Jeevanvidya Discussion Forums
February 04, 2012, 08:57:09 AM *
Welcome, Guest. Please login or register.

Login with username, password and session length
News: Note: New user registration is Enable till 15 Aug 2011
 
  Back to Website   Home   Help Search Login Register  
Pages: 1 ... 4 5 [6] 7   Go Down
  Print  
Author Topic: positive experiences due to universal prayer  (Read 17547 times)
Varsha
Senior Contributor
***
Offline Offline

Posts: 116


« Reply #75 on: July 04, 2007, 02:36:34 AM »

Dear All,
Sorry I couldn't take part in discussions on forum since last many days..I am happily surprised to see Mr.Subhash Kelkar on forum,Sir I had attended ur lectures in Basic Course of JV.You r  a great speaker!
Nutan Tai I don't have 'Sharir Sakshat Parmeshwar' and will enjoy reading ur posts.

I would like to share one positive experience with all of u..
One of my relative was experiencing  hurdles in getting job in a big company...
I thought of applying visualisation tech. for him.At night after repeating Vishwaprarthana,in the sleepy state I pictured -'I am talking to his wife and she is joyously telling me a good news that her husband has got a job in a big firm and at a good scale..She is very happy..I felt the happiness in the news..then I congratulated him...and thanked Satguru for granting my wish!' and then I went off to sleep.I did this for 2 more days.
Next time when I talked to her,I was astonished to hear same words,same news and same feelings from her which I imagined.
Of course his efforts r there to meet his goal.But I am surprised to see the same thing came to pass which I imagined.

MAY SATGURU GUIDE EVERYONE.


Report to moderator   Logged
Rajeev Khade
New Contributor
*
Offline Offline

Posts: 4


« Reply #76 on: October 07, 2007, 02:49:32 PM »

Dear All Vithal Vithal
Our Universal Prayer is great. It makes miracles happen in our life. Only thing is we should chant it minimum 1000 times.

God bless all.

Rajeev
Report to moderator   Logged
subhash
Senior Namdharaks
Ultimate Contributor
*
Offline Offline

Gender: Male
Posts: 238



« Reply #77 on: October 14, 2007, 08:09:46 PM »

Thanks Varsha and Rajeev.

Speaker does not matter but the content of the speech does. JV is great and so is the experience of learning JV.

By the way, something about Universal Prayer (U.P.) at least 1000 times a day. We are directly playing KUSTI with our own mind when we force it to do U.P. It is very difficult for first seven days continuously. If you win this hurdle you can make hopes of becoming one who chants it 1000 times easily. You do not need to explicitly 'SEE' the thoughts or 'HOLD' and 'TURN' the thoughts. It directly gets TUNED and ALIGNED in the right manner as long as you are entertaining the most beautiful prayer full of golden thoughts. Satguru says it is a goldmine of golden thoughts - HI SUNDAR VICHARANCHI KHAAN AHE. ANI KHANALYASHIVAY HEY SONE MILANAR NAHI. Satguru further adds, KHANAYACHE MHANAJE MHANAYACHE. Just see that your JEEBH is chanting the U.P. continuously whenever you are mentally free from your work.

It is something to be experienced - NOHE BOLA AISE.

All the best to all who decide to do it 1000 times a day.

Best wishes,
Subhash
Report to moderator   Logged

God bless you, God bless all.
Varsha
Senior Contributor
***
Offline Offline

Posts: 116


« Reply #78 on: October 16, 2007, 11:32:33 PM »

Namskar Shree Subhashji,

Thanks for motivating us for chanting UP 1000 times.Everytime namdharaks tell abt chanting prayer I feel like Satguru is reminding me abt it.Thanks.

I have exeperienced wonderful results of UP plenty of times in my life.I have full faith in it.
But I do get upset when other people like my close friends r having some troubles in their life(like problems in office or at home).
I tell them to change their thoughts to good and start chanting  the prayer.But most of the times they r not in that mental stage to change their thoughts.
How to influence them at that time?Everyone please tell me how do you practice JV at that time?

Vitthal Vitthal
Report to moderator   Logged
Geeta Datar
Junior Contributor
**
Offline Offline

Gender: Female
Posts: 75


« Reply #79 on: October 17, 2007, 09:13:09 AM »

Hello Varsha

Right now I am reading a book ' How to use your healing power ' by Dr Joseph Murphy. I found an answer for your question in this book. Dr Murphy says if close people around you do not believe in the power of prayer you still can do prayer for them with the strong conviction that one day they will change their negative thought pattern. DR Murphy further tells us that infinite power within us is timeless and spaceless and it embraces the one you are praying for.

Please do not feel upset about it but act with 100% faith in Universal prayer. FEEL UNIVERSAL PRAYER WITHIN YOU AND VISUALISE THE CHANGE IN YOUR CLOSE FRIEND.

GOD BLESS US ALL WITH AKHAND PRAYER

Geeta Datar
Report to moderator   Logged

Vitthal Vitthal
shambhagwat
Guest Members
Ultimate Contributor
*
Offline Offline

Gender: Male
Posts: 308


« Reply #80 on: December 23, 2007, 05:17:23 PM »

सर्वांना नमस्कार,

    माझ्या मनात खोलवर घर करून बसलेल्या जुन्या व नकोशा असलेल्या आठवणींचा कडवडपणा विश्वप्रार्थनेच्या साहाय्याने मी खूपच मोठ्या प्रमाणावर ते सुध्दा चांगल्यारितीने कमी करू शकलो आहे असे मला वाटत होते.  पण ऑक्टोबर २००६ ला एक घटना घडली त्यामुळे मी परत सावध झालो.  सर्व सामान्य माणसाला राग येतो तसाच मलाही येतो.  पण या रागात अविचाराने प्रवेश केला की, त्या रागाचे क्रोधात रुपांतर होते.  बऱ्याच वेळेस आपल्यावरील चांगल्या संस्कारामुळे आपल्या हातून प्रत्यक्षात काही अयोग्य घडत नसले तरी मनाच्या पातळीवर आपण सूड घेण्याचा प्रयत्न करण्याची शक्यता असते.  तसेच ही सूड घेण्याची प्रवृत्ती अनुकुल काळाची वाट पहात आपल्या मनात दडून बसलेली असते व त्याचा आपल्याला पत्ताच नसतो.  याच गोष्टीचा मला आलेला अनुभव मी लिहित आहे.

