prashant1406
Junior Contributor

Offline
Posts: 42
|
 |
« on: September 07, 2006, 04:40:28 PM » |
|
Sadguru tells us ?Vicharaana paha,? mag tyna dhara, tyana vakva, ani tyna valva?.
I want to know how we can divert our thoughts (Vicharana Valva) ? Could you please help me with example?
Regards,
Prashant Adkar
|
|
|
|
|
Deepak_jvm
Global Moderator
Senior Contributor
Offline
Posts: 125
|
 |
« Reply #1 on: September 07, 2006, 07:17:40 PM » |
|
Dear Prashant, Answer to your question in one word is "Prayer"
God Bless You, Deepak
|
|
|
|
|
prashant1406
Junior Contributor

Offline
Posts: 42
|
 |
« Reply #2 on: September 08, 2006, 11:54:07 AM » |
|
Dear Deepak
Thanks for your reply but I am sorry I am not fully satisfied with your reply. May be I am wrong but still I am happy if you could explain me in detail.
Dear Sham Bhagwat could you pl help me?
Regards,
Prashant Adkar
|
|
|
|
|
shambhagwat
Guest Members
Ultimate Contributor
Offline
Gender: 
Posts: 308
|
 |
« Reply #3 on: September 09, 2006, 08:55:22 AM » |
|
नमस्कार प्रशांत आडकर,
श्री. दीपक यांनी दिलेले उत्तर बरोबर आहे.? तरीपण तुम्ही म्हटल्याप्रमाणे मी सविस्तर उत्तर देण्याचा जरूर प्रयत्न करेन.? पण हा विषय भरपूर साधना केल्यानंतर साधकाने कसे वागायचे असते किंवा काय काळजी घ्यावयाची असते या संदर्भात असल्याने उत्तर द्यायला थोडा वेळ लागेल.
सर्वांना नमस्कार. सर्वांना शुभेच्छा. शाम भागवत.
|
|
|
|
|
prashant1406
Junior Contributor

Offline
Posts: 42
|
 |
« Reply #4 on: September 09, 2006, 11:40:45 AM » |
|
Dear Sham
I do agree with reply given by Mr.Deepak. I am also agreeing that it required lot of ?Sadhna? to understand this subject.
You can take your own time for replay but do reply. I am eagerly waiting for your reply mean while I request to all namdhark if they can share their views.
Good Bless you,
Prashant Adkar
|
|
|
|
|
shambhagwat
Guest Members
Ultimate Contributor
Offline
Gender: 
Posts: 308
|
 |
« Reply #5 on: September 09, 2006, 09:58:09 PM » |
|
नमस्कार प्रशांत आडकर,
"विचारांना पहा, मग त्यांना धरा, त्यांना वाकवा आणि त्यांना वळवा."? हे वाक्य सोपे वाटण्यासाठी आपण वरील वाक्यातील 'विचार' हा शब्द तात्पुरता बाजूला ठेऊ.? म्हणजे असे लक्षात येईल की, या वाक्यात पहाणे, धरणे, वाकवणे व वळवणे ही क्रियापदे आहेत.
प्रथम आपण पहाणे ह्या क्रियापदाचा अर्थ लक्षात घेण्याचा प्रयत्न करू.? जर आपण दोघे एकमेकांना भेटलो तर आपण दोघे एकमेकांना पाहू शकू.? कारण मी व तुम्ही वेगवेगळे आहोत.? मात्र असे असले तरी मी मला पाहू शकत नाही.? अगदी आरसा घेऊन मी मला पाहाण्याचा प्रयत्न केला तरीही जास्तीत जास्त मी माझे प्रतिबिंब पाहू शकतो कारण ते माझ्यापेक्षा वेगळे आहे.? म्हणजे असे म्हणता येईल की, जी गोष्ट आपल्याला पहावयाची असते ती आपल्यापेक्षा वेगळी असली पाहिजे.?
