dr.nutanpol
Senior Namdharaks
Ultimate Contributor
Offline
Gender: 
Posts: 429
|
 |
« on: December 21, 2007, 01:24:13 AM » |
|
नमस्कार,
पाप आणि पुण्याच्या व्याख्या धर्मागणिक, समाजागणिक, देशाबरोबर, संस्कृतीबरोबर आणि काळानुसार बदलत जातात त्यामुळे पाप-पुण्य पूर्णपणे बदलत जाणारी सापेक्ष अशी संकल्पना आहे असे बऱ्याच लोकांना वाटते.
श्री सदगुरूंनी पाप-पुण्य समज गैरसमज या ग्रंथात या विषयावर अत्यंत सुंदर असे मार्गदर्शन केले आहे. ते म्हणतात,
जे "कर्म" कर्म करणाऱ्याला व ईतरांना सुख देते ते कर्म, पुण्य होय. जे "कर्म" कर्म करणाऱ्याला व ईतरांना दुःख देते ते कर्म, पाप होय.
माणूस जी कर्मे करतो ती सर्व दिव्य बॅंकेत जमा होतात. त्या कर्मांचे सुक्ष्म ठसे तेथे वास करतात. अंतर्मनाकडून त्यांचा निसर्गनियमानुसार विनियोग होतो व त्यांचे चांगले किंवा वाईट परिणाम भोगावे लागतात. हे ठसे प्रतिक्रिया या स्वरूपात व्यक्त होण्यासाठी अनुकुल काळ व संधी-परिस्थिती निर्माण व्हावी लागते त्यानंतरच ते सुख किंवा दुःख या स्वरूपात प्रतिक्रिया म्हणून प्रकट होतात.
क्रिया व प्रतिक्रिया या दोहोंच्या दरम्यान माणसाच्या कर्माचा जो सूक्ष्म ठसा अव्यक्त स्वरूपात अत्यंत सूक्ष्म रूपाने खोल जाणीवेत वास करून असतो व अभिव्यक्त होण्यासाठी अनुकुल काळ व अनुकुल संधीची वाट पहात ठाण मांडून बसतो तो सूक्ष्म ठसा म्हणजे पाप किंवा पुण्य होय.
In English we can define Paap and Punya as
Unmanifested inauspicious or auspicious reactions lodged in the subconscious mind, awaiting for appropriate and favourable circumstances for manifestation in life, can be rightly designated as Paap or Punya.
श्री. सदगुरू पुढे म्हणतात, केवळ विधी म्हणून किंवा नियम म्हणून किंवा देवाच्या भितीने किंवा धर्म मार्तंडांच्या दबावाखाली जे कर्मकांड केले जाते, ते कर्मकांड पुण्य निर्माण करण्यास समर्थ ठरत नाही. पाप-पुण्याचा संबंध देवा-धर्माशी जोडून बुवा-बाबा, भगत-फकीर, देवऋषी व पुरोहित या सर्वांनीच पुरेपुर फायदा घेतला आहे.
"देवाधर्माच्या नावाखाली सर्व धर्मातील सर्व लोक खूप काही करीत असतात पण त्या करण्यात देवही नसतो व धर्मही नसतो."
"सत्कर्म" हाच धर्म व सत्कर्मांचे आचरण हेच धर्माचरण, जे केल्याने माणसाला अगणित पुण्याची प्राप्ती होते.
|