DEVENDRA
New Contributor
Offline
Gender: 
Posts: 24
|
 |
« on: September 15, 2009, 11:31:17 PM » |
|
सर्वांना विठठल...!! विठठल...!!!
आज मला एक नविन विषय सुरु करावासा वाटत आहे आणि त्यासाठी तुम्हा सर्वांची परवानगी असावी.
विषय: अखंड नामस्मरण.
कदाचित माझे वय पाहता मी लहान तोंडी मोठा घास घेण्याचा प्रयत्न करत आहे त्यासाठी क्षमस्व.
हा विषय सुरु का करावा याविषयीची माझी थोडी पार्श्वभूमी स्पष्ट कराविशी वाटते.
आपल्या सदगुरुनी सांगितले आहे की ''माणसाचा जन्म कशासाठी तर आनंद वाटता वाटता आनंद लूटन्यासाठी'' आणि जर आपण अति सुक्ष्मपणे विचार केला तर तो आनंद म्हणजे सद्चिदानंद.
सद्चिदानंद म्हणजे शाश्वत आनंद...!!! पण हा आनंद मिळवन्या साठी अनेकांनी अनेक मार्ग सांगितले उदा. योगमार्ग, समाधी वगैरे पण त्यातला सर्वात सोपा मार्ग वारकरी संप्रदायातील संतानी सांगितला आणि तो म्हणजे... 'नामस्मरण'.
तोच मार्ग आपल्या सदगुरुनी सुद्धा सांगितला पण नविन जगाला, लोकांना अनुसरून नविन पद्धतीने आपल्या दिव्या अशा विश्वप्रार्थनेच्या रुपाने.
पण एवढे सगळे सांगुन सुद्धा आपल्या (इथे आपला हा शब्द फक्त माझ्या स्वतःबद्दल आहे) कडून ते सतत किंवा अखंड पणे होत नाही आणि ह्या गोष्टीचे मला खुप दुःख होते याचे एक कारण म्हणजे कदाचित माझ्या मनातील सल् असू शकतो की सदगुरु जे सांगतात त्याचे आपल्या कडून आचरण सुद्धा होत नाही आणि दुसरे कारण म्हणजे माझी एक लहानपणा पासून ची इच्छा आहे आणि ती बहुतेक सर्वांची असते सुद्धा ती म्हणजे 'मला देवाला पहायचय' किंवा 'मला देव पाहिजे' पण खुप वेळेला ती फक्त लहानपना पुरतीच राहते मोठे झाल्यावर त्याचा विसर पडतो.
आणि जर "याची देही याची डोळा पाही जे मुक्तीचा सोहला" हे प्रत्यक्ष अनुभवायाचे असेल तर त्या साठी अखंड नामस्मरण याशिवाय दूसरा पर्याय नाही.
त्यामुले जर या विषयाच्या अभ्यासावरुन काही मार्गदर्शन झाले तर त्याचा सर्वांना खुप फायदा होईल.
माझ्या वरील लिखाणात माझ्या कडून काही चुकीचे लिहिले अथवा बोलले गेले असेल तर मला लहान समजुन मोठ्या अंतकरनाने माफ करावे.
धन्यवाद देवेन्द्र.
|
Thanks May God bless all akhanda shubhchintan & vishwaprarthana Devendra (Ghatkopar) 9220828744
|
|
|
mk
Guest Members
Ultimate Contributor
Offline
Gender: 
Posts: 543
साधनेने प्राप्त सिद्धी ही साध्य नाही साधन
|
 |
« Reply #1 on: September 16, 2009, 09:32:43 AM » |
|
Namonamah Devandrajee, Namaste. A good post, a sincere post! Thanks. I think forum members should list their experiences about what are the practical difficulties in chanting of VP. It could be a part of the guidance that Devendrajee wishes (and all of us wish too). I start with a list of the top 5 difficulties ( or are they excuses?)I face: 1. Trying to chant VP before just going to sleep destroys my sleep and I am drowsy the next morning. So I have stopped that. 2. I like to listen to Vividh Bharati. VP comes in the way of my enjoying the music. I must state here that I can do my work and enjoy music simultaneously most of the time. 3. I cannot chant VP when I am in a meeting,even if I am just listening. 4. Chanting VP interferes with any "thought oriented" work, even with chintan about JV. 5. Sometimes when I chant VP, I unconsciously chant two distinct VPs simultaneously at two distinct speeds. It used to happen more often earlier. I had asked about it in an earlier post (and had got appropriate explanation): QUOTE I find that when I am chanting VP, there are two chants going on. I do not know where the other one originates from. But when one is on "bhala kar", the other has reached its end and is waiting for the first one to catch up. This probably slows down the process for me. However, if I try to do anything consciously about this, the first chant goes haywire and I miss out the wording.UNQUOTE ( http://www.jeevanvidya.org/forum/index.php/topic,232.0.html) I request all forum members to list their Top 5 difficulties; Forum leaders like Dr. Nutanjee, Subhashjee and ShamBhagwatjee could then provide appropriate guidance. Thanks JVM and all forum members! Regards Milind Khadilkar
|
या लिखांणात व्यक्त झालेल्या मतांशी लेखक सहमत असेलच असे नाही.
