामस्मरण किंवा विश्वप्रार्थना गात-गात स्वानंदस्वरूप जाणीवेच्या नदीत डुंबत-डुंबत तीर्थयात्रेचे पुण्य जोडणे सहस्त्रपटीने इष्ट व श्रेष्ठ होय. आता नेमके काय करायचे हे ज्याचे त्यानेच ठरवायचे असते. म्हणून जीवनविद्या सांगते,-
'तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार'
|
Sarve Sukhinha santu! Sarve bhadrani pashyantu! May Divinity Within All get bloomed! May God Bless all!
|
|
|
dr.nutanpol
Senior Namdharaks
Ultimate Contributor
Offline
Gender: 
Posts: 429
|
 |
« Reply #6 on: July 31, 2007, 02:16:08 AM » |
|
शरीर एक महान चमत्कार
चमत्कार तेथे नमस्कार अशी मराठी भाषेत एक म्हण आहे. लोकमानसामध्ये चमत्कारांचे किती विलक्षण सामर्थ्य आहे, हे या म्हणीवरून प्रत्ययास येते. एखादा बुवा किंवा बाबा चमत्कार करतो असे एखाद्या माणसाने दुसऱ्या माणसाच्या कानात नुसते कुजबुजले तरी ते षट्कर्णी होऊन लोकांच्या झुंडीच्या झुंडी त्या बुवा-बाबाच्या दिशेने पळत सुटतात. चमत्कारांचे विलक्षण आकर्षण लोकांमध्ये दिसून येते, याचे मुख्य कारण एकच आहे. मुळातच मर्कट अशा एका माकडाला कोणीतरी मद्य पाजले, त्यात त्या माकडाला एक विंचू चावला, त्यात त्या माकडाचे डोके फिरले, म्हणजे ते माकड काय गोंधळ घालील त्याची कल्पनाही करवत नाही. सामान्यपणे सामान्य लोकांची अशीच विकट व बिकट परिस्थिती आहे. लोक मुळातच अज्ञानी असतात, त्यात त्यांना अंधश्रध्देचा विंचू चावलेला असतो, त्यातही त्यांना दैववादाचे मद्य बालपणापासून पाजलेले असते. त्यात भरीस भर म्हणजे चमत्काराच्या आकर्षणाने डोके फिरलेले, अशा परिस्थितीत लोकांच्या जीवनात काय गोंधळ माजेल याची कल्पनाच केलेली बरी. चमत्कार करणाऱ्या बुवाला किंवा बाबाला काही सिध्दी प्राप्त झालेल्या असतात किंवा त्यांच्याजवळ विशेष प्रकारचे सामर्थ्य असते किंवा त्या सामर्थ्याच्या बळावर तो बुवा-बाबा आपल्या जीवनातील सर्व संकटे, आपत्ती, रोग व दुःख निवारण करील असा लोकांचा प्रामाणिक समज असतो. परंतु हा समज पूर्णपणे गैरसमज असतो. मुळातच कोणत्याही बाबाकडे चमत्कार करण्याचे सामर्थ्य नसते. बुवा किंवा बाबा चमत्कार करतात, अशी अफवा काही लोक भोळेपणाने किंवा अज्ञानाने कोणाच्यातरी ऐकीव सांगण्यावरून जनमाणसात पसरवित असतात. त्याचप्रमाणे काही अन्य लबाड लोक बुध्दीपुरस्सर तर काही स्वार्थ साधण्याच्या हेतूने चमत्कारांच्या कथा लोकांत सांगत सुटतात. त्यातच काही अन्य लोक त्या दंतकथा अधिक तिखटमीठ लावून लोकांना सांगतात. बुडत्याला काडीचा आधार वाटतो, त्याचप्रमाणे संसारात आपत्ती-विपत्तीने गांजून गेलेल्या लोकांना चमत्कार करणारा बाबा फार मोठा आधार वाटतो. काडीचा आधार जसा बुडत्याला उपयोगी पडत नाही, त्याचप्रमाणे बुवा-बाबांचा आधार संसारात गांजून गेलेल्या माणसांना उपयोगी पडत नाही, उलट बुडत्याचा पाय खोलात त्याप्रमाणे संसारात गांजून गेलेल्या