dr.nutanpol
Senior Namdharaks
Ultimate Contributor
Offline
Gender: 
Posts: 429
|
 |
« Reply #1 on: January 14, 2011, 06:38:14 PM » |
|
विठ्ठल विठ्ठल अजित,
सर्वांना नमस्कार,
माणूस जे कर्म करतो (क्रियमाण) त्यातूनच त्याचे नशिब किंवा नियती साकार होते. कर्म हे दोन पातळीवर होते. देह या पातळीवर आणि मन या पातळीवर. आपण देहाने कर्म करतो म्हणजेच हाताने कर्म करतो. मन या पातळीवर केलेले कर्म म्हणजे आपण करीत असलेले विचार. विचार जेंव्हा वारंवार केले जातात तेंव्हा त्याला चिंतन असे म्हणतात.
आपल्या अंतर्मनात आपण पुर्वी केलेले सर्व कर्म सुक्ष्म जाणीवेच्या टेपवर ठशांच्या रूपात (पुर्व संचित) नोंदविलेले असते. जाणिवेच्या टेपवर कर्माचे ठसे नोंदविलेले जातात तेच जीवनात योग्य वेळ आल्यावर सुख किंवा दु:ख या रूपाने प्रतिक्रिया म्हणून अनुभवयास येतात. जसे बीच्या जातीवर अवलंबून आहे की केव्हा अंकुर येणार व फळे येणार तसेच कर्मांवर (सत्कर्मे व दुष्कर्मे, मिश्र फळ देणारी कर्मे) अवलंबून आहे की ते जीवनात सुख किंवा दु:ख रूपाने, कधी व कसे व्यक्त होणार. क्रिया तशी प्रतिक्रिया हा निसर्गाचा नियम आहे आणि क्रियांतूनच नशिब-नियती निर्माण होते.
जर आपण ठरविले की जे नशीबात असेल ते मुकाटपणे स्विकारायचे. स्वत: कोणत्याही प्रकारे प्रयत्न करायचे नाहीत तर माणूस दैववादी, निष्क्रीय बनतो, आळशी व दैवाधीन होतो. अशा माणसाची प्रगती होत नाही. त्याच्या कुटुंबाचीही प्रगती होत नाही. ज्या समाजात अशी माणसे अधिक्याने असतात त्या समाजाची, राष्ट्राची प्रगती होत नाही. म्हणूनच अशा माणसाबद्दल श्रीसद्गुरू म्हणतात, माणसाने एकदा का आपले भवितव्य नशीबाच्या खुंटिला टांगले की नियती त्याला टांग मारल्याशिवाय रहात नाही.
आपल्या जीवनात काय घडणार हे जसे पुर्वी केलेल्या कर्मांवर (पुर्व संचितावर) अवलंबून आहे तसे ते क्रियमाणावरही (आज काय करतो त्याच्यावर) अवलंबून आहे. विचार तसा जीवनाला आकार, हा निसर्गाचा नियम आहे. आपण सतत करीत असलेले विचार बहिर्मनातून अंतर्मनात जातात व तसा जीवनाला आकार देतात म्हणजे विचारांप्रमाणे जीवन घडत जाते. म्हणून क्रियमाणाच्या बाबतीत म्हणजे देह तसेच मन पातळीवरचे कर्म म्हणजे विचार करीत असताना आपण सावध असले पाहिजे.
दुसरे असे की आपण जे आपल्याला मिळावे असा विचार करतो तेव्हा आपण पुर्व संचितातून प्रारब्ध बाहेर काढतो. कधी हे विचार सुखाचे असतात तर कधी कधी नैराश्याच्या आहारी जाऊन दु:ख, आजारही मागितले जाते. अशा प्रकारे आपण शुभ किंवा अशुभ विचार करून पुर्व संचितातून पाप किंवा पुण्य बाहेर काढतो. ही पुर्वसंचितातून काढलेली उचल म्हणजे भोगण्यासाठी काढलेले प्रारब्ध. हे आपण आपल्या चिंतनाद्वारे वरचेवर काढत असतो.
अशा प्रकारे जीवनात येणारे सुख-दु:ख हे आपल्या पुर्वकर्माची प्रतिक्रिया म्हणून अनुकुल वेळ आल्यावर (passively आपल्या न कळत) आणि चिंतनाद्वारे मागून (actively) आपण सुख-दु:ख या रूपात भोगत असतो.
जीवनविद्या आपल्याला असे सांगते की, आपण जर सतत शुभ चिंतन केले, विश्वप्रार्थना म्हंटली तर येणारी प्रतिक्रिया दाबून टाकता येते किंवा सौम्य होते. यालाच Interaction म्हणतात. सर्व प्रयत्न करून व सतत शुभ चिंतन केल्यानंतर जे आपल्याला भोगावे लागते त्यालाच नियती असे म्हंटले पाहिजे. आणि तिचा वस्तुस्थिती म्हणून स्विकार केला पाहिजे आणि तिला सुरेख आकार देण्याचा प्रयत्न करा व आपल्याबरोबर सर्वांची प्रगती साधा असे जीवनविद्या सांगते. (यासाठीच प्रार्थना, हरिपाठ, सद्गुरू कार्य केले पाहिजे.)
क्रियमाण, प्रारब्ध, पुर्वसंचित आणि नियती नशीब या संकल्पना अधिक स्पष्ट होण्यासाठी जीवनविद्येचा प्राथमिक अभ्यासक्रम करावा व तुमचे भाग्य तुमच्या विचारात तसेच तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार हे ग्रंथ वाचावेत.
|