Jeevanvidya Discussion Forums
February 10, 2012, 10:23:35 PM *
Welcome, Guest. Please login or register.

Login with username, password and session length
News: Note: New user registration is Enable till 15 Aug 2011
 
  Back to Website   Home   Help Search Login Register  
Pages: [1]   Go Down
  Print  
Author Topic: जीवनविद्या दर्शन-परमेश्वर  (Read 1926 times)
dr.nutanpol
Senior Namdharaks
Ultimate Contributor
*
Offline Offline

Gender: Female
Posts: 429



« on: September 24, 2007, 09:24:06 PM »

       
 जीवनविद्या दर्शन-

  लेखक-श्री. सदगुरू श्री. वामनराव पै.

   परमेश्वर-

       "परमेश्वर आहे का?" हा प्रश्न मानवजातीपुढे युगानुयुगे यक्षप्रश्न म्हणून उभा आहे. वास्तविक हा प्रश्न निर्माण का व्हावा याचेच आश्चर्य वाटते. सर्वांनाच असा प्रश्न पडतो असे मात्र नाही. या संदर्भात भक्त प्रल्हादाची आठवण येते. ’नारायण, नारायण’ असे परमेश्वराचे नामस्मरण प्रल्हाद नित्य करीत असे. प्रल्हादाच्या पित्याने म्हणजे हिरण्यकश्यपुने क्रोधाने प्रल्हादाला विचारले "तुझा नारायण आहे कुठे? " प्रल्हादाने पित्याला उलट प्रश्न विचारला, "माझा नारायण नाही कुठे?" म्हणजे काय  गंमत आहे पहा! पित्याचा प्रश्न परमेश्वर आहे कुठे? तर पुत्राचा प्रश्न परमेश्वर नाही कुठे? वास्तविक वस्तुस्थिती आहे की, परमेश्वर सर्वत्र वास करतो. त्याचप्रमाणे परमेश्वराला स्थूल स्वरूपात पहाता येते, सुक्ष्म  स्वरूपात ओळखता येते आणि दिव्य स्वरूपात त्याला अनुभवता येते. आत्मज्ञानी संताना परमेश्वर आहे का? असा प्रश्न कधीच पडत नाही कारण ते परमेश्वराला पाहू शकतात, ओळखू शकतात व अनुभवू शकतात. उलट परमेश्वर आहे का? असा प्रश्न लोकांना पडतोच कसा याचे त्यांना आश्चर्य वाटते.  वास्तविक वस्तुस्थिती आहे की, परमेश्वराला सर्वांनाच पाहता येणे शक्य आहे. परंतु जे संसारात गुंतलेले आहेत ते परमेश्वराला पाहू शकत नाहीत. याच्याउलट संसारात अलिप्तपणे रहाणाऱ्या संतांना परमेश्वर आकाशातल्या सूर्याइतका स्पष्ट दिसतो.

१)  निसर्गनियमांसहित स्वयंचलित स्वयंनियंत्रित, नैसर्गिक पध्दतशीर व्यवस्था म्हणजे सगुण साकार परमेश्वर.

२) जगातील सर्व धर्मातील सर्व लोकांसाठी सर्व शक्तीमान परमेश्वर एकच असून तो कोणावरही कृपा किंवा कोप करीत नाही तर केवळ माणूसच स्वतःच्या कर्मांनी स्वतःवरच कृपा किंवा कोप करीत असतो.

३) परमेश्वर म्हणजे मूर्ती नाही, व्यक्ती नाही किंवा नुसती शक्ती सुध्दा नाही. परमेश्वराचे आनंद हे स्वरूप असून जाणीव हे त्याचे रूप आहे व शक्ती हा त्याचा गाभा होय.

४) परमेश्वर हा सर्वार्थाने व सर्वांगाने अनंत स्वरूप असून  तो अखिल मानवजातीसाठी एकच आहे,  ज्याप्रमाणे अखिल मानवजातीसाठी सूर्य एकच असतो त्याप्रमाणे.