माणसांची परिस्थिती अधिकच चिघळत जाते व सरतेशेवटी हे भोळेभाबडे लोक त्या बुवा-बाबांकडून नागविले जातात. काही बुवा-बाबा हातचलाखीचे प्रयोग-चमत्कार करतात तर अन्य काही बुवा-बाबा नजरबंदीचे प्रयोग-चमत्कार करतात. अशा तऱ्हेचे प्रयोग किंवा चमत्कार लोकांच्या जीवनातील कुठल्याही प्रकारच्या समस्या सोडवण्यास समर्थ नसतात. या संदर्भात जीवनविद्येचे आगळे आणि वेगळे मार्गदर्शन आहे. जीवनविद्या सांगते हे अखिल विश्व चमत्कारांनीच भरलेले आहे. जेथे पहाल तेथे चमत्कार दिसेल. चमत्कार पहाण्याची दृष्टी आपल्याजवळ नसते, हेच माणसाचे दुर्दैव होय. चमत्कारांनी भरलेल्या या विश्वात मानवी शरीर हाच सर्व चमत्कारांचा मुकुटमणी आहे. मानवी शरीराचा प्रत्येक अवयव हा सुध्दा एक प्रचंड चमत्कार आहे. मानवी शरीरात जो मेंदू आहे तो तर चमत्कारांचा चमत्कार आहे. शास्त्रज्ञ असे सांगतात की, सामान्यपणे माणसे मेंदूचा फारच अल्प प्रमाणात वापर करतात. शास्त्रज्ञ असेही सांगतात की, अतिशय बुध्दीमान असा गणलेला माणूस सुध्दा मेंदूचा वापर दहा टक्क्यापेक्षा अधिक करीत नाही. याचाच अर्थ असा की, दहा टक्के मेंदूचा वापर करून मानवजातीने विज्ञान आणि तंत्रज्ञान यांच्या सहाय्याने प्रचंड प्रगती केलेली आहे. माणसाने जर शंभर टक्के मेंदूचा वापर केला तर भविष्यकाळात काय घडेल याची कल्पनासुध्दा करणे शक्य नाही. थोडक्यात मानवी शरीर हाच सर्व चमत्कारांचा मुकुटमणी असूनसुध्दा सामान्य माणसे स्वतःच्या जवळचा महान चमत्कार सोडून फालतू चमत्कारांच्या मागे धावत सुटतात, ही मोठी खेदाची गोष्ट होय. सूक्ष्म दृष्टीने मानवी शरीराकडे पहा. शरीराची अंतर्बाह्य रचना भव्य व दिव्य असलेली दिसून येईल. मानवी शरीराची संपूर्ण रचना आखीव व रेखीव असून सुबक व सुंदर आहे. सर्वांगाने व सर्वार्थाने सुरेख अशी नैसर्गिक पध्दतशीर व्यवस्था शरीराचे ठायी असलेली दिसून येते. स्थूल, सूक्ष्म, अतिसूक्ष्म व दिव्य अशा क्रमाने शरीराची रचना केलेली दिसून येते. पंचमहाभूते, पंचकर्मेंद्रिये, पंचज्ञानेंद्रिये, चार अंतरेंद्रिये, पंचप्राण, कल्पनाशक्ती, भावनाशक्ती, वासनाशक्ती, संकल्पशक्ती अशा स्थूल, सूक्ष्म, अतिसूक्ष्म व दिव्य प्रकाराने मानवी शरीर युक्त आहे. थोडक्यात मानवी शरीर म्हणजे चमत्कारांचा सागर आहे. इतकेच नव्हे तर मानवी जीवनातील सर्व समस्या सोडविण्याचे प्रचंड सामर्थ्य मानवी शरीरातच वास करते. अज्ञान, अंधश्रध्दा व अहंकार यांच्या आहारी गेलेल्या माणसाला त्याच्याजवळच असलेल्या दिव्य शरीराची जाणीव नसते हेच त्याचे दुर्दैव होय. अशा या दिव्य शरीराची योग्य प्रकारे सेवा करायची की अज्ञानाच्या आहारी जाऊन त्याचा द्वेष करायचा हे आपणच ठरवायचे असते. म्हणून जीवनविद्या सांगते,- 'तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार'
|
Sarve Sukhinha santu! Sarve bhadrani pashyantu! May Divinity Within All get bloomed! May God Bless all!