   खूप जवळचाही नाही व खूप लांबचाही नाही असा माझा एक मित्र आहे.  १९८० सालापासूनचे संबंध आहेत.  दोन- तीन वर्षांपूर्वी आमच्यात मतभेद झाले होते.  मी बरोबर असूनही त्याने गैरसमज करून घेतल्यामुळे मला थोडा त्रासही झाला होता.  पण जेव्हा त्याचे ते गैरसमज नाहीसे झाले तेव्हा तो आपणहून माझ्याशी बोलायला आला व मी पण झाले गेले विसरून जाऊया अशी भूमिका घेतली.  संबंध परत पूर्वीसारखे झाले आहेत असेच मला मनापासून वाटत होते.  इथपर्यंत ठीक होते.  पण ऑक्टोबर महिन्यात त्याच्याबाबतीत एक त्याच्या घरगुती समस्येत त्याला जरा त्रास झाला. दुखा:ची गोष्ट घडली.  ही बातमी मला जेव्हा माझा दुसरा मित्र मला सांगत होता तेव्हा मला मनातून बरे वाटत होते.  बरे झाले बरे झाले म्हातारीचे काम झाले असे आम्ही लहान पणी म्हणत असू त्याची आठवण झाली.  त्याच्या वागण्याचा मला जो त्रास झाला होता; त्या त्रासाचे माझ्या अंतर्मनात उठलेले ठसे त्या घटनेबद्दल सूड घेण्याच्या अपेक्षेत अनुकुल संधीची वाट पाहात दबा धरून बसलेले होते ह्याचा हा सज्जड पुरावाच होता.  हे माझ्या लक्षात आल्याबरोबर मी ताबडतोब एका जागी बसून त्याच्यासाठी विश्वप्रार्थना म्हणू लागलो.  अर्धा एक मिनिट जरा त्रास झाला पण शेवटी ते जमले.  शुभ चिंतनाचे महत्व अतोनात आहे हे पूर्णपणे पटलेले असल्यानेच माझ्या हे लक्षात येऊ शकले असावे.  खरे म्हणजे मी हा अनुभव त्यावेळेसच लिहिणार होतो पण थोडे थांबावयाचे ठरविले इतकेच.

   एप्रील २००७ मधे अशीच एक गोष्ट घडली.  येथे तर माझा द्वेष करणारा माणूस होता.  त्याने केलेल्या अफरातफरीबद्दल चौकशी करण्याचा आदेश कोर्टाने दिला आहे अशी वर्तमानपत्रात आलेली बातमी मला माझा एक मित्र दाखवत होता.  ही बातमी वाचत असताना मी नकळत माझ्यावरती लक्ष ठेवायला लागलो.  मला ही बातमी ऐकून आनंद तर होत नाहीये ना याची खात्री करून घ्यावयास लागलो.  मी माझ्या मनाला समजावून सांगत होतो की,  ह्या माणसाने मला खूप त्रास दिला असला तरी मी आनंद व्यक्तही करणार नाहीये तसेच या बातमीचा आनंद मानणार नाहीये.  आनंद मानण्याचे मला काही एक कारण नाहीये.  त्या माणसाच्या बाबतीत जे काही घडतेय ते त्याच्या कर्माने घडतेय.  त्यात मला लक्ष घालायचे काहीएक कारण नाही.  मला वाटते परमेश्वराने घेतलेल्या या दुसऱ्या परिक्षेत मी पहिल्या परिक्षेपेक्षा जास्त मार्क मिळवेलेले असावेत.

अशुभ चिंतनातून सुटणे किती अवघड आहे व त्यासाठी अखंड नामस्मरण अथवा विश्वप्रार्थना करणे किती आवश्यक आहे हे मला या दोन्ही प्रसंगानी चांगलेच शिकवलेय असे मी मानतो.

"पाप फळते लवकर आणि पुण्य फळते उशीरा" ह्या प्रश्नाचे उत्तर लिहिताना मला असे वाटले की हा अनुभव मी फोरममधे पोस्ट करायला हवा.  म्हणून मी आज पोस्ट करत आहे.

सर्वांना नमस्कार.  सर्वांना शुभेच्छा.
Report to moderator   Logged
SanyuktaDeshpande
New Contributor
*
Offline Offline

Posts: 14


« Reply #81 on: December 24, 2007, 12:35:41 PM »

Namaskar

Your Experience is really very nice.
I am new to jeevanvidya so want to know that we can change our thoughts with VP and train our mind to think positively about others.
But How we can see the effect with others?Means I have a very bad exp.with somebody &  whenever I think abt that I feel really bad & sad.My mind started finding how badly the person treated me & how I am right & the person is wrong.
So if I started doing VP for Him.Can it is possible to change that person behavior with me?


Regards
Vitthal Vitthal


Report to moderator   Logged
subhash
Senior Namdharaks
Ultimate Contributor
*
Offline Offline

Gender: Male
Posts: 238



« Reply #82 on: December 26, 2007, 12:15:31 AM »

Sanyukta,

as you alter your thoughts towards things and other people they will alter towards you. Either that person will change or you will go too far away from the person's circle. Both ways you will get helped. Experiment it. Initially your thinking good about the person - will be mechanical ritual. Later it will become a conviction in your mind. At that time you should get the result. Change within forces a change without.

All the best,
Subhash

PS: Shambhagwat's experience is a learning.
Report to moderator   Logged

God bless you, God bless all.
shambhagwat
Guest Members
Ultimate Contributor
*
Offline Offline

Gender: Male
Posts: 308


« Reply #83 on: December 26, 2007, 03:15:34 PM »

सर्वांना नमस्कार,

नमस्कार संयुक्ताताई,

तुम्ही जो प्रश्न मांडलेला आहे तसाच प्रश्न इतरांनाही पडलेला असण्याची शक्यता असल्याने माझे विचार जरा सविस्तरपणे मांडत आहे.

आपल्या समोर जेव्हा एखादी समस्या असते तेव्हा आपले मन ती समस्या सोडविण्याची एकही संधी सोडत नाही.  जेव्हा जेव्हा शक्य होईल तेव्हा तेव्हा आपले मन हा प्रयत्न आपल्या कळ्त अथवा नकळत करत राहाते.  हा प्रश्न जर मनाने गांभिर्याने घेतलेला असेल तर मात्र आपले मन प्रत्येक वेळेस खूप मोठ्याप्रमाणावर उर्जा खर्च करत असते व आपला बहुमुल्य वेळ त्यासाठी खर्ची पडत असतो.  खूप मोठ्याप्रमाणावर उर्जा खर्च होत असल्याचे त्यावेळेस जाणवत नसले तरी त्यानंतर येणारा शारिरिक व मानसिक थकवा अथवा अस्वस्थता आपल्याला अनुभवता येते व त्यावरून आपल्या मन किती गांभिर्याने या प्रश्नाच्या सोडवणूकीचा प्रयत्न करत आहे हे आपण समजून घेऊ शकतो.

