Jeevanvidya Discussion Forums
May 23, 2012, 06:40:08 AM *
Welcome, Guest. Please login or register.

Login with username, password and session length
News: Note: New user registration is Enable till 15 Aug 2011
 
  Back to Website   Home   Help Search Login Register  
Pages: [1]   Go Down
  Print  
Author Topic: help me!  (Read 1629 times)
Hrishikesh1
New Contributor
*
Offline Offline

Gender: Male
Posts: 18

you are Builder of your destiny


« on: October 20, 2006, 05:54:00 PM »

sadgurunchya parmeshwar samaj gair samaj pustkat lihile aahe ki Parmeshwar kadhihi avatar ghet nahi.aata bhagvat gita yachya ulat sangate.geetechya 4 chapter madhe bhagvan shree krishna mhanatat ki jevha jevha ya jagat adharm balavato tyaveli dharm sansthapane karata mi avatar gheto.These both are conflit statements.when there are conflict operations on database then transactions cant proceed.same thing here.i am totaly confused? Huh
« Last Edit: October 20, 2006, 05:57:55 PM by Hrishikesh1 » Report to moderator   Logged
dr.nutanpol
Senior Namdharaks
Ultimate Contributor
*
Offline Offline

Gender: Female
Posts: 429



« Reply #1 on: October 21, 2006, 01:20:01 PM »

adgurunchya parmeshwar samaj gair samaj pustkat lihile aahe ki Parmeshwar kadhihi avatar ghet nahi.aata bhagvat gita yachya ulat sangate.geetechya 4 chapter madhe bhagvan shree krishna mhanatat ki jevha jevha ya jagat adharm balavato tyaveli dharm sansthapane karata mi avatar gheto.These both are conflit statements.when there are conflict operations on database then transactions cant proceed.same thing here.i am totaly confused?

अखिल मानवजातीला शांतीसुखाचा राजमार्ग दाखवणाऱ्या अनंत कोटी ब्रम्हांड नायक श्री. सदगुरूंच्या चरणी व त्यांना अखंड साथ देणाऱ्या माईंच्या चरणी कोटी कोटी प्रणाम.

श्री.सदगुरूंनी जे तत्वज्ञान मांडले आहे ते पूर्णपणे तर्कशुध्द आहे तसेच ते अनुभवाच्या कसोटीवर आधारित आहे. ते 'परमेश्वराचे रूप व स्वरूप' या ग्रंथात पश्न क्रमांक १८ चे उत्तर देताना असे म्हणतात की, परमेश्वर हा चैतन्य शक्तीचा विराट सागर असून ही चैतन्य शक्ती सर्वव्यापक आहे. त्याच प्रमाणे दिव्य जाणीव स्वरूप दिव्य नेणीव हे परमेश्वराचे स्वरूप असून विश्वनिर्मितीचे प्रचंड कार्य या परमेश्वराकडून दिव्य जाणीवेच्या अधिष्ठानावर दिव्य नेणीवेद्वारा नेणीवपूर्वक (जाणीव पूर्वक नव्हे) सातत्याने चालत असते.
परमेश्वर हा अवतार घेत नाही.? हे श्री. सदगुरूंनी म्हटले आहे त्याचे स्पष्टीकरणही दिले आहे आणि ते कोणालाही मान्य होईल असेच आहे. परमेश्वराची व्याप्ती एवढी अवाढव्य आहे, तिचा पसारा एवढा मोठा आहे की पुर्ण मानव जात दर्यामे खसखस आहे. एवढया अनंत कोटी आकाशगंगा आकाशात आहेत. अगणित तारे आहेत. पृथ्वीला जेथे विशेष काही स्थान नाही तेथे मानवजातीला काय स्थान असणार? दुसरे असे की परमेश्वर हा जाणीवपूर्वक काहीच करीत नाही तर त्याच्याकडून निसर्ग-नियमांतर्गत? दिव्य जाणीवेच्या आधारावर नेणीव पूर्वक कार्य चालते. जसे केस आपल्या देहाकडून निर्मित होतात, घाम देहाकडून निर्मित होतो अगदी तसेच. परमेश्वर जाणीव पूर्वक कोणतेही कार्य करीत नसल्याने अवतार घेण्याचे कर्तुत्व तरी त्याला कसे घेता येईल?? ?
पण संत जे आत्मज्ञानी असतात ते कृपावंत असल्याने दयेच्या भावनेने विश्वाच्या कल्याणासाठी पुन्हा पुन्हा लोकांचा उध्दार करण्यासाठी पुन्हा पुन्हा जन्म घेतात. त्यांच्या ठिकाणी असणारी जाणीव परमेश्वराशी पूर्णपणे एकरूप असल्याने ते मी परमेश्वर आहे, मी अवतार घेतो असे म्हणाले तर त्यात वावगे असे नाही पण या सर्वाचा संदर्भ लक्षात घेणे गरजेचे आहे.
श्री. सदगुरूनाथ महाराजांना निरामय असे उदंड आयुष्य लाभो व अखिल मानव जात सुखी होण्यासाठी भरपूर कष्ट, प्रयत्न करण्याची सद् बुध्दी आम्हा सर्व नामधारकांना लाभो ही त्यांच्याचरणी तळमळीची प्रार्थना. आम्हा सर्व नामधारकांची मने अखंड तुमच्या विषयीच्या कृतज्ञतेने भरून राहोत अशी तुमच्या चरणी प्रार्थना...

जय सदगुरू जय जीवनविद्या जय नामधारक............
विठ्ठल विठ्ठल.....................
Report to moderator   Logged

Sarve Sukhinha santu! Sarve bhadrani pashyantu!
May Divinity Within All get bloomed!
May God Bless all!
Pages: [1]   Go Up
  Print  
 
Jump to:  

Powered by MySQL Powered by PHP Powered by SMF 1.1.14 | SMF © 2006-2011, Simple Machines LLC Valid XHTML 1.0! Valid CSS!