५) परमेश्वर कोणावरही कृपा करीत नाही किंवा कोप करीत नाही किंवा तो कोणाचाही न्याय करीत नाही किंवा अन्याय करीत नाही.

६)  परमेश्वराला स्थूल स्वरूपात पहावयाचे, सुक्ष्म  स्वरूपात त्याला ओळखायचे आणि त्याला दिव्य स्वरूपात अनुभवायचे असते.

७) जे मुढ असतात ते म्हणतात, "God is no where" परंतु जे सूज्ञ असतात ते मात्र अनुभवतात की, "God is now and here." 

८) ज्याप्रमाणे हवा प्रत्यक्ष अस्तित्वात असून सुध्दा ती डोळ्यांना दिसत नाही किंवा इतर इंद्रियांना अनुभवता येत नाही त्याप्रमाणे परमेश्वराचे प्रत्यक्ष  असून सुध्दा तो डोळ्याना दिसत नाही किंवा त्याला इतर इंद्रियांना अनुभवता येत नाही.

९) नाक धरले की, हवेचा साक्षात्कार होतो, त्याप्रमाणे मन धरले की, देवाचा साक्षात्कार होतो.

१०) ज्याच्यात विश्व विसावून राहिलेले आहे आणि जो विश्वात भरून उरला आहे तो "विठ्ठल".

११) धोतर आणि पायजमा यांच्यातील सूत ज्यांना पहाता येत नाही त्यांना भूतमात्रात  भरून राहिलेला भगवंत कसा पाहता येईल?

१२) "सर्व ठिकाणी देव भरलेला आहे" ही कल्पना चुकीची असून वस्तुस्थितीला धरून नाही. सर्व ठिकाणी भरून राहिलेले आहे, तो देव नसून चैतन्य होय आणि हे चैतन्य सर्वत्र जीवरूपात वास करते.

१३) विश्वात दिसणारी प्रत्येक आकृती ही प्रकृतीची विकृती नसून परमात्म्याची मूर्ती होय.

१४) विश्व म्हणजे प्रभूची प्रभा होय.

१५) परमेश्वराच्या ऐश्वर्याचा पहिला आविष्कार म्हणजे ओम्.

१६) ईश्वर आणि निसर्ग यात फार फरक आहे. योजना करणारा तो ईश्वर आणि त्या योजनेप्रमाणे घडत रहाणे हा निसर्ग.

१७) स्वस्वरूपाच्या सुखशय्येवर शिव-शक्तिच्या प्रणयातून प्रगट होणारा प्रणवाचा आविष्कार म्हणजे हे विश्व होय.

१८)  ज्याप्रमाणे जगातील सर्व धर्मांच्या सर्व लोकांचा सूर्य एकच आहे त्याप्रमाणे,  सर्व लोकांचा परमेश्वर एकच आहे व कुठल्याही परिस्थितीत तो धर्मांच्या अनेक कल्पनांप्रमाणे अनेक असूच शकत नाही.

१९) विठ्ठल हा मंत्र आहे, विठ्ठल हे नाम आहे, विठ्ठल हा भाव आहे व विठ्ठल हा देव आहे.

२०)  "सर्व ठिकाणी देव भरलेला आहे" या कल्पनेत सत्यापेक्षा काव्य अधिक आहे.

२१) ज्या विशिष्ट नियमांनी जग चालते तो निसर्ग आणि या नियमांचा जो नियामक तो परमेश्वर.

२२) जमिनीत पेरलेली एक कोय जर हजारो आंब्यांच्या रूपाने प्रकट होते तर स्वानंदाच्या स्वादाने स्वरूपाच्या ठिकाणी स्फुरणारा एक प्रभू अनंत रूपाने प्रकट झाला तर त्यात काय नवल? 

