सर्वांना नमस्कार,
"my opinion" चा येथे अर्थ "JV या विषयी काय सांगते यासंबंधीचे माझे आकलन"
मला वाटते "तुम्हाला झालेले आकलन" या एकाच गोष्टीवरती तुमचे मुद्दे आधारित आहेत. म्हणून "आकलन" या शब्दावरच जास्त भर देत आहे.
आपल्याला जे आकलन होते ते साधारणत: दोन पध्दतीने होते. पहिला प्रकार म्हणजे ग्रंथ, सी.डी., प्रवचने यांचा अर्थ तर्काने जाणणे होय. मात्र इथे हे गृहित धरले आहे की, त्याने सद्गुरूंचे सर्व ग्रंथ हे वाचलेले आहेत तसेच प्रवचनामधील सत् चित् आनंद यावरील २८ सीडी ऐकलेल्या आहेत. दुसरा प्रकार म्हणजे प्रत्यक्ष अनुभव घेऊन जाणणे. या दोन्ही पध्दतींचा समन्वय असेल तरच खरे जाणणे जमू शकते. याचे कारण असे सांगता येऊ शकेल. जेव्हा आपण तर्काने जाणण्याचा प्रयत्न करतो तेव्हा आपल्या दृष्टीकोनाला खूप महत्व असते. जसा आपला दृष्टीकोन असतो त्याप्रमाणे आपला तर्क असतो. म्हणजे आपल्या तर्क करण्याच्या पध्दतीवर आपल्या दृष्टीकोनाचा प्रभाव असतो. तर अनुभव ही अशी गोष्ट आहे की, ती आपला दृष्टीकोनच बदलते. अर्थातच प्राप्त झालेला हा नवीन दृष्टीकोन (अनुभवसिध्द दृष्टीकोन) आपल्याला खरा अर्थ लक्षात आणून देते. या उलट योग्य दृष्टीकोन नसेल तर ज्ञानाऐवजी विपरीत ज्ञानाची प्राप्ती होते. सर्व संतांनी यास्तव प्रत्यक्ष उपासनेला महत्व दिलेले आहे.
1.
But I still feel you are expecting too much from the antarman, in terms of JV.
आपल्या चपखल स्पष्टीकरणानंतर देखील मला असे वाटते की आपण (JV ने कल्पिलेल्या) अंतर्मनाकडून फार जास्त अपेक्षा ठेवीत आहात.
यातील टू मच बद्दल जरा स्पष्टीकरण कराल का? एखादे उदाहरण देऊन स्पष्ट केले तर मला समजायला खूपच सोपे जाईल असे वाटते.
1.
I do not think that the antarman (as conceptualised by JV) can disobey or twist bahirman's commands.
मला जे आकलन झाले आहे त्यानुसार बहिर्मनाच्या सूचनांचा अधिक्षेप, अवमान वा अपालन करण्याची अंतर्मनाची कुवत नाही, प्राज्ञा तर यंत्राला असूच शकत नाही.
वरील वाक्यांना छेद जाईल असे काही मी लिहिले आहे असे मला वाटत नाही. तसे तुम्हाला वाटत असेल तर उदाहरण देऊन स्पष्ट करा.
It is for the bahirman to "train itself" to not give improper commands to the antarman.
अंतर्मनाला अयोग्य सूचना न जाऊ देण्याची संपूर्ण जबाबदारी बहिर्मनाची आहे व तशी शिस्त बहिर्मनाने अंगी बाणवली पाहिजे.
हेच तर आपल्याला साधायचे आहे. सर्व उपासना पध्दतींचे हेच तर धेय्य असते. हे धेय्य नामस्मरणाने अथवा विश्वप्रार्थनेच्या उपासनेने कसे साधायचे हेच तर मी लिहिले आहे. तुम्ही हे वाक्य का लिहिले आहे त्याचे कारण अजूनही माझ्या लक्षात येत नाहीय्ये. जरा स्पष्ट करा.
2
"फावल्यावेळेत का होईना तसेच यंत्रवत का असेना" यासंबंधात मी लिहिलेः
do you intend to suggest that the above are compromises to some ideal situation?
"फावल्यावेळेत का होईना तसेच यंत्रवत का असेना" असे जेव्हा आपण लिहिता तेव्हा ही एक तडजोड आहे असे आपणास सुचवावयाचे आहे का?
तडजोड या शब्दाचा वापर तुम्ही का केलाय ते लक्षात येत नाहीय्ये. तडजोड करणे म्हणजे काहीतरी अयोग्य आहे असे तुम्हाला काही सुचवावयाचे आहे का? तुमच्या शब्दांना ज्याचा आधार आहे तो आधार लक्षात घेण्याचा प्रयत्न करतोय पण अजून मला ते नीट जमत नाहीय्ये. जरा मदत करा.
But (again my opinion) does not JV say that VP is best when done in spare time (faavlyaa velet) and as a chant (which is yantravat)?
मला जे आकलन झाले आहे त्यानुसार VP तशीच असावी, "फावल्यावेळेत व यंत्रवत" हीच सर्वोत्तम असे JV चे म्हणणे नव्हे का?
याबाबतीत मीच अंधारात आहे. मी तुम्हाला काय सांगू. जीवनविद्येतील अधिकारी नामधारकच यावर प्रकाश टाकू शकतील. वाट पाहाणे एवढेच आपल्या हातात आहे. आणि मी तरी तेच करत राहाणार आहे.
सर्वांना नमस्कार