This content does not necessarily represent the views of the author.
|
|
|
rasika
New Contributor
Offline
Gender: 
Posts: 3
Always Do good things
|
 |
« Reply #2 on: September 16, 2009, 04:48:05 PM » |
|
Namskar , Devendra
In Early When JV started Satguru suggest for AKHAND NAMASMARN but its not working as such . So, Satguru suggest VP In VP 1) We Know the thought like subh vichar ( now a day's good thinking is not happened for new comer in Parmarth)
2) Its Universal Thought
3) As satguru Explain Law of Nature Boomrang of 'Jase vichar Tase jeevan '
4) We Visualize this shubh Vichar
In Namasmaran 1) I think its not easy to chat continuous Namasmaran because our mind like butterfly
|
rasika shinde
|
|
|
shambhagwat
Guest Members
Ultimate Contributor
Offline
Gender: 
Posts: 308
|
 |
« Reply #3 on: September 16, 2009, 10:04:43 PM » |
|
सर्वांना नमस्कार,
अध्यात्माच्या प्रागणांत प्रवेश केल्यावर एक अडचण नेहमी सर्वांना सतावत असते. पण ही अडचण अशी गमतीशीर आहे की, ती आपल्या लक्षात येऊ शकत नाही. लहानपणापासून आपण शाळेत जायला लागतो. वर्गात शिकवलेले शिकतो. आपले आई वडील आपला अभ्यास घेतात. खूप शिकायचे खूप मोठे व्हायचे हे धेय्य असते. चांगली नोकरी मिळवावयाची. वगैरे वगैरे स्वप्न असतात. त्यासाठी आपण खूप कष्ट करतो. म्हणजे अभ्यास करतो. हा अभ्यास करणे म्हणजे अभ्यासाच्या सर्व विषयाची माहिती मिळवणे, नोटस काढणे, प्रश्नपत्रीकांचा सराव करणे, क्लासेस लावणे, लाईकली किंवा मोस्ट लाइकलीच्या टीप्स मिळवणे. यानंतर आपण मोठ्या कष्टाने मिळविलेली ही माहिती परिक्षेच्या उत्तरपत्रिकेत सुवाच्य अक्षरात जशीच्या तशी उतरवितो व चांगले मार्क मिळवतो. जो चांगले मार्क मिळवतो त्याला बक्षीसे, पाहिजे त्या विषयात पाहिजे त्या कॉलेजमधे प्रवेश शिवाय निरनिराळ्य शिष्यवृत्या मिळतात. चांगली नोकरी मिळते. नोकरीत करिअर करायचे असते. त्यासाठी खूप कष्ट करायची तयारी असते. त्यासाठी तो आपले ज्ञान सदैव ताजे राहिल याचा प्रयत्न करतो. आणि यश मिळवत राहातो. चर्चेत भाग घेतो. जमा केलेल्या जास्तीच्या ज्ञानाच्या (माहितीच्या) हे तो सर्व मिळवत असतो. ज्याच्या कडे माहितीचा सर्वात मोठा साठा तो यशस्वी अशी आजची स्थिती आहे. तसेच ज्याची माहिती सर्वात अद्ययावत आहे तो इतरांच्या पुढे जातो असा सद्याच्या युगाचा महिमा आहे. या सगळ्यांचा खोल संस्कार आपल्यावर झालेला आहे.
त्यामुळे असा हुषार अभ्यासू विद्यार्थी जेव्हा अध्यात्माच्या प्रांगणात प्रवेश करतो तेव्हा तो झपाट्याने माहिती मिळविण्याच्या प्रयत्नाला लागतो. सगळे तोंडपाठ असते. कोणीही कुढलिही शंका विचारा उत्तरे मुखोद्गत असतात. त्यामुळे आपल्याला सगळे कळले आहे, लक्षात आलेले आहे असे वाटू लागते. त्याची लेखी अथवा तोंडी परिक्षा घेतली तर तो पैकीच्या पैकी मार्काने पास होणार ही जणू काळ्या दगडावरची रेष असते. इतरांनी कसे वागायला पाहिजे आहे हे तो तर्कशुध्द पध्दतीने कोणालाही पटवून देऊ शकतो. किंवा साधार सिध्दही करू शकतो. बऱ्याच वेळेस त्याचे म्हणणे बरोबरही असते. ज्ञानी म्हणून लोक मान्यताही द्यायला लागतात.
इथेच त्याची फसगत होते. कारण माहितीचा हा सगळा साठा तो स्वत:साठी वापरू शकत नाही. कारण अध्यात्म हे आपल्या जवळ असलेल्या माहितीच्या साठ्यावर अवलंबून नसते. किंवा त्या माहितीचे विश्लेषण करण्याच्या आपल्या क्षमतेवरही ते अवलंबून नसते. कारण अध्यात्मातील सिध्दांत प्रत्यक्ष जगण्यासाठी असतात. प्रत्यक्ष अनुभव अथवा प्रत्यक्ष अनुभुती हा एकमेव निकष येथे लागू होतो.