हे सर्व स्वाभाविक असून त्यात काहीच गैर नाही.  मात्र मन या पध्दतीने कार्य करत असताना खालील मुद्यांचा आधार घेतला तर आपण खर्च करत असलेली उर्जा व आपला बहुमुल्य वेळ सार्थकी लागण्याची शक्यता असते असे वाटते.

१) उद्दिष्ट्य : आपले उद्दिष्ट्य निश्चित असले पाहिजे.
२) उद्दिष्ट्य पूर्ततेची खात्री : आपले मन यासाठी जो काही प्रयत्न करत आहे त्याद्वारे आपल्याला आपले उद्दिष्ट्य नक्की साधता येईल ना? याची खात्री करून घेणे.
३) वेळेचा व शक्तीचा अपव्यय : आपल्या मनाने जी दिशा धरली आहे त्या दिशेने कितीही गेले तरी त्यातून काही साध्य होणार नसेल तर खर्च होणारी उर्जा व वेळ हा अपव्यय असेल याचे भान ठेवणे.
४) उपाय हाच अपाय : मन या बाबतीत जे काही करत असेल त्यामुळे प्रश्न सुटण्याचे राहोच पण ते प्रश्न आणखीनच जटील तर बनणार नाहीत ना याबाबत सावध राहाणे.
५) निसर्गाचे नियम : शेवटचे व सर्वात महत्वाचे म्हणजे हे सर्व करत असताना जीवनविद्या तत्वज्ञानाची कास कधिही न सोडणे व आपण जो मार्ग अनुसरत आहोत त्यापेक्षा आणखी चांगला मार्ग या तत्वज्ञानानुसार मिळू शकेल का? याचा सातत्याने धांडोळा घेणे.

वरील मुद्दे तसेच तुम्ही पोस्ट केलेला मजकूर या दोन्हीच्या आधारे आपल्याला काही मार्ग मिळू शकेल काय याचा आढावा घेण्याचा प्रयत्न करू.

१. उद्दिष्ट्य : Can it is possible to change that person behavior with me?
ह्या व्यक्तीला तुमच्या जीवनात काहीएक स्थान असून त्या व्यक्तीसंदर्भात तुम्हाला काही हक्क, अधिकार, जबाबदाऱ्या तसेच त्या व्यक्तीकडून तुम्हाला काही अपेक्षा आहेत.  तसेच त्या व्यक्तीने त्याची चूक मान्य केली किंवा त्या व्यक्तीने तुमच्याशी असलेली  त्याची वर्तणूक सुधारली तर तुम्ही त्याला त्याच्या चुकीबद्दल माफ करायलाही तयार आहात.  थोडक्यात तुम्ही या व्यक्तीशी असलेले संबंध तोडू तर इच्छीत नाहीच उलट ते जोडू अथवा पूर्ववत करू इच्छिता.

२. उद्दिष्ट्य पूर्ततेची खात्री :  यासंबंधात तुमचे मन कोणत्याप्रकारे उर्जा खर्च करत आहे हे लक्षात घेऊन त्याद्वारे प्रश्न सुटण्यास मदत होऊ शकेल का ते तपासून पाहू.  तुमचे मन खालील प्रकारे उर्जा खर्च करत आहे असे वाटते.
अ) whenever I think abt that I feel really bad
घडलेल्या प्रसंगाबद्दल मनातल्या मनात वारंवार खूप वाईट वाटून घेतल्याने त्या व्यक्तीची वर्तणूक खरोखरच बदलेल असे तुम्हास वाटते का?
ब) & sad.
मनातल्या मनात सातत्याने दु:खी झाल्याने त्या व्यक्तीची वर्तणूक खरोखरच बदलेल असे तुम्हास वाटते का?
क) My mind started finding how badly the person treated me
त्या दु:खद प्रसंगाची उजळणी मनातल्या मनात वारंवार केल्यामुळे त्या व्यक्तीची वर्तणूक खरोखरच बदलेल असे तुम्हास वाटते का?
ड) & how I am right
आपण कसे बरोबर आहोत हे आपणच आपल्या मनाला वारंवार समजावून सांगितल्यामुळे त्या व्यक्तीची वर्तणूक खरोखरच बदलेल असे तुम्हास वाटते का?
इ)  & the person is wrong.
ती व्यक्ती कशी चूक होती हे निरनिराळ्या अथवा त्याच त्या मुद्यांद्वारे स्वत:च्या मनाला सातत्याने समजावून सांगितल्याने त्या व्यक्तीची वर्तणूक खरोखरच बदलेल असे तुम्हास वाटते का?

वरील सर्व प्रश्नांची उत्तरे होकारात्मक येत असतील तर तुमचा प्रश्न सोडविण्यासाठी तुमचे मन योग्य प्रकारे उर्जा खर्च करत आहे असे म्हणता येईल.

३. वेळेचा व शक्तीचा अपव्यय : वरील सर्व प्रश्नांची उत्तरे जर नकारार्थी येत असतील तर तुमच्या मनाची शक्ती विनाकारण फुकट जात आहे असे समजले पाहिजे.

४. उपाय हाच अपाय : तुमचे मन ज्या पध्दतीने या संदर्भात उर्जा खर्च करत आहे त्याने तुमचे नुकसान होण्याची शक्यता आहे का ते तपासून पाहू.  त्यासाठी तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार या ग्रंथातील निकषांचा आधार घेऊ.

अ) शेतकरी व जमीन : "बहिर्मन हा शेतकरी असून अंतर्मन हे शेत किंवा जमीन आहे.  विचार ह्या बिया आहेत.  बहिर्मन जे विचार अंतर्मनाच्या शेतात पेरील त्याप्रमाणे दामदुपटीने परत देण्याचे काम अंतर्मन करील." --- पान क्र.६५ व ६६
तुम्ही असे लिहित आहात की, "I have a very bad exp.with somebody &  whenever I think abt that I feel really bad & sad."
प्रसंग एकदाच घडलेला असेल तर त्याची नोंद तुमच्या अंतर्मनाने एकदाच केली पाहिजे.  पण या वाक्यातून (whenever) असे सुचित होते आहे की तुम्ही वारंवार त्याची उजळणी करत आहात व नकळत तुमच्या अंतर्मनावर असे संस्कार करत आहात की, ही घटना वारंवार घडलेली आहे.  जर या पध्दतीने तुम्ही तुमच्या अंतर्मनात चुकीची माहिती भरत राहिलात तर त्याचा परिणाम म्हणून तुमचे अंतर्मन तुमचे दु:ख भविष्यात वारंवार परत करायचा प्रयत्न करेल असा होत नाही का?  कारण निसर्ग नियम असे सांगतो की तुम्ही जे अंतर्मनात पेरता ते परत करणे इतकेच आपले अंतर्मन जाणते. 

