1.What should be my view to look at those traditions?
2.And how should I celebrate them ?I mean as a Jeevanvidya mission's member what special thing should I do?
These questions came in my mind as one of my friend reminded me ,don't look at moon on 'Vinayak Chaturthi'.
सर्वांना नमस्कार,
१) दरवर्षी गणेशोत्सव येत असतो.? प्रत्येकवेळेस चंद्रदर्शन न करण्याबद्दल आपल्याला आठवते किंवा कोणीतरी आठवण करून देते.? म्हणजे असे दरवर्षी नियमीतपणे घडत असेल तर या नियमीतपणे घडणाऱ्या घटनेचा आपल्याला चांगल्यारितीने उपयोग करून घेता आला तर किती छान होईल?
२) चंद्र हा मनाचा कारक आहे असे ज्योतिष शास्त्रात मानले जाते.? चंद्राचा मनावर परिणाम होत असतो त्यामुळे पोर्णिमा व अमावास्या या दोन दिवशी मनोरुग्णांच्या लक्षणात वाढ होते असे मनोवैज्ञानीक काही प्रमाणात? मान्य करतात.? त्याचे कारण असे सांगितले जाते की, समुद्राच्या पाण्यावर चंद्राचा परिणाम होतो त्यामुळे भरती व ओहोटी येते.? माणसाच्या शरीरात ७० टक्के पाणि असते त्या पाण्यावरही चंद्राचा परिणाम होत असणार.? त्यामुळे त्याचा परिणाम मनावरही होत असणार.? पण सर्वसामान्य माणसांच्या मनापेक्षा मनोरुग्णांचे मन कमकुवत असल्याने त्यांच्याबाबतीत हा परिणाम लागलीच लक्षात येतो इतकेच.?
पण हे मुद्दे महत्वाचे नाहीत.? चंद्र रोज एका कलेने बदलतो.? त्यामुळे तो चंचल आहे असे समजले जाते.? येथे चंद्र हे चंचलपणाचे रूपक आहे.? गणेश चतुर्थीच्या दिवशी चंद्राकडे पाहावयाचे नाही याचा असा अर्थ असा आहे की, मी जी साधना करत आहे, करणार आहे त्यामधे आजपासून चंचलपणा येऊ देणार नाही.? त्या साधनेत मी आजपासून स्थीर होण्याचा प्रयत्न करेन.? ती साधना मी आजपासून निग्रहाने, अट्टाहासाने करेन.
३) चोरी याचा अर्थच असा आहे की जे आपल्या मालकीचे नाही त्याची अभिलाषा बाळगणे किंवा जे दुसऱ्याच्या मालकीचे आहे त्याची हाव बाळगणे.? मनाच्या या स्थितीतून अथवा मनातील या विचारातून माणूस चोरी करावयास प्रवृत्त होतो.? थोडक्यात चोरी याचा अर्थ मोहाला बळी पडणे असा होतो.? गणेशचतुर्थीला चंद्रदर्शन घेतले तर चोरीचा आळ येतो याचा खरा अर्थ असा आहे की, मी जी साधना करत आहे, ती करत असताना जर मी चंचलपणा सोडून दिला नाही तर मी मोहाला बळी पडण्याची शक्यता आहे.
४) आळ येणे म्हणजे एखाद्यी गोष्ट आपण केलेली नसूनही ती आपण केली असण्याचा आपल्यावर आरोप होणे.? आपणाला मोह झाला तरी आपल्यावरील सुसंस्कारामुळे आपण ती वाईट गोष्ट प्रत्यक्षात करत नाही ईतकेच.? म्हणजेच एखादी वाईट गोष्ट न करताही ती गोष्ट करण्याचे मनात आल्याने ती गोष्ट जणूकाही प्रत्यक्षात केल्याचे फळ आपल्याला मिळते असे 'आळ' या शब्दातून सूचित होते.
५) म्हणजे असे म्हणता येईल की, "गणेश चतुर्थीला चंद्राकडे बघू नकोस." असे जर पुढेमागे कोणी आपल्याला सांगितले, तर त्यामुळे 'आपण आपली साधना निग्रहाने केली पाहिजे' या विचाराची आपण आपल्या मनातल्या मनांत उजळणी करू.? शिवाय "काय ही अंधश्रध्दा? शी!"? अशा प्रकारचे नकारात्मक विचार आपल्या मनाला शिवणार नाहीत.? जर आपण उत्सवात भाग घेताना त्यातील अंधश्रध्दा यापध्दतीने वगळू शकलो तर ते उत्सव आनंददायी बनू शकतील.? (इतकेच नव्हे तर खरा अर्थ आपल्याला माहित असल्याने) दुसऱ्यांची श्रध्दा अथवा अंधश्रध्दा दुखाविण्याचे आपल्याला काही कारणच पडणार नाही.? गीता दातार हेच सांगत आहेत की,
1) "If you exclude andhashraddhaa from festivals then festivals are celebration of happiness.
2) As a jeevanvidya sadhak I do not believe in andhashraddha but I make it a point not to hurt anyones shraddha or andhashraddha."
६) तसेच खरा अर्थ आपल्याला माहित असल्याने, जर आपल्या जवळच्यांपैकी कोणीतरी ह्यातील अर्थ जाणण्याची जिज्ञासा दाखवली तर खरा अर्थ आपण त्याला नीट समजावून सांगू शकू.? ज्यांना खरा अर्थ समजावून घेण्याची आवश्यकता वाटत नसेल तर त्यांच्याशी आपण तो विषय सोडून इतर विषयांवर बोलू शकू.? इथेही गीता दातार हेच सांगत आहेत.
"Those who are closer to me and show interest in Jeevanvidya I am very happy to explain to them why I exclude andhashraddha from festivals but with others I talk about celebration and happiness.
"
गीता दातार यांनी मांडलेले सर्व मुद्दे मला त्यामुळे जास्त भावले व? गीता दातार यांनी दिलेल्या उत्तरात मला शहाणपण ठासून भरलेले आहे असे वाटले.