|
|
|
Vaibhav Nimbalkar
Senior Contributor
 
Offline
Gender: 
Posts: 115
Viththal Viththal...
|
 |
« Reply #7 on: September 02, 2007, 03:16:47 AM » |
|
Such a great effort to appreciate..... I reckon this as the most tedious and simultaneously enchanting experience u must have had! Hats off to u indeed!! 
|
Viththal Viththal.... May GOD bless all... 
|
|
|
subhash
Senior Namdharaks
Ultimate Contributor
Offline
Gender: 
Posts: 238
|
 |
« Reply #8 on: September 05, 2007, 12:10:44 AM » |
|
All, Cool Hindi / Marathi script convertor from Google http://www.google.com/transliterate/indic/Hope this eases out some efforts. It has real good features. God bless all, Subhash
|
God bless you, God bless all.
|
|
|
dr.nutanpol
Senior Namdharaks
Ultimate Contributor
Offline
Gender: 
Posts: 429
|
 |
« Reply #9 on: September 06, 2007, 04:59:26 PM » |
|
Respected Subhashji,
Namskaar,
You have posted a very useful link. Thank you very much!
|
Sarve Sukhinha santu! Sarve bhadrani pashyantu! May Divinity Within All get bloomed! May God Bless all!
|
|
|
rakeshmahashabde
Junior Contributor

Offline
Gender: 
Posts: 32
rakesh mahashabde
|
 |
« Reply #10 on: September 08, 2007, 12:24:08 AM » |
|
पंचमहाभूते, पंचकर्मेंद्रिये, पंचज्ञानेंद्रिये, चार अंतरेंद्रिये, पंचप्राण, कल्पनाशक्ती, भावनाशक्ती, वासनाशक्ती, संकल्पशक्ती अशा स्थूल, सूक्ष्म, अतिसूक्ष्म व दिव्य प्रकाराने मानवी शरीर युक्त आह aapne yahan panchmahabhoot se panch pran tak jin indriyon ke bare main bataya hai yah shareer main kis prakar se kahan sthit hai please vistrat mai samjhaye.
|
|
|
|
|
dr.nutanpol
Senior Namdharaks
Ultimate Contributor
Offline
Gender: 
Posts: 429
|
 |
« Reply #11 on: September 08, 2007, 05:16:18 PM » |
|
Rakeshji,
Namaskaar.
Jal, aakash, vayu, pruthvi and tej or agni are panch mahabhutas.These elements are constituents ghataks of our body-sharir.
The Energies which are evolved out of these Panch-mahabhutas are called as panch pranas.
These are (1) The Pran -from the Pruthvi tatwa; (2) The Apaan -from the Jal (Water) tatwa; (3) The Udaan- from the Tej tatwa; (4) the Vyan- from vayu tatwa and (5) the Samaan-from the Akash tatwa.