आता 'विचार पहावयाचे' याचा विचार करण्याचा प्रयत्न करू.? सामान्यत: आपल्या मनांत विचार येतात व त्या विचारांशी आपण एकरूप होतो.? म्हणजेच विचारांचे व आपले अस्तित्व वेगवेगळे राहात नाही आणि त्यामुळेच आपण विचारांना पाहू शकत नाही.? म्हणजेच विचार व आपण यांचे वेगवेगळे अस्तित्व आपण ठेऊ शकलो तरच आपण विचारांना पाहू शकू असे म्हणता येईल.? हे आणखी सोप्या भाषेत सांगावयाचे झाल्यास असे म्हणता येईल की, सामान्यत: आपल्या मनात विचार येतात व मनांत आलेल्या त्या विचारांबरोबर आपण वहात जातो, त्यामुळे आपण विचारांकडे वेगळेपणाने पाहू शकत नाही.? आपले हे विचारांबरोबर वाहाणे जेव्हां थांबेल, म्हणजे आपण जेव्हां कोठेतरी स्थीर होऊ तेव्हांच मनांत येणाऱ्या विचारांना आपण पाहू शकू.
विषय आणखी स्पष्ट करण्यासाठी असे म्हणता येईल की, आपले मन, मनांत येणाऱ्या विचारांबरोबर वाहात जाऊ नये यासाठी त्या मनाला बांधून ठेवण्याची आवश्यकता आहे.? ?मात्र एखाद्या शत्रूला जसे आपण करकचून बांधून ठेऊ तसे हे बांधणे नसले पाहिजे.? कारण आपले मन, हे आपले शत्रू नसून मित्र आहे.? फक्त या जवळच्या मित्राला त्याच्याकडे पाहुणे म्हणून आलेल्या कुठल्याही विचारांबरोबर, त्या पाहुण्यांची (विचारांची) जराही पारख न करता वाहात जाण्याची चुकीची सवय लागली आहे इतकेच.? या चुकीच्या सवयीपासून आपल्या या जवळच्या मित्राला सोडवण्यासाठी त्याला आपण बांधून ठेवत आहोत हे आपण विसरता कामा नये.
घरात आपण कुत्रा पाळतो.? त्याच्यावर प्रेम करतो.? त्याला खायला घालतो.? पण त्याच बरोबर ते कुत्रे घरात केव्हाही, कसेही व कुठेही हिंडायला लागले तर मात्र आपण त्याला बांधून ठेवतो.? जरी त्या कुत्र्याला बांधून ठेवले तरी त्याला उठणे, बसणे वगैरे सर्व क्रिया करता येतात.? ते हिंडू, फिरूही शकते पण त्याला बांधलेल्या साखळीच्या परिघातच ते हिंडू शकते.? त्या साखळीचा परिघ त्या कुत्र्याने ओलांडायचा प्रयत्न केला तर मात्र त्याच्या मानेला हिसका बसतो व ते तेथेच थांबते.? आपल्याला आपल्या मनाला बांधून ठेवावयाचे आहे ते या प्रकारे असले पाहिजे.? आपल्या मनाला सर्व चांगल्या गोष्टी करता आल्या पाहिजेत.? पण जर ते मन एखादी चुकीची गोष्ट करू लागले तर मात्र त्या मनाला एक हिसका बसून ते चुकीचे वागायचे थांबले पाहिजे.
मन हे सूक्ष्म असल्याने त्याला बांधून ठेवायचे साधनही तसेच सूक्ष्म असले पाहिजे.? हे सूक्ष्म साधन म्हणजे भगवत्नाम किंवा विश्वप्रार्थना.? जेव्हां आपण नामस्मरण करत असतो किंवा विश्वप्रार्थना करत असतो तेव्हां जणू आपण आपल्या मनाला भगवत्नामाने अथवा विश्वप्रार्थनेने बांधत असतो.? म्हणजेच इतरवेळेस ते मन मोकळे असते असे म्हणता येईल.? मन असे कधीही मोकळे सुटू नये यासाठीच अखंड नामस्मरण किंवा विश्वप्रार्थना करावयाची असते.
यानंतर या अखंड नामस्मरणाने अथवा विश्वप्रार्थनेने आपले मन कसे बांधले जाते व आपण विचारांना कसे पाहू शकतो हा प्रकार चांगल्यापैकी गुंतागुंतीचा असल्याने सोप्या शब्दात ते मांडणे अगदी अवघड होत चालले आहे.? पण डोक्यातील विचारांची गर्दी जरा कमी झाली की एक-दोन दिवसात मी नक्की लिहीन.