हे एकदा लक्षात आले की वाचन, चर्चा इत्यादिंना आपोआप फाटा दिला जाऊ लागतो. प्रत्यक्ष साधना करण्यालाच महत्व असा विद्यार्थी देऊ लागतो. आपणाला कितीही माहिती असली व जीवनविद्येचे सगळे सिध्दांत तोंडपाठ असले तरी प्रत्यक्ष व्यवहारात उतरल्यावर मात्र ही कोणतीही माहिती आठवत नाही. ती सर्व माहिती सीडी, कॅसेट अथवा पुस्तकात जशीच्या तशी तशी राहाते हे लक्षात यायला लागते. ही माहिती माहितीच्या स्वरुपात न राहाता प्रत्यक्ष अनुभवाच्या रुपात किंवा अनुभुतीच्या रुपात जिवंत राहिली पाहिजे किंवा तो आपला स्वभाव झाला पाहिजे तरच व्यवहारात वागताना त्या माहितीच्या आधारे नेणीवेतून आपण वागू शकतो हे भान त्याला यायला लागलेले असते. त्यामुळे असा माणूस फक्त साधनेलाच महत्व देऊ लागतो. हे सर्व लक्षात न येणे ही मला वाटते सर्वात मोठी अडचण आहे.
पाच अडचणी वेगळ्या शब्दात सांगावयाच्या झाल्यास असे म्हणता येईल की, १. "यश" ह्या शब्दाची व्याख्या चुकली की सगळे चुकत जाते. म्हणून यश या शब्दाची नक्की व्याख्या करता न येणे ही एक अडचण असू शकते. २. बऱ्याच वेळेस आपल्याला काय मिळवावयाचे आहे हे नक्की असते. म्हणजे आपण आपली स्वप्ने निश्चित केलेली असतात पण ती पूर्ण होणे अथवा न होणे याचा अध्यात्माशी काहीही संबंध नाही हे लक्षात येत नाही ही एक अडचण आहे. ३. किंवा असेही म्हणता येईल की, ज्या मार्गाने मी व्यवहारात अथवा संसारात यश मिळवले ती पध्दत जशीच्या तशी वापरून मी अध्यात्मात यश मिळवू शकेन असे वाटणे हीच खरी मोठी अडचण आहे. ४. बऱ्याच वेळेस आपल्या सुखाच्या कल्पनाच चुकतात. गाडी घोडा बंगला भरपूर पैसा यालाच यश अथवा सुख समजले जाते. त्यामुळे हे सर्व मिळविण्यासाठी अध्यात्माची कास धरली जाते व फसगत होऊ शकते. हीही एक अडचणच आहे. ५. बऱ्याच जणांना असे वाटते की, मी काही मागण्यासाठी अध्यात्माच्या प्रांगणात शिरलेलो नाही. पण प्रत्यक्षात त्यांचा संसार व्यवस्थित चालू असतो व तो तसाच उत्तमरित्या चालू राहिला पाहिजे किंवा त्यात कोणतीही अडचण येता कामा नये ही सुप्त व तीव्र अपेक्षा आपल्या मनात खोलवर दडी मारून आहे याचा त्यांना पत्ताच नसतो. आणि या एका अपेक्षेमुळे अशी माणसे "निवांत" या शब्दाच्या अनुभूतीपासून लांब राहातात. हे त्यांच्या लक्षात येत नाही ही सुध्दा एक अडचण असू शकते.
सर्वांना नमस्कार.
|
|
|
|
|
mk
Guest Members
Ultimate Contributor
Offline
Gender: 
Posts: 543
साधनेने प्राप्त सिद्धी ही साध्य नाही साधन
|
 |
« Reply #4 on: September 17, 2009, 02:11:16 AM » |
|
नमोनमः शामजी नमस्ते.
सर्वप्रथम शामजींना धन्यवाद. त्यांचे लेखन बऱ्याच दिवसांनंतर वाचावयास मिळाले आणी फोरमला त्यांचे मार्गदर्शन मिळत आहे याचे समाधान वाटले.
शामजींनी सांगितलेल्या 5 गोष्टी महत्त्वाच्या आहेतच आणी अध्यात्ममार्गावरील सर्वांसाठी अत्यंत उपयुक्तही. (अर्थात असे प्रमाणपत्र देण्याची माझी पात्रता नाही, व माझ्यासारख्याच्या प्रमाणपत्राची फोरमला गरजही नाही.) अथक साधनेतून मिळवलेला मोलाचा अनुभव शामजी आपल्याला मुक्तपणे देत आहेत. शामजी, पुनश्च धन्यवाद.
