Jeevanvidya Discussion Forums
February 10, 2012, 10:38:03 PM *
Welcome, Guest. Please login or register.

Login with username, password and session length
News: Note: New user registration is Enable till 15 Aug 2011
 
  Back to Website   Home   Help Search Login Register  
Pages: 1 2 [3]   Go Down
  Print  
Author Topic: अखंड नामस्मरण...!!!  (Read 6760 times)
mk
Guest Members
Ultimate Contributor
*
Offline Offline

Gender: Male
Posts: 543


साधनेने प्राप्त सिद्धी ही साध्य नाही साधन 


« Reply #30 on: September 27, 2009, 04:38:03 PM »

vcavc_,

शामजी नमस्ते,

आपणास आपली वाट सापडली आहे. यापूर्वी आलेले आणी आता येत असलेले आपले अनुभव सर्वांसाठीच मोलाचे आहेत यात काहीही शंका नाही. ते मांडण्यामागची आपली भूमिका व कळकळ, ते योग्य तऱ्हेने मांडण्यासाठी आपण घेत असलेले कष्ट व तसे मांडण्यातली आपली हातोटी या सर्वांसाठी आपले अभिनंदन.

आपल्या हेतूंविषयी या फोरमवर तरी कोणीही कसलीही शंका कधीही कधीही उपस्थित केलेली मला तरी जाणवली नाही. माझ्याकडून कधी जाणीवपूर्वक अशी आगळीक झालेली नाही. अजाणता झाली असेल तर आताच जाहीर माफी मागतो.

आपण आपल्या मतांशी ठाम असता हे योग्यच आहे. पण
QUOTE
मला वाटते "तुम्हाला झालेले आकलन" या एकाच गोष्टीवरती तुमचे मुद्दे आधारित आहेत.
UNQUOTE
या छोट्याशा, निव्वळ माझ्याशी संबंधित असलेल्या आपल्या गृहीतकाबद्दल आपण एवढे आग्रही आहात हे उमजून वाईट वाटले व आपण ज्या मार्गावरून वाटचाल करीत आहात त्याची वेगळी ओळख नव्याने झाली.

आपला ऋणी

मिलिंद खाडिलकर


Report to moderator   Logged

या लिखांणात व्यक्त झालेल्या मतांशी लेखक सहमत असेलच असे नाही.

This content does not necessarily represent the views of the author.
shambhagwat
Guest Members
Ultimate Contributor
*
Offline Offline

Gender: Male
Posts: 308


« Reply #31 on: September 27, 2009, 09:17:03 PM »

सर्वांना नमस्कार,

फावल्यावेळेतील नामस्मरणाने अथवा विश्वप्रार्थनेने आपली प्रगती कशी होते हे जाणून घेता आले तर आपल्या या साधनेत प्रेम येईल, सातत्य ठेवता येईल असे वाटल्याने मी हे सर्व लिहिण्याचा प्रयत्न करत आहे.  आपली साधना वाढावी असा यामागे हेतू आहे.  चर्चा वाढवित नेणे हा माझा हेतू नाही.

विषय समजावा म्हणून आपण दोन टप्पे कल्पिलेले आहेत.  त्यासाठी पहिल्या टप्यात अंतर्मन साधना करते व बहिर्मनाचे त्यात लक्ष नसते तर दुसर्‍या टप्यात अंतर्मना बरोबर बहिर्मनही साधनेत लक्ष केंद्रीत करू लागते असे आपण गृहित धरले आहे.  प्रत्यक्षात हे दोन्ही टप्पे एकमेकांत मिसळलेले असतात.  कसे ते आपण पाहाण्याचा प्रयत्न करू.