सर्वांना नमस्कार. सर्वांना शुभेच्छा. शाम भागवत.
|
|
|
|
|
shambhagwat
Guest Members
Ultimate Contributor
Offline
Gender: 
Posts: 308
|
 |
« Reply #6 on: September 09, 2006, 10:02:18 PM » |
|
jpg attachment continued
|
|
|
|
|
shambhagwat
Guest Members
Ultimate Contributor
Offline
Gender: 
Posts: 308
|
 |
« Reply #7 on: September 10, 2006, 11:36:21 AM » |
|
नमस्कार प्रशांत आडकर,
आपण जेव्हां माळ घेऊन किंवा एका ठिकाणी बसून नामस्मरण अथवा विश्वप्रार्थना करत असतो तेव्हां ते आपण जाणतेपणाने करत असतो.? अशावेळेस आपल्या मनात जर दुसरे विचार येऊन गेले तरी काही काळानी आपल्या लक्षात येते की, आपण जरी साधना करत असलो तरी आपले लक्ष साधनेत नव्हते.? ईतकेच नव्हे तर आपल्या मनात कुठले विचार येत होते हे पण आपण सांगू शकतो.? ?म्हणजे एक प्रकारे मनांत येऊन गेलेले विचार पाहाण्याचाच हा प्रकार आहे असे म्हणता येईल.? तसेच त्यावेळेस आपण साधना करत असल्यामुळेच हे आपल्या लक्षात येऊ शकले अन्यथा असे विचार मनात येऊनसुध्दा व त्या विचारांबरोबर वाहात जाऊनसुध्दा ते आपल्या लक्षातही आले नसते असे म्हणता येईल.
खरे पाहाता आपल्या साधनेमुळे प्राप्त झालेला हा पहिला अनुभव आहे.? आपले मन आपल्या ताब्यात नाही हे लक्षात आणून देण्याचे कार्य हा अनुभव करतो असे म्हटले पाहिजे.? हा अनुभव आल्यामुळेच तर आपण आपली साधना आणखी काळजीपूर्वक केली पाहिजे हा विचार दृठ होतो.? आणि म्हणूनच हा अनुभव आल्यावर साधनेत लक्ष लागत नाही अशी तक्रार करण्याऐवजी साधनेत लक्ष ठेवण्याचे कसून प्रयत्नाला लागणे इष्ट ठरते.? कारण साधकाने जोराने प्रयत्नाला लागावे हेच तर या अनुभवाचे कार्य आहे.? असो.
आपण आपली साधना दोन प्रकारे करत असतो.? पहिली पध्दत म्हणजे जाणीवपूर्वक एका जागी बसून व दुसरी पध्दत म्हणजे फावल्या वेळेत किंवा आपले मन रिकामे असेल तेव्हां. या दोन्ही वेळेस आपल्या नकळत हे नामस्मरण अथवा विश्वप्रार्थना आपल्या अंतर्मनात उतरत असते किंवा भरली जात असते.? फक्त या दोन्ही पध्दतीत थोडा फरक आहे.
पहिल्या पध्दतीत आपण आपली साधना जाणीवपूर्वक करत असतो.? म्हणजे आपण आपली साधना जाणीवपूर्वक आपल्या अंतर्मनात उतरवत असतो.? दुसऱ्या शब्दांत सांगावयाचे झाल्यास बहिर्मनाने अंतर्मनाला ही जाणीवपूर्वक दिलेली शिकवणूक किंवा आज्ञा असते.? त्यामुळे ज्याला आपल्या अंतर्मनात आपली साधना लवकर उतरावी असे वाटत असेल त्याने या प्रकारे करावयाच्या साधनेचा कालावधी वाढवला पाहिजे.?
दुसऱ्या पध्दतीतही आपली साधना अंतर्मनात उतरत असली तरी त्याबरोबर आणखी एक संदेश आपण आपल्या अंतर्मनाला देत असतो.? जेव्हा जेव्हा बहिर्मन रिकामे असेल किंवा बहिर्मनाला जेव्हा जेव्हा फावला वेळ असेल तेव्हा तेव्हा ही साधना सुरू करायची असते अशी सूचना किंवा शिकवण आपण आपल्या अंतर्मनाला देत असतो.
