सद्गुरु श्री वामनराव पै यांची ग्रंथ संपदा
जीवनात सुखी, शांती समधान व आनंद प्राप्त होण्यासाठी मानसाला प्रपंच व परमार्थ या दोन्ही गोष्टींची नितांत आवश्यता आहे. अर्था शिवाय (पैशाशिवाय) प्रपंच फ़ाट्का तर परमर्थाशिवाय पोषक असून यूक्तिने केले तर प्रपंच चांग होतो आणि व परर्माथ सांग होतो. या संबधीचे मार्गदर्शन ग्रंथच्या मर्यादेत जित्के करता येने शक्य आहे तितके या ग्रंथात केले आहे. त्याच प्रामणे जे तळमळीचे खरे साधक आहेत त्यांच्या साधनेला व प्रयत्नांना योग्य ती गती मिळवी हा सुद्धा या ग्रंथाचा हेतु आहे यामध्ये सुखी जीवनाचे पंचशील, सुख दु:ख,सुखाचा शोध,जीवनविद्या ज्ञान म्हणजे आत्मज्ञान साधनेचे रह्स्य व इतर महत्वाचे विषय स्पष्ट केले आहे
आपन जिवन जगत असताना निरनिराळ्या प्रकारचे प्रश्न निर्माण होतात. त्यांची आचुक उत्तरे न निळाल्यास आपण भारकटत जातो, परमेश्वर धर्म संस्कूती, नियती, परमार्थ, पुनर्जन्म,सद्गुरु व साधना नामस्मरण, मनाचे महत्व सुखदु:ख जीवनविद्या,गीतांचे सार,स्त्रीयांच्या संदर्भात वगैरे विषय थोडक्यात पण समर्थपणे हाताळलेले आहेत.१८९ प्रश्नांची उत्तरे बदललेली परिस्थीती व विज्ञानाची प्रगती यांना अनुसरुन दिलेली आहेत.
कस्तुरी मगाच्या सुगंध जसा आसमंतात दरवळत असतो. त्याचप्रमाणे जिवनविद्येच्या सुगंध विश्वमानवाच्या जीवनात सतत दरवळ्त राहुन मानवाला सुखी, समाधानी जीवनाचा आस्वाद सातत्याने अनुभवाला यावा या एकमेव प्रेरणेने या ग्रंथाची निर्मीती करण्यात आली आहे. या ग्रंथामध्ये सद्गुरुनी पारमार्थिक, धार्मिक, सामजिक, व्यवहारीक, राजनैतिक, असे निरनिराळ्या क्षेत्रातल्या विषय हाताललेले असून,या विषयासंबंधी नेमका दृष्टीकोन अत्यंत प्रभाविपणे वाचकांना समजावुन दिलेला आहे. खरा अभिषेक देवाचा अवतार, प्रतिष्ठेचा प्रश्न चुल आणि मुल इत्यादि प्रकरणावर बोधप्रद विचार मांड्लेले आहेत.
सिद्धावस्थेत सद्गुरुंना अनेक अमृत तुशार म्हणजेच सिद्धांत स्फ़ुरले या सर्वे अमृत तुशाराचे संकलन करुन या विषयावर त्यांची विभागनी करुन अतिशय सुत्रबध्द स्वरुपात सद्गुरुंनी या ग्रंथातुन जीवनविद्येचे दर्शन घडवले आहे. प्रतेक विषयाला अमृत तुशारांची पार्श्वभूमी स्पष्ट होण्यासाठी प्रतेकाला एक प्रास्थाविक दिले आहे. लहान मुले ही मतिच्या गोळ्या प्रमाने असुन त्यांना घडविण्यासाठी व योग्य संस्कार करण्यासाठी या ग्रंथातील अमृत तुशार आपल्याला मदत करतील तसेच सर्वांगाने जीवस्पर्शी असल्यामुले आपल्याला दिपस्थंभा प्रमाणे मार्ग्दर्शक ठरतील






