फावल्या वेळेत नामस्मरण करणे आवश्यक आहे हे प्रथम बहिर्मन ठरविते किंवा तसा निश्चय करते.  फावला वेळ म्हणजे काय ह्याची व्याख्या बहिर्मन करते.  उदाहरणार्थ कोणत्याही रांगेत उभे राहाण्याचा प्रसंग म्हणजे फावला वेळ,  अंघोळ करणे म्हणजे फावला वेळ इत्यादि.  अशा रितीने बहिर्मनाचा सहभाग पहिल्या टप्यात असतो.  हा सहभाग नसेल तर फावल्यावेळेतील नामस्मरणाला सुरवातच होणार नाही.  यावरून या पहिल्या टप्यात बहिर्मनाचा सहभाग किती महत्वाचा असतो ते लक्षात येईल.  तसेच यातूनच फावला वेळ प्राप्त झाला आहे किंवा नाही याकडे सातत्याने लक्ष ठेवणे व तो मिळाला रे मिळाला की बहिर्मनाचे लक्ष असो अथवा नसो साधना सुरू करायची हे कार्य अंतर्मन सुरू करते.  अंतर्मनाच्या ठिकाणी नांदत असलेल्या प्रचंड शक्तीमुळे अंतर्मनाला हे सहज शक्य होते.

तसेच यानंतर जेव्हा अंतर्मन ही साधना चालू ठेवावयाला लागते तेव्हा बहिर्मन जरी तेथे हजर राहिले नाही तरीही बहिर्मनाची पूर्ण अनुकुलता अथवा अनुमती या साधनेला असते.  किंवा बहिर्मनाचा या साधनेला अजिबात विरोध असत नाही.  आणि ही गोष्टच फार महत्वाची आहे.  बहिर्मन व अंतर्मन यांना सद्‌गुरूंनी नवरा बायकोची उपमा दिलेली आहे.  या दोघांत विरोध म्हणजे ३६ चा आकडा तर पूर्ण सामंजस्य म्हणजे ६३ चा आकडा असे म्हटले आहे.  या साधनेद्वारे या दोघांमधे सामंजस्य निर्माण व्हायला सुरवात  होते हे बर्‍याच जणांच्या लक्षात येत नाही.  कुठलीही गोष्ट बहिर्मनाने व अंतर्मनाने सामंजस्याने केली पाहिजे, एक विचाराने केली पाहिजे हा खूप मोठा संस्कार यावेळेस आपण आपल्यावर नकळत करत असतो.  याच्या उलट या साधनेत काही अर्थ नाही अशी शंका जरी बहिर्मनाला आली तरी ही साधना बंद पडण्याचा धोका निर्माण होतो.  यावरून या पहिल्या टप्यातही आपल्या बहिर्मनाला किती महत्व आहे हे लक्षात येऊ शकेल.

आपण जेव्हा फावल्या वेळेत नामस्मरण अथवा विश्वप्रार्थना करत असतो तेव्हा जरी ते आपल्या लक्षात येत नसले तरी कधितरी अचानक आपल्या ते लक्षात येते व "अरे आपण विश्वप्रार्थना करत आहोत" हा विचार आपल्या मनात येतो.  हे लक्षात येणे म्हणजेच बहिर्मनाने या साधनेत हजेरी लावणे होय.  बहिर्मन नेहमी भूतकाळात अथवा भविष्यकाळात हिंडत असते.  व मधूनच काही काळासाठी वर्तमान काळात येते.  ही बहिर्मनाची सवय आहे.  याच सवयीचा उपयोग फावल्यावेळेतील नामस्मरणात करून घेतलेला असतो.  अशारितीने बहिर्मन त्याच्या स्वभावानुसार मध्येच वर्तमान काळात येते.  त्या वर्तमानकाळी आपले अंतर्मन सवयीने नामस्मरण अथवा विश्वप्रार्थना करत असेल तर त्यामुळे आपोआपच बहिर्मन त्या नामस्मरणाशी अथवा विश्वप्रार्थेनेशी संलग्न होते.  वेगळ्या शब्दात सांगायचे झाल्यास फावल्या वेळेत ही साधना करण्याचा हा काळ ज्याप्रमाणात आपण वाढवू त्याप्रमाणात बहिर्मन या साधनेशी संलग्न होण्याची शक्यता वाढीस लागते हेच या साधनेचे वैशिष्ट्य आहे.  बहिर्मनाची माकडासारखी एका फांदीवरून दुसर्‍या फांदीवर उड्या मारण्याची जी सवय आहे त्या सवयीतून त्याला बाहेर काढणे व वर्तमान काळात स्थीर व्हायला शिकवणे हेच यातून आपण साधत असतो.  आणि हे शक्य होते कारण फावल्या वेळेत ही साधना करणे याला हे बहिर्मन पूर्णपणे अनुकुल असते.  त्यामुळे वर्तमान काळात आल्याबरोबर व नामस्मरण चालू आहे हे लक्षात आल्यावर त्याबाबत बहिर्मनाची प्रतिक्रिया अनुकुल असते.  त्याला आनंद होतो.  त्याला जे चालले आहे ते चांगले चालले आहे असेच वाटते व या सर्वांचे दोन परिणाम होतात.  बहिर्मनाचा वर्तमानकाळात राहाण्याचा अवधी वाढू लागतो.  दुसरा परिणाम म्हणजे फावल्या वेळेत नामस्मरण करणे योग्य आहे हा अंतर्मनावरील संस्कार दृठ होतो व ही सवय वाढीस लागते.