परंतु असेही वाटते कि या ठिकाणी आपण एका छोट्याशा (पण अर्थात् महत्त्वाच्या) चिंतेत आहोत, की VP वा नामस्मरण करतांना येणाऱ्या आडचणी केणत्या व त्यावर कशाप्रकारे उपाय करता येतील हा. अस्पष्टपणे जाणवते की शामजींचे 5 मुद्दे हे येथेही महत्त्वाचे आहेत, पण असेही वाटते की त्या महत्त्वाच्या पण पुढच्या गोष्टी आहेत, आपण सध्याचा अडथळा पार केल्यानंतर पुढच्या प्रवासासाठीची ती शिदोरी आहे. (अर्थात्, हे माझे मत माझ्या मर्यादित आकलनशक्तीचा नमुना असेल. )
शामजी नामस्मरण व VP दोहोंत पारंगत आहेत. त्यांना विनंती कि त्यांनी या छोट्याशा मोठ्या गोष्टीत येणाऱ्या अडचणीही वेगळ्या नमूद कराव्यात.
सर्वांना धन्यवाद व शुभेच्छा.
मिलिंद खाडिलकर
|
या लिखांणात व्यक्त झालेल्या मतांशी लेखक सहमत असेलच असे नाही.
This content does not necessarily represent the views of the author.
|
|
|
DEVENDRA
New Contributor
Offline
Gender: 
Posts: 24
|
 |
« Reply #5 on: September 17, 2009, 10:21:59 PM » |
|
सर्वांना विठठल...!! विठठल...!!!  सर्वांना धन्यवाद...!!! विशेष करून श्याम काकांना त्यांनी केलेल्या मोलाच्या मार्गदर्शनाबद्दल...!! वरील मार्गदर्शनावरुन मला एक प्रश्न विचारावासा वाटतो (अर्थात तीच माझी अड़चन असू शकेल) की सदगुरु सांगतात की अखंड नामस्मरण करण्याची पहिली पायरी म्हणजे '' येइल तैसा बोल राम कृष्ण हरी'' मग त्याप्रमाणे मला जेव्हा आठवेल तेव्हा आणि जेव्हा वेळ मिळेल तेव्हा मी नामस्मरण करतो (इथे करतो म्हणण्यापेक्षा माझ्या कडून होते हे जास्त बरोबर आहे असे मला वाटते) कधी मी ''विठ्ठल..विठ्ठल'' म्हणतो किंवा ''विश्वप्रार्थना'' म्हणतो पण हे मी बऱ्याच दिवसापासून करत आहे. हे करत असताना माझे त्यामधे खुप कमी लक्ष असते म्हणजे ती प्रार्थना किंवा नामस्मरण फक्त मेक्यानिकली होत असते आणि सदगुरु हे सुद्धा सांगतात की नामस्मरण किंवा विश्वप्रार्थना म्हणताना त्यात स्मरण हे महत्वाचे असते पण इथे अड़चन ही असते की स्मरण करायचे कोणाचे? कारन ज्याचे स्मरण करायचे तो अव्यक्त आहे आणि तो आपल्या ठिकाणी प्रगट व्हावा यासाठी नामस्मरण करायचे असते. त्यामुले प्रार्थनेत लक्ष लागत नाही आणि त्यामुले नामस्मरण अखंड होते नाही यावर काही उपाय आहे काय? तसेच नामस्मरण अखंड होण्यासाठी अजून काय प्रयत्न केले पाहिजेत त्याबद्दल सुद्धा मार्गदर्शन करावे ही नम्र व आग्रहाची विनंती. माझ्या वरील लिखाणात माझ्या कडून काही चुकीचे लिहिले अथवा बोलले गेले असेल तर मला लहान समजुन मोठ्या अंतकरनाने माफ करावे. पुनःश्च धन्यवाद...!!!  देवेन्द्र
|
Thanks May God bless all akhanda shubhchintan & vishwaprarthana Devendra (Ghatkopar) 9220828744
|
|
|
shambhagwat
Guest Members
Ultimate Contributor
Offline
Gender: 
Posts: 308
|
 |
« Reply #6 on: September 18, 2009, 08:20:10 AM » |
|
सर्वांना नमस्कार,
श्री. मिलिंद खाडीलकर यांस,
विचारांशी प्रामाणिक असणे हा एक मोठा गुण तुमच्याकडे आहे. हाच गुण स्वामी विवेकानंदाकडे होता. आणि म्हणूनच ते पूर्णपणे नास्तिक असूनही रामकृष्ण परमहंसाचे ते प्रथमपासून आवडते शिष्य होते. त्यांनी स्वामी विवेकानंदाचा दृष्टीकोन फक्त बदलला आणि नरेंद्राचे स्वामी विवेकानंद झाले. द्रुष्टीकोन बदला जग बदेलल हा एक सिध्दांत आहे. मी तुम्ही मांडलेल्या मुद्यांवर विचार करत आहे. जरा वेगळ्या पध्दतीने मुद्दे मांडायचा प्रयत्न करणार आहे. मात्र आशय जीवनविद्या तत्वज्ञानानुसार असेल. एका पोस्टमधे सर्व काही लिहिता येईल असे वाटत नाही पण जसे जमेल तसे मुद्दे जरुर मांडत जाईन.