याचा परिणाम असा होतो की, बहिर्मन मोकळे आहे किंवा नाही यावर आपले अंतर्मन लक्ष ठेवायला सुरवात करते व जेव्हा बहिर्मन मोकळे आहे असे अंतर्मनाच्या लक्षात येते तेव्हा ताबडतोब आपले अंतर्मन आपली साधना सुरू करावयास लागते.? असे व्हायला लागले की, अखंड नामस्मरण किंवा अखंड विश्वप्रार्थना सुरू होण्याच्या प्रयत्नातील पहिले पाऊल उचलले गेले असे म्हणता येऊ शकेल.? आपल्याला हे माहित आहे की आपले अंतर्मन बहिर्मनाच्या दबावाखाली नांदत असते.? पण याप्रकारे आपले बहिर्मन आपला ताबा अंतर्मनाकडे द्यावयास सुरवात करते.? म्हणजे मालकाने नोकराला सांगावयाचे की माझ्यावर लक्ष ठेव व जर मी मोकळा आहे असे लक्षात आले तर माझ्याकडून अमूक हे काम करवून घे व त्या सांगण्याप्रमाणे नोकराने त्या आज्ञेची इमाने इतबारे अंमलबजावणी करायची असा हा सर्व प्रकार असतो.? हीच अंतर्मन व बहिर्मन यांची युती होण्याची सुरवात होय व याचप्रकारे अंतर्मनात बहिर्मन हळू-हळू विलीन व्हायला सुरवात होते.? मात्र याची सुरवात व्हायला किती महिने अथवा वर्षे लागतील हे तो साधक आपली साधना किती अट्टाहासाने व दिवसाचा किती काळ करत आहे यावर अवलंबून असते.
|
|
|
|
|
shambhagwat
Guest Members
Ultimate Contributor
Offline
Gender: 
Posts: 308
|
 |
« Reply #8 on: September 10, 2006, 11:37:37 AM » |
|
अशा रितीने आपले बहिर्मन आपल्या अंतर्मनाद्वारे बांधले जायला लागते.? पण हे बांधण्यासाठी नामस्मरणातील किंवा विश्वप्रार्थनेतील शब्द वापरले जात नाहीत तर त्यातील अर्थ (यालाच 'भाव' असे म्हटले जाते.) वापरला जातो.? कुत्र्याला आपण साखळीने बांधतो.? येथे बहिर्मनाला बांधण्यासाठी वापरलेली साखळी म्हणजे नामस्मरणाचा अथवा विश्वप्रार्थनेचा भाव होय.? यावरून आपल्या लक्षात येईल की, आपण नामस्मरण विठ्ठलाचे करतो का शंकराचे करतो याला, म्हणजे शब्दांना महत्व नसून त्यातील भावाला महत्व आहे.
आपले बहिर्मन अशा प्रकारे अंतर्मनाकडून बांधले गेलेले असताना बहिर्मनात कुठलाही विचार आला व त्या विचारांबरोबर बहिर्मनाने त्याच्या नेहमीच्या सवयीनुसार वाहात जायला किंवा त्या विचाराबरोबर एकरूप व्हायला जरी सुरवात केली तरी, बहिर्मनाला ज्या भावाने (साखळीने) बांधलेले आहे त्याच्या विरोधात तो विचार असेल तर या साखळीला एक हिसका बसतो व आपले बहिर्मन एकदम वाहात जायचे थांबते.? दुसऱ्या शब्दात सांगावयाचे झाल्यास बहिर्मनात आलेला विचार व आपले बहिर्मन दोघेही एकदम वेगवेगळे होतात व आपल्या बहिर्मनात आलेला विचार आपले बहिर्मन पाहू शकते.
यालाच सद्गुरू "विचारांवर जागृत राहून लक्ष ठेवण्याची कला" असे म्हणत आहेत.? दुसऱ्या शब्दात सांगावयाचे झाल्यास ज्या प्रमाणात अखंड नामस्मरण अथवा विश्वप्रार्थना आपण करू लागू त्याप्रमाणात विचारांना पाहाणे आपल्याला जमू लागते असे म्हणता येईल.
विचारांना पाहाणे एकदा का जमू लागले की त्यांनतरच धरणे, वाकवणे व वळवणे हे शक्य आहे.