ब) बियांचा प्रकार : "परंतु येथे एक महत्वाची गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की कुठल्या जातीच्या वृक्षांची बिजे (म्हणजेच विचार) जमिनीत पेरायची हे जमीन शेतकऱ्याला सांगणार नाही." ---पान क्र.६६
तुम्ही जो विचार करत आहात त्या विचारांच्या पहिल्या बीचे नाव "bad" व दुसऱ्या बीचे नाव "sad" असण्याची शक्यता असू शकेल.  पण या बियांची नावे कोणतीही असली तरी या बिया तुम्ही तुमच्या अंतर्मनात पेराव्या किंवा नाही हे तुमचे अंतर्मन तुम्हाला कधिही सांगणार नाही.  तुम्हीच तो निर्णय घ्यावयाचा आहे असा या निकषाचा अर्थ होतोय का? हे तुम्हालाच ठरवायचे आहे असे वाटते.

क) खत-पाणी : "या ठिकाणी आणखी एक महत्वाची गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे ती ही की, वृक्षाच्या बिया नुसत्या जमिनीत पेरून काम भागत नाही तर त्यासाठी त्यांना खत-पाणी घालावे लागते.  त्याचप्रमाणे कल्पना व भावना यांचे खत-पाणी अंतर्मनात पेरलेल्या विचारांच्या बियांना लागते." ---पान क्र.६६
   तुम्ही स्पष्टपणे लिहित आहात की, how I am right & the person is wrong. हे कल्पनाशक्तीशिवाय कसे बरे शक्य आहे?  एखादा तर्क करण्यासाठी अथवा एखादा निष्कर्श काढण्यासाठी कल्पनाशक्तीला वेगवेगळ्या दिशेने खूप मोठ्या भराऱ्या माराव्या लागतात.  ही कल्पनाशक्ती जेव्हा खूप मोठ्या ताकदीने भराऱ्या मारू लागते तेव्हा आपले स्थळ, काळ व वेळ यांचे भान हरपते.  आपल्या आजूबाजूला काय चालले आहे? आपले आत्ताचे कर्तव्य काय आहे? आपण किती वेळ यात घालवतो आहोत?  आत्ताची वेळ काय आहे? म्हणजे दिवस आहे की मध्यरात्र आहे वगैरे कशाचेही भान राहात नाही.  "bad & sad." या तर भावना आहेत व त्याही तुम्ही निश्चीतपणे वापरत आहात याचाच अर्थ तुम्ही जो विचार करत आहात त्या विचारांच्या बियांना खत-पाणी घालत आहात असा होतो आहे असे वाटते.

ड) शंकर म्हणतो तथास्तु : "आपल्या बहिर्मनात जे विचार व विकार येतात त्यांना खोल अंतर्मनात पोहोचविण्याचे काम कल्पना व भावना करतात.  जे विचार, सूचना किंवा प्रार्थना खोल अंतर्मनात जावून भिडतात म्हणजेच शिवाच्या-शंकराच्या चरणापर्यंत पोहोचतात त्या सर्व विचारांना, सूचनांना किंवा प्रार्थनांना शंकर तथास्तु म्हणतो व त्या प्रार्थना फलद्रूप होतात." ---पान क्र.५९
तुम्ही कल्पना व भावना वापरत असाल तर हे सर्व विचार अंतर्मनात खोल जावून भिडतील व शेवटी ते शंकराच्या चरणापर्यंत जाऊन पोहोचतील व त्या विचारांना शंकर तथास्तु म्हणेल असेही म्हणता येईल.

५. निसर्गाचे नियम : वरील सर्व विवेचन जीवनविद्या तत्वज्ञानानुसारच केले आहे.  आता याच तत्वज्ञानानुसार तुम्ही आचरत असलेल्या मार्गापेक्षा आणखीन चांगला मार्ग मिळू शकेल का त्याचा धांडोळा घेण्याचा प्रयत्न करू.

त्यासाठी ह्या सर्व प्रकारची काय कारण असावे हे पहावे लागेल.  आपल्याला अचूक कारण शोधता आले तरच आपण अचूक उपाययोजना करू शकू.  आपण शोधून काढलेले कारण जितके व्यक्तीनिरपेक्ष व परिस्थितीनिरपेक्ष असेल तितके ते अचूक असण्याची शक्यता असते.

मला वाटते या विश्वातील कोणतीही व्यक्ती चुकीचे वागते कारण त्या व्यक्तिला चांगली बुध्दी नसते हे होय.  हे कारण मला वाटते अगदी त्रिकालाबाधित सत्यस्वरुपातले आहे आणि म्हणूनच तुम्ही संबोधिलेल्या व्यक्तिलाही लागू पडू शकेल.  असे जर असेल तर त्या व्यक्तिला चांगली बुध्दी देणे एवढेच शिल्लक राहाते.  पण बुध्दी बाजारात विकत मिळत नाही.  मिळाली तर ती चांगली आहे हे कसे ठरवावयाचे?  कारण चांगले म्हणजे नक्की काय हे तरी कुठे आपल्याला कळतेय.  आणि जरी बाजारात आपल्याला चांगली बुध्दी विकत मिळाली तरी ती चांगली बुध्दी त्या व्यक्तिच्या डोक्यात कशी भरायची हा प्रश्न उरतोच.  यासाठी एकमेव पर्याय शिल्लक राहातो तो म्हणजे त्या परमेश्वरालाच प्रार्थना करायची की, सर्वांना चांगली बुध्दी दे व त्या बुध्दीनुसार त्या व्यक्तिला कार्य करता यावे यासाठी चांगले आरोग्य दे.  हे म्हणत असताना ती व्यक्ति डोळ्यासमोर आणली की आपले काम झाले.  मात्र या दोन गोष्टी त्या व्यक्तिला मिळाल्याबरोबर त्याला इष्ट नियती प्राप्त होऊन तो सुखात, आनंदात, ऐश्वर्यात राहाणार हे जणू काळ्या दगडावरची रेष आहे.  यासाठीच त्या व्यक्तिला हे सर्व मिळालेय अशी कल्पना करायची.  अगदी याच पध्दतीने संपूर्ण विश्वप्रार्थना जेव्हा जेव्हा या प्रसंगाची आठवण तुम्हाला होईल तेव्हा तेव्हा करत राहा.

