सर्वांना नमस्कार,
खालील पोस्टमधून निघणारा अर्थ काढण्याचा प्रयत्न करू.
आपले मुळ स्वरूप चैतन्य म्हणजेच सत् + चित् + आनंद असे असून हे तिन्ही घटक वेगवेगळे नसून नेहमी एकत्रच असतात पण त्यांचे गुणधर्म वेगवेगळे असल्याने त्यांना वेगवेगळे संबोधण्यात येते. सा़खरेच्या कणांचा आकार, रंग व तिच्या ठायी असणारी गोडी जसे वेगवेगळे करता येत नाही तसेच हे आहे. यातील चित म्हणजेच जाणीव होय.
1. चित् म्हणजे शुद्ध जाणीव + शुद्ध नेणिव हे सतगुरुनि सच्चिदानंद स्वरूप C.D. मद्ये सांगितल आहे.
Chit= Shuddha janeev + Shuddha Neneev.
१. गिताताई व गौरव म्हणतात - चित् म्हणजे शुद्ध जाणीव + शुद्ध नेणिव
२. नूतनताई म्हणतात - चित म्हणजेच जाणीव होय.
३. चित् म्हणजे चैतन्य - तूच आहेस तुझ्या जीवनाशा शिल्पकार पान क्रमांक १८७
४. माझ्या मते - चित् म्हणजे ज्ञान (संदर्भ ज्ञानेशाचा संदेश)
५. माझ्या मते जाणिव म्हणजे एकत्रीत सत् चित् आनंद (चित्-जड ग्रंथीचा मला कळलेल्या अर्थानुसार; जो मी मांडण्याचा प्रयत्न करणार आहे.)
१. तेव्हा पहिला प्रश्न असा आहे की वरील सर्वांची संगती कशी लावावयाची?
२. सत् चित् आनंद स्वरूप या शब्दप्रयोगातील चित् व
चित्-जड ग्रंथी या शब्दप्रयोगातील चित् हे दोन्ही एकच आहेत का? का त्या दोन्हीचे अर्थ वेगवेगळे आहेत?
मला असे वाटते की,
सत् चित् आनंद स्वरूप या शब्दप्रयोगातील चित् हे एक पद असून त्याचा अर्थ ज्ञान असा आहे. व
चित्-जड ग्रंथी या शब्दप्रयोगातील चित् हा शब्द सत् + चित् + आनंद असा एकत्रीतपणे वापरला आहे. अन्यथा जाणीव या शब्दाचा अर्थ नीट जाणता येणार नाही. चित् या शब्दाबद्दल गोंधळ होऊ नये यासाठीच चित् म्हणजे चैतन्य हेही पान क्रमांक १८७ वर स्पष्ट केलेले आहे. तसेच 'तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार" या ग्रंथात सद्गुरूंनी चित्-जड ग्रंथी विषयी सांगायला पानक्रमांक १८७ वर सुरवात केल्यावर जाणीव हा शब्द "consciousness" या अर्थाने सर्वप्रथम पान क्रमांक २१७ वर आलेला आहे हे पण लक्षात ठेवले पाहिजे.
आता जाणीव ह्या शब्दाचा अर्थ स्पष्ट व्हावा म्हणून मी स्वत:लाच काही प्रश्न विचारतो व स्वत:च त्याची उत्तरे स्वत:लाच देण्याचा प्रयत्न करतो.
अ) ही जाणिव काय करते? फक्त जाणते. म्हणजेच जाणणा्रा कोणीतरी अस्तित्वात असलाच पाहिजे. त्याशिवाय जाणणे ही प्रक्रिया होऊच शकणार नाही. म्हणजेच जाणण्याला अधिष्टान पाहिजे. म्हणजेच सत् पद असलेच पाहिजे.
ब) जाणीव जाणते म्हणजे नक्की काय होते? तर त्यामुळे ज्ञान प्राप्त होते. किंवा ज्ञान प्राप्तीकरताच आपला जाणण्याचा प्रयत्न अखंड चालू असतो.
क) हे ज्ञान प्राप्त व्हावे असे का वाटते? तर ते मिळाले असता आपल्याला आपल्याठायी असलेला आनंद परत मिळेल म्हणून.
थोडक्यात जाणीव या शब्दाबद्दल विचार करताना सत् चित् आनंद या तिन्हींचा एकत्रीतच विचार करावा लागतो. कारण सद्गुरू स्पष्ट पणे सांगत आहेत की,
जाणीव वजा केली तर जीवन नावाची गोष्ट असूच शकत नाही. पान क्रमांक २१७
इतरांना त्यांचे मुद्दे मांडता यावेत म्हणून येथेच थांबतो.
सुभाषदादांना वेगळे उत्तर लिहिणार आहे.
सर्वांना नमस्कार. सर्वांना शुभेच्छा.