dr.nutanpol
Senior Namdharaks
Ultimate Contributor
Offline
Gender: 
Posts: 429
|
 |
« Reply #1 on: September 13, 2007, 09:06:43 PM » |
|
जीवनविद्येचा कार्यकर्ता- लेखक श्री. सुभाष केळकर- भाग-२
श्री. सदगुरूंनी जीवनविद्येची ५ दैवते सांगितली. आहेत. आदरणीय+ आचरणीय. ती म्हणजे म्हणजे भगवान श्री. कृष्ण, आर्य चाणक्य, छत्रपती शिवाजी महाराज,सावता माळी व एकनाथ महाराजांचे सदगुरू श्री. जनार्दन स्वामी. त्यांनी न सांगितलेले सहावे दैवत म्हणजे स्वतः श्री. वामनराव पै. मूर्तिमंत जीवनविद्या म्हणजे श्री.सदगुरू. आपल्या वाढदिवसाच्या दिवशी सामान्य लोक गिफ्ट घेऊन आनंदोत्सव साजरा करतात. परंतु श्री.सदगुरू मात्र त्यांचा प्रत्येक वाढदिवस आनंद मेळावा म्हणून साजरा करतात व अखिल मानवजातीला जीवनविद्येच्या ज्ञानामृताची गिफ्ट देतात. त्यांच्याच शब्दात सांगायचे झाले तर गुरू तेथे ज्ञान, ज्ञान तेथे शहाणपण, शहाणपण तेथे नारायण, नारायण तेथे सुख, शांती, समाधान. श्री. सदगुरूंकडून मिळणारे जीवनविद्येचे दिव्य ज्ञान संसाराच्या अंगाने शहाणपण देऊन परमार्थाच्या अंगाने आत्मज्ञान देते व आपले जीवन कृतार्थ होते. अशा या अलौकिक युगपुरूषाला अनंत कोटी साष्टांग प्रणिपात.
कार्यकर्त्याचा दुसरा महत्त्वाचा गुण म्हणजे तो जीवनविद्या जगत असतो. जीवनविद्या वाटते सोपी पण आहे कठीण. खरा कार्यकर्ता झाल्याशिवाय ती कळूच शकत नाही हा अनेकांचा अनुभव आहे. खऱ्या कार्यकर्त्याला जीवनविद्येचे वेगळेपण ज्ञानाच्या अंगाने पटलेले असते. हे जीवनविद्येचे वेगळेपण कोणते?सांगायला गेले तर भले मोठे पुस्तकच लिहावे लागेल. पण सूत्र रूपाने सांगायचे झाले तर खालील प्रमाणे मुद्दे मांडता येतील.
१) जीवनविद्येचे तत्वज्ञान विज्ञाननिष्ठ, तर्कशुध्द, अनुभवसिध्द खऱ्या अर्थाने धर्मातीत शाश्वत व वैश्विक आहे. २) विज्ञान, प्रज्ञान व आत्मज्ञान यांचा सुरेख संगम तिच्यात आहे. ३) मानस शास्त्र, परामानस शास्त्र व अध्यात्म शास्त्र यांचा सुरेख संगम आहे. ४) जीवनाभिमुख, राष्ट्राभिमुख, समाजाभिमुख, सर्व भूत हित साधणारे, सर्वंकष, सर्वगामी, मूलगामी, अखिल मानवजातीचा साकल्याने विचार करणारे आहे. ५) दैव वाद, आदर्श वाद, भोग वाद/त्याग वाद यांना बाद करून वास्तव वाद, प्रयत्न वाद व विकास वाद यांचा पुरस्कार करणारे आहे. ६) सुखाला मारक अशा अज्ञान, अहंकार व अंध श्रध्दा यांना छेद देऊन निसर्ग नियमांशी सुसंगत जीवन जगण्याची कला व शास्त्र यांची अभिनव मांडणी जीवनविद्येत आहे. ७) मानवी जीवन सुखी करणाऱ्या महत्त्वाच्या संकल्पनांची निःसंदिग्ध, सुस्पष्ट व शास्त्र शुध्द मांडणी-परमेश्वर, धर्म, संस्कृती, नियती, पाप-पुण्य, मन, शरीर व त्या अनुषंगाने मानवी जीवन सुखी करण्याहेतू अनेक अभिनव सिध्दांतांचा शोध व बोध. ८) Preventive rather than curative, proactive than reactive; ९) संसार -परमार्थ, देह-देव, ईश्वर-ऐश्वर्य, काम-नाम, उत्कर्ष-उन्नती, कला-शास्त्र या सर्वाचा साकल्याने विचार व जीवनासाठी कसे मिळवायचे यांचे विज्ञाननिष्ठ मार्गदर्शन, १०)स्त्रियांना सन्मानाचे स्थान व "चूल आणि मूल" या विषयाचे महत्त्व समजावले; ११)सच्चिदानंदस्वरूप चैतन्यशक्तीचा खोल अभ्यास व विवेचन आणि तिचे जीवनासाठीचा Relevance and importance समजावले, पटवून दिले. १२) शतकानुशतके न सुटलेल्या अनेक प्रश्नांना शास्त्रशुध्द उत्तरे, पारंपारिक ज्ञानाचाच फक्त स्वीकार व अज्ञानाचा त्याग उदा. माणसाचा जन्म कशासाठी? इतिहासाची पुनरावृत्ती का होते इ.
विस्तारभयास्तव जीवनविद्येचे अभिनव सिध्दांत इथे सांगू इच्छित नाही. पण असे हे जीवनविद्येचे वेगळेपण खऱ्या कार्यकर्त्याला सतत जाणवत असते. श्री. सदगुरू सांगतात, "मरावे परि कार्यरूपी उरावे" , तोच खरा कार्यकर्ता "जो दुसरे कार्यकर्ते तयार करतो तो"-विश्वनाथ कामत, जीवनविद्येचा हा खरा कार्यकर्ता. काही मिळावे म्हणून नाही तर बरेच काही चांगले मिळावे म्हणून सवयीने जीवनविद्येचे कार्य करीत असतो.श्री. सदगुरूंकडे त्याचे एकच मागणे असते-"श्री. सदगुरू तुम्ही सांगता ना जीवनाच्या अंगाने आपण अमर आहोत. मग प्रत्येक जन्मात यापुढे तुमचेच कार्य करण्यासाठी जन्माला येऊ आणि कार्य करीत करीत देह ठेऊ." अशा कार्यकर्त्यांना बघून सहजोद्गार निघतात.-"नामधारक पैमय झाले त्यांची वंदीन मी पाऊले" असो.
तुम्ही कोण होणार? या परंपरागत प्रश्नाचे उत्तर आता बदलावे लागेल. नुसते "मी इंजीनीयर होणार" , "मी डॉक्टर होणार", "मी मोठा मॅनेजर होणार" , "मी यशस्वी खेळाडू होणार" इ. उत्तरे न देता तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कुठल्याही समाजोपयोगी क्षेत्रात जा व जे व्हायचे ते व्हा. पण जीवनविद्येचा कार्यकर्ता झालाच पाहिजे नाहीतर आपण सुखी होणे शक्य नाही.
|