The energy of these panch pranas is converted into panch tan-matras-5 koshas
1) Annamaya kosh-dependent on consumptions-sthul kosh; (2) Pranamaya-kosh of all pranas; (3) Manomaykosh -thoughtful mind; (4) Dnyan-Vidnyanmaya kosh-kosh of Knowledged and tested knowledge; (5) Anandmaya kosh-Joyful-Life Accomplishment position.
panch karmendriyas-hands, feet, mouth-tongue, genital-urinary organ, anus-gud-dwar.
panch dnayanendriya-ear, nose, tongue-rasenendriya, eyes, skin.
char antarendriya-man, buddhi, chitt, ahankaar. ( please read Tuch aahes tuzya jeevanacha shilpkaar)
Vitthal Vitthal............
|
Sarve Sukhinha santu! Sarve bhadrani pashyantu! May Divinity Within All get bloomed! May God Bless all!
|
|
|
dr.nutanpol
Senior Namdharaks
Ultimate Contributor
Offline
Gender: 
Posts: 429
|
 |
« Reply #12 on: September 09, 2007, 02:14:09 PM » |
|
Namaskaar,
This information may be useful to those who are curious about relationships between sthul sharrir, suksm sharir and karan sharir.
There is inter-relationships between the
1)The manifestation body, the gross body, sthula sharira, annamaya kosha.
2) The energy body, the subtle body, the light body of form, sukshma sharira, the pranamaya kosha, manomaya kosha, vijnanamaya kosha.
3)The anandamaya kosha, the causal body (karana sharira) , the seed body. Annamaya kosha which is translated as food sheath and corresponds roughly to the physical body. It has the most dense and slow vibrational frequency. It is associated with the sthula sharira (coarse body).
2) The second sheath is composed of the pranamaya kosha or energy sheath. It interconnects the annamaya kosha (physical body) with the manomaya, vijnanamaya, and anandamaya koshas. It is associated with the suksmah sharira (subtle body).
3) Next there is manomaya kosha or mental and emotional sheath which also is included in the sukshma sharira (subtle body)
4) Next the vijnanamaya kosha or the prajna wisdom sheath of Gnosis (transconceptional knowledge) which also is included in the sukshma sharira (subtle body)
5) The anandamaya kosha (literally the bliss sheath) which is associated with the karana sharira or causal body.
Our thoughts are transmitted to the body through the nero-endocrine system. Scientists have found that these mental processes such as thoughts and emotions can not be separated from bodily mechanisms and function as all thought and emotions are involved in biochemical and neurological activities.
Aadhis (mental/emotional disturbances in the manomaya kosha or astral sheath) cause corresponding disturbances at the physical level (annamaya kosha). These disturbances are called vyadhi. This is transmitted through the intermediary of the pranamaya kosha (or energy body) causing disturbances in the prana. The good news is that we can consciously work with the body and/or pranamaya kosha to effect healing in the manomaya kosha and vice versa, we can consciously work in the manomaya kosha to effect positive healing changes in the pranamaya and annamaya koshas. It is believed that a lasting cure is only possible when the causal disturbance is completely remedied; i.e., the previously unhealthy tensions and conflicts between the bodies or sheaths have been harmonized and resolved. Here the adhis which originate in the manomaya kosha are considered causal and primary which in turn cause physical ailments (vyadhi). These adhis can also occur in the vijnanamaya kosha and/or karmic sheath when our belief systems are out of synch with the inner wisdom karmic body and/or strong unresolved karmic forces are at play. Thus when the adhis are destroyed in the subtle or causal bodies, then the vyadhis are no longer generated or manifest. Physical disease is caused by disturbances/corruption and/or obstruction of the nadis (psychic nerves) and energy patterns which have become disrupted, distorted, and patterned into corruptive patterns causing degeneration, dissipation, dis-ease, pain, suffering, stasis, and death. Thus effective therapy is aimed at removing the source of the disturbances, opening up these blocked pathways, and rechanneling and repatterning the energy flow.
Various sadhanas like pranayaam, naam jap, vp, Divy sadhana (Divine Meditation) help in repatterning the energy flow. As our mind is purified we realise shiva consciousness by the grace of Shri. Satguru.