२३) जीव, जगत् आणि जगदीश हे तिन्ही एकाच ईशतत्त्वाचे आविष्कार होय.

२४) अनेकांत एक हा ईश्वर तर एकाचे अनेकत्व हे त्याचे ऐश्वर्य होय.

२५) जगात दिसणारी प्रत्येक आकृती ही प्रभूची सुरेख अशी कलाकृती होय.


« Last Edit: October 04, 2007, 04:54:24 PM by dr.nutanpol » Report to moderator   Logged

Sarve Sukhinha santu! Sarve bhadrani pashyantu!
May Divinity Within All get bloomed!
May God Bless all!
dr.nutanpol
Senior Namdharaks
Ultimate Contributor
*
Offline Offline

Gender: Female
Posts: 429



« Reply #1 on: September 25, 2007, 12:04:41 AM »

 

    जीवनविद्या दर्शन-

  लेखक- श्री. सदगुरू श्री. वामनराव पै.


    २) ईश्वर-स्वरूप

   अव्यक्त परमेश्वर व्यक्त होण्यासाठी उपाधि धारण करतो तेव्हा त्या उपाधिच्या अपेक्षेत त्या परमेश्वराला ईश्वर असे म्हणतात. ईश्वर हा परमेश्वराचा अंश आहे असे म्हणतात, त्याचे कारण हेच होय. चैतन्याचे शुध्द स्वरूप म्हणजे ईश्वर. प्रत्येकाच्या ह्दयात ईश्वर वास करतो असे सांगितले जाते त्याचे सुध्दा कारण तेच होय. ईश्वर आणि देव हे दोन शब्द सामान्य पणे एकाच अर्थाने वापरले जातात. परंतु ती प्रथा ही चुकीची आहे. ज्याप्रमाणे हवा आणि वारा यात फार मोठा फरक आहे, त्याचप्रमाणे ईश्वर आणि देव  यात फार मोठा फरक आहे. हवा हलविली की त्यातून हवा प्रकट होते हे जरी खरे असले तरी हवा म्हणजे वारा नाही हेही तितकेच खरे. हवा माणसाला शितलता देऊ शकत नाही परंतु हवेतून निर्माण   झालेला वारा मात्र माणसाला सुखद शितलता देऊ शकतो. त्याचप्रमाणे ईश्वरातून देव प्रकट होतो याचा भावार्थ असा की, शुध्द चैतन्य स्वरूपातून दिव्य स्वरूपाची जाणीव उदयाला येते आणि ही दिव्य जाणीवच माणसाला सुख, शांती, समाधान प्राप्त करून देण्यास समर्थ ठरते. विशिष्ट प्रकारच्या सदगुरू प्रणित दिव्य साधनेचा अभ्यास करूनच शुध्द चैतन्य स्वरूपात दिव्य स्वरूपात  दिव्य  स्वरूपाची जाणीव निर्माण होत असते, हे लक्षात ठेवणे आवश्यक आहे.

१) पंचमहाभूते, तीन गुण व चैतन्य अशा नवरंगाने भरलेल्या या देहाच्या पिचकारीतून रंगाची उधळण करीत ह्दयस्थ श्री हरी विश्वात नित्य रंगपंचमी साजरी करीत असतो.

२) देव हे तत्त्व वास्तविक अलौकिक परंतु लौकिकात मात्र देव या शब्दाचा वापर अगदी ढसाळपणे केला जातो.

३)  ’ह्दयात ईश्वर वास करतो’ हा गीतेतील शोध सर्वात मोठा असून असा दिव्य शोध आतापर्यंत लागला नाही व यापुढे लागेल असे वाटत नाही.

४) "आत आहे मा" या नाव आत्मा.

५) प्रत्यक्षात नारायण स्वरूप इतके विलक्षण आहे की, त्याचे नीट आकलन झाल्याशिवाय प्रभूला आकळता येणे अगदी अशक्य आहे.

