dr.nutanpol
Senior Namdharaks
Ultimate Contributor
Offline
Gender: 
Posts: 429
|
 |
« on: June 30, 2011, 03:00:54 PM » |
|
सौ. वंदनाताई बेल्हे यांनी लिहिलेला एक लेख- यात कर्जत प्रकल्पासाठी धन-दान केल्याने त्यांना काय अनुभव आला ते सांगितले आहे.
ज्ञानदान श्रेष्ठ दान
श्री सद्गुरू श्री वामनराव पै निर्मित जीवनविद्या तत्वज्ञानाचा प्रचार गेली ५८ वर्षे चालू आहे. श्री सद्गुरूंनी अनेक प्रचारक, प्रसारक, प्रबोधक, ग्रंथदिंडीकार, कार्यकर्ते तयार केले. त्याचबरोबर हजारो माणसांचे संसार श्रीसद्गुरूंच्या तत्वज्ञानाच्या आधारे सुखी झाले.
एका उपकेंद्रांत माझे प्रबोधन होते. माझे प्रवचन झाल्यावर एक नामधारक श्री.X मला म्हणाले, "ताई, आज माझ्या पत्नीने आपल्यासाठी खास पदार्थ तयार केला आहे. म्हणून माझ्या घरी आपण चला.? मी व माझे पती त्यांच्या घरी गेलो. प्रबोधनातील त्यांना आवडलेले काही मुद्दे चर्चेत आले. मी ते अगदी तन्मयतेने ऐकत होते. त्यावेळेस तेथे हजर असलेले श्री x मला म्हणाले, "ताई खरे तर आम्हा चौघांची तुमच्या सारख्यांबरोबर बसून गप्पा मारायची लायकी नाही. त्यावर मी पट्कन म्हणाले, "तुमच्यासारख्यांबरोबर म्हणजे?" श्री.X म्हणाले, आम्ही इथे बसलेलो चौघे (मी श्री.X, श्री., श्री. xx व श्री. xxx) हे सर्व एक नंबरचे दारूडे. जीवनविद्या मिशनमध्ये येण्याअगोदरचे अट्टल दारूबाज. आम्ही रोज दारू पिल्याशिवाय घरी जातच नसू. एकदा असे झाले की, मी ऑफिसमधुन येताना नेहमीप्रमाणे दारू पिऊन घरी जात होतो. तेवढ्यात रस्त्याच्या बाजूला असलेल्या एका मैदानावर मला प्रचंड गर्दी दिसली. तेथे काय चालले आहे ते पहावे म्हणून मी मैदानात गेलो. तेथे मी पाहिले, खूप मंडळी खाली जमिनीवर बसून एका सद्गृहस्थांचे प्रवचन ऐकत आहेत. माझ्या आजूबाजूच्या लोकांना मी कोणत्या अवस्थेत आहे ते लगेच समजले. त्या माणसांनी सरकून मला बसायला जागा दिली आणि ती मंडळी परत तन्मयतेने प्रवचन ऐकू लागली. आपसूक मीही शांतपणे प्रवचन ऐकू लागलो. ते प्रवचन ऐकताना माझी मलाच कीव आली, किळस वाटू लागली. मी अतिशय दीनवाणे, हीन पातळीवर जीवन जगत आहे याची जाणीव मला झाली आणि त्याच क्षणी पक्का निर्धार केला की, ?आजपासून दारूला स्पर्श करायचा नाही.? जरी मी भरपूर दारू प्यायलेलो होतो तरी दारूच्या नशेच्या अंमलापेक्षा श्री सदगुरूंच्या शब्दांचा प्रभाव माझ्या मनावर अधिक पडला आणि त्यामुळेच त्याही अवस्थेत मी कायमची दारू सोडण्याचा निर्णय घेऊ शकलो. बाजूला बसलेल्या तिन्ही आपलाही हाच अनुभव असल्याचे सांगितले. नंतर घरी येताना माझ्या मनात या चौघांचेच विचार चालू होते. माझ्या असे लक्षात आले की, श्रीसद्गुरूंचे प्रवचनातले शब्द जरी जगावेगळे नसले तरी त्या शब्दांपलीकडे असणारा भाव, लोकांना सुधारण्याची तळमळ आणि त्यांच्या साधनेचा प्रभाव यामुळे सामान्य शब्दही असामान्य होतात आणि श्रोत्यांच्या अंत:करणाला थेट जाऊन भिडतात. त्यामुळेच लोकांच्या जीवनात आमुलाग्र बदल होतो. जसे एखादा सर्जन रोग्याच्या शरिरातील ट्युमर किंवा गाठ शस्त्रक्रिया करून काढून टाकतो व रोग्याला आजारातून मुक्त करतो. अगदी तसेच श्रोत्यांच्या अंतर्मनातील अनेक अनिष्ट गोष्टी श्रीसद्गुरू प्रबोधनामुळे कायमच्या निघून जातात. जणू ते आपल्या शब्दांनी अंतर्मनाची शस्त्रक्रियाच करतात.