Vitthal Vitthal..........
|
Sarve Sukhinha santu! Sarve bhadrani pashyantu! May Divinity Within All get bloomed! May God Bless all!
|
|
|
dr.nutanpol
Senior Namdharaks
Ultimate Contributor
Offline
Gender: 
Posts: 429
|
 |
« Reply #13 on: September 09, 2007, 03:19:57 PM » |
|
शरीर एक कल्पतरू
पुराणात कल्पतरू नावाच्या वृक्षाची महती कथित केलेली आहे. या वृक्षाची कथा विलक्षण आहे. या संदर्भात ज्ञानेश्वर महाराज सांगतात-
कल्पवृक्षातळी जो कोणी बैसला काय उणे त्याला सांगा जो जी
याचा अर्थ असा की कल्पवृक्षाच्या खाली जो कोणी बसेल आणि तो जे मागेल ते त्याला प्राप्त होईल. पुराणातील हा कल्पवृक्ष माणसाच्या जीवनात मानवी शरीर रूपाने प्रत्यक्ष हजर आहे. कल्पतरूच्या वृक्षाखाली बसलेल्या माणसाला जर का आपण कल्पवृक्षाखाली बसलेलो आहोत याची जाणीव नसेल तर त्याच्या जीवनात भयानक परिस्थिती निर्माण होणार हे निश्चित. कारण अज्ञानाने किंवा चुकीने किंवा अनवधानाने तो ज्या इष्ट किंवा अनिष्ट इच्छा किंवा संकल्प मनात आणील त्या सर्व इच्छा किंवा संकल्प सिध्दीस जातील. एकदा एक प्रवासी एका गावाहून दुसऱ्या गावाला जात असता दुपारच्या दोन प्रहरी तहानेने व भुकेने व्याकुळ झाला. आजुबाजूला त्याने नजर टाकली तर काही अंतरावर त्याला एक वृक्ष दिसला. तो त्या वृक्षाखाली जाऊन बसला. त्याच्या मनात सहज एक ईच्छा निर्माण झाली की, आता आपल्याला जर थंडगार पाणी प्यायला मिळेल तर देवाची मोठी कृपा होईल. हा विचार त्याच्या मनात येता क्षणीच पाण्याने भरलेला चांदीचा पेला त्याच्या समोर आला. पाणी प्यायल्यावर त्या प्रवाशाच्या मनात इच्छा निर्माण झाली की आता जर अन्न मिळेल तर देवाची मोठी कृपा होईल. पाणी पिऊन व भोजन केल्यावर त्या प्रवाशाच्या मनात इच्छा निर्माण झाली की आता जर झोपायला गादी आणि उशी मिळेल तर देवाची मोठीच कृपा होईल. हा संकल्प मनात येताक्षणीच गादी आणि उशी प्रवाशाला प्राप्त झाली. तृप्त मनाने बिछान्यावर पहुडलेला तो प्रवासी आजूबाजूला पाहू लागला. Empty mind is devil's abode. अशी इंग्रजी मध्ये एक म्हण आहे. तृप्त झालेल्या रिकामटेकड्या त्या प्रवाशाच्या डोक्यात सहज एक अनिष्ट विचार आला. तो मनात म्हणतो, "मी जे जे मागितले ते ते मला या ठिकाणी क्षणार्धात प्राप्त झाले. बाप रे ! येथे एखादा राक्षस असेल तर माझे काय होईल? " हा विचार त्याच्या मनात येताक्षणीच एक राक्षस तेथे हजर झाला. राक्षसाला पाहून त्या प्रवाशाची भितीने गाळण उडाली. तो मनात म्हणतो, "अरे बाप रे ! हा राक्षस मला जर खाईल तर माझ्या पोराबाळांचे कसे होईल. " हा विचार मनात येताक्षणीच राक्षसाने त्या प्रवाशाला खाऊन टाकले. कल्पवृक्षाखाली बसलेल्या माणसाची अशी परिस्थिती होते. मानवी शरीर हाच एक दिव्य कल्पवृक्ष आहे आणि या कल्पवृक्षाखाली प्रत्येक व्यक्ती बसलेली आहे. दुर्दैवाची गोष्ट अशी की, आपण या एका दिव्य कल्पवृक्षाखाली बसलेलो आहोत याची जाणीव माणसाला नाही, त्यामुळे त्याच्या वाट्याला भयंकर परिस्थिती येते. ’सुख पहाता जवापुढे दुःख पर्वता एवढे’, अशी माणसाची बिकट परिस्थिती निर्माण होण्यास, हेच त्याचे अज्ञान कारणीभूत आहे. अनिष्ट विचार, अनिष्ट कल्पना, अनिष्ट संकल्प, अनिष्ट भावना व अनिष्ट चिंतन करण्याची बहुतेक सर्व माणसांना सवय जडलेली असते.
