नमोनमः
(अ)वैधानिक इशाराः ही आचरणी JV शी सुसंगत असेलच असे नाहीसुजीवनविद्या आचरणी माझी कठोर स्वयंशिकवणी
पहिली पायरी- हातातले काम वेळेवर, मनोभावे करावे.
- ज्यावर इतराचे काम वा आपलेच दुसरे काम अवलंबून आहे, ते काम प्रथम हाती घ्यावे.
- नावडती कामे शक्यतो आवडत्या कामांच्या आधी हाती घ्यावीत.
- स्वतःविषयी खोट्या अपेक्षा निर्माण होतील असे वागणे वा बोलणे टाळावे.
- आपली आवड वा नावड आपल्या जबाबदारीच्या आड येऊ देऊ नये.
- एखादे काम ठरल्यावेळी वा ठरल्याप्रमाणे होऊ शकत नसेल तर संबंधितांना त्याची वेळीच कल्पना द्यावी.
- भीती बाळगू नये. आपल्या चुकीची कबुली शक्य तेवढ्या लवकर व नम्रपणे द्यावी.
- आपल्या चुकीबद्दल दिली गेलेली योग्य शिक्षा ही मनाच्या संवर्धनाचे साधन समजून स्वीकारावी.
- आपल्या चुकीबद्दल आपण भोगलेली शिक्षा ही केलेल्या चुकीची दुरुस्ती वा भरपाई नव्हे याचे सतत भान ठेवावे.
- आपण केलेल्या कामाचे मिळालेले समाधान हे त्या कामाचे मिळालेले फळ समजावे.
सर्वांचे आभार, सर्वांना शुभेच्छा.
मिलिंद खाडिलकर