दारू, जुगार, गुटखा यांसारखी व्यसने करणारे तसेच स्त्रियांशी दुर्वर्तन करणारे, त्यांना मारहाण करणारे पुरूष, अभ्यास न करणारी व अनिष्ट संगतीने बिघडलेली मुले, कामाची टाळाटाळ करणारे कर्मचारी, अंधश्रध्देच्या आहारी जाऊन भयगंडग्रस्त झालेली माणसे व अशा अनेक प्रकारच्या समस्यांमुळे त्रासलेली लाखो कुटूंबे जीवनविद्येचे तत्त्वज्ञान आत्मसात करून सुखी झाली. लोकांचे रहाणीमान व आरोग्य सुधारले. त्यांच्या मुलांनी उत्तम शैक्षणिक प्रगती केली. जीवनविद्येच्या बोधाने कुटुंबात शांती, सौख्य-समाधान प्रस्थापित झाले. त्यामुळे जीवनविद्या तत्त्वज्ञानाचा प्रचार आणि प्रसार जेवढा समाजात होईल तेवढी अधिकाधिक माणसे सुखी होतील. श्रीसद्गुरू हे कार्य गेली ५८ वर्षे करतच आहेत पण जर या कार्याला गती आणायची असेल तर आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर व्हायलाच पाहिजे. आता त्यासाठी गरज आहे जीवनविद्या मिशनला स्वत:च्या वास्तूची. आधुनिक तंत्रज्ञानाने युक्त अशी वास्तु कर्जत येथे उभारण्याचा संकल्प श्रीसद्गुरू वामनराव पै यांचा आहे. आता प्रश्न असा येतो की, या प्रकल्पासाठी मोठ्या प्रमाणात धनाची जी गरज आहे त्यासाठी निधी आपण कसा उभारू शकतो? मला माझा स्वत:चा अनुभव येथे नमुद करावासा वाटतो.
जेव्हा कर्जत प्रकल्प जाहीर झाला आणि माझ्या कानावर आला तेव्हा मी कर्जत प्रकल्पाला दहा हजाराची देणगी देण्याचे ठरविले व त्याप्रमाणे चेंबुर शाखेकडे दहा हजाराचा चेक सुपुर्द केला. माझा मुलगा चि. नामेंद्र याने जेव्हा श्रीसद्गुरूंचे प्रवचन ऐकले तेव्हा त्याने मला विचारले की, आई तू कर्जत प्रकल्पाला किती देणगी देण्याचे ठरविले आहेस? मी म्हणाले, ?दहा हजाराचा चेक दिला सुध्दा.? त्यावर तो म्हणाला, ?अग आई, श्रीसद्गुरूंच्या तत्त्वज्ञानामुळे तुझा संसार सुखाचा झाला. आम्हा भावंडांवर उत्तम संस्कार झाले. आपले सर्व कुटुंब त्यांच्या तत्त्वज्ञानामुळे सुखाचा अनुभव घेत आहे. तर मला असे वाटते की, तू एक लाख रूपये द्यावेस.? त्याच्या तोंडून एक लाख रूपये हे ऐकल्यावर मी ताडकन् उडालेच आणि त्याला स्पष्ट शब्दात नकार दिला. त्यानंतर तो त्याच्या खोलीत गेला आणि त्याने दहा हजाराचा चेक लिहून माझ्या हातात दिला. ही घटना घडली शनिवारी. दुसऱ्या दिवशी सकाळी दहा वाजता मी जेथे रहाते त्या सोसायटीच्या चेअरमननी माझ्या पतिंना सोसायटीच्या कार्यालयात बोलावले व त्यांच्या हातात पाकिट दिले. पाकिट उघडून त्यांनी पाहिले तर त्यात ४० हजाराचा चेक होता. माझ्या पतिंना आश्चर्य वाटले व त्यांनी विचारले, ?हे काय आहे?? तर चेअरमन म्हणाले, ?बेल्हेसाहेब, घरासाठी जे पैसे तुम्ही भरले होते त्यात तुमचे ४० हजार जास्त निघालेत. तर ते तुम्हाला परत केलेत.? पतिंनी घरी आल्यावर माझ्या हातात चेक दिला. तो बघून मी सुखावले. असे अचानक आलेले पैसे खुप आनंद देतात. असा आपल्या सर्वांचाच अनुभव आहे आणि तो मी ही त्यादिवशी घेतला. म्हणजे बघा मी जीवनविद्या मिशनला दहा हजार दिले तर दोन दिवसात माझ्याकडे ५० हजार आले. मग मी नामेंद्रने दिलेला चेक परळ शाखेत दिला. काही दिवसांपुर्वी ६ व्या वेतन आयोग लागू झाल्याने पतिंना १लाख ४० हजाराचा चेक मिळाला. BARC मध्ये Performance Bonus ची पध्दत सुरू झाली आणि प्रत्येक कर्मचाऱ्याला त्याचे रेकॉर्ड पाहून बोनस देऊ लागले. पतिंना जवळ जवळ ९० हजाराचा चेक मिळाला. मी जीवनविद्या मिशनला देणगी दिल्यानंतर ६ वा वेतन आयोग लागू झाल्याने महागाई भत्ता व इतर थकबाकी मिळून सुमारे साडेचार लाख पतिंना मिळाले आणि आता काही दिवसापुर्वीच त्यांना डबल प्रमोशन मिळाले व त्यांचा पगार वाढला आहे. नामेंद्र अमेरिकेत नोकरी संभाळून पुढचे शिक्षण घेत आहे त्याचबरोबर त्याची पत्नी केतकीसुध्दा सी. ए. चे शिक्षण अमेरिकन युनिव्हर्सिटीमधून घेत आहे. नामेंद्रला इन्क्रिमेंट मिळाले असून त्याचाही पगार वाढला आहे.