६) अगदी निकट असलेला ह्दयातील ईश्वर ज्याला अंतःकरणात सापडत नाही त्याला तो अन्य ठिकाणी सापडणे शक्य नाही.

७) स्वस्वरूपाचा आत्मसूर्य म्हणजे सतत सातत्याने तेवत रहाणारा भगवंताचा नंदादीप आहे.

८) स्वस्वरूपाच्या विस्मृतीत होते देहाशी रती तर स्वस्वरूपाच्या जागृतीत होते देवाची आरती.

९) ईश्वर अगदी उघडा आहे हे ईश्वर झाल्याशिवाय उमजत नाही.

१०) ’निद्रिस्त ईश्वर’  हा आहे जीव तर ’जागृत’ जीव हा आहे शिव.

११) प्रभूचे प्रत्यक्ष प्रकट रूप म्हणजे सूर्यदेव होय.

१२) खोलीतील दिव्याचा प्रकाश खोलीला व्यापतो व खोलीबाहेर पसरतो त्याप्रमाणे देहातील ईश्वराचा ज्ञानप्रकाश पिंडाला व्यापतो व ब्रम्हांडात  पसरतो.

१३) एका साध्या अणूमध्ये जर ऍटम बॉंम्ब निर्माण करणारी प्रचंड शक्ती वास करीत असते तर चैतन्य स्वरूप आत्म्याच्या अणूत केवढी शक्ती वास करीत असेल याची कल्पनाच केलेली बरी.

१४) फुलातील सुगंध दिसत नाही परंतु त्याचा वास मात्र येतो. त्याचप्रमाणे देहातील ईश्वर दिसत नाही पण ह्दयात त्याचा वास असतो.

१५) पुत्राचे अस्तित्वच पित्याचे अस्तित्व सिध्द करते त्याचप्रमाणे जीवाचे अस्तित्व ईश्वराचे अस्तित्व सिध्द करते.

१६) आत्मरूपाने  ईश्वर निर्गुण, ’मी’ रूपाने सगुण व देह रूपाने तो साकार आहे.

१७) प्रभूच्या प्रज्ञेतून प्रपंचाचा प्रकर्ष होत असल्यामुळे तो सत्यस्वरूप ज्ञानरूप व आनंदघन आहे.

१८) स्वशरीर म्हणजे प्रत्यक्षात आहे ईश्वराचे जागृत स्थान परंतु ते दुर्लक्षित करून लोक तथाकथित  जागृत देवस्थानांना भेटी देण्यासाठी विविध ठिकाणी पायपीट करतात हे नवल नव्हे काय?

१९) सेवा करण्याचे प्रकार दोन; पहिला ईश्वरातून जगाची सेवा करणे व दुसरा जगातून ईश्वराची सेवा करणे.

२०) ईश्वराची प्राप्ती म्हणजे स्वस्वरूपाची प्रतिती.

२१) तत्त्वतः स्मरण हे ईश्वराचे स्फुरण आहे.

२२) ह्दयात सारखी टक टक चालू आहे. ह्दयस्थ परमात्मा आपल्याला सांगून राहिला आहे की, माझ्याकडे टक लाव म्हणजे सर्व कटकट नाहीशी होईल.

२३) देह हे देवाचे देऊळ असून त्यातील आत्मदेव हाच खरा जागृत गणपती आहे. गणपतीची मनोभावे प्रार्थना केली व त्याचे नामस्मरण केले व योग्य दिशेने प्रयत्न केले तर आपल्या सर्व अडीअडचणी निवारण करण्यास व सर्व संकटांचा नाश करण्यास तो पूर्ण समर्थ आहे.

२४) आपल्याच  ह्दयात प्रचंड ईश्वर शक्तीचा वास असून आपले सर्व संकल्प सिध्द करण्याचे विलक्षण सामर्थ्य त्या शक्तीत आहे याची यथार्थ जाणीव होणे, हा तर मन मजबूत करण्याचा उत्कृष्ट मार्ग होय.
   