श्री. देवेंद्र यांस, तुमची तळमळ मला जाणवली. अधिर होऊ नका. योग्य वेळ येताच तुमचा कार्यभाग साधेल. अधिरता हा शापही आहे व ते वरदानही आहे. अधिरतेमुळे साधनेत सातत्य येते तसेच अधिरतेमुळे उताविळपणाही येऊ शकतो. आपली जी प्रगती होते आहे त्या प्रगतीचा वेग दुसऱ्या कुणीही नाही तर आपल्याच अंतर्मनाने निश्चीत केलेला असतो व तो कधिही चुकीचा असत नाही हे एकदा का लक्षात आले की, तुमची अधिरता हे वरदान ठरू शकेल.
आज येथेच थांबतो.
सर्वांना नमस्कार.
|
|
|
|
|
omkar
Junior Contributor

Offline
Posts: 86
Read "Many Lifes Many Master" Brian L. Weiss
|
 |
« Reply #7 on: September 18, 2009, 10:06:30 PM » |
|
Hello All My only 2 cents
Nam smaran means Namache Smaran. You are not involved in it You are just remembering it not doing it
Please try to forget karta try to listen only I think you are all saying about NamJap Omkar May God bless with Akhand Sadgurukrupa & Effortless Namsmaran
|
I am vary Happy & in deepest ( bottom hearth) Gratitude to god for blessing "every body be with akhand sadgurukrupa & effortless namsmaran"
|
|
|
mk
Guest Members
Ultimate Contributor
Offline
Gender: 
Posts: 543
साधनेने प्राप्त सिद्धी ही साध्य नाही साधन
|
 |
« Reply #8 on: September 19, 2009, 10:58:38 PM » |
|
नमोनमः शामजी नमस्ते. QUOTE विचारांशी प्रामाणिक असणे हा एक मोठा गुण तुमच्याकडे आहे. UNQUOTE आपल्या उदार शब्दांबद्दल धन्यवाद. त्याचबरोबर असा गैरसमज हौऊ देण्याचा माझा उद्देश खचितच नाही हे नमूद करून, झाला असल्यास दिलगिरी व्यक्त करतो.
या फोरमपुरता मी माझ्या विचारांशी नाही तर अंगीकृत भूमिकेशी प्रामाणिक राहू इच्छितो. माझ्या लिखाणाखालील सही मी याची मला सतत जाणीव रहावी म्हणून केली आहेः या लिखांणात व्यक्त झालेल्या मतांशी लेखक सहमत असेलच असे नाही.
This content does not necessarily represent the views of the author.
याउलट, जर प्रत्यक्ष जीवनात मी माझ्या विचारांशी प्रामाणिक राहण्यापुरते मानसिक बळ कमाऊ शकलो तर मी अत्यंत सुखी, आनंदी होइन.
Thanks and regards Milind Khadilkar
---------------------------------- Omkarjee Namaste. Thanks for pointing out that Naam Jap and Naam Smaran are distinct concepts. I am not really aware of the difference, though!!
Thanks and Regards, Milind Khadilkar
|
या लिखांणात व्यक्त झालेल्या मतांशी लेखक सहमत असेलच असे नाही.
This content does not necessarily represent the views of the author.
|
|
|
DEVENDRA
New Contributor
Offline
Gender: 
Posts: 24
|
 |
« Reply #9 on: September 20, 2009, 12:06:24 AM » |
|
सर्वांना विठठल...!! विठठल...!!! Shyam Kaka, thanks a lot..!!! मी तुमच्या सुचेनेचे नक्की पालन करीन. श्री. ओमकार यांना सुद्धा धन्यवाद. सदगुरुनी सांगिताल्याप्रमाने, नामस्मरण म्हणजे नामाच्या सहाय्याने नामिचे केलेले स्मरण म्हणजे नामस्मरण आणि जोपर्यंत आपल्याला नामिचे रूप -स्वरुप माहित नाही तोपर्यंत त्याचे स्मरण करताच येत नाही. त्यामुले आपल्या कडून नुसताच नामजप होतो किंवा तो जप करताना आपण एखाद्या मूर्तीचे किंवा अन्य गोष्टींचे स्मरण करतो. त्यामुले कदाचित आपले लक्ष विचलित होते. यासाठी काय करावे? श्याम काकांच्या मार्गदर्शनाची मी खुप आतुरतेने वाट पाहात आहे तसेच मिलिंद काकांच्या मार्गदर्शनाची सुद्धा...!!! सर्वांना नमस्कार, देवेन्द्र.
