नमस्कार गीता दातार,
तुमच्या व माझ्या उत्तरात फरक पडला कारण आपली गृहितके वेगवेगळी होती.? विश्वप्रार्थना अथवा नामस्मरणाच्या संदर्भाने तुम्ही विचार केला असावा असे तुमचे उत्तर वाचून वाटले.
मात्र ज्यांचे चित्त सावध आहे अशा विचारवंतांनी कसा विचार केला पाहिजे किंवा असे विचारवंत कसा विचार करतात याबाबतचे स्पष्टीकरण सद्गुरूंनी यातून केले आहे असे मला वाटते.? किंबहुना सद्गुरू स्वत: कसा विचार करतात हेच त्यांनी उलगडून दाखवले आहे असेही म्हणता येईल.
नमस्कार प्रशांत आडकर.
हे वाक्य सद्गुरूंनी कुठला विषय समजावून सांगताना कुठे वापरलेले आहे हे तुम्ही सांगू शकाल काय?? खरे म्हणजे हा प्रश्न मी सर्वात प्रथम विचारायला पाहिजे होता.? पण काही लोकांचे घोडे वरातीमागून जाते तसे माझे येथे झाले आहे.
सर्वांना नमस्कार. सर्वांना शुभेच्छा.
शाम भागवत.
