सर्वांना नमस्कार,
नमस्कार गार्गीताई,
अ) मी आत्तापर्यंत जीवनविद्येचा जो थोडाफार अभ्यास केला त्यातून मला असे जाणवले की, जीवनविद्येची तीन प्रमुख उद्दिष्ट्ये आहेत.
१) कोणी कितीही साधना करो. पण त्याला जर शुभचिंतनाचे महत्व कळलेले नसेल तर तो मुक्कामाला पोहोचणे कठीण आहे हा प्रमुख संदेश सर्वांपर्यंत पोहोचवणे
२) साधना व शुभचिंतन यांची झालेली फारकत विचार प्रदूषणाला कारणीभूत असून त्यातून सर्व गोंधळाला सुरवात झालेली आहे हे स्पष्ट करणे.
३) भविष्यात साधना व शुभचिंतन यांची फारकत होऊ नये म्हणून विश्वप्रार्थनेची निर्मीती केली गेलेली असून वरील दोन कारणांचा प्रतिवाद तिचा प्रसार करून करणे.
जीवनविद्येची सर्व ग्रंथसंपदा वरील तीन गोष्टी लक्षात ठेवून वाचल्यास फायदा होऊ शकेल. तसेच ग्रंथातील कोणते वाक्य कोणता हेतू साध्य करण्यासाठी वापरले आहे हे कळल्यामुळे शंका निर्माण होण्याचे प्रमाण कमी होण्याची शक्यता आहे.
ब) एखादी व्यक्ती (विश्वप्रार्थने ऐवजी दुसरी कोणतीही) साधना करत असेल व शुभचिंतनाचे महत्वही त्याच्या मनात ठसलेले असल्याने मनात कोणते विचार असले पाहिजेत व कोणते नकोत याबाबत तो जागरूक राहाण्याचा प्रयत्न करत असेल तर त्याने त्याची साधना चालू ठेवावयास काहीच हरकत नाही. सद्गुरू पदाला पोहोचलेली व्यक्ती, सद्गुरू तत्वाचा अविष्कार करत असल्याने समोरच्या व्यक्तीची साधना तामस होत असेल किंवा सिध्दीप्राप्तीसाठी होत असेल तरच त्या व्यक्तीला त्याची साधना थांबवायला सांगतात. जर अशा व्यक्तीने तो जी साधना करत आहे त्याबाबत मार्गदर्शन मागितल्यास ते त्याला त्या मार्गानुसार मार्गदर्शनही करतात. अशावेळेस त्याला त्याची साधना थांबवून नवीन सांगितली जात नाही. (येथे हे गृहित धरले आहे की, ती व्यक्ती साधना व शुभचिंतन या दोन्हींची सांगड घालत आहे. उदा. बरेच अधिकारी साधक अशुभ विचार झटकण्यासाठी विठ्ठल विठ्ठल असा उच्च्चार झपाट्याने दोन-चार वेळेस करून हे साधतात.)
क) शुभचिंतनाचे महत्व मनात ठसलेले असेल तर मनात येणारे अशुभ विचारांचे परीवर्तन शुभ विचारात कसे करता येते व त्याचा फायदा आपल्याला कसा उठवता येऊ शकतो ते मांडण्याचा थोडासा प्रयत्न करतो. एखाद्या व्यक्तीची साधना जसजशी वाढत जाते त्याप्रमाणात त्याचे मन शुध्द होत जाते. ज्याप्रमाणात त्याचे मन शुध्द होत जाते त्याप्रमाणात इतरांमधील शुध्दता अथवा अशुध्दता टिपण्याची त्याची कुवतही वाढत असते. मात्र काय टिपायचे व काय नाही हे कर्मस्वातंत्र्य मानवाला आहे. तसेच मनाने जे टिपले त्यावर बुध्दीच्या साह्याने कसे चिंतन करावयाचे हेही स्वातंत्र्य मानवाला आहे. हे स्वातंत्र्य जर नीट उपभोगले नाही तर सज्जन माणसाला सर्वात जास्त त्रास होतो.
वरील विचार आणखी स्पष्ट करण्यासाठी तुमचा खालील पोस्टचा वापर करत आहे.
People who are almost born in JV behave so drastically opposite to JV principles.
Bharlya tatawar annala nawe thewane, Aai-Vadilanshi uddhatpane bolane, Upasane chya nantar ekmekanchya kuchalakya karane, Swanand shibirawarun yewun khanyache Menu discuss karane , JVM ne niyukta kelelya Guruna ch nawe thewane..
हौशे, नवशे, गवसे अशा प्रकारची माणसे सर्व ठिकाणी सापडतात. जीवनविद्येचे प्रांगण त्याला अपवाद समजावयाचे कारण नाही. या माणसांमुळे तुम्हाला फायदा होण्याऐवजी मनस्तापच झाला असण्याची शक्यता जास्त हेही मला मान्य आहे. पण या प्रश्नाकडे जरा वेगळ्या दृष्टीकोनातून पाहिले तर
तुमची पसायदानावर श्रध्दा आहे. त्यामुळे सत्संगतीचे महत्व तुम्हाला वेगळे सांगण्याची गरज नाही. मात्र एखाद्याला पाहाताच क्षणी त्याचे रंग, रुप, कपडे, शिक्षण वगैरेच्या पलिकडे जाऊन पाहाता येऊन, तो सज्जन आहे अथवा दुर्जन आहे हे ओळखणे कठीण असते. अशा परिस्थितीत वरील माणसे त्यांच्या वर्तनाद्वारे आमची संगती कधिही धरू नका असे टाहो फोडून तुम्हाला सांगत आहेत असे तुम्ही का समजत नाही? तसे जर तुम्हाला वाटले तर त्या माणसांनी तुम्हाला सावध करून तुमच्यावर खूप उपकार केले आहेत असेच तुम्हाला वाटू लागेल. त्यांच्या बाबत तुमच्या मनात वसत असलेला राग निघून तर जाईलच उलट त्यांनी तुमच्यावर केलेल्या उपकारांमुळे त्यांचे भले व्हावे हाच विचार तुमच्या मनात येण्याची शक्यता जास्त. जोपर्यंत अशी माणसे तुमच्या कार्यसिध्दीच्या आड येत नाहीत तोपर्यंत ही पध्दत उपयोगी पडू शकेल!
सर्वांना नमस्कार, सर्वांना शुभेच्छा.