|
Thanks May God bless all akhanda shubhchintan & vishwaprarthana Devendra (Ghatkopar) 9220828744
|
|
|
shambhagwat
Guest Members
Ultimate Contributor
Offline
Gender: 
Posts: 308
|
 |
« Reply #10 on: September 20, 2009, 07:30:40 PM » |
|
सर्वांना नमस्कार,
आपला जप मेकॅनिकल होतो म्हणजे खूपच खेदाची गोष्ट आहे असे एखाद्याला वाटणे हीच खरी खेदाची गोष्ट आहे हे आपण लक्षात ठेवले पाहिजे. पण अनेकांना असे वाटते हे खरे आहे. कधिकाळी मलाही असे वाटत असे हे मला मान्य केलेच पाहिजे. भगवंताचे नाम घेऊन साधना करणार्याचे यंत्रवत जप करणे हेच पहिले धेय्य असते. भले त्याला कोणी नामस्मरण म्हणो अथवा नामजप म्हणो. त्या शब्दछलात जाऊन स्वत:चा बुध्दीभेद करवून घेणे इष्ट नसते इतकेच इथे म्हणता येईल. याचे कारण म्हणजे यंत्रवत जप ही पहिली पायरी आहे. या पुढच्या प्रगतीचे निकष वेगळे असतात. हे निकष या पहिल्या पायरीला लावण्याची चूक जर अजाणतेपणे झाली तर अर्थाचा अनर्थ होण्याचीच शक्यता असते.
यंत्रवत जप करताना जपात लक्ष नसते हे मान्य. पण असा जप करता येणे अत्यंत महत्वाचे आहे. सर्व संतांना ह्या पध्दतीचा जप करूनच आपल्या साधनेला सुरवात करावयास लागली आहे. याला कोणीही अपवाद नाही. बर्याच वेळेस यापुढील प्रगती करताना सांभाळायची पथ्ये आपण वाचून अथवा ऐकून त्याची माहिती गोळा करतो व फसतो. उदा. "किती लक्ष जप केला यापेक्षा अलक्षाकडे किती लक्ष होते हे महत्वाचे." हे सद्गुरूंचे वाक्य उदाहरणादाखल घेऊ. हे वाक्य ज्याने यंत्रवत जपाची पायरी यशस्वीरित्या पूर्ण केली आहे त्याच्यासाठी आहे. तसेच नामजप व नामस्मरण यातील फरक जो सद्गुरूंनी सांगितलेला आहे तोही यंत्रवत जप करण्यात पूर्ण पारंगत झालेल्या साधकासाठी आहे. नामाने नामाचे स्मरण व नामीचे स्मरण होण्यासाठी अथवा राहाण्यासाठी घेतलेले नाम ह्यातील फरक अनुभवावयाची ज्याची पात्रता आहे त्यांच्यासाठी हा संदर्भ आहे. ह्या दोन्हीतील फरक म्हणजे काय याची माहिती गोळा करण्यासाठी याचा उपयोग व्हावा हा हेतू यामधे नक्कीच नाही.
यंत्रवत जप करण्याचा हा टप्पा खूप मोठ्या कालावधीचा असतो. हा कालावधी अनेक वर्षांचाही असू शकतो. त्यामानाने पुढील प्रगतीला खूप कमी वेळ लागतो. ह्या पहिल्या टप्याचा कालावधी कमी करण्याचे काही मार्ग आहेत. ते म्हणजे सद्गुरूंचे दर्शन, प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्ष सेवा, मानसपूजा, सद्गुरूंचा अथवा संताचा प्रत्यक्ष सहवास, आपल्या पेक्षा पुढे असलेल्या साधकाचा निकटचा सहवास.(आई, वडिल, भाऊ, बहीण वगैरे)
बर्याच वेळेस जास्त माहिती गोळा झालेली असणे फायद्याऐवजी नुकसानीस अथवा बुध्दीभेद होण्यास मदत करते. येथे वैयक्तीक मार्गदर्शन उपयोगी पडते. जे पूर्वीच्या काळी मिळत असे. आज टीव्ही, कॅसेट, पुस्तके इत्यांदीमुळे ज्या माहितीची सद्यपरिस्थितीत उपयोग नाही अशीही माहिती आपण गोळा करत आहोत. माईक वरुन गुरुपदेश अथवा मार्गदर्शन मिळत आहे. सद्गुरुंचे दर्शन झालेच तर व्यासपीठावर बसलेले सद्गुरु लांबून पाहावयाचे व धन्यता मानायची अशी परिस्थिती आहे. वैयक्तिक मार्गदर्शनाची पूर्वीची परंपरा जवळपास लोप पावत चाललेली आहे. कालाय तस्मै नम: !!!
अध्यात्मशास्त्राच्या दृष्टीने हा विषय मांडायचा झाल्यास इतकेच म्हणता येईल की, वैखरी व मध्यमा वाणीतील जप म्हणजे यंत्रवत जप होय. या यंत्रवत जपातील पुढची पायरी म्हणजे मध्यमावाणीत स्थिर झालेला यंत्रवत जप होय. यंत्रवत जपात निपूण झालेला म्हणजे मध्यमा वाणीत जप करणे बंद झालेले आहे पण पश्यन्तीवाणीत जप करायला सुरवात झालेली नाही अशा स्थितीत होणारा जप होय. आपण यंत्रवत जप करण्यात आपण निपूण झालेलो आहोत किंवा नाही हे ठरविण्यासाठी एक निकष आहे जो सद्गुरूंनी एका वेगळ्या संदर्भात मांडलेला आहे. दिवसाकाठी ५ ते ६ तास फावल्या वेळेतील जप अथवा विश्वप्रार्थना करता येऊ शकते असे एके ठिकाणी सद्गुरूनी म्हटलेले आहे. जर आपण दिवसाकाठी ५ ते ६ तास फावल्याकाळात जप अथवा विश्वप्रार्थना करू शकत असाल तर हा टप्पा तुम्ही पूर्ण केलेला आहे असे जरुर समजा. पण तसे नसेल तर जास्त माहिती गोळा करण्याच्या फंदात न पडता किंवा चर्चेत सहभागी होऊन त्यात तासन तास न घालवता फावल्या वेळेत जप करण्याचा कालावधी वाढवणेच इष्ट होय.