तुम्ही जो आत्तापर्यंत विचार करत आला आहात त्यावरून एक गोष्ट तुमच्या लक्षात आली असेल की ती व्यक्ति समोर नसतानाही तुम्ही त्याची जिवंत प्रतिमा मनाने डोळ्यासमोर आणू शकता.  तसेच तुम्ही आत्तापर्यंत जो विचार करत आला आहात त्या प्रत्येक वेळेस तुम्ही त्या विचारांशी किती समरस झाला होता ते आठवा व वरील प्रार्थना करताना अगदी तसेच समरस होण्याचा प्रयत्न करा व त्या व्यक्तिला डोळ्यापुढे आणण्याचा प्रयत्न करा. 

यामुळे काय होण्याची शक्यता आहे?
१) यामुळे त्या माणसाची तुमच्याशी वागण्याची पध्दत बदलणे हे तुमच्या हिताचे आहे असे जर त्या परमेश्वराला वाटत असेल तरच तो तसे करेल.  आणि जर ते तुमच्या हिताचे नसेल तरच तो तसे करणार नाही हेही निश्चित.
२) परमेश्वराला जो काय निर्णय घ्यायचा असेल तो निर्णय तो घेईलच पण यात तुम्ही एक गोष्ट नक्की साधाल.  ती म्हणजे तुमचा बहुमुल्य वेळ व मानसिक उर्जा खूप मोठ्या प्रमाणावर वाचेल.  तुमच्या मेंदूच्या हजारो पेशींवर ह्या सगळ्या गोष्टींचा ताण येतो आहे तो गेल्याने तुम्हाला प्रफुल्लित वाटू लागेल.  खूप मोकळे मोकळे झाल्यासारखे वाटू लागेल.  हा परिणाम इतका मोठा असतो की तुम्हीच नव्हे तर कदाचित तुमच्या परिवारातील इतर सदस्यांनाही तो जाणवेल व तसे ते कदाचित बोलूनही दाखवतील.

This para (point 3) which was inadvertently missed, has been added on 05:21:25 PM on same date
३) या पध्दतीने जेव्हा तुम्ही प्रार्थना करू लागाल तेव्हा तुमच्या मनात येणाऱ्या विचारांच्या बियांची नावे असतील चांगली बुध्दी, चांगले आरोग्य, सुख, आनंद, ऐश्वर्य इत्यादि.  त्या व्यक्तिला हे सर्व प्राप्त व्हावे अशी तुम्ही कल्पनाही करत असाल तसेच या विचारांशी समरस होण्याचा प्रयत्न करत असाल.  त्यामुळे तुमचे अंतर्मन तुम्हाला तेच परत करायचा प्रयत्न करू लागेल.  तुमचे उद्दिष्ट्य साध्य होईल किंवा नाही हे मी सांगू शकत नसलो तरी हे मात्र निश्चितपणे सांगू शकतो की, यापुढच्या काळात तुमच्या जीवनात सुख, आनंद व ऐश्वर्य प्रवेश करून ते उत्तरोत्तर वाढतच जाईल.  तसेच या गोष्टींचा योग्य वापर करण्यासाठी तुम्हाला चांगले आरोग्य लाभलेले असेल.  इतकेच नव्हे तर तुम्हाला प्राप्त झालेली चांगली बुध्दी तुम्हाला नेहमीच सर्वांना हितकारक असेल असेच निर्णय घेण्यास प्रवृत्त करेल.  अट फक्त एकच या व्यक्तीसाठी विश्वप्रार्थना करीत राहायचे व त्यातूनच (विश्वप्रार्थनेत सांगितल्याप्रमाणे) या विश्वातील सर्वचजणांना हे सर्व मिळो इथपर्यंत पोहोचायचे.  मी नक्की सांगतो की, कालांतराने तुम्ही सुध्दा म्हणू लागाल की, "परमेश्वराने माझ्या जीवनात जे काही घडवले ते माझे कल्याणाचेच होते.

एक मात्र नक्की तुम्ही लिहिलेला मजकूर वाचून मला असे वाटतेय की,  अगदी मोजक्या शब्दात सगळा आशय तुम्ही मांडू शकला आहात.  तुम्ही प्रामाणिक असल्यामुळे तुमच्या लिखाणात प्रांजळपणा आला आहे.  आवश्यक ती सगळी माहिती द्यावयाची व अनावश्यक ती सर्व माहिती टाळायची हा एक स्वभाव विशेष असू शकतो व तसा तुमचा असावा.  तसेच तुम्हाला तर्कशुध्द पध्दतीने विचार करायला तसेच मांडायला तसेच वाचायला आवडत असावे.  मी हे सविस्तर उत्तर लिहिण्यास प्रवृत्त झालो त्यामागे हेही एक कारण असू शकेल.

"विचार करणाऱ्याने विचार करून विचार करायला शिकले पाहिजे---तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार पान क्र.६४" हेच तर आपल्याला साधता यावे असे सद्‌गुरूंना मनापासून वाटतेय म्हणून तर इतकी ग्रंथसंपदा त्यांनी निर्माण केली आहे व सातत्याने ते प्रवचने देत आहेत.

सर्वांना नमस्कार. सर्वांना शुभेच्छा.

« Last Edit: December 26, 2007, 05:31:06 PM by shambhagwat » Report to moderator   Logged
SanyuktaDeshpande
New Contributor
*
Offline Offline

Posts: 14


« Reply #84 on: December 26, 2007, 05:19:31 PM »

Namaskar Shamdada

Atishay Dhanyavad.
Mazya tin-char vakyanche itake sundar vivechan aani samadhan yapeksha dusare asuch shakat nahi.
Tumhi mazya manatil asvasthata ghalavanyasathi khoop vyayasthit margadarshan kele aahe.
Tumhi itake chhan lihile aahe tyasathi tumache aani tumhala itake sundar lihinyachi prerana denyasathi jeevanvidyechi aani Satgurunchi mi manapasun Runi aahe.
I will  follow these words  as a guide throughout my life.
Thanks a lot.

