dr.nutanpol
Senior Namdharaks
Ultimate Contributor
Offline
Gender: 
Posts: 429
|
 |
« on: June 03, 2008, 05:57:51 AM » |
|
श्री सदगुरू सौ. शारदामाई -सहजीवन आनंद यात्रा
लेखिका -सौ. वंदनाताई बेल्हे, स्मरणिका २००८ आनंद महोत्सव
"पति हाच देव असा जिचा भाव तिचा अवघा प्रपंच परमार्थरूप होय"
माणसाच्या जीवनात विवाह ही एक महत्त्वाची घटना असते. विवाह जीवनाला कलाटणी देणारा टर्निंग पॉईंट असतो. पति-पत्नी एकमेकांना साथ देणारे असतील तर त्यांचे वैवाहिक जीवन आनंदाने फुलत रहाते.
६० वर्षांपुर्वी श्री सदगुरू व सौ माईंचा विवाह १८मे १९४८ रोजी झाला. या ६० वर्षांमध्ये त्यांचे जीवन आनंदाने बहरत गेले. लग्नाच्या या साठाव्या वाढदिवसानिमित्त सर्व नामधारकांकडून सहस्त्र सहस्त्र शुभकामना.
लग्न झाल्यावर दोन वर्षांनी १ मुलगा व १ मुलगी झाल्यावर श्री. सदगुरूंच्या कुटुंब नियोजनाच्या निर्णयाला सौ. माईंनी मान्यता दिली. १९५२ पासून श्री. सदगुरूंनी प्रबोधनाचे कार्य हाती घेतले. हे कार्य विनामुल्य असतानाही माईंनी त्याला विरोध तर केला नाहीच आणि सातत्याने सहकार्य केले.
सौ. माई सूनबाई व नातसुन बाईबरोबर आनंदाने रहात आहेत. त्या दोघीही माईंचे कौतुक इतके करतात की मन आनंदाने भरून येते. जेथे तीन पिढ्या एकत्र इतक्या नांदतात असे हे श्री सदगुरू व सौ माईंचे हे कुटुंब जीवनविद्या मिशनचा जगाला जणु एक आदर्श आहे. एका विधवा स्त्री कडून सौ. माईंनी आपली ओटी भरून घेतली आणि अंधश्रध्दा निर्मुलनाचे कार्य आपल्या कृतीने सहज करून दा़खवले.
सौ, माईंचा पिंड प्रथम पासून धार्मिकच, त्यांच्या माहेरी व्रत वैकल्ये, पुजा-पाठ सतत होत असत पण श्री सदगुरूंच्या सहवासात आल्यावर त्या पुर्णपणे त्यांच्या विचारांशी एकरूप झाल्या व त्यांच्या कार्यात त्यांनी अत्यंत प्रेमाने साथ दिली.
सौ. माईंचे वैशिष्ट्य म्हणजे त्या जास्त बोलत नाहीत. बोलण्यापेक्षा प्रत्यक्ष कृती करणे त्यांना जास्त आवडते. त्या सतत तुमचे कल्याण होणार, भले होणार असा आशीर्वाद देत असतात.
श्री. सदगुरूंच्या नजरेत माई म्हणजे साक्षात अन्नपुर्णाच. कारण पुरण पोळी पासून केक पर्यंत सर्व पदार्थ माई घरीच बनवतात. त्यामुळे श्री. सदगुरू कौतुकाने सर्वांना सांगतात की आम्ही हॉटेलमध्ये कधीच जात नाही कारण माई सर्व पदार्थ घरी बनवतात. प्रवासाला जाताना बॅग भरण्याचे काम माईच करीत. श्री. सदगुरूंची सर्वतोपरी व्यवस्था पहाणार्या सौ. माई जीवनविद्या मिशनच्या संस्थापकांच्या व्यवस्थापक म्हणून शोभून दिसतात.
उगाच कोणाला नाव ठेवण, हसण हे त्यांच्या स्वभावात कधीच नव्हत. श्री सदगुरूंना सौ. माईंकडून कधीही त्रास झाला नाही. त्यांनी कधीच दागिने, मोटार वगैरे कोणत्याच गोष्टीसाठी हट्ट धरला नाही. त्यांनी अगदी काटकसरीने संसार केला. संसाराची पुर्ण जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतली आणि श्री सदगुरूंना कार्यासाठी, चिंतनासाठी, साधनेसाठी वेळ दिला. सदैव त्यांनी कुटुंबाचा व श्री सदगुरू कार्याचा विचार केला व सर्वांच्या सु़खात आपला आनंद मानला. या त्याग मूर्तिचे जेवढे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे. श्री सदगुरू माईंना कौतुकाने गुणसुंदरी असे म्हणतात. आपल्या वागण्याने त्यांनी सर्व स्त्रियांपुढे सुंदर असा आदर्श निर्माण केला आहे. त्या या काळातील, २१ व्या शतकातील अशा पतिव्रता आहेत ज्यांचे नित्य स्मरण करावे.
नवीन सून घरात आल्यावर तिने सासरच्या माणसांना आपल्या प्रेमाने, सौजन्यपूर्ण वागण्याने जिंकले पाहिजे. मी कोणापुढे हार मानणार नाही. अशी नकारात्मक विचारसरणी धारण करून वागू नये. असे सौ. माई सर्व स्त्रियांना सांगतात. आणि हे तत्त्व आपल्या जीवनात पूर्णपणे अंमलात आणले आहे.
सौ. माई श्री सदगुरूंच्या सतशिष्या आहेत. त्यांच्या कडे बिलकुल अहंकार नाही. इतरांची सेवा करण्यात त्यांना खूप आनंद मिळतो. प्रार्थना, हरिपाठ एकादशावर्तन, नामस्मरण सतत त्यांचे सुरू असते.
आम्ही नामधारक असे म्हणतो की श्री सदगुरू व सौ. माई यांची योग्यता सारखीच आहे व म्हणूनच ते एकमेकांना इतके शोभून दिसतात की जणू हे दोघे एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. पण सहवासाने हे कळाले आहे की दोघे एका अनमोल अशा नाण्याच्या अनमोल अशा बाजू आहेत आणि हे अनमोल नाणे म्हणजे जीवनविद्या मिशन.
|