जरा वेगळ्या शब्दात हे मुद्दे मांडावयाचे झाल्यास असे म्हणता येईल की, यंत्रवत जप अथवा नामस्मरण म्हणजे भगवंताचे नाव घेण्याचा केलेला सराव होय. सराव हा शब्दच अंतर्मनाच्या अखत्यारीत येतो. सराव म्हणजे असे कार्य जे अंतर्मन करते व ते कार्य करण्यासाठी बहिर्मनाला त्यात लक्ष घालावे लागत नाही. किंबहुना बहिर्मनाला इतर गोष्टींत लक्ष घालता यावे यासाठी बहिर्मन मोकळे राहिले पाहिजे या मूलभूत हेतूने हे कार्य करण्याची जबाबदारी अंतर्मन स्वत:हून आपल्याकडे घेत असते. अंतर्मनाचा हा स्वभाव आहे व या स्वभावाचाच उपयोग या पहिल्या टप्यात नामस्मरणच्या मार्गात करून घेतलेला असतो. यंत्रवत जप अंतर्मन करत असल्यामुळे या यंत्रवत जपाचा परिणाम अंतर्मनावर होत असतो व ते बदलत असते. पण आपले अंतर्मन जाणणे हे या टप्यातील साधकाला शक्य नसते त्यामुळे नक्की काय बदल होतो आहे हे त्याला कळू शकत नसते. पण बदल होत असतो हे निर्विवाद सत्य आहे. बहिर्मनात मात्र त्यामानाने काही बदल होत नसतो त्यामुळे आपल्यात होणारा बदल आपल्याला न जाणवल्यामुळे आपली प्रगती होत आहे किंवा नाही याबाबत आपल्याला शंका येत राहाते. हाच या टप्यातील धोका आहे. ही शंका बलवत्तर झाली की नामस्मरणात काही अर्थ नाही या निष्कर्षापर्यंत साधक येऊन तो साधना सोडून देण्याचीही शक्यता असते. निव्वळ श्रध्देच्या जोरावरच हा टप्पा पूर्ण करता येतो. हाकारून सांगे तुका । नाम घेता राहो नका ॥ किंवा येईल तैसा बोल राम कृष्ण हरि अशा प्रकारच्या संतवचनांचे पालन केल्याने माझे कधिही नुकसान होऊ शकणार नाही अशी दृढ श्रध्दा ठेवता आली तर हा महत्वाचा व मोठा कालखंड पूर्ण करता येऊ शकतो.
हा टप्पा जेव्हा पूर्ण होतो तेव्हा नामस्मरण करण्याचे काम संपूर्णपणे अंतर्मन करत असते तर बहिर्मनाला त्यात काडीचेही लक्ष घालावे लागत नाही. किंबहुना बहिर्मन पूर्णपणे उंडारायला मोकळे असते असेही म्हणता येईल. या नंतरच्या टप्यात हे बहिर्मन हळू हळू अंतर्मनाकडे वळवावयाचे असते. लक्ष देणे हा प्रकार या टप्यात सुरु होतो. नामाचा नंदादीप या ग्रंथात सद्गुरूंनी स्पष्टपणे म्हटलेले आहे की, जपात माझे लक्ष एकाग्र होत नाही अशी तक्रार अनेक जण करतात पण अशी तक्रार करणेच चुकीचे आहे.
ज्याला लवकर प्रगती व्हावी अशी खरी आच आहे त्याला आणखी एक मार्ग उपलब्ध आहे. जो अत्यंत प्रभावी आहे. फावल्यावेळेत जप करण्याच्या सरावा बरोबर जप करण्यासाठी दिवसातील एक विशिष्ट वेळ राखून ठेवणे होय. एका जागी बसून प्रथम शरीर स्थिर करावयाचे. डोळे बंद करून बाहेरून येणारे विक्षेप बंद करायचे. पहाटेची वेळ निवडून कान बंद करावयाचे. आणि जप करावयाचा. यावेळेस जपाकडे अथवा विश्वप्रार्थनेत लक्ष ठेवण्याचा प्रयत्न करावयाचा (अट्टाहास नव्हे). आपले मन भरकटते आहे हे जेव्हा लक्षात येईल तेव्हा परत त्या मनाला जपात अथवा विश्वप्रार्थनेत लक्ष ठेव अशी विनंती करायची (बळजबरी नव्हे) व परत प्रयत्न करायला सुरवात करायची. हा संतानी सुचविलेला मार्ग आहे म्हणून येथे देत आहे इतकेच. जिवनविद्येला हा मार्ग मान्य आहे किंवा नाही हे माहित नाही. कारण जीवनविद्या ही चालती बोलती असल्याने याबाबत जीवनविद्येतील अधिकारी व्यक्तीचा सल्ला घेणेच इष्ट ठरेल. असो.