God bless you and all always.
Countless Regards
Sanyukta


Report to moderator   Logged
SanyuktaDeshpande
New Contributor
*
Offline Offline

Posts: 14


« Reply #85 on: December 26, 2007, 05:33:02 PM »

Namaskar subhash dada

Special thanks for your Guidance.

Regards
Sanyukta
Report to moderator   Logged
Deepak_jvm
Global Moderator
Senior Contributor
*
Offline Offline

Posts: 124


« Reply #86 on: December 26, 2007, 08:20:54 PM »

Namaskar Sanyuktatai,
Unwanted incidences happen sometimes in life. It is beneficial if we could forget such incidences as quickly as possible.
I would suggest reading of chapter"Kharuj" in book Sugandh Jeevanvidyecha.

If the person with whom you had a bad experience comes in front of you, if possible, from bottom of your heart wish for the well being of that person. Pray to God for peace of mind for him.
It is difficult to pray and wish good for such person from bottom of heart. But we have to start superficially first before it starts coming from bottom of heart.

As already explained by Mr Bhagwat, it may not be helpful to sit at one place and pray for such person. Tase kelyas shubh chintanaaivaji khajvun kharuj kadhalyasarakhe hovu shakate.

It is beneficial to say UniversalPrayer without specially remembering such incidences.

May God Bless all.
Deepak
Report to moderator   Logged
shambhagwat
Guest Members
Ultimate Contributor
*
Offline Offline

Gender: Male
Posts: 308


« Reply #87 on: December 26, 2007, 10:14:36 PM »

नमस्कार संयुक्ताताई,

श्री. दिपकदादा म्हणत आहेत ते अगदी बरोबर आहे.  आणि म्हणूनच ५ नंबरच्या मुद्यातील तिसऱ्या पॅरात शेवटी मी स्पष्टपणे म्हटले आहे की, "अगदी याच पध्दतीने संपूर्ण विश्वप्रार्थना जेव्हा जेव्हा या प्रसंगाची आठवण तुम्हाला होईल तेव्हा तेव्हा करत राहा."  आणि त्यानंतर त्यावेळची प्रार्थना कशी (म्हणजे आठवण झाल्यावर) म्हटली पाहिजे त्याचे स्पष्टीकरण दिले आहे. 

पण वरील वाक्याकडे जर नजरचुकीने तुमचे दुर्लक्ष झाले तर मात्र श्री. दीपकदादा म्हणतात तसे होऊ शकेल.  हा धोका लक्षात आणून दिल्याबद्दल दिपकदादांचे आभार मान.  मीपण त्यांना धन्यवाद देतो आहे.

मी जो माझा पहिला अनुभव लिहिला आहे (उत्तर क्र.३) त्यातही असे स्पष्टपणे म्हटले आहे की, "अशा प्रकारच्या आठवणी आल्या की लागलीच त्या व्यक्ति डोळ्यासमोर ठेवून जीव तोडून त्यांच्यासाठी मी विश्वप्रार्थना म्हणावयास सुरवात केली."

दिपकदादांनी सुचविलेल्या प्रमाणे "सुगंध जीवन विद्येचा" मधील खाज व खरूज हे तिसरे प्रकरण पान क्र.२० जरूर वाचा.  त्याचबरोबर उत्तर क्र. ३ मधे ज्याचा उल्लेख केला आहे ते प्रकरण "तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार" पान क्र.१४४ (प्रार्थना-दुसरा मार्ग) हा भागही वाचल्यास त्याचाही कदाचित उपयोग होऊ शकेल असे वाटते.  मी उत्तर क्र. ३ मधे लिहिलेला अनुभव ज्या वाक्यावर आधारित आहे तेवढेच वाक्य खाली देत आहे.

"जितक्या पोटतिडकीने तळहातावर तळहात घासून व दांत-ओठ चाऊन दुसऱ्यांना "तुझे तळपट होवो" असा शाप देतोस, तितक्याच पोटतिडकीने "दुसऱ्यांचे कल्याण होवो, त्यांचे भले होवो, ते सुखी होवोत" अशी देवाची प्रार्थना केली तर त्या प्रार्थनेने भगवंत, संत, सद्‌गुरु व सर्व देव-देवता तुझ्यावर प्रसन्न होतील."

सर्वांना नमस्कार.  सर्वांना शुभेच्छा.
Report to moderator   Logged
Deepak_jvm
Global Moderator
Senior Contributor
*
Offline Offline

Posts: 124


« Reply #88 on: December 27, 2007, 09:22:25 PM »

Dear Bhagwatsaheb,
Since senior members like you, Subhash, and Dr Nutantai are explaining each topic in detail, I am just adding few points in brief to supplement. Thank you for giving exact reference of Satguru's quote in book "Tuch ahes tuzya jeevanacha shilpakar".
I can see all members are enjoying reading your detailed posts.

May God bless all.
Deepak
Report to moderator   Logged
shambhagwat
Guest Members
Ultimate Contributor
*
Offline Offline

Gender: Male
Posts: 308


« Reply #89 on: December 31, 2007, 03:55:59 PM »

नमस्कार दीपकदादा,

मला सुचत गेले त्याप्रमाणे मी संयुक्ताताईं समोर माझे विचार मांडत गेलो.  आता तुम्ही जी दिशा दिली आहे त्या दिशेने माझे विचार बरोबर आहेत का ते पडताळून पाहाण्याचा प्रयत्न करतो.  बीजगणितातील समीकरणातील 'क्ष' व 'य' च्या किमती काढल्यावर ज्याप्रमाणे त्या समीकरणात आलेल्या किंमती घालून आपण ताळा करून बघतो. तसेच काहीसे करण्याचा माझा प्रयत्न असणार आहे.  असो.

मी माझा दृष्टीकोन तपासण्यासाठी "खाज व खरूज" या प्रकरणात पान क्र.२३ वर गीतेच्या श्लोकाचा जो अर्थ सद्‌गुरूंनी सांगितलेला सांगितला आहे त्याचा आधार घेत आहे.  त्यासाठी त्या अर्थाचे खालील भाग पडतात.
०. मनुष्याचे अध:पतन व्हावयास सुरवात होण्याअगोदरची स्थिती अथवा पात्रता.
१. विषयाच्या ध्यानाने म्हणजे स्मरणाने प्रथम विषयाचा संग होतो. 
२. संगातून विषयाबद्दल काम म्हणजे कामना निर्माण होते.
३. कामातून क्रोध म्हणजे विषयाच्या प्राप्तीबद्दल तळमळ किंवा तडफड निर्माण होते.
४. क्रोधातून संमोह म्हणजे त्या विषयावाचून सुख मिळणारच नाही अशी मनाची धारणा होते.
५. संमोहातून स्मृतिभ्रंश म्हणजे सारासार विचार करण्याची शक्ती नष्ट होते.
६. स्मृतिभ्रंशातून बुध्दिनाश म्हणजे बुध्दी भ्रष्ट होते.
७. व बुध्दिनाशातून विनाश होतो.

