Jeevanvidya Discussion Forums
May 22, 2012, 11:14:33 AM *
Welcome, Guest. Please login or register.

Login with username, password and session length
News: Note: New user registration is Enable till 15 Aug 2011
 
  Back to Website   Home   Help Search Login Register  
Pages: [1]   Go Down
  Print  
Author Topic: Sant Wani- Non JVM Source-  (Read 1742 times)
dr.nutanpol
Senior Namdharaks
Ultimate Contributor
*
Offline Offline

Gender: Female
Posts: 429



« on: April 18, 2008, 02:52:32 AM »

 Namaskaar,

Following is the abhang from Namdev gatha. Abhang is written by great saint Namdev. Here, he describes the glory of company of saints.

परिसाचेनि संगे लोह होय सुवर्ण तैसा भेटे नारायण संतसंगे

कीटकी ध्याता भृंगी झाला तोचि वर्ण तैसा भेटे नारायण संतसंगे

वनस्पति परिमळु चंदन जाला जाण तैसा भेटे नारायण संतसंगे

अग्निस मिळे ते न ये परतोन तैसा भेटे नारायण संतसंगे

सरिता ओघ जाय सिंधूसि मिळोन तैसा भेटे नारायण संतसंगे

नामा म्हणे केशवा मज देई संतसंग आणिक काही तुज न मागे बापा

Meaning- When iron is touched by philosopher's stone it gets turned into gold. Similarly when we get the company of the saint we meet Narayan(God)
When the insect keeps thinking about black bee which collects nectar from flowers,  he gets that form. Similarly ....

In the company of sandal wood tree all other trees also smell likewise. Similarly .....

Whatever goes in the fire does not return back. Similarly ....

When river meets ocean, she looses her identity. Similarly .......

Namdev requests Keshav (God) to give the company of saints and says, Oh father I do not wish to ask anything else from you.   
Report to moderator   Logged

Sarve Sukhinha santu! Sarve bhadrani pashyantu!
May Divinity Within All get bloomed!
May God Bless all!
dr.nutanpol
Senior Namdharaks
Ultimate Contributor
*
Offline Offline

Gender: Female
Posts: 429



« Reply #1 on: April 20, 2008, 12:59:24 AM »


नाम-स्मरण भक्ती - दासबोध दशक चौथा, समास तिसरा

॥ स्मरण देवाचें करावें । अखंड नाम जपत जावें । नामस्मरणें पावावें । समाधान ॥ २॥
 नित्य नेम प्रातःकाळीं । माध्यान्ह काळीं सायंकाळीं । नामस्मरण सर्वकाळीं । करीत जावें ॥ ३॥
 सुख दुःख उद्वेग चिंता । अथवा आनंदरूप असतां । नामस्मरणेंविण सर्वथा । राहोंच नये ॥ ४॥
हरुषकाळीं विषमकाळीं । पर्वकाळीं प्रस्तावकाळीं । विश्रांतिकाळीं निद्राकाळीं । नामस्मरण करावें ॥ ५॥
 कोडें सांकडें संकट । नाना संसारखटपट । आवस्ता लागतां चटपट । नामस्मरण करावें ॥ ६॥
चालतां बोलतां धंदा करितां । खातां जेवितां सुखी होतां । नाना उपभोग भोगितां । नाम विसरों नये ॥ ७॥
संपत्ती अथवा विपत्ती । जैसी पडेल काळगती । नामस्मरणाची स्थिती । सांडूंच नये ॥ ८॥
 वैभव सामर्थ्य आणी सत्ता । नाना पदार्थ चालतां । उत्कट भाग्यश्री भोगितां । नामस्मरण सांडूं नये ॥ ९॥
आधीं आवदसा मग दसा । अथवा दसेउपरी आवदसा । प्रसंग असो भलतैसा । परंतु नाम सोडूं नये ॥ १०॥
नामें संकटें नासतीं । नामें विघ्नें निवारती । नामस्मरणें पाविजेती । उत्तम पदें ॥ ११॥
भूत पिशाच्च नाना छंद । ब्रह्मगिऱ्हो ब्राह्मणसमंध । मंत्रचळ नाना खेद । नामनिष्ठें नासती ॥ १२॥
 नामें विषबाधा हरती । नामें चेडे चेटकें नासती । नामें होये उत्तम गती । अंतकाळीं ॥ १३॥
 बाळपणीं तारुण्यकाळीं । कठिणकाळीं वृधाप्यकाळीं । सर्वकाळीं अंतकाळीं । नामस्मरण असावें ॥ १४॥
 नामाचा महिमा जाणे शंकर । जना उपदेसी विश्वेश्वर । वाराणसी मुक्तिक्षेत्र । रामनामेंकरूनी ॥ १५॥
उफराट्या नामासाठीं । वाल्मिक तरला उठा उठी । भविष्य वदला शतकोटी । चरित्र रघुनाथाचें ॥ १६॥
हरिनामें प्रल्हाद तरला । नाना आघातापासून सुटला । नारायेणनामें पावन जाला । अजामेळ ॥ १७॥
नामें पाषाण तरले । असंख्यात भक्त उद्धरले । माहापापी तेचि जाले । परम पवित्र ॥ १८॥
परमेश्वराचीं अनंत नामें । स्मरतां तरिजे नित्यनेमें । नामस्मरण करितां, येमें- बाधिजे ना १९॥
सहस्रा नामामधें कोणी येक । म्हणतां होतसे सार्थक । नाम स्मरतां पुण्यश्लोक । होईजे स्वयें ॥ २०॥
कांहींच न करूनि प्राणी । रामनाम जपे वाणी । तेणें संतुष्ट चक्रपाणी । भक्तांलागीं सांभाळी ॥ २१॥
नाम स्मरे निरंतर । तें जाणावें पुण्यशरीर । माहादोषांचे गिरिवर । रामनामें नासती ॥ २२॥
अगाध महिमा न वचे वदला । नामें बहुत जन उद्धरला । हळहळापासून सुटला । प्रत्यक्ष चंद्रमौळी ॥ २३॥
चहुं वर्णां नामाधिकार । नामीं नाहीं लाहानथोर । जढ मूढ पैलपार । पावती नामें ॥ २४॥
 म्हणौन नाम अखंड स्मरावें । रूप मनीं आठवावें । तिसरी भक्ती स्वभावें । निरोपिली ॥
Report to moderator   Logged

Sarve Sukhinha santu! Sarve bhadrani pashyantu!
May Divinity Within All get bloomed!
May God Bless all!
Pages: [1]   Go Up
  Print  
 
Jump to:  

Powered by MySQL Powered by PHP Powered by SMF 1.1.14 | SMF © 2006-2011, Simple Machines LLC Valid XHTML 1.0! Valid CSS!