सर्वांना नमस्कार. सर्वांना शुभेच्छा. शाम भागवत.
|
|
|
|
|
shambhagwat
Guest Members
Ultimate Contributor
Offline
Gender: 
Posts: 308
|
 |
« Reply #9 on: September 10, 2006, 11:42:01 AM » |
|
jpg attachment continued.
|
|
|
|
|
shambhagwat
Guest Members
Ultimate Contributor
Offline
Gender: 
Posts: 308
|
 |
« Reply #10 on: September 10, 2006, 10:58:08 PM » |
|
नमस्कार प्रशांत आडकर,
विचारांना धरण्यासंबंधी विचार करायला लागल्यावर असे लक्षात येते की, आपल्या मनात हजारो विचार येतात व हे सर्व विचार धरायचे ठरवल्यास हेच काम इतके मोठे होऊन बसेल की, त्यांनतर ते वाकवणे व वळवणे यांना आपल्याला वेळच मिळणार नाही.? इतकेच काय आपण आपली दैनंदीन कामे सुध्दा करू शकणार नाही इतके हे काम मोठे होऊन बसेल.
याचा अर्थ असा होतो की, सद्गुरू मनात येणारे सगळेच विचार धरायला सांगत नाही आहेत.? ?म्हणजे कुठले विचार धरायचे हे निश्चीत करायला पाहिजे.? विचारांचे तीन प्रकार असतात.? पहिला प्रकार म्हणजे अशुभ विचार.? हे नक्कीच धरायचे नाहीत तर ते मनातून काढून टाकायचे.? दुसरा प्रकार म्हणजे शुभ विचार.? हे मनात येण्यासाठीच तर आपली धडपड आहे.? त्यांना धरून त्यांच्यावर कुठलीच प्रक्रिया करायची नसून आपल्याला ते सरळ आपल्या अंतर्मनांत भरावयाचे आहेत.? तिसरा प्रकार म्हणजे अशुभ व शुभ यांची सरमिसळ झालेले विचार.? ह्या विचारांच्या बाबतीत मात्र आपल्याला जास्त विचार करायला लागतो.? जर ते मनातून काढून टाकले तर त्या विचारात जे शुभ आहे ते आपण गमावतो.? जर ते आहे तसेच अंतर्मनात भरले तर त्या विचारातील अशुभ भाग कालांतराने आपल्यालाच त्रास देण्याची शक्यता असते.? याचा अर्थ असा की, हेच विचार आपल्याला धरले पाहिजेत व त्यांच्यावर पुढची प्रक्रिया म्हणजे वाकवणे व वळवणे केली पाहिजे.
विचार मनाने धरणे म्हणजे मनात धारण करणे होय.? यालाच 'मनन' असे म्हणता येईल.? हे विचार आपल्याला धरायचे आहेत ते त्यांना नीट न्याहाळण्यासाठी किंवा नीट समजावून घेण्यासाठी.? प्रथमदर्शनी विचार धरणे ही एक सोपी गोष्ट वाटत असली तरी सामान्य माणूस विचारांना धरू शकत नाही तर साधारणत: ते विचारच त्याला धरतात.? जर आपण विचारांना धरू शकलो तरच आपण त्यांना वाकवू शकतो व वळवू शकतो.? पण याउलट विचारांनीच जर आपल्याला? धरले तर हेच विचार आपल्याला वाकवतात व वळवतात.? भय, चिंता, काळजी या संदर्भातल्या विचारांनी एकदा का माणसाला धरले की, त्यातून सुटणे भल्या भल्या माणसांना शक्य होत नाही हे लक्षात घेतले तरच विचार धरणे ही गोष्ट सोपी आहे की अवघड आहे हे लक्षात येऊ शकेल.
सर्वांना नमस्कार. सर्वांना शुभेच्छा. शाम भागवत.
|
|
|
|
|
Geeta Datar
Junior Contributor

Offline
Gender: 
Posts: 75
|
 |
« Reply #11 on: September 12, 2006, 10:54:52 AM » |
|
Namaskar everyone
As we start chanting vishwaprarthana we slowly realise that vishwaprarthana is replacing our thoughts. The number of thoughts minimise. This is the first step as Sadguru says vicharana paha ( watch your thoughts ).
We start realising the importance of divine thought( Vishwaprarthana and Vitthal naam ). We then hold on to this divine thought . This is the second step Vicharana dhara ( tightly hold on to this divine thought).