सर्वांना नमस्कार.
|
|
|
|
|
mk
Guest Members
Ultimate Contributor
Offline
Gender: 
Posts: 543
साधनेने प्राप्त सिद्धी ही साध्य नाही साधन
|
 |
« Reply #11 on: September 21, 2009, 01:58:54 PM » |
|
नमोनमः
कोणतीही क्रिया वा (इष्ट) गोष्ट मेकॅनिकल होणे याचे अनेक प्रकार असू शकतात. मन न गुंतता गोष्ट होत राहणे हा एक प्रकार. गोष्ट झालीय वा होतेय याची जाणीव नसणे हा दुसरा प्रकार. होते आहे ती गोष्ट इष्टच आहे याचा बोध न होणे हा तिसरा, व इष्टानिष्टाची तमा नसणे हा चौथा प्रकार. या सर्वांहून अधिक भयंकर असा प्रकार म्हणजे जे होत वा घडत आहे त्याची जाणीव असून व त्याची इष्टानिष्टता ज्ञात असूनदेखील आपल्या क्रियेत बदल न घडवणे.
याउलट जे घडते आहे ते इष्टच आहे याची खात्री असली तरी अधिक अष्टाची लालसा बाजूस सारून मनाला त्यामध्ये गुंतू न देणे हे ही मेकॅनिकलच पण श्रेयस्कर आहे. (मर्यादा प्रत्येकाने स्वतः ठरविणे.)
देवेन्द्रजी, आपला प्रश्न व शामजी आपले उत्तर हे दोहों हे सारख्याच मेकॅनिकल संबंधी आहेत काय?
Thanks and Regards Milind Khadilkar
|
या लिखांणात व्यक्त झालेल्या मतांशी लेखक सहमत असेलच असे नाही.
This content does not necessarily represent the views of the author.
|
|
|
shambhagwat
Guest Members
Ultimate Contributor
Offline
Gender: 
Posts: 308
|
 |
« Reply #12 on: September 21, 2009, 02:31:30 PM » |
|
सर्वांना नमस्कार,
माझ्या पोस्टमधे मेकॅनिकल या शब्दाचे मराठी भाषांतर यंत्रवत या शब्दाने केले आहे. प्रत्यक्षात याचा अर्थ प्रतिक्षिप्त क्रिया असाच ध्वनित होतो आहे असे मला वाटते.
सर्वांना नमस्कार.
|
|
|
|
|
DEVENDRA
New Contributor
Offline
Gender: 
Posts: 24
|
 |
« Reply #13 on: September 21, 2009, 04:22:31 PM » |
|
सर्वांना विठठल...!! विठठल...!!!  माझी विश्वप्रार्थना किंवा नामस्मरण मेकॅनिकल होते म्हणजे फक्त तोंडाने होते म्हणजे त्यात माझे (म्हणजे मनाचे) लक्ष नसते या अर्थाने मी 'मेकॅनिकल' हा शब्द वापरला होता. श्याम काका तुमच्या मार्गदर्शनाबद्दल मी तुमचा खुप खुप आभारी आहे. वरील मार्गदर्शना वरुन मला माझी चुक मला लक्षात आली आहे. तुम्ही सांगितलेल्या सूचनांचे मी नक्की अवलंब करीन. तसेच मला हा अतिशय महत्वाचा टप्पा पूर्ण करण्यासाठी तुम्हा सर्वांच्या अशिर्वादाची खुप खुप गरज आहे. मी तुमच्या विषय समजावून सांगायच्या पद्धतीने खुप भारावून गेलो आहे. तुमच्या अचूक मार्गदर्शनामुले मला माझी नेमकी चुक कुठे होत आहे ते कळाले आणि याचा मला भावी काळात खुप उपयोग होइल. यासाठी मी तुमचा खुप खुप ऋणी आहे आणि सदैव राहील. आता इथेच थांबतो. तुमचा कृपाभिलाशी, देवेन्द्र.
|
Thanks May God bless all akhanda shubhchintan & vishwaprarthana Devendra (Ghatkopar) 9220828744
|
|
|
mk
Guest Members
Ultimate Contributor
Offline
Gender: 
Posts: 543
साधनेने प्राप्त सिद्धी ही साध्य नाही साधन
|
 |
« Reply #14 on: September 22, 2009, 06:00:58 AM » |
|
नमोनमः शामजी. देवेंद्रजी नमस्ते.
यंत्रवत VP म्हणजे स्वयंचलित VP असे म्हणता येईल का?
Thanks and Regards Milind Khadilkar
|
या लिखांणात व्यक्त झालेल्या मतांशी लेखक सहमत असेलच असे नाही.
This content does not necessarily represent the views of the author.
|
|
|
|