डॉ. मर्फी सांगतात-
"Thoughts of jealousy, fear, worry and anxiety tear down your nerves and glands bringing about physical and mental diseases of all kinds"
तुम्ही जसे विचार, कल्पना व चिंतन कराल त्याप्रमाणे तुमच्या जीवनाला आकार प्राप्त होतो. हे सर्व घडवून आणण्याचे कार्य तुमचेच शरीर किंवा शरीर अंतर्गत अंतर्मन घडवून आणीत असते. थोडक्यात तुम्ही मानवी शरीररूपी दिव्य कल्पवृक्षाच्या खाली बसलेलो आहोत हे नित्य स्मरणात ठेऊन नित्य ईश्वर चिंतन व शुभ चिंतन करायचे की, अनिष्ट व अशुभ चिंतन करायचे हे केवळ तुमच्याच हातात आहे.
म्हणून जीवनविद्या सांगते,-
'तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार'
|
Sarve Sukhinha santu! Sarve bhadrani pashyantu! May Divinity Within All get bloomed! May God Bless all!
|
|
|
dr.nutanpol
Senior Namdharaks
Ultimate Contributor
Offline
Gender: 
Posts: 429
|
 |
« Reply #14 on: September 11, 2007, 01:53:03 AM » |
|
शरीर एक चिंतामणी-
जन्माला आल्यापासून मरेपर्यंत बहुतेक माणसे चिंताग्रस्त असतात. चिंता करण्याची माणसाला सवयच जडलेली आहे. संसारी जीवनच असे आहे की, माणसाने चिंता करायेचेच ठरवले तर त्याला चिंता करण्यासाठी अनेक गोष्टी असतात.वास्तविक वस्तुस्थिती अशी आहे की, माणुस ज्या अनेक प्रकारच्या चिंताग्रस्त गोष्टी करीत असतो त्यापैकी पुष्कळशा गोष्टी केवळ काल्पनिक असतात. त्याचप्रमाणे अहंकार, अविचार व मुर्खपणा यांच्या आहारी जाऊन माणसे अनेक अनिष्ट प्रसंग स्वतःच स्वतःच्या जीवनात निर्माण करीत असतात. दुसरा मुद्दा असा की, चिंता करण्याच्या सवयीने माणूस चिंता करणाऱ्या बिकट प्रसंगांना आमंत्रण देऊन बसतो.
या संदर्भात डॉ. मर्फी सांगतात-
"God has nothing to do with unhappy or chaotic conditions in the world. These conditions are brought about by man's negative and destructive thinking. It is therefore silly to blame God for his troubles and sufferings."