Action and Reaction are equal and opposite हा निसर्गाचा नियम आहे. भिंतीवर मारलेला चेंडू मारणाऱ्याकडेच परत येतो. श्रीसद्गुरूंनी नवा सिध्दांत मांडला. Sometimes reactions are multiplied and magnified. त्याचे स्पष्टीकरण श्रीसद्गुरू असे देतात की, जी सुक्ष्म गोष्ट आपण इतरांना देतो ती सहस्त्र पटीने आपल्याकडे परत येते. पण स्थुल पैसा माझ्याकडे अनेक पटीने परत आला. असे चमत्कार केवळ जीवनविद्या मिशनमध्येच आपल्याला अनुभवयाला मिळतात. मला सांगायला अतिशय आनंद होत आहे की, माझ्याकडून १,००,०० रूपये देणगी देऊन झाले. पण मी इथेच थांबणार नाही. मी आणि माझा मुलगा चि. नामेंद्र जीवनविद्या मिशनला धनपुरवठा करणारच. तर मला वाचकांना हे आवाहन करावेसे वाटते की, मी जे केले ते आपणही करावे. आनंद वाटता वाटता आनंद लुटावा.
दुसरा महत्त्वाचा मुद्दा मला इथे नमुद करावासा वाटतो की, तो कलेक्शनविषयी. ८ मार्च २०१०च्या कार्यक्रमाआधी मंडळाकडून प्रत्येक शाखेला काही पावती पुस्तके देण्यात आली. चेंबुर शाखेच्या सचिव प्रेमा बांदेलकर यांनी २ पावती पुस्तके माझ्या हातात दिली. मी घरी गेल्यावर माझे चिंतन सुरू झाले. आता लोकांना पैसे कसे मागायचे? पैसे कसे गोळा करायचे? पण मला काही उत्तर मिळेना. दुसऱ्या दिवशी मी श्रीसद्गुरूंना फोन लावला. सर्व काही त्यांना सांगितले व कशाप्रकारे हे कार्य करावे अशी विचारणा केली असता ते म्हणाले, ?अग, तुझे जे फॅनस् आहेत ना त्यांना विचार आणि हे लक्षात ठेव, हे पैसे तू तुझ्यासाठी मागत नाहीस. कार्यासाठी मागतेस त्यामुळे अहंकाराचा प्रश्नच येत नाही.? (म्हणजे कोणी पैसे नाही दिले किंवा काही बोलले तर वाईट वाटण्याचा प्रश्न येत नाही.) चर्चेमधला ?फॅन? हा त्यांचा शब्द मनाला खुप भावला आणि माझ्या काही नामधारक मैत्रिणींना फोन लावला. त्यांची appointment घेतली. त्यांच्या घरी जाऊन collection केले. त्यावेळी त्या मैत्रिणींचे शब्द मला आठवतात. त्या म्हणाल्या, ?वंदना हे पैसे मी तुझ्याकडे पाहून देते. कारण तू श्रीसद्गुरूंची निष्ठावान शिष्या आहेस. त्यामुळे तुला देताना मला आनंदच वाटेल.? काहीजण असे म्हणाले की, सद्गुरू श्री वामनराव पै यांचे कार्य आम्हाला माहित आहे. त्यांची पुस्तके आम्ही वाचली आहेत. तर कोणी असे म्हणाले की त्यांची प्रवचने आम्ही रेडिओवर ऐकली आहेत. काहींनी असे सांगितले की, मी त्यांच्या प्रवचनाला मी नियमितपणे जाते. तर काही असे म्हणाले की, मी त्यांचा अनुग्रह घेतलेला नाही पण या ग्रेट माणसाच्या ग्रेट कार्याची आम्हाला जाणीव आहे. त्यामुळे त्यांच्या कार्याला पैसे देताना आम्हाला खुप आनंद वाटतो. नंतर मी काही आमदारांकडे गेले. कुर्ल्याचे नगरसेवक श्री नवाब मलिक यांच्याकडे गेले असता ते म्हणाले की श्रीवामनराव पै