« Last Edit: October 04, 2007, 04:51:41 PM by dr.nutanpol » Report to moderator   Logged

Sarve Sukhinha santu! Sarve bhadrani pashyantu!
May Divinity Within All get bloomed!
May God Bless all!
Ajit
New Contributor
*
Offline Offline

Gender: Male
Posts: 11


« Reply #2 on: December 29, 2008, 04:45:27 AM »

जीवनविद्या दर्शन-

3) लक्ष-अलक्ष
जीवनात माणसाला यश किंवा अपयश मीळते त्याला प्रमुख कारण 'लक्ष' हे असते. जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात अभ्यासाची गरज असते. किंबहुना अभ्यासाला पर्याय नाही असे म्हनने रास्त होईल. अभ्यासाला जितके महत्व आहे त्याच्यापेक्षा अभ्यासात लक्ष असणे सहस्त्रपटीनै महत्वाचे असते. ज्याचे अभ्यासावरुन लक्ष उड़ते , ते उडानटप्पू झाल्याशिवाय रहात नाहीत. प्रपंचात अभ्यासाची निरनिराळी क्षेत्रे असतात, त्याप्रमाणे परमार्थाच्या क्षेत्रात सुदृदा विशेष प्रकारचा अभ्यास आवश्यक असून साधकाला अलक्षाचे ठिकाणी लक्ष स्थिर करावयाचे असते. थोडक्यात प्रपंच असो किंवा परमार्थ असो, दोन्ही ठिकाणी अभ्यास आवश्यक असून अभ्यासात लक्ष स्थिर करता येणे नितांत आवश्यक असते.

1)   जप किती केला यापेक्षा जपात किती लक्ष होते याला अधिक महत्व आहे, त्याप्रमाणे जपात किती लक्ष होते त्यापेक्षा जप करताना अलक्षकडे किती लक्ष होते याला सर्वात अधिक महत्व आहे.
2)   स्वरूपी दक्ष राहुन प्रभु चरणाभोवती लक्ष फिरवित ठेवणे म्हणजे प्रदक्षीणा.
3)   अलक्षावरील लक्ष ढळले की लक्षावधी विचार, विकार व् आकार लक्षात येऊ लागतात.
4)   अलक्षाचे ठायी लक्ष स्थिर करणारा साधक " पहाता पहाता " लक्ष्मीपति होतो.
5)   नामस्मरणात दक्ष राहून मनावर लक्ष ठेवल्याने अलक्ष सस्वरूप लक्षात येवू लागते.
6)   जे प्राप्त आहे त्याकडे दुर्लक्ष करण्याने व जे प्राप्त नाही त्यावर लक्ष केन्द्रीभूत केल्याने माणसाला " सुख पहाता जवा पाडे दुख पर्वताएवढे " अशी अनुभूति प्राप्त होते. 
7)   अचूक शरसंधान करणारा धनुर्धर लक्ष्याचे सहज लक्ष्य साधतो, त्याप्रमाणे अखंड स्वरूपानुसंधान करणारा नामधारक ' अलख निरंजन '  या अलक्षाचे लक्ष्य साध्य करतो.
Cool   आपले लक्ष "मी" वर स्थिर होते तेव्हाच जीवनात खरी लक्ष्मी प्रगट होते.
9)   नामस्मरणात लक्ष असेल तरच अलक्षाचे लक्ष करता येईल. 
10)   मनावर लक्ष ठेवले तर ते विरते व दुर्लक्ष केले तर ते फुगते.
Report to moderator   Logged
Pages: [1]   Go Up
  Print  
 
Jump to:  

Powered by MySQL Powered by PHP Powered by SMF 1.1.14 | SMF © 2006-2011, Simple Machines LLC Valid XHTML 1.0! Valid CSS!