The third step Vicharana vakava( bend thoughts) and fourth step vicharana valva(Turn the direction of thoughts ) are the most important steps in spirituality and require akhand naamsmaran and Sadguru's guidance.
What Sadguru means by bend and turn the direction of thoughts is, all this time our thoughts are about outside world and our thoughts are the outcome of our vasanas( desires ).When we do the second step of holding on to divine thought we start getting fulfillment in our materialistic desires and feel like turning around our thoughts and look inwards. We start bending our thoughts and thus the third step begins.
By sadguru's guidance we ultimately become successful in turning the direction of our thoughts. It is called Ufarati Dristi. That is the way to self realisation.
AKHAND NAAMSMARAN AND VISHWAPRARTHANA IS THE ONLY WAY TO REACH THE FOURTH STEP.
Let God bless us all with akhand naamsmaran.
Vitthal Vitthal
Geeta Datar
|
Vitthal Vitthal
|
|
|
prashant1406
Junior Contributor

Offline
Posts: 42
|
 |
« Reply #12 on: September 13, 2006, 10:17:02 AM » |
|
Hey Sham
You have done a great job. Thank you very much for your fantastic reply. Since I am not in town I saw your reply in cyber. I have taken print out and I think I need to read your reply again and again so that I could understand in detail.
Once again thanks for such wonderful reply. Your explanation along with example definitely helps me to clear my concept.
God bless you
With warm regards,
Prashant Adkar
|
|
|
|
|
shambhagwat
Guest Members
Ultimate Contributor
Offline
Gender: 
Posts: 308
|
 |
« Reply #13 on: September 13, 2006, 04:43:03 PM » |
|
नमस्कार प्रशांत अडकर,
विचाराना जेव्हा धरलेले (मनन) असते तेव्हा तो विचार आपल्याला हळू-हळू समजायला लागतो.? आणि तो जसजसा समजायला लागतो त्याप्रमाणात त्याला वाकवणे म्हणजे चिंतन सुरू होते.? बऱ्याच वेळेस हे चिंतन चालू असताना त्या विचाराची एखादी नवीच छटा एकदम आपल्या लक्षात येते व त्यातून परत मनन सुरू होते.? म्हणजे त्या नवीन छटेसंबंधी मन नव्याने माहिती गोळा करायला लागते.? हे मनन (धरणे) व चिंतन (वाकवणे) ह्या दोन्ही प्रक्रियेमधे फरक असूनही या दोन्ही प्रक्रिया एकमेकांत इतक्या मिसळलेल्या असतात की, केव्हा मनन सुरू झाले व केव्हा चिंतन सुरू झाले हे आपल्या लक्षात येऊ शकत नाही.? म्हणजे मनन व चिंतन वेगवेगळे असूनही ते वेगवेगळे करता येत नाही.? म्हणून मनन,चिंतन हे शब्द साधारणत: जोडीनेच वापरले जातात.?
विचारांना वाकवणे म्हणजे विचाराबद्दल प्राप्त झालेल्या माहितीच्या साहाय्याने साधक-बाधक विचार करणे होय.? या प्रक्रियेत त्या विचाराचा कीस काढला जातो.? त्या विचारातील योग्य-अयोग्य किंवा शुभ-अशुभ यांचे मिश्रण ओळखून ते वेगवेगळे करणे ही प्रक्रिया 'वाकवणे' या शब्दात अभिप्रेत आहे.? राजहंस जसे दूध व पाणि वेगळे करू शकतो त्याप्रमाणेच ही प्रक्रिया आहे.? ही प्रक्रिया करणाऱ्या मनाला नीर-क्षीर विवेक बुध्दी असेही म्हटले जाते.? थोडक्यात सांगावयाचे झाल्यास धरणे? म्हणजे एखादा विचार कल्पना शक्ती वापरून निरनिराळ्या दिशेने तो न्याहाळणे व तर्कशक्तीच्या साहाय्याने तो वाकवणे म्हणजे त्या विचाराचे परिशीलन करणे, त्या विचारातील चांगले वाईट बाजूला करणे किंवा त्या विचाराचे सार काढणे होय.