यांचे नाव मी ऐकले आहे आणि त्यांनी खिशात हात घालून ५०००रूपये काढून दिले आणि बघता बघता माझी २ पावती पुस्तके खपली. मला या कार्याने खुप आनंद दिला. कलेक्शनच्या निमित्ताने अनेक लोकांकडे जाणे झाले. त्या निमित्ताने गप्पा झाल्या. पण मनाला एक गोष्ट जाणवली की काही लोकांकडे बराच पैसा आहे आणि त्यांना तो दान करायचा आहे पण ज्या संस्थेला तो त्यांना दान करायचा आहे त्या संस्थेवर त्यांचा विश्वास नाही. त्यांना जर आपण आपल्या संस्थेची योग्यप्रकारे माहिती दिली व त्यांना आपल्या कार्याविषयी पटवून देऊ शकलो तर ते आपल्याला नक्की पैसे देतात.
काहींनी पैसे नाही दिले. काहींनी आज देतो, उद्या देतो असे सांगून टोलवाटोलव सुध्दा केली पण मी आजही त्यांच्याशी चांगले संबंध राखून आहे कारण श्री सद्गुरूंचा असा अमृततुषार आहे की, ?कोण, कोणाला, केव्हा, कसा, उपयोगी पडेल ते ब्रम्हदेवही सांगू शकत नाही तेंव्हा सर्वांशी सलोख्याचे संबंध राखण्यात खरे शहाणपण आहे.?
दुसरा महत्त्वाचा मुद्दा मला नमुद करावासा वाटतो. कुठल्याही गोष्टीचा संचय करणे चांगलेच. आज काही माणसांकडे पैसा आहे. त्यांनी फार मोठ्या प्रमाणात पैशाचा संचय केला आहे. पण संचय किती करावा याला काही मर्यादा आहे. ज्याप्रमाणे साठवून ठेवलेल्या पाण्यावर शेवाळ साचते. साठवलेल्या धान्याचा वापर केला नाही तर ते खराब होते आणि ते फेकून द्यावे लागते. म्हणजे त्याला बंदिस्त न ठेवता त्याचा वापर केला पाहिजे. अगदी त्याचप्रमाणे गडगंज संपत्ती घरादाराला गंज आणते. त्या धनाला सुध्दा Ventillation ची मोकळ्या हवेची गरज आहे. आपल्या धनाची आवक जावक झाली पाहिजे.
श्रीसद्गुरूंनी शिकविले आहे की, योग्य मार्गानेच पैसा आपल्या घरी आला पाहिजे आणि श्री प्रल्हाद दादांनी कोर्समध्ये आपल्याला शिकविले आहे की, आपण मिळविलेला पैसा योग्य मार्गानेच खर्च झाला पाहिजे. श्रीसद्गुरू आपल्याला सांगतात की सत्कर्म केल्याने पुण्य मिळते. मला असे वाटते की आपण सत्कर्म करणे चांगलेच पण श्रीसद्गुरूंप्रमाणे दुसऱ्याला सत्कर्म करण्यास प्रवृत्त करणे हे महापुण्य आहे. गुजराथी समाज खुप श्रीमंत आहे. माझ्या अनेक मैत्रिणी गुजराथी आहेत. या गुजराथी समाजात एक खुप छान प्रथा आहे. ते म्हणतात, आज तुम्ही व्यापारात किती नफा मिळवला. १ रूपया. तर याचे ४ भाग करा. १ भाग कुटुंबाच्या गरजांसाठी, १ भाग मनोरंजनासाठी, १ भाग गुंतवणुकीसाठी आणि एका भागाचे दान करा. गुजरातील समाजातील ही प्रथा आपणही अंगिकारली पाहिजे. आपल्या कुटुंबाच्या गरजा भागल्यावर उरलेल्या पैशातून आपण कर्जत प्रोजेक्टला देणगी दिली पाहिजे. जीवनविद्येच्या वास्तू उभारणीला आपण हातभार लावलाच पाहिजे कारण भावी पिढीसाठी जीवनविद्या जतन झालीच पाहिजे. श्रीसदगुरूचरणी सौ. वंदना बेल्हे
|