पुराणामध्ये चिंतामणी नावाच्या मौल्यवान एका मौल्यवान वस्तुचे वर्णन केलेले आहे. या वस्तुचे सामर्थ्य असे की, हा चिंतामणी ज्याच्या हातात असेल त्याला चिंतामुक्त करून सुख, शांती, समाधान, आनंद, यश व समृध्दी हे सर्व प्राप्त करून देण्याचे सामर्थ्य त्या चिंतामणीत असते. हा चिंतामणी माणसाला चिंतामुक्त करतो पण तो अनिष्ट चिंतनाना किंवा चिंताना आश्रय देत नाही. मानवी शरीर हा सुध्दा एक चिंतामणी आहे. परंतु हा शरीररूपी चिंतामणी आगळ्या आणि वेगळ्या प्रकारचा आहे. वस्तुस्थिती अशी आहे की, चिंतामुक्त करण्याचे सामर्थ्य या शरीररूपी चिंतामणीत आहे, त्याचबरोबर चिंता करण्याचे प्रसंग निर्माण करण्याचेही सामर्थ्य या शरीररूपी चिंतामणीत आहे. माणूस जे काही बरे वाईट चिंतन करतो त्याप्रमाणे घडवून आणण्याचे कार्य हा शरीररूपी चिंतामणी करीत असतो. हा मुद्दा अधिक स्पष्ट करणे इष्ट वाटते. मानवी शरीर हा विलक्षण चिंतामणी तर आहेच शिवाय ती अलौकिक व्यवस्था सुध्दा आहे. वर म्हटल्याप्रमाणे मानवी जीवनात इष्ट किंवा अनिष्ट घडवून आणण्याचे विलक्षण सामर्थ्य या मानवी शरीराच्या ठायी वास करते. प्रत्यक्ष चैतन्यशक्ती म्हणजेच ईश्वर मानवी शरीररूपाने प्रगट झालेला आहे. शरीर जीवंत असते याचा अर्थ जीवनशक्ती शरीराच्या ठिकाणी वास करून असते. स्थूल रूपाने जीवनशक्ती साकार होते, त्याचप्रमाणे सूक्ष्म जाणीवेच्या (Consciousness) रूपाने जीवनशक्ती शरीराच्याद्वारे वाहत असते. ही जीवनशक्ती नित्य स्फुरद्रुप असून मानवी जीवन सुखी व यशस्वी होण्यासाठी सदैव अनुकुल असते. परंतु मानवजातीला या सत्याचे ज्ञान नसल्यामुळे माणसे या जीवनशक्तीला अनुकूल करून घेण्याच्या ऐवजी प्रतिकूल करून घेतात. त्याचे परिणाम माणसांना भोगावे लागतात.
या संदर्भात डॉ. मर्फ़ी यांनी सुंदर विचार मांडलेले आहेत. ते म्हणतात-
"God is life and life principle is flowing through you every moment. God loves to express himself through you as harmony, peace, joy and abundance. This is called will of God or the tendency of life. However if you set up resistance to this flow of life in your mind, this emotion will get snarled up in your subconscious mind and will cause all kinds of difficulties and maladies in your life."
वर म्हटल्याप्रमाणे अनिष्ट चिंतन करण्याची सवय जडलेल्या माणसाला जीवनात अनेक अनिष्ट प्रसंगांना व संकटांना तोंड द्यावे लागते त्याचे कारणही तेच आहे. अनिष्ट चिंतन करण्याची सवय माणसाला इतकी जडून गेलेली आहे की आपण अनिष्ट चिंतन करतो, हे सुध्दा त्याला ज्ञात नसते.
जीवनविद्येचा एक महत्त्वाचा सिध्दांत आहे की तो खालीलप्रमाणे-
"माणूस जे करतो तो ते देवाजवळ मागतो."
माणूस अनिष्ट चिंतन करतो म्हणूनच त्याच्या मागणीप्रमाणे निसर्ग देवतेकडून त्याच्या जीवनात अनिष्ट घटना निर्माण होतात. या संदर्भात डॉ. मर्फ़ी सांगतात-
" The law of your subconscious mind works for good and bad ideas alike. The law when applied in negative way is the cause of failure, frustration and unhappiness. However if your habitual thinking is harmonious and constructive you will experience success, prosperity and perfect health."
थोडक्यात माणसाच्या हातात शरीररूपी चिंतामणी आहे याचे नित्य भान ठेऊन नित्य इष्ट चिंतन व ईश्वर चिंतन करण्याची सवय अट्टाहासाने व प्रयत्नपूर्वक जडवून घेतली पाहिजे. हे करणे प्रत्येक माणसाच्या हातात आहे. म्हणून जीवनविद्या सांगते,- 'तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार'
|
Sarve Sukhinha santu! Sarve bhadrani pashyantu! May Divinity Within All get bloomed! May God Bless all!
|
|
|
|