वाकवणे या शब्दातून आणखी एक गोष्ट लक्षात येते.? 'वाकवणारा' व 'ज्याला वाकवावयाचे तो' या दोन्हीमध्ये वाकवणारा जास्त ताकदवान असतो.? आपण ताकदवान असू तरच आपण विचारांना वाकवू शकतो.? याउलट सर्वसामान्य माणसामध्ये त्याच्या मनापेक्षा, मनात आलेले विचारच जास्त ताकदवान असतात त्यामुळे ते विचारच त्याला वाकवतात.
विचारांना वळवणे म्हणजे आपले जे धेय्य आहे त्या धेय्य प्राप्तीकरता तो विचार अनुकूल करून घेणे होय.? म्हणजेच एक प्रकारे आपले जे धेय्य आहे त्याला जे प्रतिकूल आहे ते वगळणे व अनुकूल ते शिल्लक ठेवून त्याचे धारण पोषण करणे होय.? दुसऱ्या शब्दांत सांगावयाचे झाल्यास, आपले धेय्य 'सतत शुभ चिंतन करणे' हे असल्याने त्या विचारातील शुभ फक्त ठेवणे (म्हणजे अंतर्मनात फक्त शुभच जाऊ देणे) व जे अशुभ असेल ते वगळणे होय.? येथेही वळवणारा व ज्याला वळवावयाचे तो विचार अशा दोन गोष्टी असून जो जास्त ताकदवान त्याची हुकमत दुसऱ्यावर असते.
यावरून असे लक्षात येईल की, धरणे, वाकवणे व वळवणे ह्या तीनही गोष्टी माणसाला जन्मत:च येत असतात व त्यांचा उपयोग मनुष्यप्राणी करतच असतो.? पण विचारांना पाहाण्याची शक्ती त्याचे जवळ नसल्याने पुढच्या सर्व प्रक्रिया त्याच्या चुकत जातात.? याउलट, विचारांना पाहाण्याची शक्ती (विचारांवर जागृत राहून लक्ष ठेवण्याची कला) ही जन्मत:च प्राप्त होत नसून ती प्रयत्नपूर्वक साध्य करण्याची गोष्ट आहे.? ही कला प्रथम मिळवायची असते.? मगच साधक अध्यात्मात प्रगती करू शकतो.? अट्टाहासाने नामस्मरण अथवा विश्वप्रार्थना करा; फावल्या वेळात अथवा मन रिकामे असताना करा; एकट्याने करा; समूहाने करा; पण सतत करा असे सद्गुरू सतत सांगत आहेत ते ही कला आपण प्राप्त करून घ्यावी म्हणूनच.
|
|
|
|
|
shambhagwat
Guest Members
Ultimate Contributor
Offline
Gender: 
Posts: 308
|
 |
« Reply #14 on: September 13, 2006, 04:49:54 PM » |
|
संदर्भ :- तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार १) आपल्याला आपले नशीब घडवायचे असेल तर केंद्रस्थानी असणाऱ्या या विचारावर नियंत्रण आणण्याची कला हस्तगत करता आली पाहिजे. पान क्र.६२
२) Mind moves from thought to thing हे तत्व लक्षात घेऊन विचार करणाऱ्याने विचार करून विचार करण्यास शिकले पाहिजे. पान क्र.६४
३) या सिध्दांताप्रमाणे जीवनाचा प्रवाहच आपल्याला हवा तसा बदलण्यासाठी व विचारांवर नियंत्रण मिळविण्यासाठी, विचारांवर जागृत राहून लक्ष (पाहाणे?) ठेवण्याची कला साधता आली पाहिजे. पान क्र.६४
४) विचारांवर जर सावध चित्त राहून लक्ष (पाहाणे?) ठेवता आले तर दोन महत्वाच्या गोष्टी घडतात.? एक म्हणजे विचार निर्मितीचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर घटते व दुसरी गोष्ट म्हणजे मनात चांगले, हिताचे, कल्याणाचे विचार येतात की वाईट, अहिताचे व अकल्याणकारक विचार येतात हे चटकन लक्षात येते.? याचा फायदा असा होतो की, वाईट विचारांची हकालपट्टी करून चांगल्या विचारांचे आपल्याला बीजारोपण करून त्यांचे धारण व पोषण करता येते. पान क्र.६५
सर्वांना नमस्कार. सर्वांना शुभेच्छा. शाम भागवत.
|
|
|
|
|
|