वरती दिलेली ही जी प्रक्रिया आहे तिची परिणामकारकता वाढवावयाची असेल तर तेही साधता येते.  त्यासाठी दिवसातील एक ठराविक काळ राखून ठेवावयाचा व एका जागी बसून डोळे मिटून नामस्मरण अथवा विश्वप्रार्थना करायची युक्ती शोधून काढली गेली आहे.  यातही वरील प्रमाणेच आपले बहिर्मन भरकटते.  पण साधारणत: त्याचे प्रमाण कमी असण्याची शक्यता असते.  येथेही आपले बहिर्मन उड्या मारत असताना मध्येच वर्तमान काळात येते व त्याच क्षणी आपण भरकटत होतो याची जाणीव होते.  मात्र बहिर्मन वर्तमान काळात आल्यावर त्याचा वर्तमानकाळातच राहाण्याचा अवधी वाढविणे या प्रक्रियेत जास्त शक्य होते.

ज्यावेळेस बहिर्मन जास्त काळ वर्तमानकाळात राहाते तेव्हा आपण आज जप खूप छान झाला असे म्हणतो व आपल्याला आनंद होतो.  याच्या बरोबर उलट झाले तर आज जप काही नीट झाला नाही असे म्हणून आपण हिरमुसतो.  प्रत्यक्षात हे हिरमुसणे म्हणजे साधना चालू असताना बहिर्मन व अंतर्मन या दोघांनी एकाच वेळी एकत्रीत हजर न राहाणे होय.  यावरूनही हे लक्षात येऊ शकेल की, बहिर्मन व अंतर्मन ह्या दोन्हींमधे एकवाक्यता असणे, सामंजस्य असणे किती महत्वाचे आहे.  आणि हेच तर या साधनेतून आपण हळूहळू साधत असतो.  साधना चालू ठेवावयाची, हाच अट्टाहास येथे उपयोगी पडतो.