या विश्वातील कुठलाही माणूस तो ज्या स्थितीपर्यंत पोहोचलेला आहे तेथून कसा घसरतो याचे हे मनोवैद्यानिक चित्रण या श्लोकातून झाले आहे असे मला वाटते.  आणि म्हणूनच येथे विनाश या शब्दाचा अर्थ तारतम्याने घ्यावा लागतो.  म्हणजे वरील क्रमांक ० चा संदर्भ लक्षात घेऊन विनाश या शब्दाचा अर्थ काढावा लागतो.  सद्‌गुरूंनी दिलेल्या उदाहरणाप्रमाणे जर क्रमांक ० येथे दुराचारी अथवा अनैतिक मनुष्य असेल तर त्याचा विनाश कसा होतो ते त्यांनी स्पष्ट केले आहे.  ह्या सर्वांचा उल्लेख करायचे कारण म्हणजे गीतेतील वरील श्लोक (क्रमांक ६२-६३) हे दुसऱ्या अध्यायातील असून स्थितप्रज्ञाची लक्षणे सांगताना आले आहेत.  एखादा विरक्त माणूस जो स्थितप्रज्ञ अथवा सिध्द होण्याच्या बेतात आहे त्याची घसरण कशी होते व स्थितप्रज्ञ होण्याच्या त्याच्या धेय्याच्या संदर्भात त्याचा विनाश कसा होतो हे अर्जुनाला स्पष्ट करताना या दोन श्लोकांची योजना भगवंतांनी केली आहे.  कुठलाही माणूस आपले अध:पतन तर होत नाही ना? याची तपासणी स्वत:च करून व त्याचबरोबर त्यासाठी योग्य उपाययोजना करून आपली घसरण थांबवू शकतो हेच माणसाने शिकावे असा उद्देश भगवंताचा यात असावा असे वाटते.  मात्र यासाठी विचारांवर जागृत राहून लक्ष ठेवण्याची कला अवगत असणे आवश्यक असते, जी अखंड विश्वप्रार्थना अथवा नामस्मरणाने प्राप्त होत असते.

स्थितप्रज्ञ, सिध्द, विरक्त ह्या संकल्पनांचा यथार्थ अर्थ समजणे सर्वसामान्य माणसाला समजणे अवघड असते.  एखादे सुंदर तसेच अत्यंत बारीक नक्षीकाम जर नीट अभ्यासायचे असेल तर आपण बहिर्गोल भिंगाचा उपयोग करतो.  अगदी त्याचप्रमाणे सर्वसामान्यांना झटकन कळावे यासाठी, निव्वळ आपल्या देहासाठी अथवा स्वार्थासाठी जगणाऱ्या अनैतीक प्रवृत्तीच्या मनुष्याचे उदाहरण सद्‌गुरूंनी दिले असावे असे वाटते.  मला वाटते हे सर्व संदर्भ जर नीट लक्षात घेतले तरच गीतेतील या दोन श्लोकांचा अर्थ आपल्याला नीट समजू शकेल.

वरील श्लोकांच्या सहाय्याने मी मांडलेले विचार तपासायचे झाल्यास असे म्हणावेसे वाटते की, संयुक्ताताईंची सध्याची स्थिती वरील क्रमांक १ ते ७ यामधे कुठेतरी असून त्यांचा प्रवास हळूहळू क्रमांक ७ च्या दिशेने सुरू आहे.  आणि त्यांना ह्या प्रवासाची गती उलटी करून क्रमांक ० पर्यंत पोहोचावयाचे आहे.  क्रमांक ० इथे त्या पोहोचल्यावर प्रपंच व परमार्थातील पुढच्या प्रगतीचे दरवाजे त्यांच्यासाठी उघडले जाणार आहेत असा होतो आहे.  त्याचे स्पष्टीकरण करण्याचा प्रयत्न करत आहे.

७. विनाश ह्या स्थितीपासून संयुक्ताताई खूपच दूर आहेत. 
६. बुध्दी भ्रष्ट होणे हेही त्यांच्या बाबतीत संभवत नाही.  बुध्दी भ्रष्ट झालेला माणूस कोणाचेही ऐकण्याच्या मन:स्थितीत नसतो.  आपले तेच खरे असे त्याचे वागणे असते.  असे म्हटले जाते की, दुर्योधनाची बुध्दी भ्रष्ट झाली होती त्यामुळे भगवान श्रीकृष्ण सगळे काही करू शकले पण दुर्योधनाची बुध्दी मात्र त्यांना काहीकेल्या पालटवता आली नाही.  तसे ते करू शकले असते तर महाभारतातील युध्दच झाले नसते.  संयुक्ताताई जे काही करत आहे ते संपूर्णपणे योग्यच आहे अशी त्यांची धारणा असती तर त्यांनी त्यांचा प्रश्न फोरम मधे विचारलाच नसता.

५. सारासार विचार करता न येणे म्हणजे जे करायला पाहिजे ते न करणे व जे करायला नको तेच नेमके करणे होय.  हे मात्र घडू लागलेले आहे.  पण सारासार विचार करण्याची शक्ती जी प्रत्येक माणसात जन्मत:च अस्तित्वात असते ती एकदम नष्ट होत नाही तर ती थोडी मंद व्हायला लागते व हळूहळू आणखीन मंद मंद होत जात मग नष्ट होण्याची शक्यता असते.  येथे त्यांची सारासार विचार करण्याची शक्ती नष्ट वगैरे काहीएक झालेले नसून ती शक्ती वापरण्यात थोडासा अडथळा आलेला आहे असे वाटते.  उदाहरण देऊन हे सांगावयाचे झाल्यास असे म्हणता येईल की, संपूर्णपणे उत्कृष्ट अवस्थेत असलेली मोटार गाडी जर तिची बॅटरी थोडीशी उतरली (मंद) तर जशी सुरू होत नाही.  मात्र त्या गाडीला जर धक्का दिला तर मात्र ती सुरू होऊन व्यवस्थित चालू लागते व सुरू झाल्यामुळे बॅटरीही चार्ज व्हायला लागून बिघाडाचे मूळ कारणच नाहिसे होऊ लागते अगदी त्याचप्रमाणे येथे होते आहे असे वाटते.  सारासार विचार कसा करायचा हे काहितरी निमित्त होऊन त्यांचे लक्षात आल्याबरोबर गाडी एकदम चांगल्या प्रकार सुरू झाली हे त्याचेच लक्षण आहे.  कारण बॅटरी चार्ज करण्याव्यतिरिक्त गाडीत कोणताच बिघाड नव्हता.

येथे हे स्पष्ट केले पाहिजे की, या स्थितीत स्वत:हून सुधारणा करणे अवघड असते.  त्यासाठी बाहेरून मदत मिळावी लागते.  मात्र नियमीत साधना करणाऱ्या अथवा सद्‌गुरूंचा अनुग्रह घेतलेल्यांना ही मदत मिळू शकते.  मात्र मदत मिळण्यासाठी त्या व्यक्तिने आपले मन मोकळे केले पाहिजे इतकीच अट असते. (गुजेविण हित कोण सांगे।  --- हरिपाठ अभंग ५वा.)

सारासार विचार जागृत झाला तरी लोकांचा असा अनुभव असतो की त्याप्रमाणे वागणे तात्काळ जमतेच असे नाही.  ज्यांना ते नेहमीच जमते त्यांना ज्ञानमार्गाचे अधिकारी समजले जाते व असे ज्ञानमार्गाचे अधिकारी ६ महिन्यात पूर्णत्वाला पोहोचतात असे ज्ञानेश्वर माऊली सांगतात.  मात्र आपली स्थिती बऱ्याच वेळेस "कळते पण वळत नाही" अशा प्रकारची असण्याची शक्यता असते.  मनाने एखाद्या गोष्टीचा विचार करावयाचा नाही असे ठरवून सुध्दा मन तिकडेच ओढ घेते.  असे जर असेल तर त्यावर उपाय काय?  यासाठीच जर मन तिकडे ओढ घेत असेल तर त्याचाच उपयोग करून मनाला मार्गावर आणण्याचा उद्योग यशस्वी होण्याची शक्यता असते.  काट्याने काटा काढण्याचाच हा प्रकार आहे.  यासाठीच जेव्हा जेव्हा आठवण येईल तेव्हा काय करता येईल ते सुचवले आहे.  मात्र काटा निघाल्यावर हातातील काटाही टाकून द्यावयाचा असतो हे भान राहावे लागते.  यासाठी
"अट फक्त एकच या व्यक्तीसाठी विश्वप्रार्थना करीत राहायचे व त्यातूनच (विश्वप्रार्थनेत सांगितल्याप्रमाणे) या विश्वातील सर्वचजणांना हे सर्व मिळो इथपर्यंत पोहोचायचे." या वाक्याचा उपयोग होऊ शकेल असे वाटते.

मला असे प्रामाणिक पणे वाटते की या विश्वातील दुर्जनातील दुर्जन माणसाचे भले व्हावे म्हणून जर मनापासून ("जितक्या पोटतिडकीने तळहातावर तळहात घासून व दांत-ओठ चाऊन") विश्वप्रार्थना केली आणि त्यामागे आपला कोणताही स्वार्थी हेतू नसेल तर त्यामुळे आपले नुकसान कधिही होणार नाही उलट त्यातून आपले भलेच होईल.  यासाठी कोणत्याही व्यक्तीचे भले चिंतीत असताना कोणताही स्वार्थी हेतु ठेवणे अयोग्य ठरते.  असा कुठलाही हेतु मनात ठेवला जाऊ नये किंवा आपल्याकडून आपल्या मनाला भोळा आशावाद दाखविला जाऊ नये यासाठी
"१) यामुळे त्या माणसाची तुमच्याशी वागण्याची पध्दत बदलणे हे तुमच्या हिताचे आहे असे जर त्या परमेश्वराला वाटत असेल तरच तो तसे करेल.  आणि जर ते तुमच्या हिताचे नसेल तरच तो तसे करणार नाही हेही निश्चित." या वाक्याचा उपयोग होऊ शकेल.  तसेच या वाक्यामुळे संमोह ह्या स्थितीतून बाहेर पडायलाही उपयोग होऊ शकेल.

४.  एखादी गोष्ट आपल्याला मिळाली तरच आपण सुखी होऊ अन्यथा आपले जीवन व्यर्थ आहे असे मनापासून वाटू लागले की संमोह ही अवस्था सुरू झाली असे समजावयास हरकत नाही.  मात्र मी मनापासून नामस्मरण अथवा विश्वप्रार्थना करत आहे त्यामुळे माझे जे हिताचे आहे ते व तेवढेच तो परमेश्वर मला देईल व जे माझे हिताचे नाही ते मला कधिही देणार नाही यावरची श्रध्दा माणसाला संमोह या स्थितीतून सहज बाहेर काढते.  "जे घडते ते कल्याणाचेच" ही मनोधारणा यासाठी आवश्यक असते.  संमोह या स्थितीतून जेव्हा त्या बाहेर पडतील तेव्हा त्यांच्या मनाची स्थिती कशी असेल हे त्यांना खालील वाक्यावरून समजू शकेल असे वाटते.
"मी नक्की सांगतो की, कालांतराने तुम्ही सुध्दा म्हणू लागाल की, "परमेश्वराने माझ्या जीवनात जे काही घडवले ते माझे कल्याणाचेच होते."

१,२ व ३ याबद्दल मला काहीही लिहावयाचे नाही कारण ही लक्षणे खाज या स्वरुपाची आहेत.  माणसाने त्याचे इप्सित साध्य करण्याचा प्रयत्न करण्यात काहीच गैर नाही.  मात्र संमोह ह्या स्थितीपासून नेहमी सावध राहिले पाहिजे.  कारण संमोह स्थिती म्हणजे "माझे भले कशात आहे ते मलाच कळते त्या सर्वशक्तीमान परमेश्वराला त्यातले काय कळतेय?" असे म्हणण्यासारखेच आहे.

सर्वांना नमस्कार.  सर्वांना शुभेच्छा.
Report to moderator   Logged
Pages: 1 ... 4 5 [6] 7   Go Up
  Print  
 
Jump to:  

Powered by MySQL Powered by PHP Powered by SMF 1.1.14 | SMF © 2006-2011, Simple Machines LLC Valid XHTML 1.0! Valid CSS!