शेवटी एक मुद्दा स्पष्ट करतो.  फावल्या वेळेत करावयाच्या या साधनेत अंतर्मन शुध्द करणे हेच पहिले धेय्य असते.  नामस्मरण हा प्रथम पासूनच दिव्य विचार असतो.  सुरवातीला तो साधा विचार असतो व नंतर तो दिव्य विचार होतो असे काही नसते.  जर तो दिव्य विचार नसेल तर अंतर्मनावर परिणाम कसा बरे होऊ शकेल?  किंवा मी पोस्टमधे सांगितल्याप्रमाणे शक्तीसंचय वगैरे होणे कसे बरे शक्य आहे?  पण अशी शंका येऊ शकते हे मान्य केलेच पाहिजे.  कितीही विचार केला तरी सुरवातीच्या काळात ह्याचे आकलन होणे अशक्यच आहे असे वाटते.  मला वाटते याचे स्पष्टीकरण मी दिलेले आहे.  ते म्हणजे सामान्य साधक आपले अंतर्मन जाणू शकत नाही.  त्यामुळे आपल्या अंतर्मनात बदल घडत आहे हेही त्याला जाणवत नाही.  याचा परिणाम म्हणून नामस्मरण हा दिव्य विचार कसा आहे हेही त्याला कळू शकत नाही.  ही एक मोठी अडचण आहे.  बर्‍याच वेळेस हे न कळल्यामुळेसुध्दा नामस्मरणात काही अर्थ नाही असे बरेच जणांना वाटू लागते व ते साधना सोडून देतात.  जे श्रध्दावान असतात ते संतवचनावर श्रध्दा ठेवतात व त्यामुळे ते साधना सोडून देत नसले तरी या सुप्त शंकेमुळे त्यांची साधना बाळसे धरू शकत नाही.  यावर एक उपाय आहे.  नामस्मरण हा दिव्य विचार आहे हे जोपर्यंत लक्षात येत नाही तोपर्यंत सद्‌गुरूंनी अमृत मंथन पान क्र. ६० वर दिलेला उपाय वापरायचा.  "देव म्हणजे सर्व सुखाचे आगर आहे, दिव्य आनंदाचा सागर आहे, दिव्य ज्ञानाचे कोठार आहे, ऐश्वर्याचे केंद्र आहे, सर्व शक्तिमान, सर्वव्यापी व दयाधन आहे."   त्याचे नाम मी घेतो आहे ही धारणा धरायची.

सर्वांना नमस्कार.
Report to moderator   Logged
shambhagwat
Guest Members
Ultimate Contributor
*
Offline Offline

Gender: Male
Posts: 308


« Reply #32 on: September 27, 2009, 10:46:11 PM »

सर्वांना नमस्कार,

माझा मुलगा मला असे म्हणाला की, मागच्या रविवारच्या सह्याद्री वाहिनीवरील प्रवचनात सद्‍गुरूंनी असे सांगितले की, आपण दिवसभरात प्रत्येक गोष्टीसाठी वेळ राखून ठेवत असतो त्याचप्रमाणे साधना करण्यासाठी काही वेळ राखून ठेवला पाहिजे.  व त्यावेळेस साधना केली पाहिजे.  मी ते प्रवचन ऐकलेले नाही.  मागिल प्रवचनात या संदर्भात सद्‌गुरूंनी नक्की काय सांगितले याबाबत कोणी खुलासा करेल काय?

सर्वांना नमस्कार.
Report to moderator   Logged
Deepak_jvm
Global Moderator
Senior Contributor
*
Offline Offline

Posts: 124


« Reply #33 on: November 21, 2009, 01:51:09 PM »

Dear Milindjee and Shamjee,

namaskar.

Milindjee, you may call me just Deepak. Deepak_jvm is my jvm user ID, not name.

vcavc_,
वर्षाजी नमस्ते.

आपले साधनेचे उत्कट (हा शब्द योग्य नसल्यास क्षमा करावी) अनुभव वाचून आनंद झाला. आपले अभिनंदन.

धन्यवाद.

मिलिंद खाडिलकर

ता. क. ः डा. नूतनजी, सुभाषजी, दीपक-जेव्हीएम् जी, गीतादातारजी बहुतेक फोरमला  विसरले असावेत.......


When conscious mind intentionally or for some other reason loses focus, sub-conscious mind is watching and when possible tries to bring conscious mind on right path (due to its good habit). Sub-conscious mind is like computer, but not a computer. That is why when conscious mind and subconscious mind are aligned, you get results
For last two months I was on business trips etc. Sorry for being unable to post any message during last few months.

May God bless all,
Deepak
Report to moderator   Logged
Pages: 1 2 [3]   Go Up
  Print  
 
Jump to:  

Powered by MySQL Powered by PHP Powered by SMF 1.1.14 | SMF © 2006-2011, Simple Machines LLC Valid XHTML 1.0! Valid CSS!